Firewood Protest : Shivsena : महागाईचा निषेध म्हणून शिवसेनेतर्फे मोफत सरपण वाटप

Categories
Breaking News Political पुणे

महागाईचा निषेध म्हणून शिवसेनेतर्फे मोफत सरपण वाटप

पुणे :-केंद्र सरकारच्या महागाईवाडी चा निषेध म्हणून शिवसेना पुणे शहर यांच्या वतीने प्रत्येक प्रभागात आंदोलन करून शिवसैनिक रस्त्यावर उतरले.

शिवसेना शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या वतीने सिलेंडर चे वाढलेले भाव याचा निषेध म्हणून गोखलेनगर जनवाडी वस्ती भागातील पाचशे कुटुंबांना मोफत सरपण (लाकडी) वाटप करण्यात आली. “महागाई आटोक्यात आली नाही तर आपल्या देशामध्ये श्रीलंके सारखी परिस्थिती होऊ शकते” अशी भीती गजानन थरकुडे यांनी यांनी व्यक्त केली.

आयोजित केलेल्या अनोख्या आंदोलनाला शहर प्रमुख गजानन थरकुडे, शहर संघटिका सविता मते, माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, उपशहर संघटक उमेश वाघ यांच्यासह प्रवीण डोंगरे प्रकाश धामणे, उपेश सोनवणे,युवराज जाधव,संजय डोंगरे, संतोष ओरसे, आकाश रेणुसे, सागर जाधव,स्नेहल पाटोळे,विनोद धोत्रे , विशाल गायकवाड, भाग्यश्री सागवेकर, दिपाली शिगवण, आदी उपस्थित होते.

Balgandharva Rangmandir : बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास शिवसेनेचा विरोध : महापालिका आयुक्तांना दिले निवेदन 

Categories
Breaking News cultural PMC Political पुणे

बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास शिवसेनेचा विरोध

: महापालिका आयुक्तांना दिले निवेदन 

पुणे : बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास शिवसेनेचा विरोध केला असून परीसरात नविन नाट्यगृहाची निर्मिती करण्याची मागणी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.प्रशासनाने जर हा प्रस्ताव जबरदस्तीने पुणेकरावर लादण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना ” पुणेकराच्या वतीने रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, याची नोंद घ्यावी. असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शिवसेनेने माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, शाम देशपांडे, प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन पुणे शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करीत निवेदन दिले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर पाडून तेथे नव्याने मॉल, मल्टीपर्पज हॉल, व छोटे-मोठे तीन नाटयगृह बांधण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बालगधर्व रंगमदिर हे नाटयक्षेत्रातील कलावतासाठी व पुणेकरांसाठी एक अस्मितेचे प्रतीक आहे. आपल्याला नवीन नाटयगृह बांधायची असेल तर जुने बालगंधर्व रंगमंदिर न पाडता त्याच्या आजूबाजूला तुम्ही नवीन नाटयगृह बाधू शकता. दोन वर्षापूर्वी सुध्दा या प्रस्तावाला पुणेकरानी, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना,
नाटय कलाकार यांनी विरोध केल्यामुळे हा विषय थाबविला गेला होता.परंतु आता परत या विषयाला सुरूवात करण्यात आली असून, मनपा नक्की कोणाच्या हितासाठी हे करत आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.

आजपर्यंत कोणतेही नाटयगृह हे दहा वर्षाच्या आत बांधून पूर्ण झालेले नाही हे बालगधर्व रंगमंदिर पाडून बांधण्यास शिवसेना पक्षाचा विरोध आहे. आपण बालगंधर्व मंदिराची आहे ती वास्तू ठेऊन नवीन विस्तारीकरण करून नवीन नाटयगृह बांधण्यास शिवसेना पक्षाचा विरोध नाही. प्रशासनाने जर हा प्रस्ताव जबरदस्तीने पुणेकरावर लादण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना ” पुणेकराच्या वतीने रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, याची नोंद घ्यावी. असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Sanjay Raut : संजय राऊत यांची 5 मे ला पुण्यात तोफ धडाडणार!  : शिवसेनेची जाहिर मेळावा सभा 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

संजय राऊत यांची 5 मे ला पुण्यात तोफ धडाडणार! 

शिवसेनेची जाहिर मेळावा सभा

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेना आणि भाजप या पूर्वीच्या मित्रपक्षांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे फायर ब्रॅन्ड नेते अशी ख्याती असलेले नेते खासदार संजय राऊत यांची पुणे शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत ते काय बोलतात ? कोणावर आसूड ओढणार ? कोणाकोणाचा आवाज बंद करणार ? याबाबत शिवसैनिकांमध्ये उत्सुकता आहे.

पुण्यात शिवसेनेची जाहिर मेळावा सभा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार आहे. गुरूवारी 5 मे 2022 रोजी, सायं 5 वा  स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृह रस्ता, माळवाडी हडपसर येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी दिली आहे.

 गुरूवारी पुणे शहरात होणाऱ्या जाहीर मेळावा सभेची जय्यत तयारी सुरू आहे. या सभेला शिवसैनिकां सोबतच पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहणार आहेत.

Uddhav Thackeray’s first reaction : एमआयएम  च्या प्रस्तावानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

एमआयएम  च्या प्रस्तावानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली असल्याने सध्या राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे. जलील यांच्या प्रस्ताव महाविकास आघाडीने अमान्य केला असला तरी मात्र ते आग्रही आहेत. जलील यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार आहेत. मात्र या भेटीआधीच उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी हा एमआयएमचा कट असल्याचं सांगत तो उधळून लावण्याचं आवाहन केलं.

उद्धव ठाकरेंनी बैठकीदरम्यान सांगितलं की, “शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा”. तसंच यावेळी त्यांनी मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपाने केलेल्या युतीची आठवण करुन देत म्हटलं की, “मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत”.

आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे असंही स्पष्ट सांगितलं. यावेळी त्यांनी जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार राहा असं आवाहन केलं.

संजय राऊतांची प्रतिक्रिया

या बैठकीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “भाजपाने एमआयएमला शिवसेनेची बदनामी करण्याची सुपारी दिली आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसंच काही झालं तरी एमआयएमसोबत युती होणार नाही हे स्पष्ट केलं. शिवसेना कधीही हिंदुत्व सोडणार नाही असं संजय राऊतांनी यावेळी खडसावून सांगितलं. हा भाजपाच्या व्यापक कटाचा भाग असल्याचंही ते म्हणाले.

२२ ते २५ मार्च शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान

राज्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसंच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेनं “शिवसंपर्क अभियान” सुरू केलं आहे. या अभियानाचा पहिला टप्पा २२ ते २५ मार्च दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील एकुण १९ जिल्ह्यात सुरू होणार आहे. या १९ जिल्ह्यात शिवसेनेचे १९ खासदार शिवसंपर्क अभियान सुरू करणार आहेत. पहिल्या टप्यातील १९ जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार आणि त्यांच्यासोबत शिवसेना पदाधिकार्यांची १२ जणांची टीम कार्यरत असणार आहे.

शिवसंपर्क अभियानाच्या मार्फत शिवसेना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत राज्यात शिवसेना करत असलेल्या विकास कामांची माहिती पोहचवणार आहे.

Last Day Of PMC : Administrator : नगरसेवक, सत्ताधाऱ्यांचा आज शेवटचा दिवस! : उद्यापासून महापालिकेवर प्रशासक 

Categories
Breaking News PMC Political पुणे

नगरसेवक, सत्ताधाऱ्यांचा आज शेवटचा दिवस!

: उद्यापासून महापालिकेवर प्रशासक 

पुणे – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal कॉर्पोरेशन) सभागृहाचा आज अखेरचा दिवस असणार आहे. सर्व पक्षीय नगरसेवक आणि सत्ताधारी भाजपचा हा शेवटचा दिवस आहे. निवडणुका होईपर्यंत मंगळवारपासून महापालिकेत प्रशासक (Administrator) सुरू होणार आहे. दरम्यान, आज शेवटच्या दिवशी महापालिकेची निरोपाची ऑनलाइन सभा (Online Meeting) होणार आहे. त्यामुळे या शेवटच्या सभेत एकमेकांवर कुरघोड्या, पाच वर्षांच्या कारभाराचा मागोवा घेतानाच सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता असल्याने याकडे लक्ष लागले आहे.

कोरोना आणि ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत. पुणे महापालिकेसाठी तीन सदस्यांच्या प्रभाग निश्चित केला आहे. या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर होऊन त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या. त्याची सुनावणी होऊन प्रारूप आराखड्यात आवश्‍यक असलेल्या बदलांचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे अंतिम आराखडा जाहीर करून आरक्षणाची सोडत जाहीर करण्याची प्रक्रिया अद्याप शिल्लक आहे. त्यातच राज्य सराकरने विधिमंडळात नवीन कायदा पारित करून निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे या निवडणुका किमान सहा महिने पुढे जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

: स्थायी समितीच्या बैठकीत काय होणार?

 दुपारी सव्वाबारा वाजता स्थायी समितीची अंदाजपत्रकाची बैठक आहे. यामध्ये भाजपकडून उपसूचना मांडून त्यांना आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात हवे ते बदल करून घेतले जाण्याची शक्यता आहे. मात्र, आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात बदल करता येत नाहीत. त्यासाठी मुख्यसभेची मान्यता घ्यावी लागते, असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत वाद होण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजता आॅनलाइन मुख्यसभा होणार आहे. या मुख्यसभेत महत्त्वाचे विषय नाहीत. पण या सभेत गेल्या पाच वर्षांचा मागोवा घेणारी भाषणे व भावनिक भाषणे होण्याची शक्यता आहे. सुविधा काढून घेणारमंगळवारपासून आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार सांभाळणार आहेत. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालय, गाड्या व इतर सुविधा काढून घेतल्या जातील. त्याबाबतही प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे. याचवेळी भाजपकडून स्थायी समिती बरखास्त होऊ शकत नाही, त्यामुळे अध्यक्ष हेमंत रासने हेच पुढील वर्षाचे अंदाजपत्रक मांडणार असे सांगत आहेत. त्यास विरोधीपक्षांनी विरोध केला आहे.  बैठकीत अंदाजपत्रकावर उपसूचना देऊन त्यात बदल करायचे प्रस्ताव भाजपकडून केले जाऊ शकणार आहेत. तर प्रशासनाने राज्य सरकारकडे भाजपच्या दाव्याबाबत खुलासा मागितलेला असून, त्यावर उत्तर न मिळाल्यास प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

: भाजप पुन्हा नको; शिवसेना करणार आंदोलन

दरम्यान शहर शिवसेना आज दुपारी महापालिकेत आंदोलन करणार आहे. भाजप पुन्हा नको रे बाबा, अशा पद्धतीच्या घोषणा शिवसेनेने तयार केल्या आहेत. तसेच   पुणे महापालिकेत मागील पाच वर्षात केलेला भ्रष्टाचार पथनाट्याच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. तसेच पालिकेतील भ्रष्टाचाराची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे.

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे घेणार शिवसेना नेत्यांची बैठक  : पुणे महापालिका निवडणुकीची तयारी 

Categories
Breaking News PMC Political पुणे

आदित्य ठाकरे घेणार शिवसेना नेत्यांची बैठक

: पुणे महापालिका निवडणुकीची तयारी

 

पुणे : राज्यातील विविध महापालिकेच्या प्रभाग रचना (pmc draft ward structure) काल (मंगळवार) जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी निवडणुकीची (PMC Elections) तयारी केली असून पुणे महापालिकेत (Pune Corporation) देखील सर्वच राजकीय पक्षांच्यावतीने तयारी सुरू झाली असून येत्या 6 आणि 7 तारखेला शिवसेनेचे नेते (Shiv Sena Leader) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे दोन दिवसीय पुणे (Pune) दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे विविध कामांचे उदघाटन आणि पक्षातील नेत्यांची बैठक घेणार आहेत. अशी माहिती शिवसेनेचे शहराध्यक्ष (Shiv Sena Pune City President) संजय मोरे (Sanjay More) यांनी यावेळी दिली.

शहर अध्यक्ष संजय मोरे यांची माहिती 


पुणे महापालिकेच्या प्रभाग रचना जाहीर (Pune Corporation Ward Structure) झाल्यानंतर प्रत्येक पक्षाच्यावतीने स्वबळाचा नारा देण्यात येत आहे. राज्यात जरी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असली तरी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), काँग्रेस (Congress), आणि शिवसेनेच्यावतीने स्वबळाची तयारी करण्यात आली आहे. मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे रविवारी आणि सोमवारी पुणे दौऱ्यावर असून या दोन दिवसात विविध विकास कामाचं (Development Work) उदघाटन आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीबाबत बैठक घेणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे शहराध्यक्ष (Shiv Sena Pune City President) संजय मोरे (Sanjay More) यांनी यावेळी दिली.

आम्ही स्वबळाची तयारी केली


गेल्या 2 वर्षांपासून पक्षाच्यावतीने स्वबळाची तयारी सुरू असून शिवसंपर्क अभियान, शिवसंवाद कार्यक्रम घेण्यात येत असून शहरात पक्ष वाढवण्यासाठी देखील प्रयत्न केलं जातं आहे. पुढं आघाडी होणार की नाही याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party chief Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) घेतील.पण आम्ही आमची स्वबळाची तयारी केली असल्याचं यावेळी मोरे यांनी सांगितलं.

Uddhav Thackeray : तलवार जरी माझ्या हातात नसली तरी तलवार कशी गाजवायची हे माझ्या नसानसांत भिनलेलं : उद्धव ठाकरे 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

तलवार जरी माझ्या हातात नसली तरी तलवार कशी गाजवायची हे माझ्या नसानसांत भिनलेलं

: उद्धव ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री कुठे आहेत? असा वारंवार सवाल करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज उत्तर दिलं आहे. “मी घराबाहेर पडलो नसलो तरी मी असमर्थ आहे असं नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलंय आहे. मुंबई महापालिकेच्यावतीनं उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं उद्घाटन ऑनलाइन स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, यावेळी ते बोलत होते. (Although I am not out of the house it doesnt mean I am incapable says CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री म्हणाले, “गेल्या काही काळामध्ये एका शस्त्रक्रियेला मला समोरं जावं लागलं. त्यानंतर मी अजूनही तसा घराबाहेर पडलेलो नाही पण असं असलं तरी याचा अर्थ असा नाही की, मी बाहेर पडायला असमर्थ आहे. मी सुद्धा शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. तलवार जरी माझ्या हातात नसली तरी तलवार कशी गाजवायची हे माझ्या नसानसांत भिनलेलं आहे. त्यामुळं जेव्हा फिरवायची त्या योग्यवेळी ती फिरवत आलेलो आहेच आणि यापुढेही फिरवणार आहेच. शिवसेना प्रमुखांच्या पुण्याईनं सर्व शिवसैनिक माझ्या आणि आदित्यच्या पाठिशी आहात त्यामुळं धन्यवाद”

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिवसादिनीच वीर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं आपण अनावरण केलं आहे. पुतळे बसवायला अनेक जागा आहेत पण नेमका आपण कोणाचा वारसा सांगत आहोत हे सांगण्याचं, आठवण देण्याचं काम तुम्ही केलं आहे. शिवाजी महाराज किंवा महाराणा प्रताप आपण होऊ शकत नाही पण त्यांचा घोडा म्हणजेच चेतक जरी आपण झालो तरी आपल्याकडून मोठ काम होईल. हा घोडा आपल्या धन्याचा निष्ठावान होता.

मुंबई महापालिकेच्यावतीनं महाराणा प्रताप चौकाच्या सुशोभिकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. यावेळी या चौकात महाराणा प्रताप यांचा भालाधारी १६ फूट उंचीचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला. याचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी पार पडलं.

Pune Shivsena : Sinhgadh Road bridge : भविष्यातील वाहतूकींचे नियोजन करुनच उड्डणपूलाचे बांधकाम करावे – शिवसेना

Categories
Breaking News PMC Political पुणे

भविष्यातील वाहतूकींचे नियोजन करुनच उड्डणपूलाचे बांधकाम करावे – शिवसेना

पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन

पुणे – सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून अजूनही पर्यायी मार्गांची कामे पूर्ण होवू शकली नाहीत. त्यामुळे पर्यायी मार्गाची कामे आधी पूर्ण करून नंतरच उड्डाणपूलाच्या कामाला सुरुवात करावी, या मागणीसाठी शिवसेना शहरच्या वतीने संतोष हॉल येथे निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले. शिवसेना खडकवासला विधानसभा मतदार संघाचे समन्वयक मनीष जगदाळे यांनी या आंदोलनाला पुढाकार घेतला. तसेच शहर शिवसेना यांच्या वतीने प्रकल्प मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, शहरातील बहुतांश उड्डाणपुलांचा आराखडा हा चुकीचाच असल्याचा प्रत्यय वाहनचालकांना येतो आहे. वाहतूक नियोजनकारांना एक तर आराखडा तयार करता येत नाही किंवा तयार करण्यात आलेल्या आराखड्यात स्थानिक लोकप्रतिनिधींकडून बदल करण्यात असल्याने शहरातील उड्डाणपुलांमुळे वाहतूककोंडी वाढल्याचेच चित्र आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावर मेट्रो आणि इतर वाहतूक व्यवस्थेचा विचार करून पुढील किमान ५०-१०० वर्षाचा विचार करून उड्डाणपूल तयार करण्यात यावा या मगणीसाठी आंदोलन करण्यात आले.

गजानन थरकुडे म्हणाले की, भविष्यातील आव्हानांचा विचार करून उड्डाणपुलाचे नियोजन करणे अपेक्षित असताना, पालिका प्रशासन यांच्याकडून याबाबत कोणतेही नियोजन ना करता काम सुरू करण्यात आले आहे. पर्यायी रस्ते अजूनही रखडले असून त्यावरून वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे आधी पर्यायी रस्ता करा, मगच उड्डाणपुलाचे काम सुरू करा, अशी मागणी आम्ही करत आहोत.

शिवसेना खडकवासला समन्वयक मनीष जगदाळे म्हणाले, पुणे महापालिकेकडून सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत उड्डाणपूलाचे काम चालू करण्यात येणार आहे. या कामामुळे सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिंहगड रस्त्यास पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण करुन हा रस्ता वाहतूकीस खुला करावा. रस्ता वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत उड्डाणपूलाचे काम सुरु करुन नये, अशी मागणी जगदाळे यांनी केली आहे.

यावेळी शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे,  मनिष जगदाळे, उपजिल्हाप्रमुख महेश मते, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, शाखाप्रमुख रमेश देसाई, संघटक प्रसाद गिजरे, समन्वयक राजाभाऊ चव्हाण, विभागप्रमुख महेश पोकळे, वैभव हनमघर, सतीश पंधारे, अनंत घरत, राजू पायगुडे, कल्पेश वाजे, सुनील जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

Shivsena : पुणे शहर शिवसेनेतर्फे बंगळुरू येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध..

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शिवसेनेने कर्नाटक सरकारच्या एसटी बसेसवर भगव्या रंगाने “छत्रपती शिवाजी महाराज की जय” लिहून बस केल्या रवाना…

: पुणे शहर शिवसेनेतर्फे बंगळुरू येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध..

पुणे (प्रतिनिधी): कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराचे पडसाद राज्यभरात उमटण्यात येत असून पुण्यात देखील शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. पुणे शहर शिवसेनेच्यावतीने कर्नाटकच्या अनेक बसेसना भगव्या रंगाने “छत्रपती शिवाजी महाराज की जय” लिहून व जयजयकार करून पुण्यातून कर्नाटकला राज्यात पाठवल्या आल्या. स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहासमोरिल खाजगी बस पार्किंगमध्ये उभ्या असणार्‍या कर्नाटक डेपोच्या अनेक एसटी बसेसला काळे फासत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, असंघटित कामगार सेनेचे अनंत घरत, उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, विभागप्रमुख सुरज लोखंडे, अशोक हरणावळ, मनीष जगदाळे, युवा सेनेचे युवराज पारीख, श्रीनाथ विटेकर, प्रसाद काकडे, विजय जोरी, संदीप गायकवाड, चंदन साळुंके, हर्षद ठकार, मुकेश दळवे, दिलीप पोमान, नंदू येवले, नितीन रावलेकर, राजेश मांढरे, गणी पठाण, सागर साळुंके उपस्थित होते.

संजय मोरे म्हणाले की, गेल्यावर्षी बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला होता. कन्नड संघटना आणि कर्नाटक सरकारकडून वारंवार मराठी भाषिकांनाही डिवचण्याचा प्रयत्न वारंवार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना बंगळुरूत करण्यात आली. तेथील भाजप सरकारचा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा द्वेष हा वारंवार जाहीर होत आहे. निवडणूका जवळ आल्या की भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते. निवडणूकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच मते मागायची, निवडून यायच आणि नंतर शाई फेकायची. हि यांची निती आहे. हे आता बंद झाले पाहिजे. पुणे महापालिकेची निवडणूक आली असल्यामुळे भाजप उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमीपूजन करत आहेत. पाच वर्षापूर्वी पुतळा बसविण्याची घोषणा करून पुढच्या निवडणुकीसाठी भूमीपूजन केले जात आहे. शिवसृष्टी विषयी तोंडातून ब्र पण काढत नाहीत. भाजप पुणेकरांची अजून किती फसवणूक करणार आहेत? अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी संजय मोरे यांनी दिली.

Shivsena : PMC : महापालिकेच्या प्रांगणात शिवसेनेने भरवली शाळा!  बांधकाम पुर्ण झालेली ई-लर्निंग शाळा सुरु करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिकेच्या प्रांगणात शिवसेनेने भरवली शाळा!

बांधकाम पुर्ण झालेली ई-लर्निंग शाळा सुरु करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

पुणे – सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक, नऱ्हे, धायरी आदी भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पध्दतीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने गेल्या कित्येक वर्षांपासून वडगाव बुद्रुक येथे पुणे महानगरपालिकेच्या ई-लर्निंग शाळेचे बांधकाम पुर्ण होउन अद्यापदेखील ही शाळा सुरु करण्यासाठी उर्वरित बाबींची पुर्तता पालिकेतील सत्ताधार्‍यांकडून केली जात नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या परिसरातील मुलांचे उज्ज्वल भविष्य त्यांना मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याखाली शाळा भरवून अनोखे आंदोलन केले गेले.

२०१३ मध्ये सुरु करण्यात आलेल्या या शाळेच्या बांधकासाठीचे बजेट बारा कोटीचे बजेट होते. परंतु बजेट पुरेसे नसल्यामुळे दोन मजले कमी करून तीन मजली इमारत बांधण्यात आली असून काम अंतिम टप्प्यात आले आहे, मात्र पालिकेतील सत्ताधार्‍यांच्या उदासीनतेमुळे या उर्वरित कामांना निधी मिळेनासा झाला आहे. केवळ देशाचे माजी कृषीमंत्री खा. शरदचंद्रजी पवार यांचे नाव या ई लर्निंग स्कूलला दिल्यामुळेच भाजपची तिरस्काराची भूमिका स्पष्ट होत आहे. या भागातील सत्ताधारी भाजपचे चार नगरसेवक, महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हे जाणून बुजून येथील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप यावेळी शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला.

शिवसेनेचे खडकवासला क्षेत्र समन्वयक मनिष जगदाळे म्हणाले, ई-लर्निंग शाळा मुद्दाम बंद ठेऊन सत्ताधारी भाजप बहुजन आणि सामान्य स्थानिक विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेत आहे. मात्र सिंहगड रोड परिसरातील विद्यार्थ्यांवर अन्याय करत भाजप कोणता सूड उगावत आहे? असा सवाल जगदाळे यांनी केला आहे.

यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, पुणे मनपा गटनेते पृथ्वीराज सुतार, जिल्हा प्रमुख विजय देशमुख, रमेश कोंडे, शहरसंघटीका संगीताताई ठोसर, सविताताई मते, नगरसेविका प्राचीताई आल्हाट, नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, अशोक हरणावळ, विशाल धनवडे, पल्लवीताई जावळे, श्वेता चव्हाण, युवासेना सहसचिव किरण साळी, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, प्रशांत राणे, आनंद गोयल, बाळासाहेब मालुसरे, मनिष जगदाळे, वैभव हनमघर, अनंत घरत, किशोर रजपूत, नंदू येवले, राजेश चव्हाण, दीपक शेडे, संतोष गोपाळ, राजेंद्र शिंदे, उमेश गालिंदे, संदीप गायकवाड, युवराज पारिख, मुकुंद चव्हाण, कल्पनाताई थोरवे, छाया भोसले, स्वाती कथलकर, रुपेश पवार, संजय वाल्हेकर, प्रथमेश भुकन, संतोष सावंत, राजाभाऊ होले, सुरेश घाडगे, महेश पोकळे, शंकरराव हरपळे, बाळासाहेब गरुड, राजेश वाल्हेकर, राहूल जेटके, सनि गवते, अजय परदेशी, मारुती ननावरे, गणेश कामठे, अक्षय माळकर, चंद्रकांत केगार, संदीप गद्रे, विकी धोत्रे, विनोद सातप, आकाश शिंदे, आशिष शिर्के, विजय पालवे, सुरेश कांबळे, योगेश जैन, राज गडुगुळ, नितिन निगडे, गणेश भापकर, श्रृती नाझरकर, अनिता परदेशी, प्रज्ञा लोणकर, कलावती घाणेकर, शर्मिला येवले, सुनिता खंडाळकर, गायत्री गरुड, भावनाताई थोरात, प्रशांत काकडे उपस्थित होते.