Pune News | Pramod (Nana) Bhangire) | पुणे शहरातील विविध मुख्य समस्या सोडवण्याबाबत प्रमोद भानगिरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune News | Pramod (Nana) Bhangire) | पुणे शहरातील विविध मुख्य समस्या सोडवण्याबाबत प्रमोद भानगिरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

| महापालिका आयुक्तांना आदेश देण्याबाबत केली विनंती

Pune News | Pramod (Nana) Bhangire | पुणे शहरात (Pune city) वाहतुककोंडी (Pune traffic) पासून रस्ता रुंदी (Road Widening)!पर्यंत  विविध समस्या भेडसावत आहेत. यामुळे शहरवासियांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे (Shivsena city president Pramod Bhangire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. तसेच या समस्या सोडवण्याबाबत पुणे महापालिका आयुक्तांना (PMC Pune Commissioner) आदेश देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली.  (Pune Municipal Corporation)
याबाबत प्रमोद भानगिरे (Pramod Bhangire) यांनी सांगितले कि  पुणे शहरात विविध ठिकाणी भेट दिल्या. नंतर तेथील समस्या जाणून घेतल्या. त्या समस्या अतिशय गंभीर असून त्या समस्या लवकरात लवकर सोडवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे पुणे शहरातील विविध मुख्य समस्या मार्गी लावण्यासाठी त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा. यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्ताना आदेश द्यावे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली आहे. (Shivsena city president Pramod Bhangire)

मुख्यमंत्र्यांकडे या समस्या मांडल्या

1) ज्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अवैध बांधकामांवर शास्ती रक्कम शर्तीच्या अधीन राहून माफ करून मूळ कराचा भरणा करण्यास शासनाने जो निर्णय दिला तसाच निर्णय पुणे महानगरपालिकेत घ्यावा.
2) पुणे शहरातील २४*७ पाणी पुरवठा प्रकल्पाला गती मिळावी.
3) पुणे शहरातील वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते त्यामुळे होणारे अपघात ही खूप मोठी समस्या आहे. मागील दोन दिवसापूर्वी एन आय बी एम महंमदवाडी-उंड्री रोड वर अरुंद व तीव्र उतार असल्यामुळे तेथे अपघात होवून दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.  अन्य चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ह्या रस्त्याचे रुंदीकरण लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.

4) हडपसर येथील सोलापूर हायवे वर असलेला पूल हा बांधून देखील  वाहतूक कोंडी जशीच्या तशी आहे. त्यामुळे तो पूल पाडून नव्याने बांधण्यात यावा.

5) त्याचप्रमाणे मुंढवा-मगरपट्टा खराडी बायपास रोड वरील मुंढवा महात्मा चौक येथे मोठ्या प्रमाणात औद्योगीक परिसर असल्याकारणाने व तेथे पूल नसल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते, मांजरी-आव्हाळवाडी-वाघोली येथील रेल्वे रुळावारील रखडलेला पूल, मांजरी बु. येथील नदीवरील पूल नसल्या कारणाने नागरिकांना प्रचा वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागत आहे व काही नागरिक तर ह्या वाहतूक कोंडीमुळे तेथून पलायन करून दूसरा
पर्याय शोधत आहे. त्यामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी व होणारे अपघात टाळण्यासाठी हे सर्व पूल व रस्ते रुंदीकरण लवकरात लवकर होणे खूप गरजेचे आहे.
6) तसेच पुणे महानगरपालिकेतील रस्तावर असणारे अनधिकृत धंदे हे पण बंद होणे गरजेचे आहे.मुंढवा ते केशव नगर येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत फळ, भाज्या व इतर विक्रेते आपल्या हातगाड्या लावून वाहतुकीस अडचण निर्माण करत आहे त्यामुळे वाहतूक कोंडीस पाहता त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
7) PMPML च्या कर्मचार्यांना ७व्या वेतन आयोगाचे उर्वरित ५०% रक्कम जमा करण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त व pmpml चे अध्यक्ष यांना आदेश देण्यात यावे.
8) उपरोक्त  संबंधित ठिकाणी महापालिका आयुक्त यांनी पाहणी करण्याच्या सूचना द्याव्यात.
—–
News Title | Pune News | Pramod (Nana) Bhangire) | Pramod Bhangire met the Chief Minister regarding solving various major problems in Pune city

Dr. Baba Adhaav | डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण देण्याची शिवसेनेची मागणी

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण देण्याची शिवसेनेची मागणी

| महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन

पुणे : “ महात्मा फुलेंच्या विचारांचे कृतीशील वारस,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा.बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा ‘, अशी मागणी पुणे शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केली आहे. आज पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख संजय मोरे,उपप्रमुख डॉ.अमोल देवळेकर यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी समता भूमी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन केले,त्यानंतर ही मागणी केली.यासंदर्भात त्यांनी एक पत्रकही प्रसिद्धीस दिले आहे.गजानन थरकुडे,उत्तम भुजबळ,विशाल धनावडे,पल्लवी जावळे,पृथ्वीराज सुतार,बाळा ओसवाल,अशोक हरणावळ,संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे तसेच राष्ट्रवादी च्या एड. रुपाली पाटील-ठोंबरे उपस्थित होत्या .

‘गेली नऊ दशके अव्याहतपणे फुले विचारांची कास धरून सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे डॅा. बाबा आढाव हे खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंच्या विचारांचे कृतीशील वारस आहेत. फुले जयंती प्रसंगी बाबा आढाव यांच्यासारख्या ऋषितुल्य वक्तित्वाचा सन्मान करणे म्हणजे आपला प्रबोधनकारी वारसा जपणे होय.येणाऱ्या महाराष्ट्र दिनी बाबा आढावांचा ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार देऊन सन्मान व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे.या मागणीचा आदर करत सरकारने त्वरित तशी घोषणा करावी आणि समविचारी सर्व लोकांनी या संदर्भात तशी निवेदने माध्यमातून मुख्यमंत्री व सरकारकडे करावी’, असे या पत्रकात म्हटले आहे.

‘सत्यशोधक’ विचारांचा हा वारसा फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अमुल्य असा ठेवा आहे.महापुरूषांच्या प्रतिमेचा-कार्याचा गुणगौरव तर आपण त्यांच्या जन्मदिनी करतोच परंतू त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणे हिच त्यांच्याप्रति खरी कृतज्ञता ठरेल’, असे या पत्रकात म्हटले आहे.

Balbharati-Poud Phata road | बालभारती-पौड फाटा रोडला शिवसेना (ठाकरे गट) चा विरोध | वेताळ टेकडी बचाव मोहिमेला समर्थन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

बालभारती-पौड फाटा रोडला शिवसेना (ठाकरे गट) चा विरोध

| वेताळ टेकडी बचाव मोहिमेला समर्थन

पुणे | महापालिकेकडून (PMC Pune) बालभारती-पौड फाटा रोड (Balbharti-Paud Fata Road) प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र या प्रकल्पाला शहरातील पर्यावरण प्रेमिकडून विरोध करण्यात येत आहे. भाजप मात्र या प्रकल्पाचे समर्थन करत आहे. आप आणि कॉंग्रेस ने या प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यानंतर आता शिवसेना’ (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivivsena) ने देखील या प्रकल्पाला विरोध केला आहे. वेताळ टेकडी बचाव मोहिमेला समर्थन देण्यात आले आहे. अशी माहिती पक्षाचे नेते तथा माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिली आहे.
सुतार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदना नुसार पुणे मनपा मार्फत बालभारती ते पौड रस्त्याचे काम व सुतारदरा (कोथरूड) ते पंचवटी (पाषाण) व जनवाडी (गोखलेनगर) हे दोन बोगदयांचे काम ३२० कोटी रूपये खर्च करून करण्यात येणार आहे. या कामांसाठी पुणे शहरातील वेताळ टेकडी फोडण्यात येणार आहे. हे पुण्याच्या पर्यावरणाचा -हास करणारे आहे, ही टेकडी फोडल्यामुळे हजारो दुर्मिळ वृक्ष नष्ट होणार आहेत, पाण्याच्ये नैसर्गिक प्रवाह बंद होणार आहेत, उष्णता मोठया प्रमाणावर वाढणार आहे, तसेच भू-जल पातळीही मोठया प्रमाणात कमी होणार आहे. सध्या जगभर ग्लोबल वार्मिंगमुळे अनेक संकटे जगावर येत आहेत, वेताळ टेकडी फोडून पुणेकरांना महानगरपालिका वेगळ्याच संकटात ओढत आहे. कोथरूडला जाण्यासाठी पर्यायी रस्ता हवा याबाबत आमची मागणी आहे. परंतु टेकडया फोडून,पर्यावरणाचा ऱ्हास करून, पुणेकरांना संकटात टाकून नाही.
वेताळ टेकडी वाचविण्यासाठी  १५ एप्रिल रोजी सायं ५ वा वेताळबाबा चौक, ते जर्मन बेकरी असे वेताळ टेकडी बचाव कृती समिती मार्फत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये पुणेकरांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी अभियानामध्ये सहभागी व्हावे. यासाठी कृती समिती व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, गटनेते पृथ्वीराज सुतार, यांच्या समवेत बैठक झाली. यावेळी उपशहरप्रमुख आनंद मंजाळकर, विभागप्रमुख प्रविण डोंगरे उपस्थित होते, या बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार, माजी पर्यावरणमंत्री, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार, संपर्कप्रमुख आमदार सचिनजी अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली, वेताळ टेकडी बचाव मोहिमेला  शिवसेना’ (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे समर्थन देण्यात आले आहे. १५ एप्रिलच्या जनजागृती अभियानात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. असे सुतार यांनी म्हटले आहे.

Transfers | Nana Bhangire | महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा | शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा

| शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची मागणी

| बदल्या न झाल्यास आंदोलनाचा इशारा

पुणे | महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. तसेच इंजिनियर, कर विभाग, क्लार्क यांच्या नियमानुसार तातडीने बदल्या कराव्यात अन्यथा शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा भानगिरे यांनी दिला आहे. (Pmc Pune)
भानगिरे यांच्या निवेदनानुसार नुकतेच मनपा वर्तुळात तसेच शहरभरात चर्चेचा असलेला मुद्दा म्हणजे पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा आहे.  पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बादल्या दर तीन वर्षांनी करणे, असे धोरण असून या धोरणास हरताळ फासला जात आहेअभियंत्यांच्या बदल्यांमध्ये लाखोंची उलाढाल होत आहे. अशी चर्चा असली तरी लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, उप अधीक्षक, अधिक्षक, प्रशासन अधिकारी या पदांवर काम करणारे अधिकारी यांच्या सन 2012 पासून दर तीन वर्षांनी होणाऱ्या बदल्या झालेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. (Pune municipal corporation)

भानगिरे यांनी पुढे म्हटले आहे कि, 2012 नंतर बदल्या झाल्या. परंतु ज्या कर्मचाऱ्यांचा वशिला नाही अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. कर आकारणी कर संकलन विभागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचा आढावा घेतल्यास सन 2010 पासून तेच तेच अधिकारी त्याच त्याच परिसरात काम करीत आहेत. परिणामी अशा अधिकाऱ्यांची त्या त्या परिसरात मक्तेदारी झालेली आहे.  तसेच हाच प्रकार बदल्या करणारे खाते म्हणजेच सामान्य प्रशासन विभाग, मालमत्ता व्यवस्थापन, मुख्य लेखापाल, दक्षता विभाग अशी अत्यंत महत्वाचे विभाग याठिकाणी काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या 10 वर्षांहून अधिक काळ झाला तरी झालेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

या बाबी निदर्शनास आणून देण्याचे महत्वाचे कारण म्हणजे या पदांवर काम करणारे अधिकारी देखील आमच्या शिवाय मनपाला पर्याय नाही. अशा वल्गना खाते प्रमुखांसमोर करतात व खाते प्रमुख देखील वेळ मारून नेण्यासाठी गप्प बसतात. मनपाच्या कडे प्रतिनियुक्ती वर आलेल्या अधिकारी यांनी स्वतःचे महत्त्व वाढवण्याच्या उद्देशाने व काही गूढ हेतूने अकारण नैसर्गिकरित्या पात्र बदल्याही अडवून ठेवल्या आहेत सेवकवर्ग विभाग संपुर्ण आयुक्त यांच्या अख्यतारीत घेण्यात यावा जेणेकरून कोणताही भ्रष्टाचार न होता पारदर्शक विना वशिलेबाजी ने बदल्या होतील.  इंजिनियर, कर विभाग, क्लार्क यांच्या नियमानुसार तातडीने बदल्या कराव्यात अन्यथा शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल. असे भानगिरे यांनी म्हटले आहे.

PMC Budget | प्रशासक विक्रम कुमारांनी सादर केलेल्या बजेटबाबत शिवसेना आणि काँग्रेस शहर अध्यक्षांना काय वाटते?

Categories
Breaking News PMC Political पुणे

प्रशासक विक्रम कुमारांनी सादर केलेल्या बजेटबाबत शिवसेना आणि काँग्रेस शहर अध्यक्षांना काय वाटते?

रखडलेल्या प्रकल्पांना चालना देणारे संतुलित बजेट | नाना भानगिरे

शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले, शहराच्या विकासाला चालना देणारे अतिशय चांगले बजेट महापालिका आयुक्तांनी सादर केले आहे. समाविष्ट गावासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. कुठलीही कर वाढ करू नये म्हणून भाजप आणि शिवसेनेने आयुक्ताकडे मागणी केली होती. त्याला यश आले, असे म्हणावे लागेल. या बजेटमुळे रखडलेल्या प्रकल्प पुरे होतील. पाणी योजनेसाठी चांगल्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजना, नदी सुधार योजना मार्गी लागण्यास मदत मिळेल. एकंदरीत हे शहरासाठी अगदी योग्य आणि चांगले बजेट आहे.
—-

भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन केलेले नियोजनशून्य बजेट – अरविंद शिंदे

बजेटवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, या बजेटमधून शहरासाठी कुठलेही शाश्वत आश्वासन देण्यात आलेले नाही. आयुक्तांना संतुलित बजेट करता आलेलं नाही. कारण चालू बजेटमध्येच 2000 कोटीची वित्तीय तूट दिसून आलेली आहे. तरीही आयुक्तांनी साडेनऊ हजार कोटींचे बजेट सादर केले आहे. भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन बजेट करण्यापेक्षा नागरिकांना सोबत घेऊन केले असते तर चांगले झाले असते. या बजेटमध्ये उत्पन्नाचा कुठलाही नवीन स्रोत नाही. समाविष्ट गावांसाठी कुठलेही ठोस नियोजन नाही. समान पाणीपुरवठा योजनेसाठी घेतलेल्या बॉन्डवर किती व्याज दिले, त्याचा कसा विनियोग केला, याबाबत कुठलेही तारतम्य दिसून आलेलं नाही. या बजेटमधून करदात्याला कसलाही उलगडा होत नाही. शहरात नवीन उद्याने कुठे होणार, त्याचे आरक्षण कुठे आहे, नवीन शाळा कुठे उभ्या राहणार, याबाबत काही उलगडा केलेला नाही. फक्त नवीन फ्लॅट कसे उभे राहतील हे दिसते आहे. एकंदरीत बजेटमधून तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले आहे. एकूणच दूरदृष्टी नसणाऱ्या आणि नियोजनशून्य भाजप नेत्यांना सोबत घेऊन केलेले हे बजेट आहे.

Shivsena | पुणे शहर शिवसेना सदैव नागरिकांच्या सेवेत |शहर संपर्क प्रमुख अजय बापू भोसले आणि शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिला विश्वास

Categories
Breaking News Political social पुणे

पुणे शहर शिवसेना सदैव नागरिकांच्या सेवेत

|शहर संपर्क प्रमुख अजय बापू भोसले आणि शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिला विश्वास

 पुणे | पुणे शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुणे शहराचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेऊन शहरातील नागरिकांच्या  समस्या बाबत भेट घेतली. तसेच  त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी देखील यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. अशी माहिती शहर संपर्क प्रमुख अजय बापू भोसले आणि शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिली.
भानगिरे म्हणाले, नागरिकांच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने पुणे शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेली जड वाहनांची वाहतूक, महाविद्यालय परिसरामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी दामिनी सक्रिय करण्यात यावे. तसेच दहानंतर चालणारे आउटडोर हॉटेल्स वर कारवाई करण्यात यावी. आदी समस्यांच्या संदर्भात पोलीस आयुक्त यांना निवेदन देत त्यावर सकारात्मक चर्चा केली. यावर पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी तुमच्या तक्रारींवर लवकरात लवकर कारवाई करू असे आश्वासन दिले.
यावेळी पुणे शहराचे संपर्कप्रमुख अजय बापू भोसले, पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, महिला आघाडी शहर प्रमुख लीनाताई पानसरे, माजी नगरसेवक श्रीकांत पुजारी, युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य कु. शर्मिला येवले, पुणे उपशहर प्रमुख राजाभाऊ भिलारे व सुधीर कुरुमकर, प्रसिद्धी प्रमुख संजय अग्रवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Nana Bhangire | पुणे शहराला गतिमान करणारा अर्थसंकल्प | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे | शिवसेना भवन येथे पेढे वाटून आनंद केला साजरा

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

पुणे शहराला गतिमान करणारा अर्थसंकल्प | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे

| शिवसेना भवन येथे पेढे वाटून आनंद केला साजरा

पुणे | राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा पुणे शहराला गतिमान करणारा आहे. यातून सर्वच घटकाला न्याय मिळणार आहे. अशा भावना शिवसेनना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी व्यक्त केल्या. दरम्यान बजेट मधून दिलेल्या योजनेमधून लोकांचे हित पाहिले गेले आहे. त्यामुळे शिवसेना भवन येथे जल्लोष करण्यात आला. तसेच नागरिकांना पेढे देखील वाटण्यात आले.

नाना भानगिरे म्हणाले, मेट्रोच्या कामाला वेग देण्याबरोबर स्वारगेट-कात्रज आणि पिंपरी-निगडी मेट्रो या मार्गिकांवर मेट्रो विस्तारणार आहे. मेट्रोअंतर्गत ८ हजार ३१३ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. पुणे रिंगरोड, पुणे-मुंबई मिसिंग लिंकसाठी भरीव निधी देण्यात आला आहे. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुण्यात सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारण्यात येणार आहे. पुण्यातील भिडेवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे.

भानगिरे पुढे म्हणाले, पुणे मेट्रोचा विस्तार, पुणे रिंगरोड, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नाशिक-पुणे रेल्वे या प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्‍वास वाटतो. समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. भानगिरे म्हणाले यातील बऱ्याच गोष्टी साठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करत होतो. आमच्या मागण्याची दखल घेतल्याबद्दल आम्ही अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो.

पुणेकरांच्या 40% कर सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

पुणेकरांच्या 40% कर सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे

पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी आज केली आहे. लवकरच ते मुख्यमंत्र्यांची व नगर विकास सचिवांची भेट घेऊन तसे पत्र देणार आहेत

याबाबत भानगिरे यांनी सांगितले कि, मिळकत करातील ४० टक्के सवलत १/८/२०१९ पासून स्व:वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची काढण्यात येऊ नये आणि देखभाल दुरुस्ती खर्च १/४/२०१० पासून १५ टक्क्यांहून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशा प्रमुख मागण्या यावेळी  केल्या जातील. या दोन्ही मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे.  या दोन्ही मागण्या मान्य झाल्या तर पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. असे ही भानगिरे म्हणाले.

Thackeray Group | Pune| निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यात ठाकरे गटाची निदर्शने

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यात  ठाकरे गटाची निदर्शने

पुणे | सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना देखील रात्रीत निवडणूक आयोगाच्या मार्फत मिंधे सरकारने शिवसेनेचे धनुष्यबाणावर घाला घातला. मिंधे सरकारने धनुष्य जरी चोरून नेले असले तरी सच्चा शिवसैनिक शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्री बरोबर एकनिष्ठ आहे. भविष्यात मिंधे सरकारला त्यांची जागा दाखवल्या शिवाय सच्चा शिवसैनिक गप्प बसणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रीय शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. 

निवडणूक आयोगाने काल (दि. १७) शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेले धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये संतापाची लाट उसळळी असून, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ  पुणे शहर  (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक प्रशांत बधे, अशोक हरणावळ, विशाल धनवडे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, महिला शहर संघटिका पल्लवी जावळे, राजेंद्र शिंदे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवासेना शहर अधिकारी सनी गवते, राम थरकुडे, युवा शहर अधिकारी निकिता मारतकर ,युवराज पारीख, छाया भोसले, नंदू येवले, गजानन पंडित, परेश खंडके, तानाजी लोहकरे, मकरंद पेठकर, तेजस मर्चंट, विलास सोनवणे, राजेश मोरे, चंदन साळुंके, सुरज लोखंडे, युवराज शिंगाडे, करूणा घाडगे, वैजयंती फाटे, दिपाली राऊत, गायत्री गरुड, किरण शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. 

मोरे म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या विरुद्ध लागू शकतो या भीतीपोटीच मिंधे सरकारने निवडणूक आयोगाला हाताशी धरून धनुष्यबाणावर घाला घातला आहे. कालच्या निर्णयानंतर प्रत्येक शिवसैनिक पटून उठला असून तो मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. चिन्ह चोरणारे ४० चोर आणि भाजप यांना जमिनीत गाडल्या शिवाय सामान्य शिवसैनिक गप्प बसणार नाही. याची सुरूवात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकी पासून करणार आहे. या पोटनिवडणुकीत मिंधे सरकार आणि भाजपला चारीमुंड्या चित केल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही.

थरकुडे म्हणाले, चिन्ह गेले म्हणून गळून जाणारे आम्ही लेचेपेचे शिवसैनिक नाही. आम्ही हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत. आगामी काळात या मिंधे सरकार आणि भाजपला त्यांची जागा दाखवून दिल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही.

यावेळी ‘शिवसेना आमच्या ठाकरेंची नाही गद्दारांच्या बापाची’, ‘उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘चिन्ह आणि नाव चोरणार्‍या गद्दारांचा धिक्कार असो’, ‘५० खोके एकदम ओके, ५० खोके माजले बोके’ अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.

Shivsena | Pune | बाळासाहेबांच्या विचाराचा आणि भगव्याचा विजय | नाना भानगिरे | जल्लोषाने भारावून गेले पुण्याचे शिवसेना भवन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

बाळासाहेबांच्या विचाराचा आणि भगव्याचा विजय | नाना भानगिरे

| जल्लोषाने भारावून गेले पुण्याचे शिवसेना भवन

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे साहेब यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देऊन निवडणूक आयोगाचा निर्णय दिला. या निर्णयाची बातमी येताच पुणे शहरातील असंख्य शिवसैनिकांनी सारसबाग येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कडे कुच करत एकच जल्लोष केला.

ढोल-ताशांच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजीत बेधुंद होवून आणि तितक्याच आनंदात मिरवणूक काढत पुणे शहराचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले, युवा सेना राज्य सचिव किरण साळी ल,शर्मिला येवले शहरातील सर्व उपशहर प्रमुख पदाधिकारी यांनी महालक्ष्मी मंदिरात जावून या निर्णयाचे स्वागत करीत महाआरती केली. असंख्य शिवसैनिकांनी दिलेल्या आत्तापर्यंतच्या खंबीर साथीचा हा विजय असून सामान्य शिवसैनिकांना बळ देण्याचं काम एकनाथजी शिंदे यांनी केलेला असून हा भगव्याचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. असे उदगार पुणे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी काढले.

याच जल्लोषात मिरवणूक सारसबाग जवळील बाळासाहेब ठाकरे सभागृहातील तैलचित्रांना नमन करून असंख्य शिवसैनिकांनी या जल्लोषात सहभाग घेतला.