Retired Employees Notional Increment | 30 जूनला सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलै ची काल्पनिक वेतनवाढ | पुणे महापालिका मागवणार राज्य सरकारचे मार्गदर्शन

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे महाराष्ट्र

Retired Employees Notional Increment | 30 जूनला सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलै ची काल्पनिक वेतनवाढ | पुणे महापालिका मागवणार राज्य सरकारचे मार्गदर्शन

Retired Employees Increment | ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या (Retired Employees) किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ ( Notional Increment) विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन (Pension) निश्चित करण्याबाबत राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. याचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. मात्र वित्त विभागाच्या परिपत्रकात (Finance Department GR) राज्यातील महापालिकांचा उल्लेख नाही. त्यामुळे हे परिपत्रक पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) लागू करण्यासाठी महापालिका राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून मार्गदर्शन घेणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. (Retired Employees Increment)

३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा आता होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत  विविध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून निवेदने  संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागास प्राप्त होत आहेत. तसेच त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण व उच्च न्यायालयात उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक १८८१ / २०२३ व इतर याचिकांमध्ये मध्ये दि.१६.०२.२०२३ रोजी दिलेला निर्णय विचारात घेऊन आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार सरकारच्या वित्त विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
काय म्हटले आहे परिपत्रकात?

उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेले  आदेश विचारात घेऊन. जे राज्य शासकीय कर्मचारी दि. ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत व ज्यांनी मागील १२ महिन्यांची अर्हताकारी सेवा केलेली आहे अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दि.०१ जुलै रोजीची काल्पनिक (Notional) वेतनावाढ विचारात घेऊन, त्यांचे सेवानिवृत्तीवेतन सुधारीत करण्यासाठी संबंधित कार्यालयांकडे अर्ज करण्याबाबत सर्व संबंधित सेवानिवृत्तांना आवाहन करण्याबाबत, सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयातील विभागप्रमुखांना कळवावे. त्यानंतर याप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालयांनी वर नमूद केलेल्या मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या उपरोक्त आदेशात नमूद केल्यानुसार संबंधितांना सुधारीत सेवानिवृत्तीविषयक लाभ अनुज्ञेय करावेत. तसेच सदर लाभ सुधारीत करण्यात आल्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकाच्या मागील ३ वर्षांची थकबाकी अथवा त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक या पैकी जे कमी असेल तितकी थकबाकी देण्यात यावी. उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करीत असलेल्या कोणत्याही सेवानिवृत्ताचा अर्ज फेटाळण्यात येऊ नये. तसेच संबंधित कार्यालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे अशा प्रकरणांचा त्यांच्या स्तरावरच तपासणी करुन निपटारा करावा. उपरोक्त प्रमाणे कार्यवाही केल्यानंतर उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी त्यांच्या
दिनांक १६.०२.२०२३ रोजी च्या आदेशातील परिच्छेद क्रमांक ९ मध्ये नमूद केले आहे की, This notional inclusion of the annual increment would be considered for re-calculating their pension, gratuity, earned leave, commutation of pension benefits etc. तरी त्याप्रमाणे अर्जदारास लाभ अनुज्ञेय करण्यात यावे.
उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या उपरोक्त निर्णयाचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

महापालिकांचा उल्लेख नाही

दरम्यान हे परिपत्रक वित्त विभागाने सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी केले आहे. राज्यातील महापालिकांचा यात उल्लेख नाही. याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता सांगण्यात आले कि, पुणे महापालिकेत यावर अंमल करण्यासाठी नगर विकास विभागाच्या आदेशाची वाट पाहावी लागेल किंवा महापालिकेला नगर विकास कडून मार्गदर्शन मागवावे लागेल. त्यानुसार मार्गदर्शन मागवण्याची तयारी सुरु केली आहे. असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
News Title | Notional pay hike on July 1 for employees retiring on June 30 |  Pune Municipal Corporation will seek guidance from the state government

One Day Salary | सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला जाणार

Categories
Breaking News Commerce social महाराष्ट्र शेती

One Day Salary | सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला जाणार

| पावसाच्या स्थितीमुळे नागरिकांच्या मदतीसाठी पगार मुख्यममंत्री सहायता निधीत द्यावा लागणार

One Day Salary | अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या (Affected Farmers) मदतीकरीता राज्य शासनाकडून (State Government) मदतकार्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीस (Natural Calamities) सामोरे जाण्यासाठी सहाय्य आणि मदत व पुनर्वसनाच्या कामास आपलाही हातभार लागावा म्हणून राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व. से व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांचा सहभाग असावा या कर्तव्यबुध्दीने त्यांना माहे जून, २०२३ च्या आपल्या वेतनातील प्रत्येकी १ दिवसाचे वेतन (One Day Salary) मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये (CM Relief Fund) देण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार सर्वांना हे वेतन द्यावे लागणार आहे. राज्य सरकारने नुकतेच याबाबतचे आदेश लागू केले आहेत. (One Day Salary)

राज्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत, आपत्तीग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत महासंघाशी संलग्न सर्व विभागातील अधिकारी देखील कर्तव्यभावनेने एक दिवसाचा पगार या मदतकार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यास इच्छुक असल्याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दि. १९ एप्रिल, २०२३ रोजीच्या पत्रान्वये शासनाला कळविले आहे. राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सदर मदतकार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून  अधिक रक्कम देता यावी यास्तव राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से व अन्य अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून एक दिवसाचे एकूण वेतनाइतकी रक्कम माहेजून, २०२३ च्या वेतनातून वसूल करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे. (One Day Salary News)

आदेशात म्हटले आहे कि, राज्य शासनातील सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका/ नगरपरिषद, सार्वजनिक उपक्रमे, महामंडळे, मंडळे तसेच सर्व स्वायत्त संस्थेचे विभागप्रमुख/कार्यालय प्रमुख यांनी सदर परिपत्रक आपल्या विभागातील/कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे व त्यांना याबाबत समजावून सांगावे. तसेच एक दिवसाच्या वेतन कपातीस त्यांची अनुमती यासोबतच्या विहित अनुमती पत्रात स्वाक्षांकित करुन आपल्या विभागातील/कार्यालयातील रोख कार्यासन वा रोखपाल यांचेकडे सुपूर्द करण्यासाठी त्यांना सूचित करावे. अधिकारी यांच्या पगारातून एक दिवसाचे वेतन (माहे जून, २०२३) कपातीसाठी व ती रक्कम मुख्यमंत्री
सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी व त्याचा हिशोब सादर करण्यासाठी खालील कार्यपध्दतीचा आखून देण्यात आली आहे. (State Government GR)

आदेशात पुढे म्हटले आहे कि, माहे जून, २०२३ या महिन्याचे वेतन देयके संपूर्ण रकमेचे काढण्यात यावे. तथापि, वेतनातील नियमित वजातीनंतर व एकदिवसाच्या वेतनाच्या वजातीनंतर वेतनाची उर्वरीत रक्कम संबंधित अधिकारी यांना धनादेश/रोखीने/विहित पध्दतीने अदा करण्यात यावी. सध्या ज्या अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन त्यांनी शासनास उपलब्ध करुन दिलेल्या त्यांच्या बँक खात्याच्या तपशिलानुसार खात्यावर परस्पर जमा करण्यात येते अशा अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतनातील नियमित वजातीनंतर उर्वरित वेतनाची रक्कम संबंधित बँकेकडे जमा करण्यापूर्वी सदर रकमेतूनजून, २०२३ मधील वेतनातून १ दिवसाचे वेतन कमी करुन शिल्लक रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे कळविण्यात यावे. (All government Employees)

१ दिवसाचे वेतन कपात करताना ते मूळ वेतन+महागाई भत्ता यांच्या एकूण रकमेच्या आधारे गणना करुन कपात करण्यात यावे. असे आदेशात म्हटले आहे. (One Day Salary Marathi News)
———-
News Title | One day salary of all government employees and officials will be deducted