PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेने 1 ऑक्टोबर पासून नागरिकांकडून 20 लाखांचा दंड केला वसूल | वाचा सविस्तर

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेने 1 ऑक्टोबर पासून नागरिकांकडून 20 लाखांचा दंड केला वसूल | वाचा सविस्तर

PMC Solid Waste Management Department | पुणे | पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने सार्वजनिक जागी थुंकणे, कचरा जाळणे, अस्वच्छता करणे, अशा कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. विभागाने ही कारवाई गंभीरपणे सुरु केली आहे. 1 ऑक्टोबर पासून सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून 20 लाख 18 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandip Kadam) यांनी दिली. दरम्यान दंड करणे नाही तर स्वच्छते बाबत जनजागृती करणे हा महापालिकेचा उद्देश असून नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त कदम यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation)
पुणे महापालिकेने सार्वजनिक जागी स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता उपविधी तयार केली आहे. त्या नियमानुसार अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांस दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये सार्वजनिक जागी थुंकणे, लघवी करणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण न करणे, नदीत राडारोडा टाकणे, अशा गोष्टींचा समावेश आहे. यासाठी 180 रुपयापासून ते 5 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. यानुसार महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही कारवाई 2 ऑक्टोबर पासून सुरु केली आहे. (PMC Pune)
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबद्दल 152 लोकांकडून 1 लाख 52 हजार दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्या 71 जणांकडून 15800 रुपये वसूल केले. कचरा जाळणाऱ्या 125 लोकांकडून 61980 रु वसूल करण्यात आले. कचऱ्याचे वर्गीकरण न केल्याबद्दल 237 लोकांकडून 75790 रुपये वसूल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या 4038 लोकांकडून 10 लाख 6 हजार रुपये वसूल करण्यात आले. बल्क वेस्ट जनरेटर कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद बाबत 7 लोकांकडून 35 हजार वसूल केले. बांधकाम राडारोडा टाकणाऱ्या 25 लोकांकडून 1 लाख 2 हजार 500 वसूलण्यात आले. 71 लोकांवर प्लास्टिक कारवाई करत 3 लाख 60 हजार वसूल करण्यात आले. अशा एकूण 4743 लोकांवर दंड ठोठावत महापालिकेने 20 लाख 18 हजार 980 रुपये वसूल केले. (Pune Municipal Corporation)
——
या अभियानाचा उद्देश हा लोकांमध्ये स्वच्छते बाबत जनजागृती करणे हा आहे. त्यानुसार लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हांला मिळू लागला आहे. तरीही स्वच्छेबाबत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आमचे आवाहन आहे. कारण महापालिकेचा दंड वसूल करणे हा हेतू नसून फक्त जनजागृतीवर भर राहणार आहे.
संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका. 

SHS 2023 | PMC Pune | पुणे महापालिकेच्या मेगा ड्राईवमध्ये ३५० ठिकाणी ३ लाख ६२ हजार नागरिकांमार्फत श्रमदान | ६५ हून अधिक संस्था सहभागी 

Categories
Breaking News PMC social पुणे

SHS 2023 | PMC Pune | पुणे महापालिकेच्या मेगा ड्राईवमध्ये ३५० ठिकाणी ३ लाख ६२ हजार नागरिकांमार्फत श्रमदान | ६५ हून अधिक संस्था सहभागी

| स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा (SHS) २०२३ अंतर्गत  मेगा ड्राईवचे  आयोजन

SHS 2023 | PMC Pune |राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित (Mahatma Gandhi Jayanti)  आदरांजली वाहण्याकरीता  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ०१ ऑक्टोबर रोजी स्वच्छतेकरीता सर्व नागरिकांनी १ तास श्रमदान करावे असे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने ०१ ऑक्टोबर रोजी स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा (SHS) २०२३ अंतर्गत पुणे शहरात पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) स्वच्छता मेगा ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.  ड्राईवमध्ये ३५० ठिकाणी ३,६२,००० नागरिकांमार्फत श्रमदान केले. तर ६५ हून अधिक संस्था सहभागी  झाल्या होत्या. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (PMC Deputy Commissioner sandeep Kadam) यांनी दिली. (PMC Solid Waste Management Department)

https://swachhatahiseva.com/. या संकेतस्थळावर ३५० event करण्यात आले शहरातील विविध शैक्षणिक संस्था, युवा क्लब, NCC NSS, NYKS, RWAs, कॉर्पोरेट कंपन्या, नागरिक इत्यादिंचा यशस्वी सहभाग (६५ हून अधिक संस्था सहभाग)
– पुणे शहरात ३५० ठिकाणी ३,६२,००० नागरिकांमार्फत श्रमदान
-एकूण ९८ टन कचरा गोळा करण्यात आला. (६१ टन सुका व ३७ टन ओला कचरा)
-५५ हून अधिक मान्यवर मा. पालक मंत्री, Celebrity, पदाधिकारी, मा. आयुक्त विविध उच्च अधिकारी, स्वच्छता Brand Ambassador व विविध संस्थाचालक/ प्रतिनिधी उपस्थित होते.
-१५/०९/२०२३ रोजी पासून पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण महत्वाचे रस्ते, विविध वारसा स्थळे, शहरातील उद्याने, टेकड्या, पुणे शहरातील विविध नदी घाट इ. ठिकाणी स्वच्छता मोहीम, नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी श्रमदान, स्वच्छता ड्राईव्ह राबविण्यात आला.
• महानगरपालिकेच्या चतुर्थ क्षेणी कामगारांचे आरोग्य तपासणी, सफाई मित्र सुरक्षा शिबीर, तसेच कर्मचारीयांना सरकारी योजनाची माहिती पर शिबीर आयोजित करण्यात आले होते.
•  ३०.०९.२०२३ रोजी पुणे महानगरपालिका सायकल क्लबमार्फत जनजागृतीपर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३५० हून जास्त सायकलस्वार सहभागी झाली होते.
●  १.१०.२०२३ रोजी भिडे पूल याठिकाणी आयोजित मुख्य कार्यक्रम व इतर सर्व स्वच्छता क्षमदान कार्यक्रम पूर्णपणे Zero Waste Event म्हणून राबविण्यात आले. या मध्ये कापडी बॅबर, Recyclable बॅनर द्वारे प्रचार प्रसार करण्यात आला. त्याच प्रमाणे Single Use Plastic व Plastic PET Bottle चा वापर पूर्णपणे टाळण्यात आला.

• सदर कार्यक्रमात मा. पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मा. लोकप्रतिनिधी, मा. आयुक्त कुमार मा. जिल्हा अधिकारी राजेश देशमुख, स्मार्ट सिटी CEO डॉ. संजय कोलते, मा. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार मा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मा. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, मा. सह आयुक्त उल्का कळसकर, मा. कृष्णन CEO APCC, मा. उपायुक्त संदीप कदम, अविनाश सकपाळ, माधव जगताप, सचिन
इथापे व इतर अधिकारी व कर्मचारी तसेच विविध शाळा/ महाविद्यालये, खाजगी संस्था, विविध स्वयं सेवी संस्था, महिला बचत गट, गणेश मंडळे, मोहल्ला कमिटी सदस्य, कार्यक्षेत्रातील विविध मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्ती, क्षेत्रिय कार्यालयांकडील ब्रॅन्ड अॅम्बेसिडर इ. सहभागी झाले होते.
• सदर कार्यक्रमामध्ये विविध कॉलेज च्या विदयार्थी व विविध संथा सदस्यांनी स्वच्छता बाबत पथ नाट्य, रॅप सॉग, व प्रोबोदन पर माहिती देण्यात आली. मा. पालक मंत्री या सदर कार्यक्रमाचे कौतुक केले व सदर कार्यक्रम वारंवार घेण्यत यावे असे सुचविले व स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्तावीक मा अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी व आभार प्रदर्शन मा. उपायुक्त संदीप कदम यांनी केले.

CSR | Sanitation | कोथरूडप्रमाणे स्वच्छता विषयक कामांसाठी सीएसआर ची मदत घ्या | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा महापालिकेला सल्ला

Categories
Breaking News PMC Political पुणे

कोथरूडप्रमाणे स्वच्छता विषयक कामांसाठी सीएसआर ची मदत घ्यावी

|  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा महापालिकेला सल्ला

| नालेसफाईच्या कामाची प्रभागात जाऊन करणार पाहणी

पुणे | शहरातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छ्ता, गटर आदी छोट्या कामांसाठी महानगरपालिकेने उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) वस्तुस्वरुपात, उपाययोजना स्वरूपात सहकार्य घ्यावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या.

पुणे महानगरपालिकेत पालकमंत्री श्री. पाटील यांनी महानगरपालिकेच्या परिमंडळ व क्षेत्रीय कार्यालयामार्फत केल्या जाणाऱ्या कामांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. बैठकीस मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे यांच्यासह परिमंडळ कार्यालयांचे उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले,  महानगरपालिकेला शासनाच्या निधीतून तसेच स्वत:च्या उत्पन्नातून विविध स्वरुपाची कामे हाती घ्यावी लागतात. सीएसआरच्या माध्यमातून कोथरुडमध्ये ज्याप्रमाणे गटारची झाकणे, स्वच्छताविषयक कामे राबविण्यात येत आहेत त्याप्रमाणे पूर्ण शहरातही सीएसआरची मदत घेण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरुन मोठ्या कामांसाठी महानगरपालिकेला शासनाचा आणि स्वत:चा निधी वापरता येऊ शकेल. नगरविकास विभागाकडून प्रभागाला दरवर्षी २ वेळा १० कोटी रुपये निधी मिळतो. त्यातून छोटी छोटी परंतु नागरिकांच्या गरजेची कामे करता येतील.
नागरिकांच्या दैनंदिन समस्या, विकासकामांचे नियोजन याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे दरमहा अशी बैठक घेण्यात येईल. शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे पाणी साचण्याच्या घटना घडल्या. त्याअनुषंगाने शहरात सुरू असलेल्या विकासकामांची, रस्ते, नालेसफाई आदी कामांची दर आठवड्याला ३ प्रभागात जाऊन स्वत: पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 महापालिकेने प्राधान्याने रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यावर काम करावे लागेल. शहरातील अतिक्रमणे, टेकड्यांवरील अतिक्रमणे, अवैध फेरीवाले यांच्याविरोधात कारवाई करावी. विद्रुपीकरण टाळण्यासाठी फ्लेक्सविरोधी कारवाई करावी. शहरातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशाही सूचना श्री.पाटील यांनी दिल्या.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी रिक्त पदांचाही आढावा घेतला. पुरेशा मनुष्यबळासाठी नियमाप्रमाणे पदोन्नती तसेच पदभरतीची प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.
यावेळी आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील नालेसफाईच्या कामाची माहिती दिली. नालेसफाईचे काम सुरू केलेले आहे. तसेच स्टॉर्म वॉटर ड्रेनेज स्वच्छतेच्या कामासही सुरूवात केली आहे. शहरात मोठा पाऊस झाल्यास पाणी साचणारी ३३८ ठिकाणे होती. तेथे आवश्यक उपाययोजना केल्यामुळे पाणी साचण्याचे बंद झाले असून अजून २३ ठिकाणे शिल्लक आहेत. आंबील ओढा येथे उपाययोजना केल्यामुळे पावसाचे पाणी आता साठत नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी परिमंडळांचे उप आयुक्त आणि क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्तांशी संवाद साधून आढावा घेतला तसेच समस्या जाणून घेतल्या.

Safai Karmchari | सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू | हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबांना मिळाली नोकरीची शाश्वती

Categories
Breaking News PMC Political social पुणे

सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू

| हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबांना मिळाली नोकरीची शाश्वती

सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि त्याला सफाईशी संबंधित काम दिले जात असेल तर त्यांनाही सफाई कामगार संबोधून सर्व लाभ देण्यात येतील. डोक्यावरून मैला वाहण्याचे काम केलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीत प्राधान्य दिले जाईल. वारसा हक्कासाठी सुधारित तरतुदी केल्यामुळे हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबीयांची अनेक वर्षांची मागणी मान्य झाली आहे.

सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याबाबत निर्णय घेतला आहे. यासंदर्भात वारसा हक्काबाबत पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून एकत्रित नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे.

*नोकरीत प्राधान्य*

शौचालय स्वच्छता, घाणीशी संबधित मलनि:सारण व्यवस्था, नाली गटारे, ड्रेनेज तसेच रुग्णालय आणि शवविच्छेदन गृहातील घाणीशी संबंधित ठिकाणी सफाईचे काम करणारे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्ग तसेच सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणारे सर्व कामगार आणि पूर्वी डोक्यावरून मैला वाहून नेण्याचे काम केलेल्यांच्या वारसांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्यात येईल. रोजंदारी, कंत्राटी तत्त्वावर बाह्य स्त्रोताद्धारे हे काम करणाऱ्या व्यक्तींना लाभ मिळणार नाही. ज्या सफाई कामगारांच्या सेवा नियमित झाल्या आहेत त्यांना या शिफारशींचा लाभ मिळेल.

*वारस कोण असेल?*

पती किंवा पत्नी, मुलगा किंवा मुलगी, सून किंवा जावई, विधवा मुलगी, बहीण, घटस्फोटीत मुलगी किंवा बहीण, परित्यक्ता मुलगी किंवा बहीण, अविवाहित सज्ञान मुलगी किंवा अविवाहित सज्ञान बहीण, अविवाहित सफाई कर्मचाऱ्याचा सख्खा भाऊ किंवा सख्खी बहीण, नात किंवा नातू आणि यापैकी कोणीही वारस नसल्यास किंवा या वारसांपैकी कोणीही सफाईचे काम करण्यास तयार नसल्यास त्या सफाई कामगाराचा तहह्यात सांभाळ करण्याची लेखी शपथपत्राद्धारे हमी देणारी व्यक्ती यांना वारसा हक्काने नोकरीसाठी पात्र समजले जाईल. अशांचे वय किमान 18 वर्षे व कमाल 45 वर्षे असावे. सफाई कामगाराच्या स्वेच्छानिवृत्तीसाठी किमान 15 वर्षे सेवा करणे बंधनकारक राहील.

*नियुक्ती प्राधिकाऱ्याची जबाबदारी*

सफाई कामगारांचे वारस म्हणून नामनिर्देशन भरून घेण्याची जबाबदारी नियुक्ती प्राधिकाऱ्याची असून त्या दृष्टीकोनातून मास्टर रजिस्टर ठेवणे तसेच सर्व माहिती ऑनलाईन ठेवणे आवश्यक आहे. वारसासाठी नामनिर्देशन 2 वर्षाच्या आत करणे आवश्यक असून अशी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस नामनिर्देशित करू शकत नाही. एखाद्या सफाई कामगाराने वारसाचे नामनिर्देशन केलेले नसल्यास एक वर्षाच्या आत वारसा हक्काने नियुक्ती करण्याची मुदत राहील. एखादा कामगार नामनिर्देशन केव्हाही बदलू शकतो. वारसा हक्काच्या तरतुदीची माहिती नियुक्ती प्राधिकाऱ्याने संबंधित कामगारास दिलेली नसल्यास सफाई कामगाराने नमूद वारसदाराना विहित मुदतीत अर्ज करण्याची अट क्षमापित करून या वारसास नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्याची तरतूद टाकण्यात आली आहे.

*तर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई*

सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती देण्यात दिरंगाई किंवा टाळाटाळ होत असेल तर शासकीय निमशासकीय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संबंधीतांविरुद्ध तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
वारसा हक्काची प्रकरणे संबंधीत कामगार सेवानिवृत्त किंवा मरण पावल्यापासून 30 दिवसांच्या आत निकाली संबंधीत नियुक्ती प्राधिकाऱ्यांला निकाली काढावी लागतील. एखाद्या सफाई कर्मचाऱ्यास शिक्षा म्हणून बडतर्फ केले असल्यास त्याच्या वारसाधारकांना वारसा नियुक्तीचा लाभ देण्यात येणार नाही.
वारसा नियुक्ती प्रक्रिया सोपी
वैद्यकीय कारणांमुळे कर्मचारी अपात्र किंवा अपंग झाल्यास या कामगाराची सेवा कितीही झाली असली तरी त्याच्या पात्र वारसास लाभ देण्यात येईल. सफाई कामगारास कोणीही पात्र वारस नसेल आणि त्याचा मृत्यू झाल्यास त्याचे संमतीपत्र ग्राह्य धरण्यात येईल आणि त्याने नामनिर्देशन दिले नसेल तर अशावेळी नामनिर्देशन देण्याचा अधिकार त्याची पत्नी किंवा पतीस राहील. पती आणि पत्नी दोन्ही हयात नसल्यास कुटुंबिय वारस ठरवू शकतात.

सफाई कामगाराची पदोन्नती झाली तरी वारसा हक्काच्या नियमास बाधा येणार नाही. सफाई कर्मचाऱ्यास वर्ग-3 मध्ये पदोन्नती मिळाल्यास बिंदुनामावलीप्रमाणे त्याला पदोन्नती द्यावी लागेल. मात्र, सफाई कामगार सेवेत असताना त्याला सेवेत गट-क मध्ये पदोन्नती मिळाल्यास अशा कामगाराच्या वारसास वारसा हक्काची तरतूद लागू होणार नाही.

लाड व पागे समितीने शिफारस केल्यानुसार विविध शासकीय, निमशासकीय मंडळे, महामंडळ, स्वायत्तसंस्था, महानगरपालिका, नगरपालिका, खासगी संस्था, शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, पशुवैद्यकीय महाविद्यालय तसेच कारखाने यांच्याकडील मेहतर व वाल्मिकी सफाई कामगारांची नोकर भरती करताना त्याच्या वारसास किंवा जवळच्या नातेवाईकास प्राधान्य देणे सुरुच राहील. याबाबत आवश्यकता भासल्यास सेवाप्रवेशातील नियम व लाड पागे शिफारशींच्या तरतूदी शिथिल करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

*शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन नियुक्ती*

ज्येष्ठता यादीतील सफाई कामगारांच्या वारसाची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन वर्ग-3 किंवा वर्ग-4 मध्ये नेमणूक करण्यात येईल. वर्ग-3 किंवा वर्ग-4 मधील कोणत्याही पदासाठी शैक्षणिक अर्हता असल्यास ती विचारात घेऊन त्यानुसार त्याला नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येईल. मात्र, वर्ग-3 चे पद उपलब्ध असेल ते आणि वारसाच्या इच्छेनुसार त्याला प्राधान्याने वर्ग-3 च्या पदावर नियुक्ती देण्यात येईल. मात्र पद रिक्त नसेल तर भविष्यात या रिक्त पदावर नियुक्ती मिळण्याच्या अधिन राहून वर्ग-4 मधील रिक्त पदावर वारसा हक्काने नियुक्ती देण्यात येईल. या पदावर नियुक्ती देण्यासाठी टंकलेखन व एमएससीआयटी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2 वर्षाची मुदत देण्यात येईल.

*नियुक्तीसाठी पदभरतीचे निर्बंध लागू नाहीत*

लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्‍याची अट सफाई कामगाराच्या वारसास देखील लागू राहील तसेच सफाई कामगारांची पदे व्यपगत होणार नाही. या नियुक्तींसाठी पदभरतीचे निर्बंध देखील लागू राहणार नाही. वारसास नियुक्ती देण्यापूर्वी त्याचे जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयाला प्राप्त करुन घ्यावे लागेल तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वारसा हक्कांच्या नियुक्तीला सर्वसाधारण सभा किंवा स्थायी समितीच्या मान्यतेची आवश्यकता राहणार नाही.

*मालकी हक्काची घरे देण्याबाबत निर्णय घ्यावा*

सफाई कामगारांच्या जागी त्यांचा वारस नियुक्त होत असल्यामुळे अशा कामगारांना मोफत मालकी हक्काची घरे देण्याबाबत नगर विकास, ग्रामविकास, गृह निर्माण त्वरित निर्णय घेण्याचेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

 

 

Sanitation | बंद असलेला महापौर बंगला आणि आयुक्त बंगल्याच्या स्वच्छतेसाठी 25 लाखाचा खर्च!

Categories
Breaking News PMC पुणे

बंद असलेला महापौर बंगला आणि आयुक्त बंगल्याच्या  स्वच्छतेसाठी 25 लाखाचा खर्च!

| घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून सामग्री खरेदीबाबत शहनिशा झालीच नाही

पुणे | महापालिका प्रशासनाकडून (PMC Pune) केली जात असलेली खरेदी आणि विविध टेंडर हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. अशाच एका खरेदीबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. बंद असलेला महापौर बंगला (Mayor Bungalow) आणि आयुक्त बंगल्याच्या (PMC Commissioner Bungalow)  स्वच्छतेसाठी 25 लाखाची सामग्री खरेदी करण्यात आली आहे. कल्पक इंटरप्रायजेस (Kalpak Enterprises) या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने शहनिशा न करताच या सामग्रीची भांडार विभागाकडून खरेदी करून घेतली आहे. विशेष म्हणजे ज्या बजेट हेड (Budget head) च्या माध्यमातून ही रक्कम वापरण्यात आली आहे. ती वापरणे अपेक्षित नसताना क्षेत्रीय कार्यालयाने हा प्रताप केला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडून याची चौकशी केली जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (PMC Pune)
महापौर बंगला आणि आयुक्त बंगल्याची स्वच्छता घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाते. त्यासाठी भांडार विभागाकडून विविध सामग्रीची खरेदी केली जाते. महापौर बंगला जो मागील वर्षांपासून बंद आहे आणि आयुक्त बंगल्याच्या स्वच्छतेसाठी 2022-23 या सालासाठी स्वच्छता विषयक सामग्री खरेदी करण्यात आले आहे. ज्यामध्ये विविध 30 साहित्याचा समावेश आहे. ज्यामध्ये सुगंधी तेल, ब्लॅक फिनेल, डांबर गोळी, फ्लोअर क्लिनर, कमोड घासण्याचा ब्रश, काच पुसण्याची नॅपकिन, चहाचा कप, चहा ट्रे, रूम फ्रेशनर, अशी विविध साहित्ये आहेत. ही खरेदी भांडार विभागाकडून करण्यासाठी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रस्ताव प्राप्त झाला. त्यानुसार भांडार विभागाने टेंडर प्रक्रिया राबवत ही खरेदी केली. कल्पक इंटरप्रायजेस या कंपनीला हे काम देण्यात आले. ज्यासाठी 24 लाख 59 हजाराचा खर्च करण्यात आला आहे. (mayor’s bungalow and the commissioner’s bungalow)
बंद असलेला महापौर बंगला आणि आयुक्त बंगल्याच्या स्वच्छतेसाठी 25 लाखाचा खर्च येऊ शकतो का, यावरच प्रश्न उपस्थित होत आहेत.  कारण गेल्या वर्षांपासून महापौर बंगल्यात कुणी राहत नाही. विशेष म्हणजे ज्या बजेट हेड च्या माध्यमातून ही रक्कम वापरण्यात आली आहे. ती वापरणे अपेक्षित नसताना क्षेत्रीय कार्यालयाने हा प्रताप केला आहे. कोठी अधिकारी साठी 10 कोटी प्रस्तावित करण्यात आले होते. ज्यातून फक्त स्टेशनरी ची खरेदी करणे अपेक्षित होते. असे असताना यातील 25 लाख रुपये स्वच्छता विषयक सामग्री खरेदी करण्यासाठी लॉकिंग करण्यात आले आहेत. तसेच हा खर्च 25 लाखाच्या खाली म्हणजे 24 लाख 59 हजार इतका असल्याने हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर देखील आला नाही. त्यामुळे याची फारशी चर्चा झाली नाही. कदाचित क्षेत्रीय कार्यालयाला हेच अपेक्षित असावे. (Pune Municipal corporation)
 खरे म्हणजे ही खरेदी करण्याअगोदर क्षेत्रीय कार्यालयाने इतक्या रकमेची शहनिशा करणे अपेक्षित होते. त्यासाठी आधी घनकचरा विभागाकडे प्रस्ताव पाठवणे गरजेचे होते. जेणेकरून घनकचरा विभागाने वित्तीय समिती अथवा पर्चेस कमिटीची मान्यता घेतली असती. मात्र हा प्रस्ताव परस्पर भांडार विभागाकडे पाठवण्यात आला. आमच्याकडे हा प्रस्ताव आलाच नाही, असे घनकचरा विभागांने सांगितले तर भांडार विभागाने सांगितले कि शहनिशा करण्याचे काम आमचे नाही. खाते किंवा वॉर्ड ऑफिसच्या मागणीनुसार आम्ही खरेदी करून देतो. यामधून मात्र महापालिकेचे नुकसान झाल्याचे सिद्ध होत आहे. याची महापालिका आयुक्तांकडून चौकशी केली जाणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. (Ghole Road ward office)

Sanitation in Vijayastambh area | भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेचा उपक्रम |डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सामाजिक संस्थांचा सहभाग

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेचा उपक्रम

|डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सामाजिक संस्थांचा सहभाग

1 जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त राज्यासह देशभरातून सुमारे 15 लाख भीम अनुयायी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी 2 जानेवारी रोजी विजयस्तंभ परिसरामधे स्वच्छता रहावी व स्थानिक रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेतला. या वेळी परिसरातील कचरा, पाण्याच्या बॉटल, कागद आदी उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला.

या स्वच्छता उपक्रमात सुनिल माने, जितेंद्र गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी, निर्भय प्रतीष्ठानचे निखिल गायकवाड, आयुष आंबेडकरी युवा मंचचे सुनिल धतराज व सहकारी, स्वच्छ संस्थाचे चेतन हरनामे व कर्मचारी, आधार पुनावालाचे मल्हार करवंदे, नागेश पवार व सहकारी, पथारी संघटनेचे विजय कांबळे, संदीप चाबुकस्वार तसेच पेरणे ग्रामपंचायतचे सरपंच रुपेश ठोंबरे आदींसह विविध जणांनी सहभाग घेतला.

या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, भीमा कोरेगावला ऐतिहासिक वारसा आहे. त्यांच्या आठवणींचे जतन भीम अनुयायी करत असतात. ही ऐतिहासिक आठवण स्मरणात रहावी, यासाठी विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. त्याला लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. एवढ्या प्रचंड संख्येनंतर या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी देखील आपलीच आहे, या सामाजिक भावनेतून परिसरात स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. गेल्या सहा वर्षांपासून स्वच्छतेच्या उपक्रमासाठी पुढाकार घेत असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले. त्याला यश फाउंडेशन, क्रिस्टल संस्था, आयुष आंबेडकरी युवा संघ, स्वच्छ संस्था, आधार पुनावाला संस्था, पेरणे ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी या सामाजिक संघटनांची देखील मोलाची साथ मिळत असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.

Cleanliness campaign | धर्माधिकारी प्रतिष्ठान व पुणे महापालिकेच्या वतीने स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम| २११ टन कचरा केला गोळा

Categories
Breaking News PMC social पुणे

धर्माधिकारी प्रतिष्ठान व पुणे महापालिकेच्या वतीने स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम| २११ टन कचरा केला गोळा

“डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान’तर्फे पुणे महापालिकेच्या (PMC Pune) सहकार्याने रविवारी शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यात विशेषत्त्वाने 37 स्मशानभूमी, 12 कब्रस्तान आणि 1 दफनभूमीमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. (Dr. Shri Nanasaheb Dharmadhikari Foundation’)

प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. पुणे शहर आणि ग्रामीण परिसरातील एकूण 37 स्मशानभूमी, 12 कब्रस्तान आणि एक ख्रिश्‍चन दफनभूमी असे सुमारे पाच लाख एक हजार 133 चौ.मीटर परिसर स्वच्छ करण्यात आला. यामध्ये सुमारे 4 हजार 96 सदस्यांचा सहभाग होता आणि सुमारे 211 टन कचरा टन कचरा गोळा करण्यात आला अशी माहिती पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली. (Pune municipal corporation)

कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीबरोबरच टायफॉइड, मलेरिया, गॅस्ट्रो, कॉलरा असे आजार पसरतात. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला आणि सरकारला मोठा खर्च करावा लागतो. अस्वच्छ वातावरणामुळे परिसरात प्रदूषण होते. अशा अस्वच्छतेमुळे आपल्या गावाला किंवा शहराला कचऱ्याचे शहर किंवा गाव असे संबोधले जाऊ शकते. हे सर्व टाळण्यासाठी जमा होणारा कचरा निर्धारित केलेल्या जागी नेऊन टाकला पाहिजे. ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले पाहिजे, असे डॉ. धर्माधिकारी म्हणाले.

प्लॅस्टिकचा कमीतकमी वापर केला पाहिजे. संपूर्ण समाज हे एक मोठे कुटुंब आहे आणि या कुटुंबचा मी एक सदस्य आहे, या भावनेतून स्वच्छता राखणे हे माझे सामाजिक कर्तव्य आहे असे प्रत्येकाने मानले पाहिजे आणि त्याप्रमाणे कृती केली पाहिजे, असेही आवाहन डॉ. धर्माधिकारी यांनी केले. (Dr. Shri Nanasaheb Dharmadhikari Foundation’)

Swachh Sanstha | Contract | स्वच्छ संस्थेच्या कराराची मुदत  5 वर्षांनी वाढवण्यात येणार! | स्थायी समिती समोर प्रस्ताव 

Categories
Breaking News PMC social पुणे

स्वच्छ संस्थेच्या कराराची मुदत  5 वर्षांनी वाढवण्यात येणार!

| स्थायी समिती समोर प्रस्ताव

 पुणे.  पालिकेचे कर्मचारी आणि कंत्राटदारांमार्फत नियुक्त केलेल्या कंत्राटी कामगारांकडून रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून कचरा उचलला जातो.  मात्र महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन कचरा उचलला जात नाही.  त्यासाठी महापालिकेने स्वच्छ संस्थेची नियुक्ती केली आहे.  संस्थेसोबत केलेल्या कराराची मुदत संपली आहे.  त्यामुळे कराराची  मुदत 5 वर्षांनी वाढविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे.  त्यासाठी पालिकेला पहिल्या वर्षी 5 कोटींचा  खर्च येणार आहे.  प्रस्तावानुसार प्रत्येक घराकडून 80 रुपये शुल्क तर झोपडी धारकांकडून 60 रुपये शुल्क घेतले जाणार आहे.
 – अनेक वर्षांपासून करार केला जात आहे
  शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्याची हाताळणी करताना पालिकेला येणाऱ्या अडचणी, कंत्राटी कामगारांना सेवा देताना येणारी अडचण, मनुष्यबळ, आर्थिक मदत, तसेच नोकरभरतीवरील निर्बंध या बाबी लक्षात घेऊन भविष्यात २३ गावांच्या विकासाचा आणि राहणीमानात बदल, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने घनकचरा व्यवस्थापनाचे काही टप्पे करणे सोयीचे होईल.  असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे मुख्य सभेची मान्यता मिळाल्यानंतर 2007 मध्ये स्वच्छ सेवा सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली.  संस्थेचे सर्व सदस्य कचरा वेचक आहेत.  त्यामुळे महापालिका आणि स्वच्छ सहकारी संस्था यांच्यात पाच वर्षांचा करार झाला.  या अंतर्गत 17/06/2008 ते 16/06/2013 पर्यंत शहरातील विविध भागात एकूण 2000 कचरा वेचक घरगुती कचरा उचलण्याचे काम करत होते.  त्यांच्या माध्यमातून सुमारे 330,000 मालमत्तांमधून कचरा उचलण्यात आला.  शहरातील सर्वच वॉर्ड आणि खोल्यांमध्ये संघटनेचे काम सुरू होते.  2008 ते 2013 या पाच वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ संस्थेने पुण्यातील नागरिकांसाठी राबविलेल्या पीपीपी मॉडेलची (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली.  ही बाब लक्षात घेऊन ऑगस्ट 2015 मध्ये स्वच्छ संस्थेसोबत आणखी 5 वर्षांसाठी पुन्हा करार करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता 2022 पासून पुढे 5 वर्ष करार करण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

| स्थायी समितीकडून प्रशासनाला हवीय या गोष्टींची मान्यता

२) पुणे शहरातील घरोघरी निर्माण होणाऱ्या वर्गीकृत कचऱ्याचे संकलन करणेकामी”स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था मर्यादित” या अशासकिय संस्थेबरोबर दि. २५/१०/२०२२ पासून पुढील कालावधीसाठी सदर संस्थेकडून न कामे करून घेणेस व त्यांचेबरोबर करारनामा करणेस.

३) स्वच्छ सहकारी संस्थेला देखरेख व व्यवस्थापन, प्रशिक्षण व नागरिकांमधील जनजागृतीचा खर्च, आवश्यक सेवकवर्गाचे मानधन, महानगरपालिकेशी समन्वय साधणे,क्षेत्रिय कार्यालयांशी समन्वय साधणे, प्रभागनिहाय आरोग्य कोठीवरील सेवकांशी समन्वय साधणे, जनजागृती मोहीम व प्रशिक्षण इ. बाबींसाठी सन २०२२-२३ या कालावधीसाठी RE19A164 या अर्थशिर्षकावर आर्थिक तरतूद उपलब्ध करून मिळणेस व प्रथम वर्षीर.रु. ४,९६,७०,७१२/-, इतका खर्च करणेस व त्यापुढील कालावधीसाठी एकूण पगारापोटीच्या वार्षिक खर्चात दर वर्षी ४% वाढ करणेस व दर वर्षी र.रु.२३,६५,२७२/- प्रशासन, जनजागृती, प्रशिक्षण, फोन, प्रवास, सॉफ्टवेअर, गणवेष व इतर तदनुषंगिक खर्चाच्या अनुषंगाने RE19A125 या अर्थशिर्षकावर आर्थिक तरतूद उपलब्ध करून मिळणेस व खर्च करणेस.

४) दि.२५/१०/२०२२ पासून पुढील कालावधीत ढकलगाडी दुरुस्ती करीता प्रति महिना प्रति कचरा वेचक र.रु.५०/- याप्रमाणे प्रती वर्षाकरीता र.रु.६००/- आदा करणेस व RE19A125 या अर्थशिर्षकावर आर्थिक तरतूद उपलब्ध करून मिळणेस
५) कचरा वेचकांसाठी आवश्यकतेनुसार व ठराविक वारंवारतेमध्ये सुरक्षा प्रावरणे,ढकलगाड्या व बकेट देणे यासाठी सन २०२२-२३ व पुढील कालावधीसाठी RE19A144 या अर्थशिर्षकावर आर्थिक तरतूद उपलब्ध करून मिळणेस
६) स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांकडून खालीलप्रमाणे सेवाशुल्क नागरिकांकडून आकारणेस.

अ. वर्गीकृत कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक घरापाठीमागे दर महा र.रु. ८०/- इतके शुल्क आकारणेस व पुढील प्रत्येक वर्षाकरीता सेवाशुल्कामध्ये ५% वाढ करणेस. आ. झोपडपट्टी भाग, एस.आर.ए. मिळकती व अघोषित वस्त्यांमध्ये प्रति झोपडी दर
महा र.रु. ६०/- इतके शुल्क आकारणेस व पुढील प्रत्येक वर्षाकरीता सेवाशुल्कामध्ये ५% वाढ करणेस व प्रत्येक कचरा वेचकास प्रति झोपडी प्रति
महिना र.रु.२०/- प्रोत्साहन भत्ता (slum subsidy) म्हणून देणेस. यासाठी सन२०२२-२३ ते पुढील कालावधीसाठी RE19A116 या र्थशिर्षकावर आर्थिक तरतूद उपलब्ध करून मिळणेस.
व्यावसायिकांकडून निर्माण होणा-या कच-याचे संकलन करणेसाठी प्रति व्यावसायिक धारकाकडून दर महा र.रु. १६०/- इतके शुल्क आकारणेस व पुढील
प्रत्येक वर्षाकरीता सेवाशुल्कामध्ये १०% वाढ करणेस.
७) वेळोवेळी आढावा घेऊन धोरणात आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार मा. महापालिका आयुक्त यांना प्रदान करणेस.
८) स्वच्छ सहकारी संस्थेचे कामकाज समाधानकारक नसल्यास या संस्थेला पुणे महानगरपालिकेमार्फत देण्यात येणारी मदत तात्काळ थांबण्याचा निर्णय घेणे व पर्यायी व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार मा.महापालिका आयुक्त यांना प्रदान करणेस.
९) पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीतून पुणे महानगरपालिकेतर्फे आवश्यकतेप्रमाणे स्वच्छ सहकारी संस्थेच्या सभासदांना साहित्य, हातगाड्या, देखभाल-दुरुस्ती खर्च, प्रशासकीय खर्च, गणवेश, संरक्षक हातमोजे, विमासंरक्षण, अत्यावश्यक
साहित्य/सुविधा इ. बाबी आवश्यकतेप्रमाणे अदा करण्याचे अधिकार मा. महापालिका आयुक्त यांना प्रदान करणेस.
१०) सदरच्या धोरणाप्रमाणे पुणे शहरात अंमलबजावणी करणेस.

Sanitation| Pune| पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उद्योजक आणि सामाजिक संस्थांशी संवाद

Categories
Uncategorized

स्वच्छतेबाबत नवे उपक्रम राबविण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे | पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उद्योजक आणि सामाजिक संस्थांशी संवाद

पुणे | पुण्याचे उद्योग संशोधन आणि उत्पादनात पुढे आहेत. स्वच्छतेबाबतही उपयुक्त संशोधन करीत नवे उपक्रम राबविण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे आणि पुण्याला स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे आयोजित बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मराठा चेंबरचे अध्यक्ष डॉ.सुधीर मेहता , माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, शहरातील नागरिकांसाठी शहर स्वच्छता, वाहतूक नियोजन आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होणे असे तीन महत्वाचे विषय आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे आणि कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यातून उत्पन्न घेण्याचे प्रयोग गरजेचे आहेत. अशा विषयांबाबत चांगल्या सूचना चेंबरने कराव्यात.

स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि त्यांना कचरा वेचण्यासाठी आवश्यक सुविधा देणे गरजेचे आहे. त्यांना काही प्रमाणात वस्तूंच्या स्वरूपात मदत करून त्यांची कार्यक्षमता वाढवता येईल. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मितीसारखे प्रकल्प राबविण्यासाठी उद्योजकांचे सहकार्य महत्वाचे ठरेल. स्वच्छतेबाबत सर्व संबंधित घटकांचा सहभाग वाढवून जनप्रबोधनावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाऊस बंद होताच ही कामे सुरू करण्यात येईल. एनडीए चौकातील वाहतूक समस्याही दूर होत आहे, असेही श्री.पाटील म्हणाले.

डॉ.मेहता यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. शहर स्वच्छ करण्यासाठी शासन आणि प्रशासनासोबत चेंबर काम करेल. स्वच्छतेचे उद्दीष्ट सामुहिक प्रयत्नातून साध्य करता येईल असे ते म्हणाले.

बैठकीला उद्योग संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.
000

MP Supriya Sule | निसर्गसौंदर्याने नटलेल्या भागात कचरा टाकू नका | खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

निसर्गसौंदर्याने नटलेल्या भागात कचरा टाकू नका

| खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन

बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर-वेल्हा-मुळशी या भागावर निसर्गाचे वरदान आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला हा भाग आहे. या भागात फिरायला किंवा अन्य कोणत्याही कामासाठी गेलेल्या पर्यटक अथवा प्रवाशांनी प्रवासादरम्यान गाडीतून किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव येथे रस्त्याच्या बाजूला कचरा टाकू नये, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

खासदार सुळे या काल (दि. १०) मुळशी तालुका दौऱ्यावर होत्या. तालुक्यातील वेगवेगळ्या गावांना भेट दिली. या दौऱ्यात असताना प्रवासादरम्यान निसर्गाने परिपूर्ण असलेल्या अनेक भागात गाडीतून उतरून त्यांनी निसर्गाचा अनुभव घेतला. अनेक ठिकाणी त्यांना स्वतः आपल्या मोबाईलमध्ये काही फोटो आणि व्हिडीओ घेण्याचाही मोह आवरता आला नाही. त्यावेळी स्वतः घेतलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हे आवाहन केले आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी, भोर आणि वेल्हा भागातून प्रवास करीत असताना निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य अनुभविता येते. याशिवाय राज्यातील सह्याद्री असो की सातपुडा, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सृष्टीसौंदर्याची रेलचेल असणारी कितीतरी ठिकाणे आहेत. महाराष्ट्रातील आपल्या भूमीचा अतिशय महत्वाचा ठेवा आहे; परंतु अनेकदा या हिरवाईत आणि निसर्गाने नटलेल्या सुंदर अशा या प्रदेशात ठिकठिकाणी कचरा दिसतो. हे अतिशय वाईट आहे. हा भाग सुंदर आहे. त्याचे सौंदर्य अबाधित राखणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे पर्यटक अथवा अन्य प्रवाशांनी प्रवासादरम्यान गाडीतून किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव येथे रस्त्याच्या बाजूला कचरा टाकू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आपण सर्वांनी निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असणाऱ्या ठिकाणांची काळजी घेतली पाहिजे. हा आपला सुंदर ठेवा कायम सुंदर रहावा यासाठी सर्वांनी कचऱ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करायला हवे. आपण सर्वांनीच सृष्टीसौंदर्याची मुक्त उधळण असणारे परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करुया, असेही त्यांनी म्हटले आहे.