School First Day | बाल विकास मंदिर शाळेत नवागतांचे स्वागत

Categories
Breaking News Education पुणे

School First Day | बाल विकास मंदिर शाळेत नवागतांचे स्वागत

School First Day | महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड (Maharashtra Education Society Saswad) येथील बाल विकास मंदिर शाळेत (Bal Vikas Mandir School) नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका , महिला शिक्षकांनी औक्षण करून तसेच पुष्पवृष्टी करून सुमधुर संगीतात स्वागत केले. (School First Day)
यावेळी शाळेत सर्वत्र फुगे लावण्यात आली होती. ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता.  शासनाच्या नियमानुसार पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना  नवीन मोफत पाठ्यपुस्तके वाटप केले, तसेच गोड खाऊ दिला.  यावेळी मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड सर्व शिक्षक उपस्थित होते.
—-
News Title | School First Day |  Welcome Newcomers to Bal Vikas Mandir School

Girish Gurnani | आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूडची मागणी

Categories
Breaking News Education Political पुणे

आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळण्याची मागणी

| राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिक्षण उपसंचालक आणि प्राथमिक शिक्षण अधीक्षक यांना निवेदन

पुणे :
 आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळणे बाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.. पालकांना प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरताना वेबसाईटच्या विलंबामुळे फॉर्म भरण्यास उशीर होत होता. बऱ्याच पालकांच्या तक्रारी या संदर्भात आल्या होत्या. असे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी सांगितले.
तसेच बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेत असे निदर्शनात येत आहे की अनेक एजंट लोक या योजनेच्या नियमावलीत पात्र नसलेल्या पालकांकडून पैसे मागून प्रवेश प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आमिष दाखवत आहेत. तरी प्रवेश प्रकिया कायदेशीर नियमानुसार करावी अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक, पुणे औदुंबर उकिरडे आणि प्राथमिक शिक्षण अधीक्षक गणेश खाडे यांना सादर करण्यात आले होते..
आरटीई प्रवेश प्रक्रियेत खरोखरच आर्थिक दुर्बल घटक पालक योजनेपासून वंचित रहात आहेत. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया असली तरी अनेक ठिकाणी सुरु असलेल्या या एजंटगिरीला बळी पडून पालकांची होत असलेली फसवणूक थांबविण्यात यावी. खरोखर आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांनाच या प्रक्रियेचा लाभ मिळावा. कोणत्याही गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन प्रशासनाने द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करत आहोत असे गिरीश गुरनानी यांनी सांगितले.
या वेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कोथरूड विधानसभेचे कार्याध्यक्ष मोहित बराटे देखील उपस्थित होते.

School Travel Improvement Plan | विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पुणे महापालिका सरसावली!  | पथ विभागाने वास्तुरचनाकाराकडून मागवले प्रस्ताव

Categories
Breaking News PMC social पुणे

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पुणे महापालिका सरसावली!

| पथ विभागाने वास्तुरचनाकाराकडून मागवले प्रस्ताव

पुणे | शालेय विद्यार्थ्यांचा शाळेत जातानाचा प्रवास सुखकारक व्हावा, तसेच त्यांना शाळेत एकटे जाताना वाहतुकीची कसलीही अडचण येऊ नये आणि विद्यार्थ्याने वाहतुकीसाठी कुणावरही अवलंबून राहू नये, यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी महापालिका एक वाहतूक आराखडा तयार करणार आहे. यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने खाजगी वास्तुरचना काराकडून प्रस्ताव मागवले आहेत. येत्या शुक्रवारी त्यातील तीन जणांचे प्रस्ताव अंतिम करून त्यानुसार त्याची लवकरच ट्रायल घेतली जाणार आहे. अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.

पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. इथे खूप शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे देश विदेशातून इथे विद्यार्थी शिकायला येत असतात. शिक्षणाच्या बाबतीत देश पातळीवर पुण्याचे नाव घेतले जाते. मात्र पुणे शहरात वाहतुकीची समस्या खूपच मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र त्या अपुऱ्या पडताना दिसून येतात. महापालिकेकडून करोडो खर्च करूनही वाहतूक समस्या तशीच आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना देखील शाळेत जाताना या समस्येला सामोरे जावे लागते. सायकलवर अथवा घरातून चालत शाळेत जाणे देखील पालकांना आणि विद्यार्थ्यांना भीतीदायक वाटते. त्यामुळे पालक पैसे खर्च करून आपल्या पाल्याला स्कूल van ने शाळेत पाठवतात. तसेच अपघाताचे देखील प्रकार पाहायला आढळतात. हीच समस्या महापालिकेच्या पथ विभागाने ओळखून त्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात विद्यार्थी कुठल्याही अडचणी शिवाय आणि कुणावरही अवलंबून न राहता बिनधास्तपणे शाळेत जाऊ शकेल. यासाठी पथ विभागाकडून आराखडा तयार केला जाणार आहे.

याबाबत पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी सांगितले कि, विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेऊन आम्ही हा प्रकल्प राबवणार आहेत. विदेशात school safe zone नावाची संकल्पना राबवली जाते. त्याच धर्तीवर आम्ही हा प्रकल्प साकारणार आहोत. यामध्ये कुठल्याही शाळेच्या परिसरातील १ किमी चा परिसर आम्हाला विकसित करायचा आहे. ज्यामध्ये ५ ते १२ वी पर्यंतचा कुठलाही विद्यार्थी आरामात सायकलवर किंवा चालत देखील आपल्या शाळेत जाऊ शकेल. यासाठी शहरातील ९ झोन आम्ही तयार केले आहेत. त्यानुसार खाजगी वास्तुरचना काराकडून प्रस्ताव मागवले होते. या ९ झोन मध्ये डेक्कन जिमखाना, हडपसर, लोहगाव-धानोरी, कोथरूड, वडगाव बुद्रुक, पर्वती-बिबवेवाडी, पाषाण, कोंढवा, आणि खराडी अशा झोन चा समावेश आहे. दांडगे यांनी सांगितले कि, आतापर्यंत ८ लोकांचे प्रस्ताव आम्हाला प्राप्त झाले आहेत. येत्या शुक्रवारी या सर्व प्रस्तावांची छाननी करण्यात येईल. त्यासाठी मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, पथ विभागातील प्रमुख अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांच्या उपस्थितीत हे प्रस्ताव अंतिम केले जातील. यामधील प्रमुख तीन प्रस्ताव अंतिम केले जातील. त्यानुसार डिसेंबर महिन्यात याची ट्रायल घेतली जाईल.

Holiday for all schools in Pune | पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी | शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार 

Categories
Breaking News Education PMC पुणे

पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी | शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार

| महापालिका शिक्षण विभागाचा निर्णय

पुणे | पुणे शहर आणि परिसरात गेल्या 10 दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. खडकवासला धरण भरले असल्याने  पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशातच आगामी काळातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शहरातील सर्व शाळांना उद्या (14 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महापालिका शिक्षण विभागाने निर्देश जारी केले आहेत.

| असे आहेत आदेश

पुणे महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व मनपा खाजगी शाळांना अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित इ.शाळांना दिनांक १४/०७/२०२२ रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
तथापि पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषगांने शाळेत उपस्थित राहतील.

Appointment of teachers | समाविष्ट २३ गावांतील शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्त्यांवर तोडगा काढा  | महापालिका आणि जिल्हा परिषदेकडे खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी 

Categories
Breaking News Education PMC पुणे महाराष्ट्र

समाविष्ट २३ गावांतील शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्त्यांवर तोडगा काढा

| महापालिका आणि जिल्हा परिषदेकडे खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे | पुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावांतील शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्त्यांबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आणि जिल्हा परिषदेकडे केली आहे.
खासदार सुळे यांच्यानुसार पुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावांतील शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्त्यांबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळणे गरजेचे आहे.
हा विषय महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या स्तरावर चर्चा करुन मार्गी लावता येणे शक्य आहे‌. तरी मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद पुणे आणि महापालिका आयुक्त पुणे  यांनी यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून यावर  तोडगा काढण्याबाबत सकारात्मक विचार करावा. अशी मागणी केली आहे.

100 percent syllabus | चालू शैक्षणिक वर्षापासून पहिली ते 12 वी साठी 100 टक्के पाठ्यक्रम लागू

Categories
Breaking News Education social महाराष्ट्र

चालू शैक्षणिक वर्षापासून पहिली ते 12 वी साठी 100 टक्के पाठ्यक्रम लागू

मुंबई | शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून इयत्ता पहिली ते 12 वी साठी 100 टक्के पाठ्यक्रम लागू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मार्च 2020 पासून कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू होत्या. तसेच प्रत्यक्ष शाळेत अध्ययन-अध्यापन मर्यादित स्वरूपात होत असल्याने या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचा ताण कमी व्हावा यादृष्टीने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता पहिली ते 12 वी चा पाठ्यक्रम 25 टक्के कमी करण्यात आला होता. तसेच ही परिस्थिती कायम राहिल्याने कमी केलेला पाठ्यक्रम 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी देखील कायम ठेवण्यात आला होता.

‘Mission Zero Dropout’ for out-of-school children | शाळाबाह्य बालकांसाठी 5 ते 20 जुलै दरम्यान ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’

Categories
Breaking News Education महाराष्ट्र

शाळाबाह्य बालकांसाठी 5 ते 20 जुलै दरम्यान ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’

 

मुंबई – शाळेत दाखल होण्यास पात्र शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करणे तसेच बालकांची शाळेतील गळती शून्यावर आणण्यासाठी येत्या ५ जुलै ते २० जुलै २०२२ या कालावधीत ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ व्यापक स्वरूपात राबविण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

बालकांना मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम राज्यात लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे.

राज्याच्या या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने हे ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ राबविण्यात येणार आहे.

मिशन झिरो ड्रॉपआऊट ची कार्यपद्धती

मिशन झिरो ड्रॉपआऊट मध्ये बालकांचा शोध घेताना ग्रामपंचायत/ नगरपरिषद/ महानगरपालिकातील जन्म मृत्यू अभिलेख्यामधील नोंदी, कुटुंब सर्वेक्षण, तात्पुरते स्थलांतरित कुटुंबात असणाऱ्या बालकांची माहिती, शाळाबाह्य, अनियमित बालके यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची कार्यवाही करण्यात येईल. ही मोहीम वस्ती, वाडी, गाव, वार्ड या स्तरावर पूर्ण करण्यात येईल. तर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक)/ जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास), बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण व नागरी) यांच्याकडून गाव. केंद्र, बीट, विभाग व शाळा स्तरानुसार नियोजन करण्यात येईल.

या अभियानात एकही शाळाबाह्य/ स्थलांतरित बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात यावी, असे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले असून यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर विविध नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

Pune : School : College : पहिली ते नववीच्या शाळा, महाविद्यालये उद्यापासून सुरू  :  १५ ते १८ वयोगटाच्या लाभार्थ्यांना फिरत्या वाहनातून लस

Categories
Breaking News Education पुणे

पहिली ते नववीच्या शाळा, महाविद्यालये उद्यापासून सुरू

:  १५ ते १८ वयोगटाच्या लाभार्थ्यांना फिरत्या वाहनातून लस

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील पहिली ते आठवीच्या शाळा अर्धवेळ (चार तास), तर नववीचे वर्ग पूर्णवेळ उद्यापासून (१ फेब्रुवारी) सुरू होणार आहेत. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणे पालकांना बंधनकारक नाही. तसेच १५ ते १८ वयोगटाच्या लाभार्थ्यांना फिरत्या वाहनातून (मोबाइल व्हॅन) लस दिली जाणार आहे. याशिवाय महाविद्यालयेही १ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळेल.

 ‘पुण्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याने शहरासह जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा अर्धवेळ, तर नववीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटाचे लसीकरण ८६ टक्के झाले आहे. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये या वयोगटाचे लसीकरण कमी झाले आहे. ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात लसीकरण होऊनही पुणे, पिंपरी-चिंचवडमुळे राज्याच्या तुलनेत १५ ते १८ वयोगटाचे लसीकरण सरासरीमध्ये कमी दिसून येत आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांचे फिरत्या वाहनातून लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास झाल्यास जवळच एका खोलीत उपचारांची व्यवस्थाही केली जाणार आहे. याबाबतचे आदेश सर्व संस्थाचालक आणि शाळांना दिले जातील. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार १ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होत आहेत. मात्र, लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल.

दरम्यान, शाळा, महाविद्यालये सुरू होणार असली, तरी पालकांनी मुलांना शाळा, महाविद्यालयात पाठवायचे किंवा कसे, याबाबतचे बंधन सध्या असणार नाही. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत मुखपट्टी काढावी लागू नये म्हणून दुपारची सुट्टी झाल्यानंतर घरीच जेवणाला मुलांनी जावे म्हणून सध्या शाळेची वेळ चार तासच ठेवण्यात आली आहे. बाधितांचे प्रमाण पाहून पुढील आठवडय़ात पहिली ते आठवीचे वर्गही पूर्णवेळ सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

Shivsena : PMC : महापालिकेच्या प्रांगणात शिवसेनेने भरवली शाळा!  बांधकाम पुर्ण झालेली ई-लर्निंग शाळा सुरु करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिकेच्या प्रांगणात शिवसेनेने भरवली शाळा!

बांधकाम पुर्ण झालेली ई-लर्निंग शाळा सुरु करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

पुणे – सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक, नऱ्हे, धायरी आदी भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पध्दतीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने गेल्या कित्येक वर्षांपासून वडगाव बुद्रुक येथे पुणे महानगरपालिकेच्या ई-लर्निंग शाळेचे बांधकाम पुर्ण होउन अद्यापदेखील ही शाळा सुरु करण्यासाठी उर्वरित बाबींची पुर्तता पालिकेतील सत्ताधार्‍यांकडून केली जात नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या परिसरातील मुलांचे उज्ज्वल भविष्य त्यांना मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याखाली शाळा भरवून अनोखे आंदोलन केले गेले.

२०१३ मध्ये सुरु करण्यात आलेल्या या शाळेच्या बांधकासाठीचे बजेट बारा कोटीचे बजेट होते. परंतु बजेट पुरेसे नसल्यामुळे दोन मजले कमी करून तीन मजली इमारत बांधण्यात आली असून काम अंतिम टप्प्यात आले आहे, मात्र पालिकेतील सत्ताधार्‍यांच्या उदासीनतेमुळे या उर्वरित कामांना निधी मिळेनासा झाला आहे. केवळ देशाचे माजी कृषीमंत्री खा. शरदचंद्रजी पवार यांचे नाव या ई लर्निंग स्कूलला दिल्यामुळेच भाजपची तिरस्काराची भूमिका स्पष्ट होत आहे. या भागातील सत्ताधारी भाजपचे चार नगरसेवक, महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हे जाणून बुजून येथील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप यावेळी शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला.

शिवसेनेचे खडकवासला क्षेत्र समन्वयक मनिष जगदाळे म्हणाले, ई-लर्निंग शाळा मुद्दाम बंद ठेऊन सत्ताधारी भाजप बहुजन आणि सामान्य स्थानिक विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेत आहे. मात्र सिंहगड रोड परिसरातील विद्यार्थ्यांवर अन्याय करत भाजप कोणता सूड उगावत आहे? असा सवाल जगदाळे यांनी केला आहे.

यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, पुणे मनपा गटनेते पृथ्वीराज सुतार, जिल्हा प्रमुख विजय देशमुख, रमेश कोंडे, शहरसंघटीका संगीताताई ठोसर, सविताताई मते, नगरसेविका प्राचीताई आल्हाट, नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, अशोक हरणावळ, विशाल धनवडे, पल्लवीताई जावळे, श्वेता चव्हाण, युवासेना सहसचिव किरण साळी, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, प्रशांत राणे, आनंद गोयल, बाळासाहेब मालुसरे, मनिष जगदाळे, वैभव हनमघर, अनंत घरत, किशोर रजपूत, नंदू येवले, राजेश चव्हाण, दीपक शेडे, संतोष गोपाळ, राजेंद्र शिंदे, उमेश गालिंदे, संदीप गायकवाड, युवराज पारिख, मुकुंद चव्हाण, कल्पनाताई थोरवे, छाया भोसले, स्वाती कथलकर, रुपेश पवार, संजय वाल्हेकर, प्रथमेश भुकन, संतोष सावंत, राजाभाऊ होले, सुरेश घाडगे, महेश पोकळे, शंकरराव हरपळे, बाळासाहेब गरुड, राजेश वाल्हेकर, राहूल जेटके, सनि गवते, अजय परदेशी, मारुती ननावरे, गणेश कामठे, अक्षय माळकर, चंद्रकांत केगार, संदीप गद्रे, विकी धोत्रे, विनोद सातप, आकाश शिंदे, आशिष शिर्के, विजय पालवे, सुरेश कांबळे, योगेश जैन, राज गडुगुळ, नितिन निगडे, गणेश भापकर, श्रृती नाझरकर, अनिता परदेशी, प्रज्ञा लोणकर, कलावती घाणेकर, शर्मिला येवले, सुनिता खंडाळकर, गायत्री गरुड, भावनाताई थोरात, प्रशांत काकडे उपस्थित होते.