Sharad Pawar Baramati | …ही आहे शरद पवारांची ताकद! असे का म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Categories
Breaking News Political पुणे

Sharad Pawar Baramati | …ही आहे शरद पवारांची ताकद! असे का म्हणाल्या सुप्रिया सुळे?

| न्यूयॉर्क टाईम्सचा दाखला देत सुळे यांचा विरोधकांवर घणाघात

Sharad Pawar Baramati – (The Karbhari News Service) – न्यूयॉर्क टाईम्स (The New York Times) सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर वाचल्या जाणाऱ्या अमेरिकन दैनिकाचे प्रतिनिधी बारामतीची निवडणूक कव्हर करायला येतात ही शरद पवार यांची ताकद आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एका अर्थाने ‘पवार हीच पॉवर’ असल्याचे स्पष्ट केले. शरद पवारांची ताकद काय आहे ते या निवडणुकीत बघायला मिळत आहे, असे त्या म्हणाल्या.

निवडणूक प्रचारादरम्यान माळेगाव खुर्द येथील यमाई देवी मंदिरात सुळे यांनी आज दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी उपसरपंच प्रदीप नवले राष्ट्रवादी युवा संघाचे राजेंद्र काटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक तावरे, पल्लवी काटे, पोर्णिमा पवार, अशोक जगताप अमोल कोंडे, राजेंद्र पाठक देशमुख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

बारामतीकरांनी चांगल्या वाईट प्रसंगी नेहमी पवारांना साथ दिली आहे, असे सांगत ‘माझी लढाई व्यक्तिगत नसून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘बारामती मधील विद्या प्रतिष्ठान मध्ये शिकणाऱ्या मुली आयटी कंपनीत काम करून लागल्या ही अभिमानास्पद बाब आहे. हा विकास कोणी केला, विद्या प्रतिष्ठान ही संस्था कोणी स्थापन केली, हे वेगळे सांगायची गरज नाही. देशातील ज्या तीन खासदारांचा उत्कृष्ट खासदार म्हणून सत्कार करण्यात आला त्या तीनपैकी मी एक होते, हा बहुमान माझा नाही तर बारामतीकरांचा आहे. तुम्ही संधी दिली म्हणून तो मान मला मिळाला.

केंद्र सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, ‘आज दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, उसाला नाही, कापसाला नाही अशा प्रसंगी आम्ही लोकसभेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा म्हणून बोललो, तर आम्हाला निलंबित करण्यात आलं. माझ्या आजीने आणि आईने मला मला एकच गोष्ट शिकवली आहे, ‘रडायचे नाही लढायचे’ त्यानुसार मी महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीच्या विरोधात नेहमी लढत राहू’.

Sharad Pawar | भाजपाने दहा वर्षे जनतेची फसवणूक केली – शरद पवार

Categories
Breaking News Political पुणे

Sharad Pawar | भाजपाने दहा वर्षे जनतेची फसवणूक केली – शरद पवार

 

Sharad Pawar – (The karbhari News Service) – आज ज्यांच्या हातात सत्ता आहेत्यांनी गेली दहा वर्षे जनतेची फसवणूक केली. शेतकऱ्यांचे प्रश्नमहागाईबेरोजगारीमहिलांची सुरक्षितता याबाबत केलेली वक्तव्य आणि वस्तुस्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. तरूणांना दरवर्षी नोकरीराजगारांचे आश्वासन देऊन त्यांचीदेखील फसवणूक केली आहे. त्यामुळे   जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाहीहा ठाम निर्णय घेतला आहेअसा विश्वास जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

 

    जिल्हाधिकारी कार्यालयापासून  भव्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह जिल्हाभरातून आलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर हॉटेल शांताई येथे जाहीर सभा घेण्यात आली. सभास्थळी उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते वाढवण्यात आला.

 

यावेळी ते बोलत होते. या वेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजेष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातकाँग्रेसचे माजी राज्यमंत्री आ. विश्वजित कदमराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटीलशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन आहिर सुषमा अंधारे आणि आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अभिजित फाटकेमाजी आमदार व पुणे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशीपुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुणे लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगतापआमदार संग्राम थोपटेसंजय जगतापरोहित पवारमाजी आमदार उल्हासदादा पवारदीप्ती चवधरीजयदेव डोळे ,अशोक पवारमाजी उपमहापौर अंकुश काकडेरोहिणी खडसे,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरेगजानन थरकुडेआम आदमी पक्षाचे सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकर उपस्थितीत होते.

 

       काँग्रेसराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेतेपदाधिकारी व हजारोंच्या कार्यकर्त्यांनी धंगेकर इंडिया आघाडीचा विजय असोअशा घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

 

     शरद पवार म्हणालेपंतप्रधान मोदी 2014 मध्ये सत्तेत आले. त्यावेळी पेट्रोलचे दर 71 रुपये होते. मोदी म्हणालेपन्नास दिवसांत पेट्रोलचे दर कमी  करतो. आज 3 हजार 650 दिवस झालेआज दर 106 रुपये झाले. घरगुती गॅस बाबत मोदी म्हणाले410 रुपयांवरून कमी आणणार. आता 1 हजार 160 रुपये झाला. मोदी तरूणांना रोजगार देणार होते. प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देणार होतेउलट रोजगार टक्का घसरला. आज 86 टक्के तरुण बेरोजगार आहेत. याचा अर्थ शब्द द्यायचा अन तो फिरवायचा. त्यामुळे जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाहीहा ठाम निर्णय घेतला आहे. मोदींनी जनतेची वेळोवळी फसवणूक केली आहे. आता त्यांना सत्ते पासून जनताच दूर करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.

 

      जयंत पाटील म्हणालेमहाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार स्वाभिमानी आहेत. या उमेदवारांना मतदार संसदेत पाठवणार आहेत. भाजप- महायुतीला अजूनही उमेदवार मिळत नाही.  दिलेला उमेदवार त्यांना बदलावा लागत  असून  आपल्याला जनता आता स्वीकारणार नाहीहे त्यांना कळून चुकले आहे. त्यांचा आत्मविश्वास हरवला आहे. कसबा विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. धंगेकर यांच्या पाठीशी जनता उभी राहणार आहे.

 

    मोहन जोशी म्हणालेयंदा पुण्याचा खासदार काँग्रेसचाच होणार. धंगेकर यांना तळागाळातून पाठींबा आहे.

 सुषमा अंधारे म्हणल्यामोदीं सरकारची गॅरंटी ही जाहिराती पुरती आहे. जाहिरात वाईट गोष्टींची होते. जसे की रमी पें आवो ना महाराज. आदर्श घोटाळा70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणाऱ्या लोकांची मोदीं सरकारने  गॅरंटी घेतली आहे. पुण्याचा उडता पंजाब सारखी परिस्थिती सरकारे केली आहे. यावर ते बोलत नाही. रविंद्र  धंगेकर यांनी यावर आवाज उठवला. पुणे सुरक्षित ठेवण्यासाठी धंगेकर यांना निवडून द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

 

   सचिन अहिर म्हणालेही लढाई पक्षापुरती नसून हुकूमशाही विरोधात आहे. शिवसेना फोडणाऱ्यांना जनता घरी बसवणार आहे.

 

रविंद्र धंगेकर म्हणालेआमची स्वाभिमानाची लढाई आहे. इतिहास सामान्य माणसांचा लिहिला जातो. पळून जाणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही. पुण्यात 10 वर्षात काम केले असा प्रश मी विरोधकांना विचारला असतात्यांनी दुसऱ्यांनी केलेल्या कामाचा आराखडा सांगितला.  जनता हुशार आहे आता फसवणे शक्य नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. जनता मला निवडून देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

 

अमोल कोल्हे म्हणालेआत्ता फक्त ट्रेलर दाखवतोपिक्चर दाखवायला आपल्याकडेडं खुप वेळ आहे.

 

देशातल्या जनतेचं ठरलंयबळकट पंजाने स्वाभिमानाची मशाल पेटवायची अन विजयाची तुतारी फुंकायची.

 

  आता हे म्हणतायेत कचाकचा बटन दाबापाहिजे तेवढा निधी देतो. हा पैसा  काय ह्यांच्या खिशातला आहे काअहो आम्हा जनतेकडून तुम्ही कर घेता अन त्या कराच्या जोरावर तुम्ही कचाकचा बटन दाबायला सांगता का?

   कोट्यवधींना मोफत खाती उघडून दिलीनंतर त्या खात्यात दोन हजार रुपये रक्कम ठेवावीच लागेल असा नियम आणला. मग या खात्यांना आधार आणि पॅन कार्ड लिंक करायला लावलं. हे करण्यासाठी दोनशे रुपये फी आकारलीउशीर झाला तर दंड ही आकारला. मग हा निधी फोडाफोडी अन निवडणुकीसाठी पैसा वापरला जातोय.

  सुप्रिया सुळे म्हणाल्यामाझ्यावर आणि अमोल कोल्हेंवर   खूप टीका होत आहे. घटस्फोट होऊन सहा महिने झालेअठरा वर्षे आमच्यासोबत संसार करणारे आता वैयक्तिक टीका करतायेत. मात्र ही निवडणूक आता जनतेच्या हातात गेली आहे.

 

विश्वजित कदम म्हणालेसध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लाट आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा त्यांनी फासला आहे. आता जनता त्यांना काळीमा फासणार आहे.

 

बाळासाहेब थोरात म्हणलेही निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. तिन्ही उमेदवार निवडून येणारे आहेत. सर्वसामान्यांचा चेहरा धंगेकर आहेत. जनतेतू त्यांची मागणी झाली होतीत्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. बाळासाहेब थोरात यांनी पुढील मुख्यमंत्री मविआचा व्हायला हवाहे ध्येय बाळगून काम कराअसे आवाहन यावेळी केले.

 

पृथ्वीराज चव्हाण म्हणालेमोदी भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहेअसे म्हणतात. मात्रमनमोहन सिंग पंतप्रधान असताना विकासाची गती जशी होतीतशीच कायम राहिली असती तर आज आपण तिसऱ्या क्रमांकावर आलो असतो. हे मी नव्हे तर देशातील नामांकित संस्थांचा अहवाल सांगतो. याला मोदींची धोरणं कारणीभूत ठरली. मोदी फक्त गोलगोल फिरवतात   विकासाची व्याख्या मात्र सांगत नाहीत. मोदी फक्त प्रत्येक ठिकाणी आपला फोटो झळकवतात. 48 ठिकाणी त्यांचे फोटो झळकवले आहेत. त्यांना भीती आहेआपला फोटो जनतेसमोर नसेल तर जनता आपल्याला विसरून जाईल.

 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे म्हणाले की, लोकशाही, सर्व धर्म समभाव आणी सामाजिक समता या विचारांची शिदोरी घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पुण्यासारखे महत्वाचे शहर काँग्रेस पक्षाने विकासित केले मात्र गेल्या १० वर्षात भाजपाने पुण्याला १० वर्ष मागे नेले.

 

 

Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar | शरद पवारांच्या नेतृत्वात  मातब्बरांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे

Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar | शरद पवारांच्या नेतृत्वात  मातब्बरांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश

Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar  – (The Karbhari News Service) – आज शरद पवारांच्या (Sharad Pawar) पुणे येथील निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक  राहुल तूपेरे, शेतकरी कामगार संघटनेचे प्रवक्ते  भगवान जाधव, माजी नगरसेवक आरिफभाई बागवान, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनिल खेडेकर, स्व. खासदार गिरीशभाऊ बापट यांचे स्विय्य सहाय्यक  सुनिल माने यांनी जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap Pune NCP) यांनी यात महत्वाची भूमिका बजावली.

The Karbhari - NCP Sharadchandra Pawar

प्रशांत जगताप म्हणाले, मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर “आता शरद पवारांच्या नेतृत्वाचं काय होणार ?” असा प्रश्न सर्वांना पडला होता. अनेकांनी तर “शरद पवार की राजनीती का इरा खतम हुआ” असं म्हणत शरद पवारांचे नेतृत्व इतिहासजमा झाले अशा वल्गनाही केल्या. परंतु या लोकांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आहे हेच पुन्हा सिद्ध झाले.

शरद पवारांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली, जेव्हा जेव्हा राजकीय संकट आले तेव्हा तेव्हा शरद पवारांनी जनतेत जाऊन न्याय मागितला, प्रत्येक वेळी जनतेच्या पाठिंब्यावर शून्यातून विश्व निर्माण करत शरद पवारांनी आपले नेतृत्व अधिक भक्कम केले. यावेळीही सगळे मातब्बर सोडून गेल्यावर शरद पवारांनी आपल्या राजकारणाचा डाव नव्याने मांडण्यास सुरुवात केली आहे. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना आजही शरद पवारांच्या नेतृत्वाची भुरळ असल्याने त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षात जोरदार इंनकमिंग सुरू आहे. असे ही जगताप म्हणाले.

 

“सर्व मान्यवरांच्या प्रवेशाने पक्षाला नक्कीच ताकत मिळेल हा विश्वास आहे.
सर्वांचे स्वागत व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !” अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी यावेळी दिली.

Baramati Latest News | बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Education Political social पुणे महाराष्ट्र

Baramati Latest News | बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

बारामती : (The karbhari online) – नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचे आणि राज्याचे भविष्य घडविण्याची एक मोठी संधी मिळाली आहे असे सांगतानाच बारामती येथे आयोजित या मेळाव्यातून २५ हजार युवांना रोजगार मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. बारामती शहर हे एक विकासाचे प्रारूप (मॉडेल) आहे असेही यावेळी ते म्हणाले.

विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने आयोजित पुणे विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बारामतीतील विविध विकास कामांतर्गत बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक, अपर पोलीस अधीक्षक, वाहतूक शाखा, बारामती पोलीस ठाणे तसेच पोलीस वसाहतींचे उद्घाटन पोलीस वाहनांचे लोकार्पणही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, ज्येष्ठ खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.

मेळाव्यात तरुणाईला मार्गदर्शन मिळेल आणि रोजगारही उपलब्ध होईल. यापूर्वी नागपूर, लातूर, अहमदनगर येथे मेळावे झाले असून बारामती येथे आयोजित हा मेळावा सर्व विक्रम मोडणारा असून यातून २५ हजार युवांना रोजगार मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बारामती शहर विकासाचे मॉडेल

बारामती शहर हे एक विकासाचे प्रारूप (मॉडेल) आहे. शहराच्या विकासात शरद पवार, अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. विकासकामे करताना सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कटाक्ष असतो. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांच्या दर्जात कुठेही तडजोड झाली नाही हे दिसून येते.

१ लाख ६० हजार रोजगार दिले

राज्यात यापूर्वी नोकरभरती बंद होती. या शासनाने ७५ हजार रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्या तुलनेत १ लाख ६० हजार रोजगार दिले आहेत. विविध नोकर भरती सुरू असून २२ हजार पोलिसांची भरती, ३० हजारावर शिक्षकांची पदे भरण्यात येत आहेत. त्यात मराठा समाजाला आरक्षण दिलेलेही समाविष्ट आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शासन आपल्या दारी मध्ये २ कोटी ६० लोकांना लाभ

शासन आपल्या दारी हा देखील राज्य शासनाचा लोकाभिमुख उपक्रम असून विविध योजना, शासन निर्णय असताना तसेच लाभार्थी असतानाही शासकीय कार्यालयात जाण्याची कटकट नको म्हणून लाभ सोडून देणाऱ्या नागरिकांना लाभ देण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. यात एकच छताखाली गरिबांना घरांचा, महिला बचत गट, शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, हार्वेस्टर आदी अनेक लाभ दिले. या कार्यक्रमातून २ कोटी ६० लाख लोकांना विविध लाभ देण्यात आले.

प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमात राज्याचे पूर्ण योगदान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तरुणाईला थेट नियुक्तीपत्रे देण्याचा कार्यक्रमांतर्गत जवळपास १० लाख युवकांना नोकऱ्या देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्य शासनही यात कुठेही कमी पडणार नाही. प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत १ कोटी ४० लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नवीन शिक्षण धोरणामधील अभ्यासक्रमातही कौशल्य विकास अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून रोजगार देणारे हात निर्माण करण्याचाही शासनाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षात दाओस येथे जवळपास ५ लाख कोटींचे सामंजस्य करार झाले असून यातून ४ ते ५ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.

बारामती-विकासाचे मॉडल

पोलीस हा कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत असताना सणवार, उत्सव, आंदोलने आदी कालावधीत ऊन, पाऊस वाऱ्यामध्ये रस्त्यावर उभा असतो. म्हणून त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करत असताना त्यांना दर्जेदार सुविधाही दिल्या पाहिजेत. त्या बारामतीतील या पोलीस वसाहतीत दिल्या आहेत. राज्यातील सर्व बसस्थानके सर्व सोई सुविधायुक्त अशी सुसज्ज ‘बसपोर्ट’ करून प्रवाशांना सर्व सोई सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असून बारामतीमध्ये राज्यातील पहिले मॉडेल बसस्थानक झाले आहे.

राज्यातील शासकीय इमारती बांधताना बारामतीच्या इमारती समोर ठेवणार- देवेंद्र फडणवीस

बारामतीचे बस स्थानक एखाद्या विमानतळासारखे वाटावे असे आहे, तसेच येथील पोलीस ठाणे, पोलीस उपमुख्यालय, पोलीसाकरीता इमारती या सरकारी बांधकामासारखे न दिसता या एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यालयासारखे वाटते. अतिशय सुंदर इमारती झाल्या असून बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या वास्तूचे आज उद्घाटन करण्यात आले आहे. राज्यात इमारती बांधण्यासाठी या इमारतीचा आधार घेण्यात येईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बारामतीतील विकासकामांचे कौतुक केले.

शासकीय कार्यालये चांगली असली पाहिजेत आणि अधिकाऱ्यांमध्येही लोकाभिमुखता असली पाहिजे. अशा कार्यालयात अधिकारी व कर्मचारी चांगले काम करुन नागरिकांच्या तक्रारी दूर करण्याचे काम करतील, अशी विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, एकीकडे उद्योगांना मनुष्यबळाची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची गरज लक्षात घेऊन ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे आयोजन निर्णय घेण्यात आला आहे. मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळणार असून त्यांच्या हाताला काम देण्याचा हा उपक्रम आहे. रोजगार मेळाव्यात रोजगार मिळालेल्या उमेदवारांनी चांगले काम करावे.

नागपूर येथे आयोजित पहिल्या नमो महारोजगार मेळाव्यात ११ हजार तरुणाला रोजगार मिळाले असून त्यापैकी काहींना ५० लाखापर्यंत पॅकेज मिळाले आहेत. मोठ्या प्रमाणात उच्च वेतनाच्या नोकरीपासून ते दहावी शिक्षण घेतलेल्या तरुणाला रोजगार मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने पश्चिम महाराष्ट्राचा नमो महारोजगार बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ५५ हजार पेक्षा अधिक पदे अधिसूचित करण्यात आली असून ३६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्यापर्यंत आणखीन अर्ज येतील. या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरुन ५ व्या स्थानी आणली गेली असून येत्या तीन ते चार वर्षात काळात जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याकरीता प्रशिक्षित मनुष्यबळाचे महत्व लक्षात घेऊन अर्थसंकल्पात राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र उघडण्याचे जाहीर केले आहे. या माध्यमातून तरूणांना कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतले आहे, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

बारामती तालुका राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार-अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या चार सुंदर इमारतींचे आज लोकार्पण करण्यात आले. पोलीस उप मुख्यालयाच्या इमारतीसाठी १३२ कोटी रुपये, पोलीस वसाहत साठी ७५ कोटी रुपयांचा खर्च आला. बारामतीचे नूतन बस स्थानक महाराष्ट्रातील क्रमांक एकचे बस स्थानक आहे. खूप चांगल्या दर्जाची कामे झाली आहेत. विविध विकास कामांसाठी निधीची देखील कमतरता कमी पडू दिली जाणार नाही.

पोलीस विभागाला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आज ३९ वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यात १४ महिला वाहन चालक आहेत. महिलांना देखील संधी प्राप्त करून दिली जात आहे. महाराष्ट्रात बारामती हा क्रमांक एकचा तालुका येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याने जर्मनीबरोबर एक करार केला असून त्यांना ५ लाख कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी मनुष्यबळ कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आजच्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक उमेदवारांना रोजगार मिळवा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृषीमूल शिक्षण संस्था आयटीआय तसेच मालेगाव येथील शासकीय आयटीआय येथे विविध १५ ते ३० दिवसांचे कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्यातून रोजगार मिळू शकणार आहेत, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी कौशल्य विभाग कटिबद्ध-मंगल प्रभात लोढा

श्री. लोढा म्हणाले, महाराष्ट्रात प्रथम नागपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या रोजगार मेळाव्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बारामती येथील रोजगार मेळाव्यात उद्योजकांनी ५५ हजार ५५७ रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. याठिकाणी २५४ उद्योजकांनी सहभाग घेतला असून ३८ हजार ७४४ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. याव्यतिरिक्त ऑनलाईन नोंदणी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात कौशल्य विभागासाठी भरीव तरतूद केली आहे. त्याच्या माध्यमातून राज्यातील १ हजार महाविद्यालयात नोकरीच्या दृष्टीने ३ महिन्याचे कौशल्य विकासाचे कोर्स सुरू करण्यात येतील. राज्यातील बेरोजगार तरुणांना जो पर्यंत रोजगार मिळत नाही तो पर्यंत कौशल्य विभाग विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून नोकरी देण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी म्हणाल्या, विभागाच्यावतीने युवक युवतींच्या पंखांना बळ देण्याचे काम करतो. २ हजार ठिकाणी प्रमोद महाराज कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असून सहा ठिकाणी आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रांची उभारणी करत आहोत. पहिला नमो महारोजगर मेळावा १० डिसेंबर का नागपूर केला होता त्याची फलश्रुती पाहून ३ महसुली विभागात आयोजित मेळाव्यात ४० हजार मुलांना रोजगार देण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

ज्येष्ठ नेते श्री. पवार म्हणाले, विद्यार्थ्यां रोजगाराची गरज लक्षात घेऊन राज्यात नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्य शासन प्रयत्न करीत आहे. विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही गेल्या ३ वर्षात सुमारे २ हजार ५०० विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोज कुसेकर, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

 “India” Aghadi meeting will be held in Pune on February 24!  

Categories
Breaking News Political पुणे

 “India” Aghadi meeting will be held in Pune on February 24!

 “India” Aghadi meeting in Pune | Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) party leader Sharad Pawar’s meeting at Modi Bagh office instructed all office bearers and workers to be ready to contest the upcoming Lok Sabha elections with a new name and a new symbol.  were given  Since the upcoming Loksabha Elections (Loksabha Election 2024) India Aghadi will fight together, the meeting of India Aghadi under the leadership of Sharad Pawar will be concluded on February 24 in Pune city.
 All the constituent parties of India Aghadi will join this meeting and it was decided to win in these three Lok Sabha constituencies with a historic majority.
 In the meeting attended by Sharad Pawar, MP Supriya Sule, Mr.  Srinivas Patil, Former Minister Anil Deshmukh, Rajesh Tope, Shashikant Shinde, Balasaheb Patil, MP Vandana Chavan, MP Mr.  Dr.  Amol Kolhe, City President Prashant Jagtap, MLA Rohit Pawar, MLA Sandeep Kshirsagar were present.

“India” Aghadi meeting in Pune |24 फेब्रुवारी रोजी “इंडिया” आघाडीचा महामेळावा होणार पुण्यात! | शिरूर, बारामती व पुणे  लोकसभेसाठी इंडिया आघाडीचा एल्गार

Categories
Political पुणे महाराष्ट्र

“India” Aghadi meeting in Pune |”इंडिया” आघाडीचा 24 फेब्रुवारी रोजी होणार पुण्यात महामेळावा  !

| शिरूर, बारामती व पुणे  लोकसभेसाठी इंडिया आघाडीचा एल्गार

 

“India” Aghadi meeting in Pune |राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar)  पक्षाचे नेते शरद पवार यांच्या मोदी बाग या कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन नाव व नवीन चिन्हसह आगामी लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) इंडिया आघाडी एकत्रितपणे लढणार पासून या अनुषंगाने शरद पवार यांच्या नेतृत्वात 24 फेब्रुवारी रोजी इंडिया आघाडीचा मेळावा पुणे शहरात संपन्न होणार आहे.

इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष या मेळाव्यात सामील होणार असून या तीनही लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत MP सुप्रिया सुळे, खा. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, खा. वंदना चव्हाण, खा. डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते.

Sharad Pawar NCP | आमचं नाव आमचं चिन्ह म्हणजे शरद पवार | निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय दुर्दैवी | प्रशांत जगताप 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Sharad Pawar NCP | आमचं नाव आमचं चिन्ह म्हणजे शरद पवार | निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय दुर्दैवी | प्रशांत जगताप

Sharad Pawar NCP | मूळ पक्षातून फुटून बाजूला गेलेल्या एका गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह आंदण देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे.  हा निर्णय क्लेशदायक असून देशातील हुकूमशाही कोणत्या स्तराला गेली आहे, याचं हे समर्पक उदाहरण आहे. प्रत्यक्ष जनतेत जाऊन मोत्यासारखा एक एक मोहरा निवडून त्यातून आदरणीय पवार साहेबांनी नेते घडवले, संपूर्ण राज्य अनेकदा पिंजून पक्षाची संघटना विणली आणि आज निवडणूक आयोगाने कष्टाने उभारलेला पक्ष सत्तेसाठी विचारांशी प्रतारणा करणाऱ्या एका गटाच्या हातात दिला. अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली आहे. (Prashant Jagtap Pune)

जगताप पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी कोणीच अस्तित्वात राहू नये या हीन मानसिकतेतून भारतीय जनता पक्षाने देशभरातील पक्ष फोडण्याचा, ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून पक्ष व चिन्ह हिसकावून घेण्याचा किळसवाण धोरण राबवलं आहे, भाजपच्या हातातील बाहुलं असलेल्या निवडणूक आयोगाचं सहकार्य त्यांना नेहमीच लाभलं, भारतातील लोकशाही संपवण्याचा हा प्रयत्न असून भाजपचा हा प्रयत्न आम्ही नक्कीच हाणून पाडू.
अस्तित्वाचा हा लढा आम्ही न्यायालयीन मार्गाने तर लढूच, परंतु देशातील सर्वात मोठे न्यायालय असलेल्या जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही आता न्याय मागू. राज्यात घडलेल्या सर्व घटना जनतेने अनुभवल्या आहेत, म्हणूनच भारतीय जनता पार्टीला व त्यांच्या आहारी जाऊन आपल्या मूळ पक्षाशी गद्दारी करणाऱ्या सर्वांनाच जनता कायमचा धडा शिकवेल हा आम्हाला विश्वास आहे. असे देखील जगताप म्हणाले.

—–

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे केवळ चिन्ह नव्हे, तर लोकनेते  शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. चिन्ह आणि नाव गेलं तरी आदरणीय पवार साहेब आमच्याकडे आहेत, साहेबांचा विचार आमच्याकडे आहे. म्हणूनच, यापुढे साहेब हेच आमचं चिन्ह आणि साहेब हाच आमचा पक्ष मानून आम्ही ही लढाई लढणार आहोत.

प्रशांत जगताप, शहर अध्यक्ष 


MVA | Shetkari Akrosh Morcha | महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला उद्यापासून प्रारंभ |शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शनिवारी सभा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

MVA | Shetkari Akrosh Morcha | महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला उद्यापासून प्रारंभ

|शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शनिवारी सभा

 

MVA | Shetkari Akrosh Morcha | पुणे : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने काढण्यात येणाऱ्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ची (Shetkari Akrosh Morcha)  तयारी पूर्ण झाली असून उद्या (दि. २७) जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाची सांगता होणार आहे. (Maharashtra News)

संसद महारत्न खासदार सुप्रिया सुळे आणि संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. कोल्हे यांनी ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवणे आणि निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण, खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान, बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा, पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून तातडीने नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित ‘शैक्षणिक कर्ज ‘ धोरण लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेससह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी हा एल्गार पुकारला असून २७ ते ३० डिसेंबर दरम्यान भव्य ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार सुळे आणि अमोल कोल्हे यांनी दिली.

उद्या ( दि. २७) सकाळी ८ वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून ओतूर येथे पदयात्रा व कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आळेफाटा येथे कोपरा सभा व नारायणगाव येथे एस.टी. स्टँडजवळ पदयात्रा होणार असून ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून या आक्रोश मोर्चाचे स्वागत केले जाणार आहे. दुपारी ३ वाजता कळंब येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर कोपरा सभा आणि मंचर बाजार समिती येथून पदयात्रेने लक्ष्मी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठी सभा होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता राजगुरुनगर बाजार समिती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाजवळ सभा आणि त्यानंतर राजगुरुनगर एस.टी. स्टँड येथील हुतात्मा राजगुरू आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पाबळ चौकातून वाहनांद्वारे हा मोर्चा चाकणकडे रवाना होईल. चाकण बाजार समिती प्रवेशद्वारापासून रात्री ८ वाजता काढण्यात येणाऱ्या पदयात्रेचा समारोप बाजारपेठेतून एस.टी.स्टँड, तळेगाव चौक येथे होईल. त्यानंतर चौफुला, करंदी मार्गे केंदूर येथे मोर्चाचा पहिला मुक्काम होईल, असे त्यांनी सांगितले.

गुरुवारी (दि. २८) सकाळी केंदूर येथील श्रीराम चौकात सभा आयोजित करण्यात आली असून पाबळ येथील लोणी चौकात कोपरा सभा होईल. त्यानंतर धामारी, मुखी, जातेगाव या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वागत केल्यानंतर दुपारी दीड वाजता शिक्रापूर येथे पाबळ चौक ते चाकण चौक अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता तळेगाव ढमढेरे येथील सावता माळी सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर टाकळीभीमा, पारोडी, दहीवडी, उरळगाव मार्गे न्हावरा येथे हा मोर्चा येईल. न्हावरा येथे तळेगाव फाटा ते निर्विदरम्यान पदयात्रा आणि पुढे निर्वि, कोळगाव डोळस, कुरुळी, वडगाव रासाई मार्गे मांडवगण फराटा येथे आल्यानंतर या ठिकाणी सभा होईल आणि पुढे तांदळी, काष्टी मार्गे दौंड येथे मुक्काम, असे नियोजन करण्यात आल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी (दि. २९) सकाळी नऊ वाजता दौंड येथील महात्मा फुले पुतळा ते आंबेडकर चौक, गांधी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान पदयात्रा काढण्यात येणार असून त्यानंतर मोर्चा कुरकुंभ, मळद, रावणगाव मार्गे खडकी येथे येईल. याठिकाणी बारामती चौकातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मोर्चाचे रुपांतर सभेत होईल. त्यानंतर भिगवण आणि पळसदेव येथे कोपरा सभा करुन दुपारी अडीच वाजता मोर्चा इंदापूर येथे येईल. इंदापूर येथे पदयात्रा झाल्यानंतर निमगाव केतकी येथे कोपरा सभा, आणि तेथून मसाळवाडी, काटेवाडी, लिमटेक, पिंपळी, बांदलवाडी मार्गे मोर्चा बारामती येथे आल्यानंतर नगरपालिकेसमोर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर बारामती येथे मुक्काम होईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

शनिवारी (दि. ३०) बारामती येथून मेडद, कऱ्हावागज, जळगाव, माळवाडी, तारडोळी मार्गे मोरगाव येथे मोर्चा आल्यावर मयुरेश्वराचे दर्शन घेऊन मंदिरासमोर कोपरा सभा होईल. त्यानंतर आंबी बु. मार्गे जेजुरी येथे कोपरा सभा होऊन मोर्चा शिंदवणे मार्गे हवेली तालुक्यात प्रवेश करेल. शिंदवणे येथे स्वागत स्वीकारुन उरळीकांचनला रवाना होईल. या ठिकाणी जुन्या इलाईट हॉटेलसमोर कोपरा सभा होणार असून सोरतापवाडी फाटा, कुंजीरवाडी फाटा, थेऊर फाटा मार्गे लोणी काळभोर येथे आल्यावर रेल्वे स्टेशनजवळ कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोणी काळभोर येथून कवडीपाट टोलनाका मार्गे मांजरी फार्म, शेवाळवाडी फाटा, १५ नंबर, हडपसर गाडीतळ मार्गे पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे हा मोर्चा जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर सभा होणार असून खासदार शरद पवार, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या न्याय्य मागण्यांसाठी काढण्यात येत असलेल्या या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’त शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी केले असून पुण्यातील सभेला उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा संदेश द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी माजी आमदार जयदेवराव गायकवाड यांची नियुक्ती

Categories
Breaking News Political पुणे

NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी माजी आमदार जयदेवराव गायकवाड यांची नियुक्ती

 

NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  (NCP Supremo Sharad Pawar) यांच्या मान्यतेने माजी आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती सेलची जबाबदारीही ऍड. जयदेवराव गायकवाड यांच्याकडे आहे. त्यांच्या नियुक्तीने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आनंद व्यक्त केला जात असून त्यांच्या प्रदीर्घ अनुभव व संघटन कौशल्याचा राष्ट्रीय स्तरावर नक्कीच फायदा होईल असे मत व्यक्त केले जात आहे.

NCP Youth Kothrud | प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरुद्ध तक्रार | कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या वतीने दिले निवेदन

Categories
Breaking News Political social पुणे

NCP Youth Kothrud | प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरुद्ध तक्रार

| कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या वतीने दिले निवेदन

NCP Youth Kothrud | समाजात तेढ निर्माण करणे तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरोधात कोथरूड येथील युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांनी कोथरूड पोलीस स्टेशन (Kothrud Police Station) येथे तक्रार नोंदवली आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जाधव यांनी अनेक व्हिडिओ तसेच मुलाखती प्रसार माध्यमांच्या मार्फत प्रकाशित केल्या होत्या ज्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याचे कारण असल्याचा ठप्पा शरद पवार यांच्यावर ठेवला आहे. तसेच काही वादग्रस्त व टोकाची भूमिका घेणारे शब ही वापरले आहेत. मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांच्या मध्ये संघर्ष निर्माण करणारे अनेक वक्तव्य केल्याचे तसेच शरद पवार यांचे नाव वारंवार घेऊन अनेक बिनबुडाचे आरोप त्यांच्यावर केले असल्याचे नमूद करत गुरनानी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

कोथरूड पोलीस स्टेशन येथे निवेदन देत नामदेवराव जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हा भा. द. वी. कलम १९७, १५३, १५३(अ), १५३(ब), २९५(अ), २९८, ४९९, ५००, ५०३, ५०४, ५०५ (२) प्रमाणे दाखल करावा अशी मागणी केली आहे. असे न केल्यास सदरील व्यक्ति जोमाने जाती धर्माच्या नावाखाली सोशल मीडिया वर खोटी व बनावट माहिती प्रसारित करुन तरुणांना दंगली घडविण्यासाठी प्रोत्साहित करेल याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची राहील हे ही गुरनानी यांनी नमूद केले.

या वेळी कोथरूड सामाजिक न्याय विभागाचे विनोद हनवते आणि राष्ट्रवादी युवतीच्या ऋतुजा देशमुख देखील उपस्थित होत्या….