Pune Loksabha Election | मतदानासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजनावर भर | येत्या १ एप्रिलपासून ४७ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election | मतदानासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजनावर भर

| येत्या १ एप्रिलपासून ४७ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाने आतापासूनच आवश्यक तयारी सुरू केली असून निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे सूक्ष्म नियोजनावर भर देण्यात येत आहे. आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४७ हजारापेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मतदानासाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी सविस्तर प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. कर्मचाऱ्यांना ईव्हीएमच्या प्रात्यक्षिकासह नियमांची माहिती प्रशिक्षणाद्वारे देण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेची नियमावली, घ्यावयाची खबरदारी, ईव्हीएम हाताळण्याची पद्धत याविषयी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मतदानासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मनुष्यबळाचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी एकूण ४७ हजार ३५९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकूण ८ हजार ३८२ मतदान केंद्रावर प्रत्येकी ४ याप्रमाणे ३३ हजार ५२८ मतदान कर्मचारी असतील. यापैकी मावळ लोकसभा मतदारसंघातील जिल्ह्यात येणाऱ्या ३ विधानसभा मतदारसंघात १ हजार ३३९ मतदान केंद्रांसाठी ५ हजार ३५६, पुणे २ हजार १८ मतदान केंद्रासाठी ८ हजार ७२, बारामती २ हजार ५१६ मतदान केंद्रासाठी १० हजार ६४ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील २ हजार ५०९ मतदान केंद्रासाठी १० हजार ३६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मावळसाठी १ हजार ६०७, पुणे २ हजार ४२२, बारामती ३ हजार १९ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी ३ हजार ११ याप्रमाणे प्रत्येकी ३० टक्के अतिरिक्त मनुष्यबळाचेही प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्याशिवाय चारही मतदारसंघ मिळून ३ हजार ७७३ कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येईल. मतदानाच्यावेळी आवश्यकतेनुसार या मनुष्यबळाचा उपयोग होणार आहे.

एकूण मनुष्यबळापैकी सुमारे ४० टक्के महिला कर्मचारी असून त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे लोकसभा मतदारसंघ स्तरावर यादृच्छीकीकरण करून त्यांना मतदान केंद्रावर नेमण्यात येईल. सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रियेची नीट माहिती करून द्यावी आणि निवडणूक नियमांचे कटाक्षाने पालन होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
0000

Pune Loksabha Election | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

 

Pune Lok Sabha Election – (The Karbhari News Service) –  भारत निवडणूक आयोगाने (Election commission of India)  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम १७(३)(ए) व (बी) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी निर्बंध लागू केले आहेत. पोटनिवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून ६ जूनपर्यंत हे निर्बंध राहणार आहेत.

या कालावधीत नागरिकांना स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास व बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांच्यावर निवडणूक कालावधीत त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही याची जबाबदारी राहील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Pune Loksabha Election | निवडणूकीतील गैरप्रकारांवर १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांचे लक्ष

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election | निवडणूकीतील गैरप्रकारांवर १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांचे लक्ष

 

Pune Lok Sabha Election – (The Karbhari News Service) –  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ दरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर आणि निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती तक्रार निवारण कक्षाद्वारे देण्यात आली आहे.

खर्च संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अधिनस्त जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष आदीदेखील खर्च पथकाला सहकार्य करतात. तसेच त्यासाठी आयकर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचीदेखील या कामात मदत घेतली जाते.

जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघाअंतर्गत २१ विधानसभा मतदार संघात मिळून एकूण १३५ एफएसटी पथक आणि १२९ एसएसटी पथके स्थापन करण्यात आली आहेत. भोर मतदार संघात १५ आणि इतर २० मतदार संघात प्रत्येकी ६ एफएसटी स्थापन करण्यात आली आहेत. तसेच भोर विधानसभा मतदार संघात ९ आणि उर्वरित विधानसभा मतदार संघांमध्ये प्रत्येकी ६ एसएसटी स्थापन करण्यात आली आहेत.

या पथकांद्वारे मतदारांना प्रभावित करण्यासाठीची रोकड, मद्य, तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घालणे, आचारसंहिता भंगाबाबत घटनांवर लक्ष देणे, निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घेणे, सिव्हिजिल आणि नियंत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारींवर कार्यवाही आदी कामे करण्यात येतात.

उमेदवार, राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या सर्व जाहीर सभा, रॅली यांचे व्हिडीओ चित्रीकरण व्हिएसटीच्या माध्यमातून केले जाते व त्याची पाहणी व्हिव्हिटीकडून केली जाते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३ व्हिएसटी आणि २ व्हीव्हीटी नेमण्यात आल्या आहेत. या पथकाची निरीक्षणे खर्च पथकासाठी उपयुक्त ठरतात. एमसीएमसीद्वारे उमेदवारांच्या वृत्तपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरात खर्चाचा अहवाल समितीकडे पाठविला जातो. या विविध माध्यमातून उमेदवारांनी दर्शविलेला निवडणूक खर्चाची पडताळणी केली जाते. खर्च दर्शविण्यात आला नसल्यास त्याबाबतची नोटीस देऊन त्याच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जातो.

प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी सहायक खर्च निरीक्षक नेमण्यात येतो. केंद्र शासनाच्या आयकर विभाग, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, केंद्रीय लेखापरीक्षा व लेखा विभाग किंवा केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाचे अधिकाऱ्यांची नेमणूक सहायक खर्च निरीक्षक म्हणून होते. ते विधानसभा मतदार संघातील खर्च तपासणीचे काम योग्य पद्धतीने चालले आहे का याची पाहणी करणे आणि खर्च निरीक्षक व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना खर्च पडताळणीसाठी सहकार्य करण्याचे काम करतात. तसेच उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची तसेच शॅडो ऑब्झर्वेशन रजिस्टरचे संनियंत्रण करतात, अशीही माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

Final Voter List | Election Commission of India | अंतिम मतदार यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Final Voter List | Election Commission of India | अंतिम मतदार यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार

 

Final Voter List | Election Commission of India |भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम (Final Voter list) प्रसिध्दी करण्याचा दिनांक २२ जानेवारी, २०२४ (सोमवार) असा होता. तथापि, राज्य शासनाने १९ जानेवारी, रोजीच्या अधिसूचनेनुसार सोमवार २२ जानेवारी, २०२४ रोजी श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त (Shri Ram Lalla Pran Pratstha Dina) सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने (ECI) त्यांच्या १९ जानेवारी, २०२४ रोजीच्या पत्रान्वये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या २३ जानेवारी, २०२४ (मंगळवार) रोजी करण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे.

Loksabha | Vidhansabha Election | लोकसभा, विधानसभा निवडणूक हालचालींना वेग | निवडणूक आयोगाचे पुणे महापालिकेला आले हे आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

Loksabha | Vidhansabha Election | लोकसभा, विधानसभा निवडणूक हालचालींना वेग | निवडणूक आयोगाचे पुणे महापालिकेला आले हे आदेश

Loksabha | Vidhansabha Election |  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ( Loksabha, Vidhansabha Election) हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने (State Election Commission) याबाबतची जोरदार तयारी सुरु केली आहे. याबाबत पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) देखील राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आले आहेत.

आगामी लोकसभा / विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारयादी दुरुस्ती व अद्ययावत करण्याकरीता भारत निवडणूक आयोगामार्फत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये मतदारयादीमधील त्रुटी दूर करण्याबाबत उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयुक्त, यांनी याबाबत  व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे महानगरपालिकांनी यादी दुरुस्ती करणेची कार्यवाही गांभीर्याने करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेळेस मतदारयादी विभाजनाचे कामकाज सुलभ व विनातक्रार व्हावे यासाठी मतदारयादी बाबतच्या पुणे मनपाशी संबंधित दुरुस्त्या २९ सप्टेंबर पर्यंत सुचविणे गरजेचे आहे.  त्यानुसार विधानसभा मतदारसंघाची मतदारयादी दुरुस्ती बाबत  कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (PMC Pune)

त्यानुसार अतिरिक्त आयुक्तांनी सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळ यांना खालील आदेश दिले आहेत.
१) पुणे मनपा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यापूर्वी करण्यात आलेल्या मतदारयादी विभाजनाच्या कार्यवाहीमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींचा गोषवारा करून संबंधित मतदारयादी नोंदणी अधिकारी यांना कळविण्यात यावे.
२)  प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाने Section Address मध्ये सुचविलेले बदल झाले असल्याची खातरजमा करण्यात यावी. बदल झालेले नसल्यास संबंधित मतदारयादी नोंदणी अधिकारी यांना त्वरित कळविण्यात यावे.
३) Section Address मध्ये बदल सुचवताना मुख्य रस्ते, नैसर्गिक नद्या, नाले इत्यादी विचारात घेऊन नवीन Section Address सुचविण्यात यावे.
४) क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रामध्ये काम करत असलेल्या BLO सोबत आरोग्य निरीक्षक/विभागीय आरोग्य निरीक्षक / पेठ निरीक्षक (कर आकारणी) यांना जोडून योग्य तो समन्वय राखून Section Address टाकणे/अद्यावत करणेची कार्यवाही विहित मुदतीत करावी.
५) Section Address बाबत सुचविण्यात आलेल्या दुरुस्त्यांच्या गोषवारा करून त्याची प्रत निवडणूक कार्यालयाकडे जमा करावी.
६) संबंधित सह आयुक्त / उप आयुक्त (परिमंडळ कार्यालय) यांनी या कामावर दैनंदिनरित्या नजर ठेवावी.
——
News Title | Loksabha | Vidhansabha Election | Lok Sabha, Vidhan Sabha Election Movement Speed ​​Up | The order of Election Commission came to Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation | BLO म्हणून कामकाज करण्यास 73 महापालिका कर्मचाऱ्यांची टाळाटाळ | जिल्हा प्रशासनाकडून तक्रार

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation | BLO म्हणून कामकाज करण्यास 73 महापालिका कर्मचाऱ्यांची टाळाटाळ

| जिल्हा प्रशासनाकडून तक्रार

Pune Municipal Corporation | पुणे शहरातील विधानसभा मतदार संघांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कामकाज करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडील कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र या कामात जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) करण्यात आली आहे. असे 73 कर्मचारी आहेत. त्यामुळे आगामी काळात कामात टाळाटाळ केल्याचे सिद्ध झाले तर कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी दिला आहे.

अतिरिक्त आयुक्तांच्या निर्देशानुसार पुणे शहरातील विधानसभा मतदार संघांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कामकाज करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडील सेवकांच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे व मतदार नोंदणी अधिकारी / सहा. मतदार नोंदणी अधिकारी संबंधित विधानसभा मतदार संघ यांचेकडून आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही सेवक निवडणूकविषयक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) चे कामामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे  पत्रान्वये  महापालिका आयुक्त यांना कळविण्यात आले आहे.
त्यानुसार बरेच कर्मचारी  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) चे कामकाज करत नसल्याचे दिसून आले आहे. सदर सेवकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) कामकाज हे आपल्या पदाचे कामकाजास सांभाळून करावयाचे आहे. 73 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी कामकाजामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळा केल्याचे सिद्ध झाल्यास “लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील परि. २९ व लोकप्रतिनिधित्व अधिनियम,
१९५१ मधील परि. १३४” अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहती. असे अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. तसेच ही जबाबदारी खाते प्रमुखांनी घ्यावी, असे ही अतिरिक्त आयुक्तांनी म्हटले आहे. (PMC Pune News)

—-
News Title |Refusal of 73 municipal employees to work as BLOs| Complaint from District Administration

Municipal Election of Maharashtra | राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

Municipal Election of Maharashtra | राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही

Municipal Election of Maharashtra | राज्य निवडणूक आयोगातर्फे (State Election Commission) 5 जुलै 2023 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील (Local Body Élections) मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची (Election Programme) घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक (Gram panchayat Election) वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ‘जैसे थे चे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न उद्‌भवत नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान (State Election Officer U P S Madan) यांनी आज येथे केले.
श्री. मदान यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्यात येत नाहीत. त्यासाठी विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या जशाच्या तशा घेवून केवळ प्रभागनिहाय विभाजित केल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सर्वच सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाच्या याद्या वापरण्याकरिता एक विशिष्ट तारीख (कट ऑफ डेट) निश्चित केली जाते. त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी 1 जुलै 2023 ही कट ऑफ डेट निश्चित करण्याबाबतची अधिसूचना 5 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Local body election of Maharashtra)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाच्या अद्ययावत मतदार याद्या वापरण्यासाठीच वेळोवेळी कट ऑफ डेट निश्चित केली जाते आणि त्यासंदर्भातील अधिसूचनाही प्रसिद्ध केली जाते. यापूर्वीदेखील या स्वरूपाच्या अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या अधिसूचना म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम नसतो. अधिसूचनेत नमूद केलेल्या कालावधीत सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुका न झाल्यास, पुन्हा नव्याने कट ऑफ डेट निश्चित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली जाते, असेही श्री. मदान यांनी सांगितले. (Municipal Election)
०-०-०
News Title | Municipal Election of Maharashtra | There is no declaration of election program by the State Election Commission

Election Commission Of India | New Voter | नवमतदारांनी नोंदणी करून घ्यावी | जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Election Commission Of India | New Voter | नवमतदारांनी नोंदणी करून घ्यावी | जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन

 Election Commission Of India | New Voter | भारत निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि नवमतदारांनी (New Voter) नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Pune Collector Dr Rajesh Deshmukh) यांनी केले आहे. (Election Commission Of India)
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. मतदार यादी किंवा मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे. आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे. अस्पष्ट अंधुक छायाचित्र बदलुन त्याऐवजी संबंधित मतदाराकडुन योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे इत्यादी कार्यवाही करण्यात येणार आहे. (State Election Commission)
१ जानेवारी २०२३ रोजी नोंदणी न केलेले पात्र मतदार आणि १ जानेवारी २०२४ मतदार नोंदणीसाठी संभाव्य  पात्र मतदारांची नोंदणी करण्यात येईल. एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरित मतदारांच्या नोंदी वगळणे व मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती करण्यात येणार आहे. (Voter list)
आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणीही मतदार मतदानापासुन वंचित राहु नये यासाठी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ आहे अगर कसे याबाबत नागरिकांनी पडताळणी   करून घ्यावी.  एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदाराचे नाव समाविष्ट असल्यास त्यांनी एक नाव कायम ठेवून इतर ठिकाणची नावे कमी करण्यासाठी नमुना ७ चा अर्ज भरुन मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय किंवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे जमा करावा.  मतदारांचे नाव चुकीने वगळण्यात आले असल्यास त्यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रासह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय येथे नमुना ६ चा अर्ज जमा करावा, असे आवाहनही डॉ.देशमुख यांनी केले आहे. (Pune News)
                           —-
News Title | Election Commission Of India |  New Voter |  New voters should register  Collector Dr.  Appeal by Rajesh Deshmukh

EVM Process | ईव्हीएममधील प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप करता येत नाही

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

EVM Process | ईव्हीएममधील प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप करता येत नाही

|  मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 EVM process | सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी (General Election) नागरिकांना ईव्हीएम (EVM) आणि व्हीव्हीपॅटविषयी (VVPAT) वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय जनजागृती करावी. याअनुषंगाने आपल्या अधिनस्त निवडणूक विषयक काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकसित करण्यावर भर द्यावा. ईव्हीएममधील प्रक्रिया पारदर्शक असून त्यामध्ये कोणताही प्रकारचा मानवी हस्तक्षेप करता येत नाही. असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Chief Election Officer Shrikant Deshpande) यांनी केले. (EVM Process)
‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम- २०२४ व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी)’ या विषयावर यशदा येथे आयोजित महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यशाळेत दुसऱ्या दिवसातील प्रथम सत्रात मार्गदर्शन करताना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे सहसचिव ओ. पी. सहानी, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर आदी उपस्थित होते. (State Election Commission)
ईव्हीएममधील प्रक्रिया पारदर्शक असून त्यामध्ये कोणताही प्रकारचा मानवी हस्तक्षेप करता येत नाही, असे सांगून श्री. देशपांडे म्हणाले, निवडणूक प्रकियेच्यावेळी ईव्हीएम जोडताना मतदान कक्षात स्वतंत्र वीज जोडणी असल्याची खात्री करावी. ईव्हीएमवर सूर्यप्रकाश, पाऊस आदी तांत्रिक बाबीचा होणारा परिणामाबाबत पडताळणी करुन घ्यावीत. यासाठी निवडणूकीपूर्वी अभिरुप मतदान (मॉकपोल) घेण्यात यावेत. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळताना घेण्यात येणाऱ्या दक्षतेबाबत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे. (Election Commission Of India)
श्री. देशपांडे पुढे म्हणाले, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या तंत्रज्ञानाविषयी वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी शाळा, महाविद्यालयामध्ये शिबीरे, प्रश्नंमजूषा आयोजित करावी. प्रचार प्रसिद्धीसाठी निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती देणारे छोटे-छोटे भाग करुन चित्रफिती तयार कराव्यात आणि समाजमाध्यमाचा वापर करावा.
सहसचिव श्री. सहानी म्हणाले, सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी ईव्हीएम ताब्यात घेताना आवश्यक तांत्रिक बाबी विचारात घेऊनच ताब्यात घेण्यात याव्यात. व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक अडचण असल्यास संपूर्ण संच बदलण्यात येतो, असेही श्री.सहानी म्हणाले.
भोर-वेल्हाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी ईव्हीएम हाताळताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम बाबतचे गैरसमज व त्याअनुषंगाने करावयाच्या उपायोजना, ईव्हीएम विषयी न्यायालयीन याचिका, न्यायनिवाडे, परिपत्रके, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मॉकपोल, व्हीव्हीपॅट, निवडणूक साहित्य वाटप, साहित्य ताब्यात घेताना घ्यावची काळजी आदी विषयाबद्दल माहिती दिली.
यावेळी राज्यातील विविध जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक प्रकियेत काम करताना आलेले अनुभव मांडले.
0000
News Title | EVM Process |  There is no human intervention in the process in EVM
:  Chief Electoral Officer Shrikant Deshpande

State Election Commission| मतदार नोंदणीच्या मोहिमेत महानगरपालिका आयुक्तांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार | मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

State Election Commission|  मतदार नोंदणीच्या मोहिमेत  महानगरपालिका आयुक्तांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार

| मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

State Election Commission | भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) निर्देशानुसार आता मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर आदी महानगरांमध्ये मतदार नोंदणीसाठी (Voter Registration) विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी कार्यगटामध्ये तेथील महानगरपालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मतदार नोंदणी तसेच मतदार यादी शुद्धीकरणासाठी चांगला लाभ होईल, असे मत अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Chief Élection Officer Shrikant Deshpande) यांनी व्यक्त केले. (State Election Commission)
‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम- २०२४ व इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी)’ या विषयावर यशदा येथे आयोजित महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेतील सत्रात मार्गदर्शन करताना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर आदी उपस्थित होते. (Lok Sabha election)
यावेळी श्री. देशपांडे म्हणाले, मोठ्या शहरातील मतदानाबाबतची उदासीनता कमी करण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोग गंभीर आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना या प्रक्रियेत सहभागी करुन घेतल्यास प्रभावी काम होईल. संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेत मतदार यादी शुद्धीकरण करत असताना कोणतेही शंकेला वाव राहू नये यासाठी प्रारूप मतदार याद्यांमधील नावे वगळणी, नवीन नावे समाविष्ट करणे आदीसंबंधाने हरकतीच्या अनुषंगाने प्रत्येक प्रकरणी योग्य कार्यपद्धतीने नोटीस देणे आणि त्यानंतर सुनावणी घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात यावा, असेही ते म्हणाले.
श्री. देशपांडे पुढे म्हणाले, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) संख्या कमी असलेल्या शहरी मतदार संघात बीएलओ नेमणुकीसाठी नागरी स्वराज्य संस्थासोबत समन्वयाने काम करावे. प्रत्यक्ष निवडणुक कामकाजासाठी मनुष्यबळाची कमतरता असलेल्या मतदारसंघासाठी नागरी स्वराज्य संस्था, केंद्रीय कार्यालये आदी कडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याबाबत पर्याय तपासून काम करावे.
आगामी निवडणूक वर्ष पाहता निवडणूक कामकाजासाठी आवश्यक बाबींची खरेदी, भाड्याने साधनसामग्री, सेवा घेणे आदी कामकाज वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे जेणेकरून ऐनवेळी अडचणी उद्भवणार नाहीत. त्यासाठी राज्यभरातील जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आदर्श अशी कार्यपद्धती उपयुक्त व्हावी म्हणून १३ प्रकारच्या ई- निविदांचे नमुने तयार करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले
यावेळी भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक श्री. अजमेरा म्हणाले, आता होणारे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण हे लोकसभा निवडणूक पूर्वी होणारे शेवटचे पुनरिक्षण असल्याने त्याला सर्वाधिक महत्व आहे. मतदार याद्या पूर्णतः शुद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आपल्या कामकाजावर भारत निवडणूक आयोगाचे बारकाईने लक्ष असून चांगल्या कामाची दखलही तातडीने घेतली जाते. पुणे जिल्हाधिकारी यांनी मतदार यादी शुद्धीकरण, नव मतदार नोंदणी साठी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट ईलेक्टोरल प्रॅक्टिसेस’ साठी पुरस्कार देत घेतल्याचे दिसून येते, अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी पुणे जिल्ह्यात नव युवा मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचा सहभाग घेत एकाच दिवशी ४४५ हून अधिक महाविद्यालयात विशेष मोहिम राबवून ४८ हजार पात्र विद्यार्थ्यांचे मतदार नोंदणी अर्ज घेण्यात आले असे सांगितले. असा उपक्रम इतर जिल्ह्यातही राबविण्याबाबत सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी यावेळी केल्या.
यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी श्री. पारकर यांनी निवडणूक आयोगाच्या नवीन सूचना, परिपत्रके यांची, तसेच लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने माहिती दिली. निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळाची नेमणूक, अतिसंवेदनशील (क्रिटिकल) मतदान केंद्रासह एकूणपैकी ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा करणे, मतदान केंद्राच्या आत व परिघाबाहेरील व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थेबाबत घ्यायची काळजी आदी अनुषंगाने श्री. पारकर यांनी माहिती दिली. उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहीम कार्यक्रमाची माहिती दिली. सर्व राजकीय पक्षांची बैठक घेणे, बीएलओंनी घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची पडताळणी करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण, मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रृटी दूर करणे आदींबाबत माहिती त्यांनी दिली.
यावेळी मुख्य निवडणूक कार्यालयातील स्वीप समन्वयक पल्लवी जाधव यांनी स्वीप उपक्रमाबाबत सादरीकरण करुन माहिती दिली. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब आदी समाजमाध्यमांचा मतदारजागृतीसाठी प्रभावी उपयोग कसा करता येईल आदींबाबत माहिती श्रीमती साधना गोरे यांनी दिली. प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार मिलिंद इंगळे यांच्याकडून निवडणूक विभागाचे ब्रँड गीत बनवून घेण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

– निवडणूक निविदा समिती अहवाल सादर

यावेळी सोलापूरचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या निवडणूक निविदा समितीने आपला अहवाल मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांना सादर केला. यावेळी समितीतील सदस्यांचा सत्कार श्री. देशपांडे यांच्याहस्ते करण्यात आला.
0000
News Title | State Election Commission  Municipal commissioners will be actively involved in the voter registration campaign
 |  Chief Electoral Officer Shrikant Deshpande