Marathi Board | MNS Pune | दुकाने व आस्थापनेवरील पाटया मराठीत करा | मनसेचा इशारा 

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

Marathi Board | MNS Pune | दुकाने व आस्थापनेवरील पाटया मराठीत करा | मनसेचा इशारा

 

Marathi Board | MNS Pune | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्णयानुसार पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनेवरील पाटया मराठीत न केलेल्यावर आस्थापनांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्याकडून देण्यात आला आहे.

मनसे ने दिलेल्या निवेदनानुसार पुणे शहरातील व उपनगरातील भागात आपल्या अधिकार क्षेत्रातील दुकाने व आस्थापना वरील पाट्या मराठी भाषेत नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले असून आपल्या शॉप अँड एस्ट्याब्लिशमेन्ट कायद्यातील तरतुदी नुसार दुकाने व आस्थापने वरील पाट्या मराठी भाषेतच असणे बंधनकारक आहे. परंतु अनेक दुकानदार व आस्थापना प्रचलीत कायदेशीर तरतुदींचा सरस भंग करीत आहेत. सदरील बाब अतिशय गंभीर असून आपल्या कार्यालयाकडूनही याकडे डोळेझाक करण्यात येत आहे. आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना आपल्या मराठी भाषेचा अभिमान व आपल्या कर्तव्याचे भान नसल्याचे दिसत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दोन महिन्यांत सर्व पाट्या दुकानदारांनी मराठी स्थानीक भाषेत करावेत या आदेशाची मुदत दिनांक २५ नोव्हेंबर २३ रोजी संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रत्येक प्रांतातील त्या भाषेमध्येच म्हणजे महाराष्ट्रात मराठीतच दुकानावरील पाटया मराठीतच असाव्यात असा निर्णय देण्यात आला तरी सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून आपण आपल्या पुणे शहरातील व उपनगरातील भागात सर्व दुकानदाराना व आस्थापना यांना कायदेशीर तरतुदी नुसार कार्यवाही करण्यात यावी.तसेच सर्व पाट्या मराठी भाषा मोठ्या अक्षरातच आहेत का नाही याची तपासणी करण्यात यावी.

स्थानिक प्रशासनाने तातडीने दुकानदाराना व आस्थापना यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या निष्क्रीय प्रशासनाच्या व सर्व दुकानदाराच्या विरोधात मनसे तिव्र आंदोलन छेडेल याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे.

MNS Pune | Pune Metro | पुणे मेट्रो स्थानकाची नावे छत्रपती शिवाजी महाराज  व महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक करा  | पुणे शहर मनसेची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political पुणे

MNS Pune | Pune Metro | पुणे मेट्रो स्थानकाची नावे छत्रपती शिवाजी महाराज  व महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक करा

| पुणे शहर मनसेची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

MNS Pune | Pune Metro |महाराष्ट्र राज्यात पुणे शहराची ओळख शैक्षणीक,सांस्कृतीक अशी आहे.  या मध्यवर्ती भागातील मेट्रो स्थानकच्या नावात आपला ऐतिहासीक वारसा जपण्याची परंपरा कायम रहावी. याकरिता या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्थानक (Chhatrapati Shivaji Maharaj Metro Station) व मंडई भागातील स्थानकाचे नाव महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक (Mahatma Jyotiba Phule Mandai Station) असेच ठेवण्यात यावे. ऐतिहासिक वारसा परंपरा जपणे हाच मुख्य उद्देश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाच्या नावाची अधिकृत घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS Pune) वतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे करण्यात आली आहे. (MNS Pune | Pune Metro)

मनसे च्या निवेदनानुसार पुण्यात गेल्या दशकात उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा आणि नोकरीच्या संधींमुळे भारताच्या विविध भागांतून स्थलांतरित झालेल्या लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे. शहराचे संशोधन आणि विकास संस्था, आयटी पार्क आणि ऑटोमोबाईल उद्योगांतील नोकरदार, विध्यार्थी घटकांना सुलभ वाहतुकीसाठी शासनाच्या पुणे मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी वाहतूक व्यवस्थेची काळाची गरज ओळखून पुणे मेट्रो प्रकल्प सुरू झाला. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज-1 ,2,3 मध्ये पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात कामगार पुतळा,दिवाणी न्यायालया जवळ स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे प्रशासनाने या स्थानकांची नावे शिवाजी नगर व मंडई अश्या चुकीच्या ऐकेरी नावे केल्यामुळे चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाच्या नावाची अधिकृत घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.


News Title |MNS Pune | Pune Metro | Name the Pune Metro Station Chhatrapati Shivaji Maharaj and Mahatma Jotiba Phule Mandai Station | Demand of Pune City MNS to Municipal Commissioner

PMC Marathi Bhasha Samiti | पुणे मनपा मराठी भाषा संवर्धन समिती कागदावरच | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Marathi Bhasha Samiti | पुणे मनपा मराठी भाषा संवर्धन समिती कागदावरच | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन

PMC Marathi Bhasha Samiti  | मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिकेने (PMC Marathi Bhasha Samiti) ज्या उद्देशाने स्थापन केली ती ध्येय धोरणे कागदावरच राहिलेली असून साहित्यिक उपक्रमला गती देऊ शकले नाही.  याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS Pune) वतीने मनसे नेते बाबू वागसकर (Babu Vagaskar) , शहराध्यक्ष साईनाथ बाबर (city president Sainath Babar), शहर सचिव रमेश जाधव, शहर सचिव रवी सहाणे यांच्या शिष्टमंडळाने नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांना निवेदन दिले. यावेळी विक्रम कुमार यांनी मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासह तिचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविणार असल्याचे आश्वासन दिले. (PMC Marathi Bhasha Samiti)

मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार,मराठी भाषा संवर्धन आणि विकासासाठी मराठा भाषा संवर्धन समितीची स्थापना २०१२साली करण्यात आली. पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) ज्या उद्देशाने स्थापन केली ती ध्येय धोरणे कागदावरच राहिलेली दिसतात .साहित्यिक उपक्रमला अद्याप गती देऊ शकले नाही. महापालिका प्रशासन व पदाधिकारी मराठी भाषेच्या संदर्भात उदासीन असल्याचे दिसते. मराठी भाषा संवर्धन समितीला सद्यस्थितीत पूर्ण वेळ कार्यालय नाही समितीसाठी कार्यालय व स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी नेमावे. गेल्या दोन तीन वर्षांपासून राहिलेले समितीतर्फे देण्यात येणारे साहित्य पुरस्कार द्यावे. साहित्यिक कट्टयावरील साहित्यिक कार्यक्रमात निमंत्रित पाहुण्यांनाफक्त ५००रुपये मानधन दिले जाते. मानधन २०००रुपये द्यावे.साहित्यिक कट्टयावरील समन्वयक कवी, लेखकांना समितीच्या बैठकिला निमंत्रित करावे.मराठीचा प्रचार प्रसार होण्यासाठी शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संपर्कदूत म्हणून नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, क्षेत्रिय कार्यालयांमध्ये एक अधिकारी समन्वयक म्हणून काम करणार होते. हा उपक्रमाची अंबलबजावणी करावी, साहित्यिक उपक्रम आयोजन सातत्याने करावे आदि मागणीचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. (Maharashtra Navnirman Sena Pune)


News Title | PMC Marathi Bhasha Samiti | Pune Municipality Marathi Language Conservation Committee only on paper Statement to the Commissioner on behalf of Maharashtra Navnirman Sena

 

MNS | PMC Election | 1 हजार लोकांमागे १ राजदूत | पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसे ची जोरदार तयारी 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

1 हजार लोकांमागे १ राजदूत | पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसे ची जोरदार तयारी

| 3500 राजदूत नेमले जाणार

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे  सज्ज झाली आहे. पुण्यासाठी मनसेकडून रणनिती आखली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी राजदूत नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार 3500 राजदूत नेमले जाणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत पदाधिकारी आणि पक्षाच्या सचिवांची बैठक पार पडली आहे. पुण्यात मनसे 3500 राजदूत नेमणार आहे. पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरीक आणि मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मनसेने राजदूत ही नवी संकल्पना आणली आहे. या उपक्रमातून मनसे पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लवकरच राजदूतांची नेमणूक करण्यात येईल. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यात मेळावा होईल. या मेळाव्यानंतर लगेच आगामी पुण्याच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भव्य सभा देखील घेतली जाण्याची शक्यता आहे.

पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना राजदूत नेमण्याबाबत सूचना केल्या आहेत. मनसेच्या संघटनात्मक पातळीवरच्या विभागनिहाय नेमणुका करण्यात येणार आहेत. दरहजारी मतदारांच्या मागे एक राजदूत नेमण्यासाठी आवश्‍यक तयारी करण्यात येत असल्याचे शहराध्यक्ष बाबर यांनी सांगितले.

राजदूताची नियुक्ती झाल्यानंतर त्याने संबंधित भागात पक्षाची ध्येय धोरणे यांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. शिवाय या अगोदर तिथे पक्षाच्या नगरसेवकाने केलेली कामे, लोकांपर्यंत पोचवायची आहेत.

साईनाथ बाबर, शहर अध्यक्ष, मनसे, पुणे.

MNS : Police Commissioner : जनजागृती अभियान कार्यक्रम हाती घेऊन पुणे शहरातील ध्वनिप्रदूषण थांबवा : मनसेची पोलिस आयुक्तांकडे मागणी

Categories
Breaking News Political पुणे

जनजागृती अभियान कार्यक्रम हाती घेऊन पुणे शहरातील  ध्वनिप्रदूषण थांबवा

: मनसेची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पुणे : पुणे शहरातील अनेक धार्मिकस्थळांवर बेकायदेशीर  लाऊडस्पीकर लावण्यात आलेले आहेत त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नागरिकांनी फोन, व्हाट्सएप, मेल अथवा पत्र पाठवून कळविले तरी आपण गंभीर दखल घेऊन त्याबाबतीतही  योग्य ती  कार्यवाही करावी. तसेच ध्वनिप्रदूषणाच्या विषयी पुणे पोलिसांकडून जनजागृती अभियान कार्यक्रम हाती घेऊन पुणे शहरातील
ध्वनिप्रदूषण थांबवावे, अशी मागणी शहर मनसे कडून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन देखील दिले आहे.
मनसेच्या शिष्टमंडळाचे पोलीस आयुक्तांना निवेदन
शहर मनसेच्या निवेदनानुसार राजसाहेब ठाकरे यांनी सातत्याने आवाज उठवत सर्वसामान्य जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या भोंग्या  बाबत मनसे ची भूमिका मांडली आहे . या भूमिके नुसार व सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाचा कायदा सन 1986 व ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 मधील तरतूदींचे सक्त पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानूसार रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये वाजविण्यास सक्त बंदी केलेली आहे.
 तसेच सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सुध्दा लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये इत्यादी मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत.
ध्वनिप्रदूषणाचा त्रास हा लोकांच्या आरोग्यालाही होतो. त्याचे दुष्परिणाम खूप आहेत. ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने वारंवार दिल्यानंतरही पुणे पोलिसांकडून सक्त कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे शहरातील ध्वनिप्रदूषणाला चाप लावण्यासाठी काय करणार, असा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. या विषयी  कृती आराखडाच आता उच्च न्यायालयाने मुंबई पोलिस आयुक्तांकडे मागितला असल्याचे समजते. अशी वेळ पुणे पोलीसांवर येऊ नये  पोलिसांच्या या कारवाई दिरंगाईबद्दल सर्वसामान्यांमध्येही नाराजी आहे.
ध्वनिप्रदूषणाचाअत्यंत गंभीर प्रश्न असून ध्वनिप्रदूषणाच्या बाबतीत पोलिसांकडून अजूनही अपेक्षेप्रमाणे कार्यवाही होताना दिसत नाही . फोनवरील तक्रारीची तात्काळ दखल घेऊन कारवाई केली जातानाही पाहायला मिळत नाही. आता न्यायालयाच्या दट्ट्यानंतर तरी पोलिस या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन कार्यवाही करावी अशी सामान्य जनतेची  अपेक्षा आहे. पुणे शहरातील अनेक धार्मिकस्थळांवर बेकायदेशी लाऊडस्पीकर लावण्यात आलेले आहेत त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नागरिकांनी फोन, व्हाट्सएप, मेल अथवा पत्र पाठवून कळविले तरी आपण गंभीर दखल घेऊन त्याबाबतीतही  योग्य ती  कार्यवाही करावी. तसेच ध्वनिप्रदूषणाच्या विषयी पुणे पोलिसांकडून जनजागृती अभियान कार्यक्रम हाती घेऊन पुणे शहरातील
ध्वनिप्रदूषण थांबवावे. असे मनसेच्या वतीने निवेदनात म्हटले आहे.

MNS : Sainath Babar : पुण्यात उद्या हनुमान चालीसा लावणारच  : मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचा इशारा 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुण्यात उद्या हनुमान चालीसा लावणारच 

: मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचा इशारा 

पुणे : मशिदींवरील भोंगे उतरवण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘३ मे’ चा अल्टिमेटम दिला होता. जर भोंगे उतरवले गेले नाही तर उद्या बुधवारी चार मे पासून मशिदींसमोर जोऱ्यात हनुमान चालीसा लावला जाईला, अशा इशारा राज यांना दिला होता. मनसेचे (MNS) पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी हनुमान चालीसा लावणारच असे ट्विट करुन सांगितले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, पुण्यात (Pune) उद्या हनुमान चालीसा लावणारच तयारीत रहा.

दुसरीकडे आज मंगळवारी (ता.तीन) मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आले आहेत. तसेच राज्यातील पक्षाचे पदाधिकाऱ्यांवर कारवाई सुरु करण्यास पोलिसांनी सुरु केले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्यावर दाखल कलमांवरुन सरकारवर टीका केली.

Sainath Babar : MNS : Pune : पुणे मनसेचे नवे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर! : वसंत मोरे यांना पदावरून हटवले  : मोरे यांनी बाबर यांचे केले अभिनंदन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे मनसेचे नवे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर!

: वसंत मोरे यांना पदावरून हटवले

: मोरे यांनी बाबर यांचे केले अभिनंदन

पुणे : मनसे पुणेत नवा बदल करण्यात आला आहे. मशिदीवरील भोंगे काढण्याच्या राज ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना पदावरून हटवण्यात आले असून त्यांच्या जागी माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान मोरे यांनी ट्विटर वरून नवे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचे अभिनंदन केले आहे.

गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याची मागणी केली होती. त्यावर राज्य तसेच देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनीही यास विरोध केला होता. पक्षाचे पुण्यातील शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीदेखील या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत मला माझ्या प्रभागात शांतता हवी, असल्याचे म्हटले होते.

गेले दोन-चार दिवस या विषयावर पक्षात वाद सुरू होता. या पाश्‍र्वभूमीवर पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांनी आज मुंबईत बोलावले होते. राज ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर वसंत मोरे यांना पदावरून हटवत माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची नवे शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे आज दुपारी जाहीर करण्यात आले.

माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ”सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असेही वसंत मोरे यांनी म्हटले होते.

दरम्यान वसंत मोरे यांनी spirit दाखवत नवे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचे अभिनंदन केले आहे. मोरे यांनी बाबर यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे कि, “अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे ” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई!

Maharashtra Navnirman Sena : भोंग्यावरून मनसेत दोन मतप्रवाह!

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भोंग्यावरून मनसेत दोन मतप्रवाह!

पुणे : मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवून अजानला विरोध केला जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसेच्या पुण्यातील एका मुस्लिम कार्यकर्त्याने पक्ष सोडला आहे. तर खुद्द शहर अध्यक्ष वसंत मोरे देखील नाराज आहेत. तर दुसरीकडे पदाधिकारी म्हंणतात कि राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा. यामुळे शहर मनसेत दोन मतप्रवाह झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी मशिदींमध्ये अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर थांबवावा, अशी मागणी राज्य सरकारला केली. तसेच प्रतिकार म्हणून हनुमान चालिसा लावा, असा आदेशही कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र त्याला विरोध होताना दिसत आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) धार्मिकवादामुळे आपण राजीनामा दिल्याचे शाखा अध्यक्ष माजीद शेख यांनी सोमवारी सांगितले. शेख म्हणाले की, राज ठाकरे राज्याच्या विकासाच्या गप्पा मारायचे, पण आता ते राजकारणासाठी जाती-धर्माचा आधार घेत आहेत.

वास्तविक पाहता भाषणात राज ठाकरे यांनीच जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडण्याचे आवाहन केले. मात्र त्याचवेळी आपण धर्माचं राजकारण करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे त्यांची जात आणि धर्मसंदर्भातील भूमिका एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवण्यासारखी असल्याचं अनेकांना वाटत आहे.

 

दरम्यान पुण्यातील मनसे नेते आणि शहर अध्यक्ष वसंत मोरे हे देखील राज ठाकरे यांच्या नव्या आदेशामुळे संभ्रमात असल्याचं दिसून येत आहे. ते म्हणाले की, माझ्या आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत होईल. तसेच मी माझ्या प्रभागात शांतता कशी राहील याचा प्रयत्न करणार. कोणीही वेगळा प्रयत्न करणार नाही. मात्र मलाच कळेना झाले आहे, मी काय भूमिका घ्यावी, असा संभ्रम वसंत मोरे यांनी बोलून दाखवला.

तर साईनाथ बाबर यांनी आपण नाराज नसल्याचे म्हटले आहे. तर मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी म्हटले आहे कि, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश अंतीम, होय आम्ही हिदूच ! वैयक्तिक भूमिकेला पक्षात स्थान नाही. यामुळे मनसेत आता दोन मतप्रवाह असल्याचे स्पष्ट झाले आहे.