PMC Pune Chief Labour Officer | अरुण खिलारी यांची पुणे महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी पदी पदोन्नती

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Chief Labour Officer | अरुण खिलारी यांची पुणे महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी पदी पदोन्नती

PMC Pune Chief Labour Officer | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मुख्य कामगार अधिकारी पदी (Chief Labour Officer) अरुण खिलारी (Arun Khilari) यांची वर्णी लागली आहे. खिलारी हे कामगार अधिकारी (Labour Officer) म्हणून काम पाहत होते. तसेच नुकताच त्यांच्याकडे मुख्य कामगार अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. आता खिलारी हे पूर्ण वेळ मुख्य कामगार अधिकारी म्हणून काम पाहतील. (PMC Pune chief Labour Officer)
पुणे महापालिकेचे (PMC Pune) मुख्य कामगार अधिकारी म्हणून काम पाहणारे शिवाजी दौंडकर (Shivaji Daundkar) हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे मुख्य कामगार अधिकारी हे पद रिक्त झाले होते. हे पद पदोन्नती ने (Promotion) भरले जाते. त्यानुसार यासाठी कामगार अधिकारी अरुण खिलारी पात्र ठरत होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून पदोन्नती समितीत (Promotion Committee) याला मान्यता दिली आहे. सेवाज्येष्ठतेने त्यांना ही पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानुसार आता खिलारी हे पूर्ण वेळ मुख्य कामगार अधिकारी म्हणून काम पाहतील. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी (PMC commissioner Vikram Kumar) जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation News)
News Title | PMC Pune Chief Labour Officer | Arun Khilari has been promoted to the post of Chief Labour Officer of Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या कल्याणकारी योजनांचा शिवाजी दौंडकर यांच्या प्रयत्नाने कित्येक कर्मचाऱ्यांना झाला फायदा | दौंडकर यांचा स्टेनो ते सह महापालिका आयुक्त असा रंजक प्रवास

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या कल्याणकारी योजनांचा शिवाजी दौंडकर यांच्या प्रयत्नाने कित्येक कर्मचाऱ्यांना झाला फायदा

| दौंडकर यांचा स्टेनो ते सह महापालिका आयुक्त असा रंजक प्रवास

Pune Municipal corporation पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी (PMC Pune employees) विविध योजना राबवल्या जातात. महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) माध्यमातून या योजना राबवण्यात येतात. या योजनांचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी नुकतेच सेवानिवृत्त झालेले महापालिकेचे मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर (Shivaji Daundkar) यांचा मोलाचा हातभार आहे. दौंडकर यांनी आपल्या विशेष प्रयत्नाने या योजना कामगारांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. याचा कर्मचाऱ्यांच्या कित्येक कुटुंबाना देखील फायदा झाला. महापालिकेत स्टेनो (Steno) म्हणून रुजू होऊन आणि सह महापालिका आयुक्त तथा मुख्य कामगार अधिकारी (Chief labour officer) पदा पर्यंतचा शिवाजी दौंडकर यांचा प्रवास खूपच रंजक आहे. (Pune municipal corporation)
शिवाजी दौंडकर हे नुकतेच महापालिकेच्या सेवेतून म्हणजे 31 मे ला सेवानिवृत्त झाले. त्यांनी महापालिकेच्या विविध पदांवर काम केले. यामध्ये मुख्य कामगार अधिकारी, नगरसचिव, सह महापालिका आयुक्त, शिक्षण विभाग, महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, अशा विविध कामाचा समावेश आहे. मात्र मुख्य कामगार अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द कायम लक्षात राहील. कारण त्यांच्या कारकिर्दीत कामगारांच्या लाभाच्या खूप योजना राबवल्या आणि त्याचा महापालिका कर्मचाऱ्यांना फायदा करून दिला. (PMC Pune Marathi news)

 – कोरोना सुरक्षा कवच देणारी पहिली महानगरपालिका

 महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना सुरक्षा कवच योजना लागू केली होती. महानगरपालिकेत कामगार कल्याण निधी यापूर्वीच लागू करण्यात आला आहे.  ही मदतया निधी अंतर्गत दिली जाते. महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार, या योजनेचे लाभार्थी असे सर्व लोक, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी असतील ज्यांना कोरोनाचे काम देण्यात आले होते. कारण आरोग्य विभाग वगळता सर्व विभागांचे कर्मचारी आणि अधिकारी या कामावर पालिका प्रशासनाने गुंतले होते.  या अंतर्गत कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना 50 लाखाची आर्थिक मदतदिली जाते. तसेच वारसाला नोकरी दिली जाते     या व्यतिरिक्त, आता अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत.  95 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  यानुसार महापालिकेने केंद्राच्या विमा कंपनीला सुमारे प्रस्ताव पाठवले होते.  ही प्रक्रिया द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी करणार आहे.  पण कंपनीने नियमानुसार पुढे जाऊन त्याला मान्यता दिली नाही.  सफाई कामगारांना नुकसानभरपाई देता येणार नाही, असे कंपनीकडून सांगण्यात येत होते.  कंपनीने आता आपला चेंडू केंद्राच्या कोर्टात टाकला होता.  त्याची मदत मिळत नव्हती.  दुसरीकडे, महापालिका सुरक्षा कवच लागू करण्यास सक्षम नव्हती.  अशा स्थितीत महापालिकेने केंद्राचा मार्ग सोडून आपला वाटा देणे सुरू केले.  शिवाय विमाकंपनी आणि शासनाच्या आरोग्य विभागाकडून महापालिका प्रशासनाचा सतत पाठपुरावा सुरू होता.  पैकी काही प्रस्ताव मंजूर झाले.  केंद्राकडून 3 कुटुंबांच्या खात्यांमध्ये 50 लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यांनतर महापालिकेने महापालिकेने आपल्या सुरक्षा कवच योजनेत बदल केला आहे. आता कर्मचाऱ्यांच्या वारसांना सरसकट 50 लाखाचे अर्थसहाय्य केले जात आहे. शिवाय वारसांना नोकरी देखील दिली जात आहे. एकूण 95 कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोना मुळे झाला आहे. यामध्ये पोस्ट कोविडचा देखील समावेश आहे. 95 पैकी 10 कर्मचारी ठेका कर्मचारी तर 1 बालवाडी शिक्षिका होती. त्यानुसार आपल्या योजनेत 84 पात्र झाले. त्यापैकी 60 लोकांना महापालिकेने 50 लाखाची मदत त्यांच्या वारसांना दिली आहे. 3 लोकांना केंद्र सरकारचे 50 आणि महापालिकेचे 25 अशी 75 लाखाची मदत मिळाली आहे.  महापालिकेने आतापर्यंत 57 वारसांना नोकरी देखील दिली आहे. तसेच 40 कोटींची मदत देण्यात आली आहे. हे सर्व करण्यात मुख्य कामगार अधिकारी म्हणून शिवाजी दौंडकर यांनी पुढाकार घेत कर्मचाऱ्यांना अर्थसहाय्य आणि वारसांना नोकऱ्या मिळवून दिल्या.

182 कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार

महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (PMC Pune employees and officers) प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने गुणवंत कामगार पुरस्कार दिला जातो. दरवर्षी  वर्ग 1 ते वर्ग 4 मधील 20 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. 25 हजार रुपये, प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याची सुरुवात 2007-08 साली झाली. शिवाजी दौंडकर यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अवगत करून प्रोत्साहन दिले. आतापर्यंत 182 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर जवळपास 41 लाखांची रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.

समूह अपघात विमा योजनेचा देखील चांगला फायदा

शिवाजी दौंडकर यांच्या कार्यकाळात सुरु झालेली अशीच एक योजना म्हणजे समूह अपघात विमा योजना. महापालिकेचे अनेक कर्मचारी अपघातांना बळी पडून कायमचे अपंग होतात.  हे लोक आयुष्यात काम करू शकत नाहीत.  तसेच अनेक लोकांचा मृत्यू होतो.  त्यामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो.  त्यामुळे अपघातात बळी पडणाऱ्या अशा पालिका कर्मचाऱ्यांना महापालिका विमा संरक्षण देत आहे.  पालिकेच्या सर्व कामगारांना आता सुमारे 10 लाखांचा विमा उतरवण्यात येत आहे.  त्या बदल्यात त्यांना त्यांच्या पगारातून केवळ 136 रुपये दरमहा द्यावे लागतात.  महापालिका प्रशासनाने २०१६-१७ या वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.  आतापर्यंत सुमारे 18 कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.  त्यांना महापालिकेने 1 कोटी 74 लाख रुपये दिले आहेत. दौंडकर यांच्या पुढाकाराने ही योजना चांगल्या पद्धतीने कार्यान्वित आहे.
याच पद्धतीने अजूनही बऱ्याच योजना कामगार कल्याण विभागात सुरु आहेत. ज्याचा महापालिका कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी शिवाजी दौंडकर यांनी प्रयत्न केले. यामध्ये कामगार कल्याण निधी आणि मनपा निधी मधून वारस अनुदान दिले जाते. आतापर्यंत 1536 लोकांना या योजनेचा फायदा झाला. जवळपास 10 कोटीची रक्कम यासाठी देण्यात आली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. आतापर्यंत 24 कर्मचाऱ्यांना भरपाई देण्यात आली आहे. यासाठी 85 लाखाची रक्कम देण्यात आली आहे. तसेच दौंडकर यांनी वार्षिक क्रीडा स्पर्धा, कामगार दिंडी, शैक्षणिक कर्ज शिष्यवृत्ती आणि गुणगौरव समारंभ अशा योजना देखील चांगल्या पद्धतीने राबवल्या.

शिवाजी दौंडकर यांनी त्यांच्या कार्यकाळात 8578 पेन्शन प्रकरणे निकाली काढली. तसेच इंडेम्निटी बॉण्ड चा 1862 लाभार्थ्यांना लाभ दिला. ध्वजदिन निधी संकलनाचे काम देखील चांगल्या पद्धतीने पार पाडले. या माध्यमातून 2 कोटीहून अधिक निधी संकलित केला गेला. जवळपास 731 कर्मचाऱ्यांना कामगार प्रशिक्षण दिले. खातेनिहाय चौकशीची 155 प्रकरणे निकाली काढली. कामगार न्यायालयातील विविध दाव्यांपैकी 356 दावे निकाली काढण्यात आले. त्याचप्रमाणे घाणभत्ता आणि अनुकंपा योजनाचाही फायदा देण्यात आला. यामध्ये घाणभत्ता ची 3729 तर अनुकंपा ची 351 प्रकरणाचा समावेश आहे. या सर्व गोष्टीसाठी दौंडकर यांना कामगार कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांची चांगली मदत झाली, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
—-
पुणे महापालिकेत मी 1988 साली रुजू झालो. सर्वात प्रथम मी गवनि विभागात स्टेनो म्हणून काम केले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त कार्यालयात स्वीय सहायक म्हणून 11 वर्ष काम केले. त्यानंतर महापालिका आयुक्त यांचे स्वीय सहायक म्हणून 2 वर्ष काम केले. 2003 साली कामगार कल्याण अधिकारी झालो. 2010 साली मुख्य कामगार अधिकारी झालो. याशिवाय महापालिकेत बऱ्याच ठिकाणी आणि खात्यात काम केले. यामध्ये सेवक वर्ग, प्राथमिक माध्यमिक, नगरसचिव विभाग अशा खात्यांचा समावेश आहे. माझ्या कार्यकाळात मी खूप कल्याणकारी योजना राबवल्या. कोरोना काळात चांगले काम केले. कर्मचाऱ्यांच्या वारसांना घरी जाऊन चेक दिले. तसेच कोरोना काळात Online आणि offline सर्वसाधारण सभा घेताना तारेवरची कसरत होती. असे असताना चांगले काम केले. नगरसेवक किंवा प्रशासनाची तक्रार येऊ दिली नाही. तसेच निवडणूक विभागात देखील काम केले.  महापालिकेच्या कामात चांगले योगदान देता आले म्हणून मी खूप समाधानी आहे. सर्वसाधारण कामगारांचे प्रश्न सोडवता आले, ही भावना सुखद आहे.  भविष्यकाळात मला माझ्या कामाचा आणि ज्ञानाचा महापालिका आणि महापालिका कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात मला आनंद वाटेल.
शिवाजी दौंडकर, सेवानिवृत्त महापालिका अधिकारी. 
—-
News Title | Pune Municipal Corporation | Many employees benefited from the efforts of Shivaji Daundkar in the welfare schemes of Pune Municipal Corporation

PMC Pune Marathi News | मुख्य कामगार अधिकारी म्हणून आता अरुण खिलारी काम पाहणार

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Marathi News |  मुख्य कामगार अधिकारी म्हणून आता अरुण खिलारी काम पाहणार

PMC Pune Marathi News | पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) मुख्य कामगार अधिकारी (Chief Labour Officer) तथा सहायक आयुक्त (PMC Assistant commissioner) शिवाजी दौंडकर (Shivaji Daundkar) हे 31 मे ला सेवानिवृत्त (Retire) होत आहेत. त्यामुळे 1 जून पासून मुख्य कामगार अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार कामगार अधिकारी अरुण खिलारी (Labour Officer Arun khilari) यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनी जारी केले आहेत. (PMC Pune Marathi News)
शिवाजी दौंडकर हे 31 मे ला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी विविध खात्यात काम केले आहे. सद्यस्थितीत त्यांच्याकडे मुख्य कामगार अधिकारी आणि प्रभारी नगरसचिव (Pune Municipal Corporation Municipal secretary) या पदाची जबाबदारी आहे. सेवानिवृत्त झाल्यांनतर त्यांची जबाबदारी इतर अधिकाऱ्याकडे सोपवणे आवश्यक आहे. त्यानुसार याआधीच नगरसचिव पदाचा पदभार राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले (Protocol officer Yogita Bhosale) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर आता मुख्य कामगार अधिकाऱ्याचा पदभार कामगार अधिकारी अरुण खिलारी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation News)
News Title | PMC Pune Marathi News |  Arun Khilari will now work as the Chief Labor Officer

PMC Pune Municipal Secretary | नगरसचिव पदाचा अतिरिक्त पदभार योगिता भोसले यांच्याकडे!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Municipal Secretary | नगरसचिव पदाचा अतिरिक्त पदभार योगिता भोसले यांच्याकडे!

| महापालिका आयुक्त यांच्याकडून आदेश जारी

PMC Pune Municipal secretary | (Author | Ganesh Mule) | पुणे महापालिकेचे नगरसचिव (pune Municipal corporation Municipal secretary) हे पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे. ते अजूनही भरण्यात आलेले नाही. दरम्यान या पदाचा अतिरिक्त पदभार इतर अधिकाऱ्याकडे दिला जात आहे. सद्यस्थितीत मुख्य कामगार अधिकारी तथा सहायक आयुक्त शिवाजी दौंडकर (Assistant commissioner Shivaji Daundkar) यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. दौंडकर हे 31 मे ला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे 1 जून पासून या पदाचा अतिरिक्त पदभार राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले (Protocol officer Yogita Bhosale) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त (PMC commissioner) यांनी जारी केले आहेत. (PMC Pune Municipal secretary)

| काय म्हटले आहे आदेशात?

पुणे महानगरपालिकेकडील (Pune Municipal Corporation) ‘नगरसचिव’ (municipal secretary) या पदाचे अतिरिक्त पदभार  शिवाजी दौंडकर, सह महापालिका आयुक्त तथा मुख्य कामगार अधिकारी यांचेकडे  आदेशान्वये सोपविण्यात आलेला आहे. पुणे महानगरपालिका (PMC Pune) प्रशासनाकडील ‘सह महापालिका आयुक्त तथा मुख्य कामगार अधिकारी’ या पदावर कार्यरत  शिवाजी दौंडकर हे दिनांक ३१/०५/२०२३ रोजी वयोपरत्वे सेवानिवृत्त होत आहेत.  शिवाजी दौंडकर यांचेकडील नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार  योगिता सुरेश भोसले, राजशिष्टाचार अधिकारी प्रोटोकॉल ऑफिसर (उप नगरसचिव) यांच्याकडे दिनांक ०१/०६/२०२३ पासून सोपविण्यात येत आहे. त्याप्रमाणे श्रीमती भोसले यांनी त्यांचे स्वतःचे पदाचे कामकाज सांभाळून ‘नगरसचिव’ या पदाचे अतिरिक्त कामकाज करावयाचे आहे. (Pune Municipal Corporation Municipal secretary News)

: 3 वर्ष होत आली तरी पद रिक्तच

महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसचिव हे पद अत्यंत महत्वाचे आहे. (Pune Municipal Corporation Municipal secretary) महापालिका आयुक्तांनंतर नगरसचिव हे पद महत्त्वाचे आहे.  प्रशासनाच्या तसेच महापौरांसह राजकीय लोकांच्या समन्वयाची जबाबदारी नगरसचिवावर असते.  महासभा, महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या नियोजनापासून ते त्याचे कार्यपत्रक प्रकाशित करण्यापर्यंत, सभेचे संघटन, त्याच्याशी संबंधित निवडणूक प्रक्रिया, विशेष विषय समित्यांची प्रक्रिया आणि त्याच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील नगरसचिव करतात. महापौर कार्यालयाचे सर्व काम देखील नगरसचिव करतात.  यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसचिवाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) पूर्ण वेळ नगरसचिव (Full Time Municipal secretary) असणारे सुनील पारखी 30 ऑगस्ट 2020 ला निवृत्त झाले. तसेच उप नगरसचिव देखील निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन नगरसचिव नेमण्यासाठी महापालिकेकडून भरती प्रक्रिया (PMC Pune Recruitment) राबवण्यात आली होती. त्यानुसार या पदभरतीबाबत जाहिरात देण्यात आली होती.  परंतु एकही उमेदवार सक्षम आढळला नाही.  नगरसचिवांच्या कामकाजाची माहिती कोणालाच नव्हती.  या कारणास्तव ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यानंतर अद्याप कोणतीही प्रक्रिया केली गेली नाही. 3 वर्ष होत आली देखील महापालिकेला (PMC Pune) हे पद भरता आले नाही. महापालिकेने प्रभारी पदभार देऊन काम चालवले. मात्र पुन्हा पद भरती बाबत जाहिरात दिली नाही. महापालिकेचे एवढे महत्वाचे पद असताना देखील याबाबत महापालिका प्रशासनाची उदासीनता लक्षात येत आहे. (Pune Municipal Corporation News) 
 

| नगरसचिव पदाची केली जाऊ शकते भरती 

 
 दरम्यान सद्यस्थितीत महापालिकेत प्रशासक असल्याने मुख्य सभा किंवा इतर समित्यांचे कामकाज हे आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली चालते. मात्र महापालिका निवडणुका झाल्यांनतर पालिकेत पूर्ण वेळ नगरसचिव असणे आवश्यक आहे. निवडणुकीला पुरेसा अवधी आहे. त्यामुळे या अवधीत महापालिका पद भरतीच्या माध्यमातून जाहिरात देऊन हे पद भरू शकते. किंबहुना महापालिकेने तशी प्रक्रिया राबवावी, अशी मागणी देखील केली जात आहे. किंवा महापालिका प्रशासन त्यांच्या अधिकारात पदोन्नतीने देखील पद भरू शकतात.   (PMC Pune Marathi News) 
—-
News Title | PMC Pune Municipal Secretary  Yogita Bhosle has the additional charge of Municipal Secretary! |  Order issued by PMC Municipal Commissioner

PMC Pune Municipal Secretary | 3 वर्षे होत आली तरी पुणे महापालिकेला पूर्ण वेळ नगरसचिव मिळेना!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Municipal Secretary | 3 वर्षे होत आली तरी पुणे महापालिकेला पूर्ण वेळ नगरसचिव मिळेना!

| पद भरतीच्या माध्यमातून कधी भरणार पद?

PMC Pune Municipal Secretary | (Author : Ganesh Mule) | पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) पूर्ण वेळ नगरसचिव (Full Time Municipal secretary) असणारे सुनील पारखी (Sunil Parkhi) 30 ऑगस्ट 2020 ला निवृत्त झाले. तसेच उप नगरसचिव देखील निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन नगरसचिव नेमण्यासाठी महापालिकेकडून भरती प्रक्रिया (PMC Pune Recruitment) राबवण्यात आली होती. त्यानुसार या पदभरतीबाबत जाहिरात देण्यात आली होती.  परंतु एकही उमेदवार सक्षम आढळला नाही.  नगरसचिवांच्या कामकाजाची माहिती कोणालाच नव्हती.  या कारणास्तव ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यानंतर अद्याप कोणतीही प्रक्रिया केली गेली नाही. 3 वर्ष होत आली देखील महापालिकेला (PMC Pune) हे पद भरता आले नाही. महापालिकेने प्रभारी पदभार देऊन काम चालवले. मात्र पुन्हा पद भरती बाबत जाहिरात दिली नाही. महापालिकेचे एवढे महत्वाचे पद असताना देखील याबाबत महापालिका प्रशासनाची उदासीनता लक्षात येत आहे. (PMC Pune Municipal Secretary)

 – भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती

पारखी निवृत्त झाल्यानंतर महापालिकेने  नगरसचिवांच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार पद भरती प्रक्रिया जलद करण्यात आली होती.  त्याची जाहिरात काढण्यात आली.  महापालिकेकडे एकूण 42 अर्ज आले होते.  यातील बहुतांश अर्ज महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे होते.   अर्ज तपासल्यानंतर 29 लोक त्यात पात्र ठरले.  पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.  परंतु नंतर ही प्रक्रिया अनेक दिवस पुढे जाऊ शकली नाही.  त्यानंत ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. कारण 29 पैकी एकाही उमेदवाराला नगरसचिवांच्या कामकाजाची माहिती नव्हती. यामुळे, आता एक नवीन प्रक्रिया राबवली जाईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानंतर अद्याप कोणतीही प्रक्रिया केली गेली नाही. 3 वर्ष होत आली तरी देखील महापालिकेला हे पद भरता आले नाही. याबाबत महापालिकेची उदासीनता लक्षात येत आहे. सध्या प्रभारी नगरसचिवम्हणून शिवाजी दौंडकर (Shivaji Daundkar) काम पाहत आहेत. दौंडकर देखील मे महिन्याच्या शेवटी सेवानिवृत्त होत आहेत. हे माहित असताना महापालिकेकडून तीन महिने अगोदरच याची भरती प्रक्रिया करणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने तसा कुठलाही निर्णय घेतला नाही. प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल मात्र प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. (PMC Pune news)

| उपनगरसचिव पद देखील रिक्तच

नगरसचिव पारखी निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात म्हणजे सप्टेंबर 2020 मध्ये उपनगरसचिव राजेंद्र शेवाळे (Rajendra Shewale) सेवानिवृत्त झाले होते. तेव्हापासून हे पद देखील रिक्तच आहे. याचाही प्रभारी पदभार देण्यात आला आहे. महापालिकेचे राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले (Protocol officer Yogita Bhosale) या प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. महापालिकेच्या नियमानुसार नगरसचिव हे उपनगरसचिव यांची नियुक्ती करत असतात. मात्र जिथे नगरसचिव नाहीत तिथे उपनगरसचिव यांची कोण नेमणूक करणार? आता हे पद पदोन्नती ने भरले जाणार कि अजून दुसऱ्या कुठल्या प्रक्रियेने, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. (PMC Pune Deputy Municipal secretary)

– महापालिकेत नगरसचिव  पद महत्वाचे

 महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसचिव हे पद अत्यंत महत्वाचे आहे. (Pune Municipal Corporation Municipal secretary) महापालिका आयुक्तांनंतर नगरसचिव हे पद महत्त्वाचे आहे.  प्रशासनाच्या तसेच महापौरांसह राजकीय लोकांच्या समन्वयाची जबाबदारी नगरसचिवावर असते.  महासभा, महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या नियोजनापासून ते त्याचे कार्यपत्रक प्रकाशित करण्यापर्यंत, सभेचे संघटन, त्याच्याशी संबंधित निवडणूक प्रक्रिया, विशेष विषय समित्यांची प्रक्रिया आणि त्याच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील नगरसचिव करतात. महापौर कार्यालयाचे सर्व काम देखील नगरसचिव करतात.  यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसचिवाची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
—-
News Title | PMC Pune Municipal Secretary  Even after 3 years, the Pune Municipal Corporation did not get a full-time municipal secretary!  |  When will the post be filled through recruitment?

E-Identity | कंत्राटी कामगारांना ई पेहचान पत्र दिल्याशिवाय ठेकेदारांना बिल मिळणार नाही | मुख्य कामगार अधिकाऱ्यांचे आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

कंत्राटी कामगारांना ई पेहचान पत्र दिल्याशिवाय ठेकेदारांना बिल मिळणार नाही

| मुख्य कामगार अधिकाऱ्यांचे आदेश

पुणे | पुणे महानगरपालिके अंतर्गत ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांना राज्य कामगार विमा योजनचे ई-पेहचान पत्र वितरीत करणे बंधनकारक आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांना हे पत्र मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांनी  याबाबत कडक धोरण अवलंबले असून कंत्राटी कामगारांना ई पेहचान पत्र दिल्याशिवाय ठेकेदारांना बिल देऊ नये, असे आदेश मुख्य कामगार अधिकाऱ्यांनी सर्व खात्यांना दिले आहेत.

पुणे महानगरपालिकेतर्फे विविध विकास प्रकल्प व देखभाल दुरुस्तीची कामे निविदेव्दारे कंत्राटी कामगारांमार्फत करण्यात येत आहेत. कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) अधिनियम, १९७० मधील व राज्य कामगार विमा अधिनियम १९४८ तरतुदींच्या अनुषंगाने राज्य कामगार विमा योजनेचे परिणामकारक अंमलबजावणी व कंत्राटी कामगारांना वैद्यकीय सुविधा मिळणेकामी  कंत्राटी कामगारांकरीता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये  राज्य कामगार विमा अधिनियम १९४८ मधील तरतुदीनुसार कंत्राटी कामगारांना त्यांचा विमा क्रमांक अवगत होणे, आधारकार्ड लिंक करणे, वैद्यकीय सुविधा मिळणेसाठी ई-पेहचान पत्र कंत्राटी कामगारांकडे असणे आवश्यक आहे, इत्यादी बाबींच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.  पुणे महानगरपालिकेतील ठेकेदारामार्फत सेवा घेण्यात येणाऱ्या कंत्राटी कामगारांना ईएसआय रकमेचा भरणा करूनही ई-पेहचान पत्र मिळत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. याअनुषंगाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करणेबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.) यांनी निर्देश दिले आहेत.
मनुष्यबळाची सेवा घेणाऱ्या सर्व संबंधित विभागाचे पर्यवेक्षकीय अधिकारी यांनी त्यांचे विभागाकडील ठेकेदारामार्फत घेण्यात येणाऱ्या कंत्राटी कामगारांचा ४% रक्कमेचा भरणा राज्य कामगार विमा प्राधिकरणाकडे केला जात आहे व संबंधित कर्मचाऱ्यांना ई-पेहचान पत्र प्राप्त होत असल्याची खातरजमा करावी. कंत्राटी कामगारांना ई- पेहचान पत्र प्राप्त न झाल्यास व सदर कंत्राटी कर्मचारी / कुटूंब वैद्यकीय सुविधेपासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पर्यवेक्षकीय अधिकाऱ्याची राहील, ही बाब संबंधित खातेप्रमुख यांनी पर्यवेक्षकीय अधिकारी यांना अवगत करावी. असे आदेशात म्हटले आहे.
तसेच मनुष्यबळाची सेवा घेण्यात येणाऱ्या संबंधित विभागांनी त्यांचेकडील सर्व कंत्राटी कामगारांना ई-पेहचान पत्र वितरीत केल्याची खात्री केल्याशिवाय संबंधित ठेकेदारांची देयके आदा करण्यात येवू नयेत.
या  निर्देशांचे सर्व संबंधित खातेप्रमुख, क्षेत्रिय अधिकारी व पर्यवेक्षकीय अधिकारी यांनी पालन करण्याची दक्षता घ्यावी. असेही आदेशात म्हटले आहे.

Sports Competition | महापालिका कर्मचाऱ्यांनी खेळत राहणे आवश्यक | महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Categories
Breaking News PMC Sport पुणे

महापालिका कर्मचाऱ्यांनी खेळत राहणे आवश्यक | महापालिका आयुक्त

महापालिकेच्या कामगार कल्याण निधी क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते संपन्न

पुणे महानगरपालिका कामगार कल्याण निधी तर्फे अधिकारी / सेवक यांचेसाठी विविध क्रीडा स्पर्धा १ ते ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ १ फेब्रुवारी रोजी पंडीत नेहरू स्टेडियम येथे विक्रम कुमार, प्रशासक व महापालिका आयुक्त यांचे शुभहस्ते व रविंद्र बिनवडे, कार्याध्यक्ष तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज),  विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि), शांताराम जाधव, अर्जुन पुरस्कार
विजेते (कबड्डी), हेमंत किणीकर, जेष्ठ रणजी क्रिकेटपटू यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
उद्घाटन समारंभास शिवाजी दौंडकर, सह महापालिका आयुक्त (मुख्य कामगार अधिकारी),  उल्का कळसकर, सह महापालिका आयुक्त (मुख्य लेखा व वित्त
अधिकारी ),    कुणाल मंडवाले उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी  प्रदीप महाडीक, अध्यक्ष, पी. एम. सी. एम्प्लॉयईज युनियन,  प्रकाश हुरकडली, सल्लागार, पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यता प्राप्त) इ. मान्यवर उपस्थित होते.
महापालिका आयुक्त यांनी सर्व सहभागी कर्मचाऱ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच काम करताना प्रत्येक कर्मचाऱ्यास ताणतणावास सामोरे जावे लागते त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने खेळत रहाणे आवश्यक आहे असा संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन   नितीन केंजळे, कामगार अधिकारी यांनी केले.

ESIC Benefit | PMC Contract employees | कंत्राटी कामगारांना ईएसआईसी चे फायदे देण्यासाठी महापालिका पुढाकार घेईल| शिवाजी दौंडकर

Categories
Breaking News PMC social पुणे

 कंत्राटी कामगारांना ईएसआईसी चे फायदे देण्यासाठी महापालिका पुढाकार घेईल| शिवाजी दौंडकर

पुणे मनपा (PMC Pune) मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी (Contract employees) कामगार राज्य महामंडळाचे (ESIC) फायदे कसे घ्यावेत या संदर्भामध्ये मनपा व कामगार राज्य विमा महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामगार सल्लागार तथा सह महापालिका आयुक्त शिवाजी दौंडकर (Labor Adviser and Joint Municipal Commissioner Shivaji Daundkar) आश्वासन दिले कि पुणे महानगरपालिका सर्व कंत्राटी कामगारांना ईएसआईसी चे फायदे देण्यासाठी पुढाकार घेईल व प्रयत्न करेल. (Pune Municipal corporation)

या कार्यशाळेमध्ये ई एस आय सी चे पुणे रिजनचे उपनिदेशक हेमंत पांडे , डेप्युटी संचालक चंद्रकांत पाटील, तर मनपाचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर, कामगार अधिकारी नितीन केंजळे, अरुण खिलारी हे उपस्थित होते. ही कार्यशाळा कामगार नेते व इ एस आय सी चे स्थानीय सल्लागार समितीचे सदस्य सुनील शिंदे (Sunil Shinde) यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.(PMC Pune)

या कार्यशाळेमध्ये हेमंत पांडे यांनी ईएसआयसी च्या वेगवेगळ्या कायद्याबाबत माहिती दिली. चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळे लाभ कसे घ्यावेत या संदर्भातले सविस्तर प्रेझेंटेशन दिले. शिवाजी दौंडकर यांनी पुणे महानगरपालिका सर्व कंत्राटी कामगारांना ईएसआईसी चे फायदे देण्यासाठी पुढाकार घेईल व प्रयत्न करेल असे सांगितले. सुनील शिंदे यांनी एस आय सी चे लाभ घेण्यासाठी त्याची नोंदणी सर्व कामगारांनी तात्काळ करून घ्यावी व त्याचे लाभ व नोंदणी करण्यासाठी संघटनेच्या कार्यालयामध्ये मोफत संगणक व मार्गदर्शक नेमण्यात येणार असून त्याद्वारे सर्व कंत्राटी कामगारांनी एस आय सी चा लाभ घ्यावा. असे आवाहन यावेळी केले. त्याचबरोबर ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी मनपाचे आयुक्त विक्रमकुमार व अतिरिक्त आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी परवानगी दिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले.

केंजळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे करण्यात आले होते. यासाठी मोठ्या संख्येने पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार हे उपस्थित होते. (ESIC)

PMC Pune | Contract employee Bouns | मनपा कंत्राटी कामगारांचे आंदोलन | कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत आयुक्त यांच्यासोबत दोन दिवसांमध्ये बैठक घेण्याचे मनपा प्रशासनाचे आश्वासन

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा कंत्राटी कामगारांचे आंदोलन | कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत आयुक्त यांच्यासोबत दोन दिवसांमध्ये बैठक घेण्याचे मनपा प्रशासनाचे आश्वासन

पुणे:- महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांनी कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांचे नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या गेटवर निदर्शने आंदोलन केले. या आंदोलनाला पुणे महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य खाते, स्मशानभूमी कर्मचारी, कचरा वाहतूक चालक, पाणीपुरवठा व इतर अनेक विभागातील कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

त्यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना कामगार नेते सुनील शिंदे म्हणाले, पुणे महानगरपालिकेतील कायम कामगारांना 8.33% बोनस व 19 हजार रुपये सानुगृह अनुदान त्याच बरोबर वीस हजार रुपये अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेने घेतला आहे. परंतु त्याचबरोबर कायम कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कंत्राटी कामगार यांना मात्र काहीच देण्यात आलेले नाही. हा मनपा मधील कांत्राटी कामगारांवर खूप मोठा अन्याय आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व कंत्राटी कामगारांनाही बोनस व इतर लाभ मिळवून देण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर या कंत्राटी कामगारांचे इतर अनेक एक प्रश्न आहेत तेही यावेळी उपस्थित करण्यात आले.

मागण्यांचे निवेदन महापालिकेचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर यांना देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चा मध्ये  शिवाजी दौंडकर यांनी कामगारांचा उर्वरित पगार दिवाळीपूर्वी करण्याचा इरादा जाहीर केला. त्याचबरोबर कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत माननीय आयुक्त यांच्यासोबत दोन दिवसांमध्ये बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, सुरक्षा रक्षक प्रतिनिधी, विजय पांडव, जानवी दिघे, वेहिकल डेपोचे संदीप पाटोळे पाणीपुरवठा विभागाचे योगेश मोरे सोमनाथ चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Security Guard Issues | मनपा सुरक्षारक्षकांना न्याय देणार |अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा सुरक्षारक्षकांना न्याय देणार |अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार

पुणे :- महानगरपालिकेतील सुरक्षारक्षकांच्या प्रश्‍नांबाबत राष्ट्रीय मजदूर संघाने अनेक तक्रारी केल्या होत्या व आंदोलने केली होती. या सर्वांची दखल घेऊन पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी यासंदर्भात महापालिकेमध्ये बैठक घेतली. सुरक्षारक्षकांनी आपले काम व्यवस्थित पार पाडावे त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत महापालिका संरक्षण करेल. असा विश्वास यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी दिला.

या बैठकीला सुरक्षारक्षक विभागाचे प्रमुख व मनपा उपायुक्त माधव जगताप, कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सेक्रेटरी एस के पळसे, सुरक्षारक्षक प्रतिनिधी विजय पांडव, जानवी दिघे, उज्वल साने, अरविंद आगम स्वप्नील कामठे, उमेश कोडीतकर, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस लिमिटेड या कंत्राटदार कंपनीचे व्यवस्थापक  काळे हे उपस्थित होते.

यावेळी सुरक्षारक्षकांना कधीच वेळेवर पगार मिळत नाही, कामगार कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या विविध सोयी सवलती मिळत नाहीत, ड्रेस, बूट, स्वेटर, काठी, सिटी इत्यादी साहित्य मिळत नाही. किमान वेतन कायद्यामध्ये झालेल्या वाढीच्या दराचा फरक मिळत नाही. कोणतेही कारण न सांगता पगारातून कपात केली जाते, कामावरून काढून टाकण्यात येते, अशा सर्व तक्रारींचा पाढा यावेळी कामगार नेते सुनील शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त  यांच्या समोर वाचला. या सर्व बाबींकडे महापालिकेकडून हेतुपुरस्सर डोळेझाक होत असल्याचा आरोप यावेळी शिंदे यांनी केला.

या सर्व प्रश्नांची गंभीर दखल कुणाल खेमनार यांनी घेतली. वेळेवर पगार करण्यास संदर्भातली व इतर सोयी सवलती व सुरक्षेची साधने देण्यासंबंधी चे आदेश संबंधित कंत्राटदाराला दिले. जर कंत्राटदाराने दिलेले आदेश पाळले नाहीत तर संबंधित कंत्राटदारा वर कडक कारवाई करण्यासंदर्भातले आदेश देण्यात येतील, असे सांगितले. सुरक्षारक्षकांनी आपले काम व्यवस्थित पार पाडावे त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत महापालिका संरक्षण करेल. असे अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितले व कामगार कायद्यामध्ये असणाऱ्या विविध सवलती बाबत कामगार उपायुक्त कार्यालय पुणे यांचे कडून सल्ला घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही खेमनार यांनी या बैठकीत सांगितले.