Mukhyamantri Vayoshri Yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये! अर्ज करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन  

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Mukhyamantri Vayoshri Yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये! अर्ज करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Mukhyamantri Vayoshri Yojana:  राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता सरसकट ३ हजार रुपये मिळणार आहेत, म्हणजे प्रत्येक वर्षाला राज्य शासन एवढी आर्थिक मदत करणार आहे.

शिंदे सरकारने  ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अभिनव योजना सुरू केली आहे, त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना, या योजनेची अंमलबजावणी पण सुरू झाली आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra साठी कोण पात्र असणार?

फायदे काय काय मिळणार? अर्ज कसा करायचा? अशी सविस्तर माहिती या लेखामध्ये मी दिली आहे. काळजीपूर्वक माहिती वाचा आणि त्यानुसार अर्ज सादर करा, म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला पण याचा लाभ घेता येईल.

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फायदे हे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहेत, या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदती बरोबरच इतर बरेच फायदे मिळणार आहेत.
  • मुख्यमंत्री वयोश्री योजना द्वारे सहभागी ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये DBT द्वारे थेट बँक खात्यात मिळणार आहेत.
  • योजनेद्वारे ३००० रुपये, वर्षाला मदत स्वरूपात शासन पैसे देणार आहे.

आर्थिक मदत ही ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळे उपकरणे खरेदी करण्यासाठी केली जाणार आहे, जर ज्येष्ठ व्यक्ती अपंग असेल किंवा वयोमान अशक्त असेल तर या उपकरणांचा त्यांना मोठा फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत मिळणारे उपकरणे

योजने द्वारे दिली जाणारी ३ हजार रुपयांची आर्थिक मदत हि वृद्धांना उपकरणे खरेदी करण्यासाठी असणार आहे, पैसे DBT द्वारे थेट लाभार्थी जेष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.

  • श्रवण यंत्र
  • फोल्डिंग वॉकर
  • बॅक सपोर्ट बेल्ट
  • सर्वाइकल कॉलर
  • चश्मा
  • ट्रायपॉड
  • स्टिक व्हीलचेयर
  • कमोड चेयर

Mukhyamantri Vayoshri Yojana Elegibility Criteria (पात्रता निकष)

महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासनाने वेगवेगळे पात्रता निकष ठरवले आहेत, त्यानुसार जे व्यक्ती पात्र ठरतील त्यांनाच या योजनेत सहभागी होता येणार आहे.

  • ज्येष्ठ नागरिकाचे वय हे किमान ६५ वर्षे असावे.
  • ज्येष्ठ नागरिकाचे वार्षिक उत्पन्न हे २ लाखा पेक्षा कमी असावे.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.

जे अर्जदार वरील पात्रता निकषांची पूर्तता करतील, के त्यांनाच मुख्यमंत्री वयोश्री योजना मध्ये सहभागी होता येईल.

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra Document List (कागदपत्रे)

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

  1. अर्जदाराचे आधार कार्ड
  2. रहिवासी प्रमाणपत्र
  3. ओळखपत्र
  4. वयाचा पुरावा
  5. रेशनकार्ड
  6. अपंग असल्यास प्रमाणपत्र
  7. मोबाईल नंबर
  8. पासपोर्ट फोटो

वर दिलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करताना सादर करायचे आहेत. कागदपत्रे Soft Copy आणि Hard Copy दोन्ही स्वरूपात असावेत.

Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र ही योजना शिंदे सरकार मार्फत राज्यात सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय वयोश्री योजना प्रमाणे या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळे लाभ मिळणार आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले जाणार आहे, त्याची प्रक्रिया सुरु आहे. केंद्राच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर हि योजना राज्य सरकार राबवत आहे, त्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया हि सारखीच असणार आहे.

योजने संबंधी मंत्री मंडळ निर्णय घेण्यात आला आहे, परंतु अद्याप याची अर्ज प्रक्रिया सांगण्यात आलेली नाही. नवीन अपडेट येण्या आगोदर आम्ही तुम्हाला येथे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची माहिती दिली आहे.

Maharashtra Mukhyamantri Vayoshri Yojana साठी पण सारखीच अर्ज प्रक्रिया असणार आहे, त्यामुळे तुम्ही पण या स्टेप वापरून योजनेसाठी अर्ज सादर करू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला वयोश्री योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
  • वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online साठी रजिस्ट्रेशन फॉर्म वर क्लिक करायचे आहे.
  • काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे, सर्व माहिती अचूक टाकायची आहे. माहिती चुकीची आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
  • सूचनेनुसार आवश्यक ते सर्व कागदपत्रे Soft Copy मध्ये अपलोड करायचे आहेत, मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व त्यांची लिस्ट वर दिली आहे.
  • शेवटी वयोश्री योजनेचा फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे.

अशा रीतीने तुम्ही Maharashtra Mukhyamantri Vayoshri Yojana साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकता.

मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यात राबवण्यासाठी मान्यता मिळाली आहे, निधीची पण तरतूद करण्यात आली आहे.

———

पुणे समाज कल्याण विभागाकडून ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी एकरकमी आर्थिक सहाय्य देण्याच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजने’चा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणाऱ्या दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी व मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न २ लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न वैयक्तिक बँक खात्यावर एकरकमी ३ हजार रूपये थेट लाभ वितरण (डीबीटी) प्रणालीद्वारे प्रदान करण्यात येईल.

लाभ वितरण झाल्यावर या योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन:स्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत सहायक आयुक्त समाजकल्याण पुणे यांचेकडून प्रमाणित करून संबंधीत केंद्रीय सामाजिक उपक्रम (सीपीएसयु) संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर ३० दिवसांच्यात आत अपलोड करणे आवश्यक राहिल. अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी पात्र अर्जदारांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन स.नं.१०४/१०५, विश्रांतवाडी रोड, पोलिस स्टेशनसमोर, येरवडा पुणे- ०६ (दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११ ईमेल-acswopune@gmail.com) वर सपंर्क साधण्याचे आवाहनही सहायक आयुक्त, समाजकल्याण विशाल लोंढे यांनी केले आहे.

Khadaki Jyesth Nagrik Sangh Virangula Kendra| खडकी परिसरात न्यू आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन

Categories
Breaking News Political social पुणे

Khadaki Jyesth Nagrik Sangh Virangula Kendra| खडकी परिसरात न्यू आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन

 

Khadaki Jyesth Nagrik Sangh Virangula kendra| खडकीतील मुळा रोड परिसरात न्यू आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन मा. नगरसेविका  सोनाली लांडगे, DYSP अनिल पवार, मा. नगरसेवक आयाझभाई काझी,  शिवसेना विधानसभा प्रमुख संतोष लांडगे फिरोज मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. (Senior Citizen Pune)

दरम्यान या संघासाठी सामुहिक निधी जमा करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी हा निधी जमा करत या संघाची स्थापना केली आहे. सोनाली लांडगे आणि संतोष लांडगे यांनी पुढाकार घेत या संघाचे काम तडीस नेले आहे. दरम्यान या संघामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. या माध्यमातून विविध उपक्रम घेता येणार आहेत. शिवाय आपल्या समस्या देखील ज्येष्ठ नागरिकांना  मांडता येणार आहेत.

The Karbhari - Santosh landge

या प्रसंगी जेष्ठ नागरी संघांचे सदस्य अध्यक्ष सुरेश मोहिते, रमाकांत शर्मा मरीबा गायकवाड, दिलीप अडसूळ, उल्हास शिंदे, विश्वास वायदंडे, अशोक शिंदे, राजेंद्र पाटोळे, ज्ञानेश्वर अडसूळ, बबन गायकवाड, विनायक काळे, प्रकाश गवळी, शंकर नाईकनवरे, सुनील गायकवाड, रमेश कांबळे, भीमराव शिंदे, आनंद शेलार, प्रभाकर केदारी, न्यानेश्वर गायकवाड, तुकाराम माने, लक्ष्मण चव्हाण, राजू चव्हाण, बाळू वाघ , मंगलताई रिटे, सूर्रय्या सय्यद, भीमाबाई शिंदे गवळी, शारदा ओव्हाळ व इतर मान्यवर उपस्थित होते

Senior Citizens Day | ज्येष्ठ नागरिकांना जागरुक करण्यासाठी आर्थिक व सायबर फसवणुकीविषयी मार्गदर्शनासाठी परिसंवाद

Categories
Breaking News social पुणे

Senior Citizens Day | ज्येष्ठ नागरिकांना जागरुक करण्यासाठी आर्थिक व सायबर फसवणुकीविषयी मार्गदर्शनासाठी परिसंवाद

 

Senior Citizens Day | Pune |  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे आणि कर्वे समाजकार्य महाविद्यालय, कर्वेनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्वे समाजकार्य महाविद्यालय येथे मंगळवार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.१५ वाजता ज्येष्ठ नागरिक दिन साजरा (Senior Citizens Day Celebration) करण्यात येणार आहे. सायबर गुन्हेगारीद्वारे (Cyber Crime) ज्येष्ठ नागरिकांची (Senior Citizen) आर्थिक फसवणुकीचे (Financial Fraud) वाढते प्रमाण पाहता ज्येष्ठ नागरिकांना जागरुक करण्यासाठी ‘आर्थिक, सायबर गुन्हे मार्गदर्शन व परिसंवाद’ याप्रसंगी आयोजित करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ चांगल्या प्रकारे व्यतीत करता यावा. समाजामध्ये त्यांचे जीवनमान सुसह्य व्हावे, शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळवण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ९ जुलै २०१८ च्या शासन निर्णयानुसार राज्याचे सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. तसेच १ ऑक्टोबर हा दिवस राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. (Why is Senior Cititzens Day Celebrated!)

त्याअनुषंगाने ३ ऑक्टोबर २०२३ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यावेळी समाज कल्याण प्रादेशिक उपआयुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे, कर्वे समाज सेवा संस्था संस्थेचे विश्वस्त मधुकर पाठक यांची प्रमुख उपस्थिती असेल. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. लोंढे यांनी केले आहे.

Senior Citizen Day | जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करा | सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना राज्य सरकारचे आदेश 

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Senior Citizen Day | जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करा | सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना राज्य सरकारचे आदेश

 

Senior Citizen Day |राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस (Senior Citizen Day)  म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम,उपक्रम राबविण्यात यावेत तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका व नगरपालिका, नगर परिषद यांनी व्यापक प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे (Sumant Bhange) यांनी दिले आहेत.

राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर २०२३ हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याबाबतचे परिपत्रक सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहे. या दिवशी सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र, परिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सचिव श्री. भांगे यांनी सांगितले आहे.

Free Travel | ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ | सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

| सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार असून एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास योजना लागू असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विधीमंडळाच्या समिती कक्षात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेसाठी ज्येष्ठांना प्रमाणपत्रांचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार भरत गोगावले, प्रताप सरनाईक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंग, महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महाव्यवस्थापक शिवाजी जगताप, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

राज्य परिवहन महामंडळाद्वारे ज्येष्ठ नागरिकांची ३४ लाख ८८ हजार स्मार्ट कार्डची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १४ लाख ६९ हजार आहे. सध्या राज्यात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेस मधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली जाते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली होती. त्याचा शुभारंभ आज झाला. याप्रसंगी श्रीमती आनंदी गुरव, रमेश खाडे, विजय औंधे, बाबाजी चिपळूणकर, चंद्रमोहन परब यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत प्रवास सवलत प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवासादरम्यान वाहक शून्य मूल्य वर्ग तिकीट देतील. विशेष म्हणजे मोफत प्रवासाची ही सवलत एस टीच्या सर्व सेवांसोबतच शिवनेरी बस सेवेसाठी देखील लागू असणार आहे,असे व्यवस्थापकीय संचालक श्री. चन्ने यांनी प्रास्ताविकात सांगितले.

सवलत योजनेची वैशिष्ट्ये : वातानुकुलीत, शयनयानसह सर्व सेवा प्रकारांमध्ये ही सवलत अनुज्ञेय आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवांमध्ये ५० टक्के सवलत मिळत आहे. आता वातानुकुलीत, शयनयान आणि शिवनेरी या उच्चश्रेणी सेवांनाही ही सवलत लागू होणार आहे.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र व केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट देऊन मोफत प्रवास करता येईल.

Free travel | Insurance cover | ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.मधून मोफत प्रवास | दहीहंडी पथकातील गोविंदांना 10 लाखाचे विमा संरक्षण

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र शेती

७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.मधून मोफत प्रवास

दहीहंडी पथकातील गोविंदांना 10 लाखाचे विमा संरक्षण

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई | नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात येईल. त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. बस मधून मोफत प्रवास देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सहकार मंत्री अतुल सावे, सार्व. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमध्ये यापूर्वी जिरायत शेतीसाठी 10 हजार प्रती हेक्टर ऐवजी त्यात बदल करून 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर, बागायत शेतीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक शेतीसाठी 25 हजार रुपयांवरून ती आता 36 हजार रुपये प्रती हेक्टर मदत करण्यात आली आहे. यात 2 हेक्टरवरून 3 हेक्टर मर्यादा करण्यात आली आहे. यामुळे नैसर्गिक आपतीमध्ये शेतकऱ्याला जवळपास दुपटीने मदत होईल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या निर्णयाची अंमबजावणी करण्यात येत आहे. शेतकरी हितासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.

उच्च दाब व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना जून 2021 पासून 1 रुपया 16 पैसे प्रती युनिट इतकी सवलत कायम, लघु दाब जलसिंचन ग्राहकांना 1 रुपया प्रति युनिट हा सवलतीचा दर जून 2021 पासून नव्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

विद्युत वितरण प्रणालीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून महावितरण कंपनीच्या रु. 39 हजार 602 कोटी व बेस्टच्या रु. 3 हजार 461 कोटी रकमेच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली आहे. तसेच वीज वितरणातील हानी 15 टक्केपर्यन्त कमी करून ग्राहकांसाठी प्रिपेड / स्मार्ट मीटर याचा 1 कोटी 66 लाख ग्राहकांना फायदा ग्राहकांना होणार आहे. ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील पात्र परंतु भूमीहीन लाभार्थीना जागा देण्यासाठी सवलती देण्यात आल्या आहेत. यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या धर्तीवर 1 हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क रक्कम निचित, मोजणी शुल्कामध्ये 50 टक्क्यांपर्यंत सवलत 2 मजली ऐवजी 4 मजली इमारत बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे श्री शिंदे यांनी सांगितले

अनेक गोविंदा पथकांची शासनाने विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भंडारा जिल्ह्यातील महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी श्रीमती रागसुधा, समादेशक, राज्य राखीव पोलिस दल यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला असून याबाबतचा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यात येईल. तसेच शक्ती कायदा बाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

मागील सरकारच्या काळातील निर्णय रद्द करण्यात आलेले नाहीत. त्या निर्णयाचा आढावा घेऊन पूनर्विलोकन करण्यात येत आहे. त्यातील अत्यावश्यक आणि प्राधान्यक्रमानुसार निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार असून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल, त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या भागामधील 95 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी पंचनाम्याबाबत तक्रारी केल्या असल्याने त्या त्या भागातील पंचनामे पूर्णत्वाकडे आहेत. याबाबत तातडीने मदत करण्यात येईल. ही मदत शेतकऱ्याच्या थेट खात्यात जमा होईल. जनतेच्या हितासाठी हे सरकार असून कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नसून पूनर्विलोकन ते करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Dr Shyamaprasad Mukherjee Diagnostic Center : कोथरूडमध्येही आता ज्येष्ठ नागरीक मोफत वैद्यकीय तपासणी योजना!

Categories
Breaking News PMC Political पुणे

कोथरूडमध्येही आता ज्येष्ठ नागरीक मोफत वैद्यकीय तपासणी योजना

: महापालिकेच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

: महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नातून साकारले सेंटर

 

पुणे : केवळ प्राथमिक आरोग्याची जबाबदारी असताना कोरोना संसर्गकाळात पुणे महापालिकेने कोणत्याही मुद्द्यावर अडून न बसता नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेची रुग्णालये अद्ययावत तर केलीच शिवाय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामध्ये मुंबईलाही मागे टाकत बाजी मारली. म्हणूनच आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेत पुणे महानगरपालिकेने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे’, असे उद्गार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढले.

पुणे महापालिकेची डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरीक मोफत वैद्यकीय तपासणी योजना आता कोथरूड येथील सुतार हॅास्पिटलमध्येही डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून सुरु झाली असून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महागड्या चाचण्यांअभावी आजाराचे निदानच करु न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना हे केंद्र मोठा आधार ठरणार आहे.

व्यासपीठावर माढ्याचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर, उपमहापौर सुनिता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, आयुक्त विक्रम कुमार, नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, जयंत भावे, राजाभाऊ बराटे, धनराज घोगरे, दिलीप वेडे-पाटील, मंजुश्री खर्डेकर, अल्पना वर्पे, डॉ. श्रद्धा प्रभुणे, कृष्णा डायग्नोस्टिकच्या पल्लवी जैन आदींसह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

पाटील पुढे म्हणाले, ‘आजारपणामुळे कर्जबाजारी झाल्याचे अनेक प्रकार घडत असतात. अशा परिस्थितीत महापालिकेचे हे केंद्र उपयोगी असेल. त्यामुळे महापालिकेचे मनापासून अभिनंदन करतो. समाजातील शेवटचा माणूस सुखी झाल्याशिवाय समाज सुखी होणार नाही, या विचारानेचे काम सुरु असून डायलिसिसची सुविधा उपलब्ध करुन द्यावी’.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘पुणे शहराची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचा शब्द भारतीय जनता पक्षाने पाळला असून भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयास लवकरच अंतिम मान्यता मिळणार आहे. यामुळे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय असणारी पुणे महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरेल. प्राथमिक सुविधेच्या पलीकडे जाऊन आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहून आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी, म्हणून महापालिकेचे अविरत कार्य सुरूच राहील’

‘पुणेकरांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन सुरक्षित आरोग्य यंत्रणा निर्माण केली गेली. ३५ ते ४० हजार महिलांची मोफत कॅन्सर तपासणी आजवर करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी राज्य सरकारची असूनही यात राजकारण न आणता नागरिकांच्या आरोग्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करून कोरोना काळात सर्वोत्तम आरोग्य सेवा प्रदान केली. पुणे महानगरपालिका आज आरोग्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे हे सांगताना अभिमान वाटतो’, असेही महापौर मोहोळ म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ जाधव यांनी केले.

Senior citizen : covishield vaccine : ज्येष्ठ नागरिकांना रविवारी 5 रुग्णालयात मिळणार लस!

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

ज्येष्ठ नागरिकांना रविवारी 5 रुग्णालयात मिळणार लस!

: 60 वर्षावरील नागरिकांना कोविशील्ड लस

पुणे : शहरामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शहरातील जेष्ठ नागरिकांना (६० वर्षावरील) कोव्हीशिल्ड ही लस पुणे महानगरपालिकेच्या ५ रुग्णालयांमध्ये प्रत्येकी कोव्हिशिल्ड लसीचे १५० डोस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

: 50% ऑनलाईन नोंदणी

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार रविवार  रोजी उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी ५० % लस फक्त वय वर्षे ६० व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर (ON SPOT नोंदणी करून) ५०% लस (ONLINE नोंदणी करून) पहिला डोस, दुसरा डोस आणि प्रिकॉशन डोस देण्यात येईल.

: खालील लसीकरण केंद्रावर कोव्हिशिल्ड लस देण्यात येणार
–   कै. जयाबाई नानासाहेब सुतार हॉस्पिटल, कोथरूड
– कै. सखाराम कुंडलिक कोद्रे दवाखाना, मुंढवा
– कमला नेहरू रुग्णालय, मंगळवर पेठ
– कै. रोहिदास किराड दवाखाना, गणेश पेठ
– औंध कुटी रुग्णालय

Pune : Vaccination : Senior Citizen : आता रविवारी देखील पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लस : महापालिका करणार नियोजन

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

आता रविवारी देखील पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लस 

: महापालिका करणार नियोजन 

पुणे – शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे (Old People) बुस्टर डोसचे (Booster Dose) लसीकरण (Vaccination) वेगात करण्यासाठी आता रविवारी देखील महापालिकेची (Municipal) लसीकरणकेंद्र सुरू राहणार आहेत. पुढच्या रविवारी म्हणजे ३० जानेवारीपासून कोणते केंद्र सुरू राहतील याचे नियोजन लवकरच पुणे महापलिकेतर्फे जाहीर केले जाणार आहे.पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीमध्ये महापालिकेने शहरातील सद्यस्थितीचे सादरीकरण केले. त्यावेळी लसीकरणाची माहिती घेताना अजित पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीही रविवारी लसीकरण सुरू ठेवा असे आदेश दिले आहेत.

 

: पालकमंत्री यांचे आदेश

पुणे शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे, वद्धापकाळात इतर आजारांनी त्यांना ग्रासलेले असते, रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने त्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. त्यामुळे ६० पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण वेगात होणे गरजेचे आहे.गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत शहरातील ४ लाख ८७ हजार ८८५ ज्येष्ठांनी एक डोस घेतला आहे. तर ४ लाख २८ हजार ६६४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. १० जानेवारी ते २० जानेवारी या कालावधीत १७ हजार ३८९ ज्येष्ठांनी बुस्टर डोस घेतला आहे. महापालिकेला येत्या काळात आणखी किमान चार लाख ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस द्यायचा असल्याने या मोहिमेची गती वाढवली जाणार आहे.महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये रविवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार शहरातील कोणते केंद्र सुरू राहणार आहेत याचे नियोजन जाहीर केले जाईल. सध्या सोमवार ते शनिवार लसीकरण सुरू आहे. त्यामध्ये कोव्हीशील्डचे १८० व कोव्हॅक्सीनचेही लसीच्या उपलब्धतेनुसार केंद्रांची संख्या निश्‍चीत केली जाते.