Bouncer In Schools : शाळांमधील बाऊंसर संस्कृती  वर बंदी घाला  : मनविसेची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी 

Categories
Breaking News Education Political पुणे महाराष्ट्र

शाळांमधील बाऊंसर संस्कृती  वर बंदी घाला

: मनविसेची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

पुणे : पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, पण याच पुण्यनगरीत अनेक शाळा शैक्षणिक आवारात बाऊंसर ठेवुन शाळे मधे दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत. शाळा परीसरातुन ही संस्कृती हद्दपार करणे अत्यंत गरजेचे आहे. अशी मागणी मनविसेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी  शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.  बाऊंसर बंदी आदेश लवकरात लवकर काढुन विद्यार्थी पालकांना न्याय मिळाला नाहीतर मनविसे विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची सर्वश्री जबाबदारी आपली राहील, असा इशारा देखील कनोजिया यांनी दिला आहे.

कनोजिया यांनी पत्रात म्हटले आहे कि शाळा ही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी असते. अश्या ठिकाणी बाऊंसर ची नेमणुका करुन दहशत पसरवणे गैर आहे. पुण्यात वारंवार पालक व विद्यार्थी यांना मारहाण करणे
शुल्क भरले नाही म्हणून शाळेच्या आवारात प्रवेश नाकारणे अश्या घटना घडत आहेत, हे दहशतमय वातावरण शाळेतुन हद्दपार करणे फार गरजेचे आहे. काल बिबवेवाडी येथील क्नाईल मेमोरियल स्कुल मधील बाऊंसर कढुन झालेली मुख्याध्यापकांना निवेदन देण्यासाठी आलेल्या पालकांना मारहाण व शिवीगाळ पुण्यातील संस्कृती ला काळीमा फासणारी आहे मनविसे झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करत आहे या शाळा प्रशासनावर कायदेशीर कारवाई झालीच पाहीजे. पुणे जिल्ह्यातील सर्व शाळे मधे बाऊंसर नेमणुकीसाठी बंदी घालण्यात यावी.  हि शाळा आहे. पब किंवा बार नव्हे. अश्या दहशतीचे  वातावरण शाळा परीसरातुन हद्दपार करणे अत्यंत गरजेचे आहे. सदर बाऊंसर बंदी आदेश लवकरात लवकर काढुन विद्यार्थी पालकांना न्याय मिळाला नाहीतर मनविसे विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वश्री जबाबदारी आपली राहील. असे कनोजिया यांनी म्हटले आहे.