SRA | पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनांचा आढावा

Categories
Breaking News Political social पुणे

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनांचा आढावा

पुणे | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीशासकीय विश्रामगृह येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या विविध योजनांचा आढावा घेतला.

यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, अप्पर जिल्हाधिकारी वैशाली इंदानी-उंटवाल, प्रकल्पाशी संबंधित विकसक व रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकंमत्री श्री. पाटील म्हणाले, दांडेकर पूल झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र १९ लाभार्थ्यांना येत्या महिन्याभरात घरभाडे वाढवून देण्याची विकासकाने कार्यवाही करावी. श्री पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्थेबाबत उच्च न्यायालयातील प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. त्याअनुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन प्रशासनाने कार्यवाही करावी. गुजरात कॉलनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अनुषंगाने इमारतीची उंची ५६ मीटर पर्यंत वाढविण्याबाबत आलेल्या प्रस्तावाबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रशासनाला दिल्या.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गटणे यांनी योजनांबाबत माहिती दिली.

पर्वती येथील दांडेकर पुल झोपडपट्टी पुनर्वसन योजना, श्री पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था, कसबा पेठ, आणि ७२१ गुजरात कॉलनी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांबाबत आढावा यावेळी घेण्यात आला.
000

SRA | पुणे शहरातील एस.आर.ए च्या अर्धवट प्रकल्पाची तपासणी करणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

पुणे शहरातील एस.आर.ए च्या अर्धवट प्रकल्पाची तपासणी करणार

|  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

पुणे शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अंतर्गत चालू असलेल्या प्रकल्पामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत म्हणून आमदार सुनील कांबळे यांनी विधान सभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी द्वारे शासनाचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व तक्रारींची चौकशी करून अर्धवट राहिलेल्या कामांची पुन्हा एकदा तपासणी शासनाकडून करण्यात येईल असे आश्वासन दिले.

पुणे शहरात काशेवाडी, मंगळवार पेठ, लोहिया नगर, ताडीवाला रोड, नाना पेठ इत्यादी ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम चालू आहेत. यापैकी बरेच प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प करणाऱ्या विकसकांचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी असलेल्या हितसंबंधा मुळे प्रत्यक्ष झोपडपट्टी धारकांची विकासकाकडून वेगवेगळ्या प्रकारे अडवणूक होत आहे. व पात्र असणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना सुद्धा घरापासून वंचित राहावे लागत आहे.
प्राधिकरनाच्या कार्यालयामध्ये सदर प्रकल्पावर देखरेख व तांत्रिक तपासणी करण्यासाठी स्वतःचे योग्य ते मनुष्यबळ नसल्यामुळे सदर प्रकल्पाच्या बांधकामाची तांत्रिक दृष्ट्या तपासणी होत नाही त्यामुळे बांधकाम योग्य होते की नाही हा प्रश्न निर्माण होतो.

लोहियानगर येथील झोपडपट्टी धारकांना बिबवेवाडी येथे तात्पुरती राहायची व्यवस्था केली असतानाही त्या ठिकाणी सदर झोपडपट्टीधारकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. व लोहियानगर येथे होत असलेल्या प्रकल्पाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना स्वतःचे घर मिळण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागत आहे.

नाना पेठेतील प्रकल्प पूर्ण झालेला असून तेथे लाभधारकांना मिळालेल्या घरांमध्ये कोणत्याही सोयी सुविधा नाही.
ताडीवाला रोड येथील पानमळा प्रकल्पातील झोपडपट्टी धारकाला विकसक व अधिकाऱ्यांच्या असलेल्या संगनमतामुळे पात्र असूनही अनेक वर्ष हेलपाटे मारायला लावूनही अद्याप पर्यंत त्यांना स्वतःच्या हक्काचे घर मिळाले नाही या सर्व अडचणी आमदार सुनील कांबळे यांनी सभागृहात मांडल्या. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व तक्रारींची चौकशी करून अर्धवट राहिलेल्या कामांची पुन्हा एकदा तपासणी शासनाकडून करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Metro | Smart City | SRA | गरवारे महाविद्यालय ते न्यायालय मेट्रो मार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करा |मेट्रो, स्मार्ट सिटी, एसआरएचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

गरवारे महाविद्यालय ते न्यायालय मेट्रो मार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करा

|मेट्रो, स्मार्ट सिटी, एसआरएचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

पुणे | शहरातील मेट्रोच्या कामाला गती देऊन गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मेट्रोमार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दिक्षीत, संचालक अतुल गाडगीळ, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, मार्च अखेरपर्यंत शहरात सुरू असलेल्या ३३ किलोमीटरच्या मेट्रो लाईनचे काम पूर्ण होईल असे नियोजन करण्यात यावे. महामेट्रोला कामाची गती वाढविण्यासाठी शासनातर्फे आवश्यक सहकार्य करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प अहवालाला शासनाची मंजूरी मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा आढावा
पालकमंत्री पाटील यांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा आढावा घेतला. यावेळी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी वैशाली इंदानी उपस्थित होते. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. श्री.गटणे यांनी शहरातील प्रकल्पांच्या सद्यस्थितीविषयी यावेळी माहिती दिली.

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचाही आढावा
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कार्पोरेशनच्या प्रकल्पांचाही आढावा घेतला. यावेळी कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य ज्ञान अधिकारी दिनेश वीरकर, मुख्य अभियंता अरुण गोडबोले, कंपनी सचिव स्वानंद शेडे उपस्थित होते.

स्मार्ट सिटीचे प्रकल्प नागरिकांच्या जीवनशैलीत अधिक चांगले बदल होण्याच्यादृष्टीने उपयुक्त असून या थीमबेस्ड प्रकल्पांना अधिक गती द्यावी, असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

यावेळी श्री. कोलते यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. कॉर्पोरेशनच्या प्रकल्पांची सद्यस्थिती, निधीची आवश्यकता आदींविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.

SRA : FSI : SRA योजनांचा एफ एस आय वाढवला

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

SRA योजनांचा एफ एस आय वाढवला

: पुणे  राष्ट्रवादीने मानले  उपमुख्यमंत्री यांचे आभार

पुणे : शहरातील एसआरए (SRA) मधील नवीन गृह प्रकल्पांना अतिरिक्त एफएसआय (Additional FSI)  वाढवून मिळावा याबाबतचे निवेदन मागील तीन दिवसापूर्वी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Pune) पार्टीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (DCM Ajit Pawar) यांना दिले होते.  अजितदादांनी आज तात्काळ हा विषय मार्गी लावला असून राज्याच्या गृहनिर्माण विभागाने आज याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयाबद्दल पालकमंत्री अजितदादा पवार यांचे पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून आभार मानण्यात आले आहेत.

याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि पुणे  शहर हे भौगोलिकदृष्टया राज्यातील १ क्रमांकाचे शहर आहे. या शहराच्या एकुण लोकसंख्येपैकी तब्बल ४२ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते. तसेच या शहरात एकूण ५४२ झोपडपट्टया आहेत. सध्या पुणे शहरात सुरू असलेले एसआरए प्रकल्पांमधील झोपडपट्टी वासीयांना मिळणारी २७० चौ. फुटची घरे अपुरी ठरतात, या निर्णयामुळे या सर्व नागरिकांना दिलासा मिळणारअसून इथून पुढे सुरू होणाऱ्या एसआरए प्रकल्पांमध्ये किमान ३०० चौ. फुटाची घरे देण्याबाबतचा आदेश राज्याच्या गृहनिर्माण विभागाने काढला आहे. शहरातील तब्बल ५४२ झोपडट्टीवासीयांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाबद्दल पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आभार

Patil estate : पाटील इस्टेट प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करणार : राजेंद्र निंबाळकर

Categories
PMC social पुणे

पाटील इस्टेट प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करणार

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांची ग्वाही

पुणे : पाटील इस्टेट येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेच्या ग्रंथालय सभागृहात पाटील इस्टेट येथील झोपडपट्टी धारकांची शुक्रवार २२ ऑक्टोबर रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. भारतकुमार आहुजा, सक्षम प्राधिकारी वैशाली इंदानी, प्रकल्प सल्लागार संदीप महाजन आदी उपस्थित होते.

 

सादरीकरण करुन प्रकल्पाची दिली माहिती

बैठकीत सुरवातीला श्री. निंबाळकर यांनी प्रकल्प बाबत सादरीकरण केलेे. पुनर्वसन प्रक्रिया, झोपडीधारकांची पात्रता व त्यासंबंधीचे आवश्यक पुरावे, झोपडीधारकांना मिळणाऱ्या सोई-सुविधा, प्रकल्प पुर्ण होण्याचा कालावधी इत्यादी बाबतची संपुर्ण माहिती दिली. त्यांनी झोपडीधारकांच्या सर्व शंकांचे निरसन केले.

तीन महिन्यात प्रकल्प आराखडा

हा प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे आणि अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांचेवतीने संयुक्तपणे खुल्या निविदा पध्दतीने राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे सर्व आराखडे पुढील तीन महिन्यांमध्ये पूर्ण करून जानेवारी २०२२ मध्ये निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. एप्रिल २०२२ मध्ये कामाचे आरंभ आदेश देऊन साधारण पुढील चार वर्षांमध्ये संपुर्ण प्रकल्पाचे काम पुर्ण केले जाणार आहे.

पात्र लाभार्थींना मिळणार हक्काचे घर

सर्व पात्र निवासी व बिगर-निवासी झोपडीधारकांना हक्काचे घर तसेच व्यावसायिक जागा त्यांचे आत्ताचे आहे त्या ठिकाणीच मोफत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी झोपुप्रा मार्फत पाटील इस्टेट येथील सर्व झोपडीधारकांच्या सर्वेक्षणाचे काम सोमवार २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्यात येणार आहे.

नव्या नियमावलीचा लाभ मिळणार

पाटील इस्टेट येथील झोपडीधारकांच्या समस्या दूर करून त्यांचे सध्याचे वास्तव्याचेच ठिकाणी किमान ३०० चौरस फुटांची (चटई क्षेत्र) सदनिकेसह पुनर्वसन करून देण्याची मागणी शासनाच्या नवीन नियमावलीमुळे शक्य होत आहे. पुनर्वसन प्रक्रियेस व त्यासाठी आवश्यक असलेल्या कामास सर्व संबंधितांनी आणि झोपडीधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. राजेंद्र निंबाळकर यांनी केले आहे.

झोपडपट्टीधारकांच्या मागणी नुसार बोलविण्यात आलेल्या या बैठकीस मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीधारकांची उपस्थिती होती. बैठकीत कोविड विषयक नियमांचे पालन करण्यात आले होते.