Scanning | PMC Pune | मालमत्ता व व्यवस्थापन विभागाच्या सर्व दस्तांचे होणार स्कॅनिंग! | 34 लाखांचा येणार खर्च

Categories
Breaking News PMC पुणे

मालमत्ता व व्यवस्थापन विभागाच्या सर्व दस्तांचे होणार स्कॅनिंग!

| 34 लाखांचा येणार खर्च

पुणे | महापालिकेच्या मालमत्तांचे संरक्षण आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी मालमत्ता व व्यवस्थापन विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे विभागातील सर्व दस्तांचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. हे करण्यासाठी विभागातील सर्व दस्तांचे स्कॅनिंग करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या प्रक्रियेला 34 लाखांचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.
स्थायी समितीसमोर ठेवलेल्या प्रस्तावानुसार  पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागामध्ये सर्व अभिलेख शासकीय नियमान्वये  वर्गीकरण करून महत्वाचे अभिलेख सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचीबद्ध पद्धतीने विविध आकाराच्या व महत्वाच्या जुन्या व नवीन कागदपत्रांचे/दस्तांचे स्कॅनिंग-डीजीटायजेशन, बायडिंग करून सूचीबद्ध पद्धतीने संगणकीकरण करणे या कामी मालमत्ता व व्यवस्थापन कार्यालयमार्फत महाराष्ट्र शासनाच्या महाटेंडर पोर्टलद्वारे ऑन लाईन पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली होती.  या कामासाठी एकूण 04 निविदा प्राप्त झालेल्या होत्या. याचे इस्टिमेट 40 लाखाचे होते. निविदांपैकी सगळ्यात कमी दर  श्री साई गणेश एंटरप्रायजेस यांचेकडून 34 लाख देण्यात आला आहे. त्यामुळे  पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागामध्ये सर्व अभिलेख शासकीयनियमान्वये वर्गीकरण करून महत्वाचे अभिलेखसुरक्षिततेच्या दृष्टीने सूचीबद्ध पद्धतीने विविध आकाराच्या व महत्वाच्या जुन्या व नवीन कागदपत्रांचे/दस्तांचे स्कॅनिंग-डीजीटायजेशन, बायडिंग करून सूचीबद्ध पद्धतीने संगणकीकरण करणे, हे काम श्री साई गणेश एंटरप्रायजेस यांना देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.