Clean Toilet Challenge | टॉयलेटसेवा अॅप सत्र २ ची सुरुवात उद्यापासून | घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची माहिती  

Categories
Uncategorized

Clean Toilet Challenge | टॉयलेटसेवा अॅप सत्र २ ची सुरुवात उद्यापासून | घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची माहिती

Clean Toilet Challenge | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) व टॉयलेटसेवा (Toilet Seva) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील उपलब्ध सार्वजनिक शौचालयाची ठिकाण सुविधांसह माहिती देणाऱ्या टॉयलेटसेवा अॅप सत्र २ (Toilet Seva App 2) ची सुरुवात उद्यापासून करण्यात येणार आहे. महापालिकेचे स्वच्छता ब्रॅन्ड अॅम्बेसिडर डॉ. सलील कुलकर्णी (Dr Saleel Kulkarni) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम (Sandip Kadam PMC) यांनी दिली. (PMC Solid Waste Management Department)

पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता व सोयीसुविधांबाबत अधिक प्रमाणात जनजागृती होणेकरीता श्री. अमोल भिंगे यांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांची ठिकाणे शोधणे, वापरानंतर त्या शौचालयास Feedback देणे किंवा तक्रारी नोंदविणे इ. सुविधा उपलब्ध असलेले Toilet Seva app तयार केले असून या App द्वारे टॉयलेट्स search करणे, टॉयलेट add करणे, ओव्हरऑल रेटिंग नुसार results sort करणे, टॉयलेटमध्ये असणाऱ्या सुविधा पहाणे किंवा त्यानुसार search results थे filtering करणेz उदाहरणार्थ – वॉशबेसिन, पाणी, liquid soap किंवा sanitizer, इस्टबिन, lights, महिलांसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन्स, टॉयलेट कुठे लोकेटेड आहे हे तपासणे अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण १९८३ सार्वजनिक स्वच्छतागृहांची (public टॉयलेट्स community टॉयलेट्स) माहिती टॉयलेटसेवा app मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही माहिती शहरातील नागरिक तसेच प्रवास करणाऱ्यांना उपयोगी पडणार आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांविषयी
नागरिकांना आपला अभिप्राय टॉयलेटसेवा app मधून रेटिंग्सच्या मार्फत देणे आणि आपल्या तक्रारी नमूद करणे सोयीचे होणार आहे. दिनांक २२/०६/२०२३ रोजी  महापालिका आयुक्त यांचे शुभहस्ते या Toilet
घे लॉचिंग करण्यात आली होती व ते नागरीकांना वापरासाठी खुले करण्यात आले होते.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत Clean Toilet Challenge २०२३ च्या अनुषंगाने आवश्यक कामकाज करणेविषयी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सुरक्षित स्वच्छतेसाठी वेगवान बदल करणेकरिता Clean Toilet Challenge प्रक्षेपित करण्यात आले आहे. या अंतर्गत पाच आठवड्यांचा (१९ नोव्हेंबर (२०२३ ते २५ डिसेंबर २०२३) संपूर्ण शहरभर सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांचे मोठ्या प्रमाणावर सामूहिक स्वच्छता व देखभाल दुरुस्ती अभियान राबविण्यात येणार आहे. शौचालयांचे वापरकर्त्यांना अपेक्षित सेवा सुविधा देणे व उत्कृष्ठ शौचालयांना सर्वज्ञात करणे असे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
सध्या सुरू असणारया Clean Toilet Challenge २०२३ च्या अनुषंगाने Toilet Seva App च्या माध्यमातून शौचालय प्रतवारी करून शहर पातळीवर स्वच्छ शौचालाय स्पर्धा राबविल्यास शौचालय व्यवस्थापन अधिक सक्षमपणे होऊन नागरिकांना योग्य सोयीसुविधा देण्यात येतील. याकरिता स्वच्छ शौचालय स्पर्धा संपूर्ण शहरभर राबविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेमध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातून उत्कृष्ट पाच शौचालयांपैकी एका शौचालयाची निवड अंतिम फेरीकरिता केली जाणार आहे. शहर पातळीवर
या १५ शौचालयांमधून तीन उत्कृष्ट शौचालय निवडले जातील. सदर स्पर्धेचा कालावधी ०१ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ असा असणार आहे. एकूण १०० गुणांकरिता Toilet Seva App Rating / मानांकन ३० गुण, Toilet Seva App वापर ३० गुण व प्रत्यक्ष निरीक्षण (FACES Parameters / मापदंड)- ४० गुण हे स्पर्धेचे निकष असतील.
स्पर्धेचे परीक्षण करण्याकरीत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्रत्येकी एक अश्या एकूण १५ समिती व मुख्य खात्याच्या स्तरावर केंद्रीय समिती कार्यरत असतील. केंद्रित स्तरावर अपेक्स कमिटीचे सदस्य पत्रकार,
स्वयं सेवी संस्था प्रतिनिधी, नागरिक प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी, सफाई कर्मचारी आयोग प्रतिनिधी इत्यादी सदस्य असणार आहेत व विकेंद्रित स्तरावर मोहल्ला कमिटी सदस्य, स्वयं सेवी संस्था प्रतिनिधी नागरिक प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी इत्यादी सदस्य असणार आहेत. महापालिका सहाय्यक आयुक्त क्षेत्रीय स्तरावरील समितीचे अध्यक्ष राहतील व मुख्य खात्याच्या स्तरावर केंद्रीय समिती चे अध्यक्ष उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन असणार आहेत. परीक्षणाबाबत सदस्यांमध्ये मतभिन्नता अढळल्यास अंतिम निर्णय अध्यक्षांचा असेल.
या स्पर्धेची व Toilet Seva App च्या दुसऱ्या पर्वाची सुरवात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित उद्या .स्वच्छता ब्रॅन्ड अॅम्बेसिडर डॉ. सलील कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागातील निरीक्षकांचे मनोबल वाढवण्यासाठी आता चारचाकी गाड्या | अस्वच्छता करणाऱ्यांवर होणार ठोस कारवाई

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागातील निरीक्षकांचे मनोबल वाढवण्यासाठी आता चारचाकी गाड्या

| अस्वच्छता करणाऱ्यांवर होणार ठोस कारवाई

PMC Solid Waste Management | पुणे | महापालिकेच्या घनकचरा विभागाने (PMC Pune Solid Waste Management Department) शहरात स्वच्छता टिकून राहावी, यासाठी गंभीरपणे पाऊल उचलले आहे. शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना विभागातील कर्मचाऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या दिमतीला चारचाकी गाड्या देण्यात येणार आहेत. या माध्यमातून शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर होणार ठोस कारवाई करण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात 4 गाड्या घेण्यात येणार आहेत. त्यासाठी 34 लाखाचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandip Kadam) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)
पुणे शहरात घनकचरा विभागाच्या माध्यमातून स्वच्छता करण्याचे काम केले जाते. शहरात दररोज 2300 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यातील 1700 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. दरम्यान स्वच्छतेबाबत शहरातील लोक मात्र उदासीन दिसून येतात. उघड्यावर कचरा फेकण्याचे प्रमाण जास्तच आहे. त्यासाठी घनकचरा विभागाच्या माध्यमातून लोकांना दंड केला जातो. मात्र तरीही काही लोकांची उदासीनता दिसून येते. कारवाई करण्याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांच्या मर्यादा दिसून येतात. ही बाब लक्षात घेत घनकचरा विभागाने निरीक्षकांचे मनोबल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना दंडात्मक कारवाईचे अधिकार आहेतच; मात्र ही कारवाई प्रभावीपणे करण्यासाठी त्यांच्या दिमतीला आता चारचाकी गाड्या देण्यात येणार आहेत. (PMC Pune News)
याबाबत उपायुक्त कदम यांनी सांगितले कि एकूण 18 गाड्या घेण्यात येणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी 1 आणि व्हिजिलन्स साठी तीन अशा 18 गाड्या घेण्यात येणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात 4 गाड्या घेण्यात येणार आहेत. एका गाडीसाठी साधारणतः साडे आठ लाख खर्च अपेक्षित आहेत. 4 गाड्यांचा खर्च 34 लाख इतका येणार आहे. हा खर्च आतापर्यंत जो दंड जमा झाला आहे. त्यातूनच घेतल्या जाणार आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या या गाड्या GeM पोर्टल वरून घेण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.
कदम यांनी सांगितले कि शहरात गस्त घालणे आणि दंडात्मक कारवाई करण्यासाठी या गाड्या उपयुक्त ठरणार आहेत. एका गाडीत 4 कर्मचारी असतील. सहायक आयुक्त आणि विभागीय निरीक्षक ठरवतील हे चार लोक कोण असणार ते. दिवस आणि रात्री अशा दोन्ही वेळा या गाड्या शहरातून फिरतील. लोकांनी उघड्यावर कचरा आणि राडारोडा फेकू नये, तसेच स्वच्छतेबाबत शिस्त लावण्यासाठी याचा उपयोग होईल. तसेच कर्मचाऱ्यांना देखील अधिकार आल्याने लोक त्यांना घाबरतील आणि नियमांचे पालन करतील.
या चारचाकी गाड्यांच्या माध्यमातून आपल्या सेवकांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे.  दंडात्मक कारवाई करताना आता जो विरोध तो  विरोध कमी होईल आणि ठोस कारवाई होईल. जेणेकरून लोकांना शिस्त लागेल आणि शहरात स्वच्छता टिकून राहिल. कारण बरेच लोक रात्रीच्या वेळी हायवे वर कचरा टाकत असतात. त्याला या माध्यमातून आळा घालता येईल. तसेच गर्दीच्या ठिकाणी या माध्यमातून स्वच्छते बाबत जनजागृती करता येईल.
संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग. 
—-

PMC Solid Waste Management Department | शहरातील वर्दळीच्या तसेच कमर्शियल भागात स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती | घनकचरा व्यवस्थापन विभागाचा निर्णय

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management Department | शहरातील वर्दळीच्या तसेच कमर्शियल भागात स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती

| घनकचरा व्यवस्थापन विभागाचा निर्णय

PMC Solid Waste Management Department | पुणे | पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने (PMC Pune Solid Waste Management Department) शहरातील स्वच्छतेवर (Sanitation) चांगलाच जोर दिला आहे. शहरात वर्दळीची तसेच कमर्शियल (Commercial Areas) असणारी बरीच ठिकाणे आहेत. या ठिकाणी कचरा देखील जास्त होतो. त्यामुळे दुपारच्या सत्रात म्हणजेच सायंकाळी 4 ते 12 या कालावधीत अतिरिक्त कमर्चारी देऊन स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 15% कर्मचारी तैनात करण्याचे आदेश उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandip Kadam) यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. तसेच सर्व आरोग्य निरीक्षकांनी त्याचा अहवाल देण्याचे आदेश देखील कदम यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation)
उपायुक्त कदम यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालय स्तरावर शहराची दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी कायम स्वरूपी व कंत्राटी/कायम पद्धतीने सफाई सेवक कार्यरत आहेत. या सर्व सफाई सेवकांमध्ये एकसंधता दिसण्यासाठी, सफाई सेवकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व सफाई सेवकांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजा दरम्यान गणवेष, अॅप्रन व ओळखपत्र परिधान करतील याची दक्षता सर्व आरोग्य निरीक्षकांनी घ्यावयाची आहे. तसेच कंत्राटी पद्धतीने काम करणा-या सेवकांना देखील गणवेष, अॅप्रन, सुरक्षा प्रावरणे व ओळखपत्र संबंधीत ठेकेदाराकडून पुरविले जाईल व सेवक त्याचा वापर करतील याची दक्षता सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी घ्यावयाची आहे. (PMC Pune)
क्षेत्रीय कार्यालयांतर्गत (नवीन समाविष्ट गावांसहित) नेमणूक करण्यात आलेल्या कंत्राटी/कायम सेवकांकडून सायंकाळी ०४.०० ते रात्री १२.०० या दुसऱ्या पाळीमध्ये कामकाज करुन घेणे तसेच कंत्राटी सुपरवायझर/कायम मोकादाम यांनी कामकाज करुन घेतल्याबाबत वेळोवेळी कामकाजाचे फोटोग्राफ्स सादर करायचे आहेत. त्याचप्रमाणे आवश्यक त्या वर्दळीच्या ठिकाणी व कमर्शियल भागामध्ये दुपारचे सत्रात १५% कंत्राटी/कायम सेवकांकडून कामकाज करून घेणेबाबतची कार्यवाही करणेबाबत संबंधिताना सूचित करण्यात यावे. असे म्हटले आहे. (PMC Pune News)
ज्या ठिकाणी मेकॅनिकल स्वीपिंग करण्यात येते अश्या ठिकाणां व्यतिरिक्त ठिकाणी सेवकांमार्फत कामकाज करून घेण्यात यावे. याबाबत कटाक्षाने दक्षता घेण्यात यावी. सर्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांनी वर नमूद केल्यानुसार कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल महापालिका सहायक आयुक्त यांचेमार्फत घनकचरा व्यवस्थापन विभागास सादर करावा. असेही आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation Marathi News)
——-

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेने संकलित केल्या शेकडो गाद्या, उशा, चिंध्या | वस्तू संकलन महाअभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

Categories
Uncategorized

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेने संकलित केल्या शेकडो गाद्या, उशा, चिंध्या | वस्तू संकलन महाअभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

PMC Solid Waste Management Department | पुणेकरांना वस्तू संकलन महाअभियानात सहभागी होणेविषयी पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. या मध्ये संपूर्ण १५ क्षेत्रीय कार्यालय (PMC 15 Ward Offices) मार्फत करण्यात आलेले गाद्या ची संख्या २६९ व अंदाजे वजन ४१६८ किलो, उश्या ची संख्या ३३७ व अंदाजे वजन ७०१ किलो, चिंध्यांचे वजन ५६३० किलो, फर्निचर ची संख्या ४९२ व अंदाजे वजन ९१८८ किलो आणि ई-कचरा एकूण २६० किलो गोळा करण्यात आला. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandeep Kadam) यांनी दिली. (PMC Pune)

दसरा दिवाळी व विविध सण समारंभाच्या पार्श्वभूमीवर घरातील जुन्या वस्तू, फर्निचर बदलले जातात. त्याचप्रमाणे गाद्या, उश्या यांचा कचरासुद्धा मोठ्या प्रमाणावर साठून राहतो. अश्या प्रकारची साहित्य सामुग्री इतःस्ततः पडू नये याकरिता या निरुपयोगी वस्तू गोळा करून पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) सिस्टीममध्ये आणणे व त्यावर थ्री आर ( RRR Reduce, Reuse, and Recycle) संकल्पना राबविणे आवश्यक आहे. याकरिता पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने विविध प्रकारच्या निरुपयोगी वस्तूंच्या संकलनाचे महाअभियान राबवीण्यात येत आहे. (PMC Pune News)

या अनुषंगाने  आज चिंध्या, उश्या, गाद्या व फर्निचर संकलन मोहीम आयोजित करण्यात आलेली होती. याकरिता प्रत्येक प्रभागनिहाय किमान ०२ आरोग्य कोठ्यांची जागा निश्चित करून एकूण ९१ ठिकाणी दि. १४/१०/२०२३ रोजी स.१०:०० ते दु ०४:०० या वेळेत सदर वस्तू गोळा करण्यात आल्या व तदनंतर निश्चित केलेल्या ठिकाणी या वस्तूंची वाहतूक करण्यात आली.
पंधरा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ९१ संकलन केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. या संकलनाच्या केंद्राबाबतची सविस्तर माहिती पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईट व सोशल मिडीयावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. वरील सर्व मोहिमांना अनुकूल प्रतिसाद मिळणेकरिता, नागरिक, मोहल्ला कमिटी सदस्य, स्वयंसेवी संस्था यांचेमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.
या ठिकाणांबाबत जास्तीत जास्त नागरिकांना अवगत करून या महाअभियानात सहभागी होणेविषयी पुणे महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात आले. या आवाहनाला पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. या मध्ये संपूर्ण १५ क्षेत्रीय कार्यालय मार्फत करण्यात आलेले गाद्या  ची संख्या २६९ व अंदाजे वजन ४१६८ किलो, उश्या ची संख्या ३३७ व अंदाजे वजन ७०१ किलो, चिंध्यांचे वजन ५६३० किलो, फर्निचर ची संख्या ४९२ व अंदाजे वजन ९१८८ किलो आणि ई-कचरा एकूण २६० किलो गोळा करण्यात आला. आयुक्त श्री. विक्रम कुमार, मा अतिरिक्त आयुक्त (इ) डॉ कुणाल खेमनार आणि उप आयुक्त संदीप कदम घनकचरा व्यवस्थापन
कार्यालय यांच्या मार्गदर्शना खाली ही महाअभियान राबविण्यात आले. सदर महाअभियाना मध्ये सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी, मोहल्ला कमिटी सदस्य, नागरिक व इतर संस्थानी सहभाग नोंदविला.

Solapur Road Traffic | सोलापूर रस्ता घेणार मोकळा श्वास | वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील

Categories
Breaking News PMC social पुणे

सोलापूर रस्ता घेणार मोकळा श्वास | वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील

| अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पथ विभागाकडून रस्त्याची पाहणी 
पुणे | शहरातील सोलापूर रस्ता (Solapur road) हा वरचेवर वाहतुकीसाठी फारच अडचणीचा ठरू लागला आहे. हडपसर (Hadapsar) पर्यंत तर वाहतूक कोंडीचा (Traffic) नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पुणे महापालिका (Pmc Pune) प्रशासन प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional commmissioner vikas Dhakne) यांच्या नेतृत्वाखाली पथ विभागाकडून या रस्त्याची पाहणी करण्यात आली. अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.
सोलापूर रस्ता हा रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या रस्त्यावरून छोट्या तसेच मोठया वाहनांची देखील वर्दळ पाहायला मिळते. कारण याच रस्त्यावरून सोलापूर, बारामती, सासवड अशा ठिकाणी नागरीक ये जा करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने असतात. ज्यामुळे कोंडी हा नित्याचा भाग होऊन बसला आहे. या रस्त्याला मोकळा श्वास घेता यावा आणि नागरिकांसाठी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी महापालिकेच्या पथ विभागाकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याचाच प्राथमिक भाग म्हणून अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पाहणी करण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, झोनल उपायुक्त संदीप कदम, क्षेत्रीय अधिकारी आणि मनपा पथ विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation)
सोलापूर रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महारपट्टा चौक  तसेच सासवड रोड वरील अतिक्रमणे काढली जाणार आहेत. तसेच फुटपाथ दुरुस्ती केली जाणार आहे. ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी आधी सर्वेक्षण केले जाईल. पहिल्या टप्प्यात भैरोबा नाला ते गोळीबार मैदान या दरम्यानचे तिथले नियोजन केले जाईल. इथे रहदारी फार असते. तो सोडवण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. परिसरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यांना विश्वासात घेत वाहतूक सुरळीत करण्यासठी विशेष प्रयत्न करावेत. असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. अशी माहिती दांडगे यांनी दिली.
रस्त्याची पाहणी करत असताना सायकल ट्रॅक वर बसेस उभा असणे, त्यावरून टू व्हीलर जाणे, यामुळे सायकल ट्रॅक चा  उपयोग होत नाही. ट्रॅक चा व्यवस्थित उपयोग करण्याच्या दृष्टीने  नियोजन सुरु करण्यात येणार आहे. असे ही दांडगे यांनी सांगितले.