Bandra-Versova sea Link | वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Bandra-Versova sea  Link | वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार देणार -मुख्यमंत्री

Bandra-Versova sea  Link | स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला (Bandra-Versova sea link) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू’ (Swatantra Verr Savarkar Bandrs-Versova Sagari Setu) असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ (Swatantra veer Savarkar Shourya Purskar) प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. (Bandra-Versova sea link)
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantra veer Vinayak Damodar Savarkar) यांच्या  १४० व्या जयंतीनिमित्त (Savarkar Jayanti) राज्यात ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ (Swatantra veer Gaurav Din) साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘शतजन्म शोधिताना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. (Vinayak Damodar Savarkar)
यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, सावरकर स्मारक चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आदी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चौरे आदी उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक मुंबई आणि महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाड निर्मित हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सादर करण्यात आला.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आज प्रथमच साजरी करण्यात आली. त्याचप्रामणे आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले, ही अभिमानास्पद बाब आहे. त्या ऐतिहासिक सोहळ्याचे व क्षणांचे साक्षीदार होता आले. लोकशाहीच्या पवित्र मंदिराची, नव्या संसद भवनाची वास्तू स्थापना व लोकार्पण विक्रमी वेळेत झाले आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीरांचे श्रेष्ठत्व, त्याग, बलिदान, देशभक्ती ही सर्वश्रुत आहे. या देशाचे, राज्याचे व मातीचे सुदैव स्वा. सावरकर यांच्यासारखे क्रांतिकारक येथे जन्माला आले. प्रखर देशभक्तीमुळे त्यांची इंग्रजांमध्ये दहशत होती. संपूर्ण सावरकर समजून घेणं अशक्य व अवघड आहे, परंतु त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास हिंदुत्वाचा सुगंध आपल्याला नक्कीच येईल. स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते, महान क्रांतिकारक, सक्रिय समाजसुधारक असे विविधांगाने त्यांची ओळख होती. ते प्रतिभावंत साहित्यिक, कवी होते तसेच अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते आणि भाषिक गुलामगिरी दूर करण्यासाठी इंग्रजीला त्यांनी अनेक पर्यायी शब्द उपलब्ध करून दिले, असे म्हणून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वा. सावरकरांना अभिवादन केले.
पालकमंत्री श्री केसरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करीत त्यांनी स्वातंत्र्याची जाज्वल्य ज्योत पेटविल्याचे सांगितले. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी अमूल्य योगदान दिल्याचे सांगून विविध इंग्रजी शब्दांना त्यांनी मराठी पर्यायी शब्द उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले. मातृभाषेतून शिक्षण या त्यांच्या विचारांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राधान्याने समावेश केल्याचे त्यांनी सांगितले. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सेल्युलर जेलमध्ये मुंबईकरांच्या वतीने आज ‘सागरा प्राण तळमळला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून सावरकरांच्या स्मृती राज्यभर जपल्या जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रधान सचिव श्री खारगे यांनी प्रास्ताविकाद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. पारतंत्र्यात देशाचा निरुत्साही इतिहास लिहिला गेला, तो प्रेरणादायी कसा होता ते सावरकरांनी लिहिले असल्याचा त्यांनी उल्लेख केला. सावरकरांना अनेक उपाध्या मिळाल्या असून लोकांनी त्या उत्स्फूर्तपणे दिल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून दरवर्षी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगून यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध आठ ठिकाणी महानाट्य सादर होत असून इतरही विभागांमार्फत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रारंभी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरूवात राज्यगीताने करण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
00000
News Title | Bandra-Versova sea route to be named after Swatantra Veer Savarkar  Chief Minister Eknath Shinde’s announcement

Pune Hindi News | Savarkar Jayanti | पुणे के फर्ग्यूसन कॉलेज में स्वातंत्र्यवीर सावरकर का कमरा कैसा है?  जान लो 

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र हिंदी खबरे

Pune Hindi News | Savarkar Jayanti | पुणे के फर्ग्यूसन कॉलेज में स्वातंत्र्यवीर सावरकर का कमरा कैसा है?  जान लो

 |  सावरकर के दर्शन के लिए उमड़ी भीड़

Pune Hindi News | Savarkar Jayanti |  स्वातंत्रवीर वि दा  सावरकर (Swatantra veer Savarkar) के निवास स्थान फर्ग्यूसन कॉलेज (Fergusson College) का छात्रावास कक्ष आज सावरकर जयंती के अवसर पर दर्शन के लिए खुला रखा गया।  बड़ी संख्या में सावरकर प्रेमियों ने दर्शन किए और श्रद्धासुमन अर्पित किए।  (Pune Hindi News: Savarkar Jayanti)
 डेक्कन एजुकेशन सोसाइटी ( Deccan Education Society) के गवर्निंग बोर्ड के अध्यक्ष डॉ.  डॉ शरद कुंटे ने सुबह 9 बजे सावरकर की प्रतिमा पर माल्यार्पण किया।  पूर्व सांसद प्रदीप रावत, महेश अठावले, प्रो.  धनंजय कुलकर्णी, डॉ.  सविता केलकर, मिलिंद कांबले, शाहिर हेमंत मालवे प्रमुख रूप से मौजूद थे।  ( vinayak Damodar Savarkar)
 1902 से 1906 की अवधि के दौरान, सावंतरी वीर सावरकर लड़कों के छात्रावास नंबर 1 के कमरा नंबर 17 में रहते थे, जब वे फर्ग्यूसन कॉलेज में छात्र थे।  उनके उपयोग की विभिन्न वस्तुओं को इस स्थान पर संरक्षित किया गया है।  ( Swatantra veer Savarkar News)
—-
News Title | Pune Hindi News | Savarkar Jayanti What is the room of Swatantra Veer Savarkar in Fergusson College, Pune? get to know

Savarkar Jayanti | Pune News | पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची खोली कशी आहे? जाणून घ्या 

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Savarkar Jayanti | Pune News | पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची खोली कशी आहे? जाणून घ्या

| सावरकरांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

Savarkar Jayanti | pune news | स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Fergusson College)  वसतिगृहातील खोली सावरकर जयंतीनिमित्त (Savarkar Jayanti)  आज सर्वांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती. मोठ्या संख्येने सावरकर प्रेमींनी (Savarkar lovers)दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली. (Savarkar Jayanti | Pune News)

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (Deccan Education Society) नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे (Dr Sharad Kunte) यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी खासदार प्रदीप रावत, महेश आठवले, प्रा. धनंजय कुलकर्णी, डॉ. सविता केळकर, मिलिंद कांबळे, शाहीर हेमंत माळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Vinayak Damodar Savarkar)

स्वातंत्र्यवीर सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी दशेत असताना  सन १९०२ ते १९०६ या कालावधीमध्ये मुलांचे वसतीगृह क्रमांक एक मधील खोली क्रमांक १७ मध्ये रहात होते. त्यांच्या वापरातील विविध वस्तूंचे या ठिकाणी जतन करण्यात आले आहे. (Swatantraveer savarkar)


News Title | Savarkar Jayanti Pune News | How is Swatantra Veer Savarkar’s room in Fergusson College, Pune? find out