Swatantra Veer Savarkar | Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकरांना अभिवादन

Categories
Breaking News cultural social पुणे

Swatantra Veer Savarkar | Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकरांना अभिवादन

 

Swatantra Veer Savarkar | स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या 59 व्या पुण्यतिथीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Fergusson College Pune) वसतिगृहातील त्यांचे वास्तव्य असणाऱ्या खोलीत अभिवादनासाठी नागरिकांची रीघ लागली होती.

डीईएसचे माजी अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्रबंधिका डॉ. सविता केळकर, संचालक मिलिंद कांबळे, अनिल भोसले, प्रा. प्राजक्ता प्रधान, प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, डॉ. प्रकाश पवार, प्रा. सुभाष शेंडे, प्रा. नारायण कुलकर्णी, डॉ. आनंद काटिकर, श्रध्दा कानेटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रवास या खोलीत चित्रबद्ध करण्यात आला होता. पुणे विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठाची डी. लिट. पदवी स्वीकारताना सावरकरांनी परिधान केलेला झगे आणि त्यांच्या वापरातील विविध वस्तू आकर्षण ठरत होत्या.

फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना 1902 ते 1905 या कालावधीत सावरकर या वसतिगृहात वास्तव्यास होते.

Veer Savarkar | Dilip Vede Patil |  सावरकर सर्वांनी आत्मसात करून अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकारावे | शरद पोंक्षे

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Veer Savarkar | Dilip Vede Patil |  सावरकर सर्वांनी आत्मसात करून अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकारावे | शरद पोंक्षे

Veer Savarkar | Dilip Vede Patil | स्वा.सावरकरांनी १३ डिसेंबर १९५३ रोजी पुण्याच्या रमणबाग (Ramanbaugh Pune) आवारात धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर या विषयावरच्या प्रसिद्ध व प्रभावी भाषणास ७० वर्षे पूर्ण झाली. याचे औचित्य साधून दिलीप वेडेपाटील फाऊंडेशन, बावधन आणि स्वा.सावरकर प्रेमी मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, १३ डिसेंबर रोजी सायं. ६:०० वा अभिनेते शरद पोंक्षे यांचा “हिंदुहृदयसम्राट स्वा.सावरकरांचा द्रष्टेपणा” या विषयावरील व्याख्यानाचा कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, स्वामी विवेकानंद ई लर्निंग स्कूल, एलएमडी चौक, बावधन खुर्द, पुणे २१ येथे आयोजित करण्यात आला होता. (Pune News)
 या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धीरज घाटे शहराध्यक्ष, पुणे – भारतीय जनता पार्टी, मा.डॉ.श्रद्धाताई प्रभुणे, नगरसेविका – पुणे मनपा,  मा.श्री. संजयजी चोरडिया, अध्यक्ष – सूर्यादत्ता एज्युकेशन फाऊंडेशन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाग संचालक मा.श्री.अनिलजी व्यास, मा.श्री.सहस्रबुद्धे तसेच स्वा.सावरकर प्रेमी मंडळ, पुणे यांचे पदाधिकारी व सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वक्ते आणि सावरकर प्रेमी श्री.शरद पोंक्षे यांनी त्यांच्या व्याख्यानात – सावरकरांचा द्रष्टेपणा या विषयाची मांडणी केली. या मध्ये अखंड हिंदुस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेविषयीचा पुरोगामी दृष्टीकोन, अंदमान मध्ये स्वतंत्र भारताचे सामरिक युद्ध केंद्र उभारणी, जातिवाद निर्मुलनाबाबातचे त्यांचे अनेक प्रयत्न – पतितपावन मंदिराची उभारणी, सहभोजनाचे कार्यक्रम, दीनदलितांच्या मुंजी करून त्यांना वेदांचे अध्ययन – पठण करण्याचा अधिकार बहाल करणे. अश्या गोष्टी घडवून आणल्या त्याबाबतचे ज्वलंत अनुभव सांगितले. सावरकरांचे हिंदुत्व आणि हिंदू धर्म म्हणजे सर्व मानवजातीचा मनुष्य म्हणून स्वीकार करून प्रत्येकाशी माणुसकीने वागणे होय. देशाच्या सुरक्षा तुकडीत काम करणारा प्रत्येक जण हा आर्थिक दृष्ट्या सर्वांत सक्षम असला पाहिजे मग तो सैनिक असो वा पोलीस. एकूणच सावरकरांचे प्रत्येक बाबतीतले विचार हे अतिशय आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोनाची कास धरून देशाची एकात्मता आणि एकसंधता टिकून राहून विकास साधणे असे आहेत. असे सावरकर सर्वांनी आत्मसात करून अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकारावे असे विचार त्यांनी व्याख्यानातून मांडले.

Bandra-Versova sea Link | वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Bandra-Versova sea  Link | वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार देणार -मुख्यमंत्री

Bandra-Versova sea  Link | स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला (Bandra-Versova sea link) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू’ (Swatantra Verr Savarkar Bandrs-Versova Sagari Setu) असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ (Swatantra veer Savarkar Shourya Purskar) प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. (Bandra-Versova sea link)
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantra veer Vinayak Damodar Savarkar) यांच्या  १४० व्या जयंतीनिमित्त (Savarkar Jayanti) राज्यात ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ (Swatantra veer Gaurav Din) साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘शतजन्म शोधिताना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. (Vinayak Damodar Savarkar)
यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, सावरकर स्मारक चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आदी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चौरे आदी उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक मुंबई आणि महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाड निर्मित हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सादर करण्यात आला.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आज प्रथमच साजरी करण्यात आली. त्याचप्रामणे आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले, ही अभिमानास्पद बाब आहे. त्या ऐतिहासिक सोहळ्याचे व क्षणांचे साक्षीदार होता आले. लोकशाहीच्या पवित्र मंदिराची, नव्या संसद भवनाची वास्तू स्थापना व लोकार्पण विक्रमी वेळेत झाले आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीरांचे श्रेष्ठत्व, त्याग, बलिदान, देशभक्ती ही सर्वश्रुत आहे. या देशाचे, राज्याचे व मातीचे सुदैव स्वा. सावरकर यांच्यासारखे क्रांतिकारक येथे जन्माला आले. प्रखर देशभक्तीमुळे त्यांची इंग्रजांमध्ये दहशत होती. संपूर्ण सावरकर समजून घेणं अशक्य व अवघड आहे, परंतु त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास हिंदुत्वाचा सुगंध आपल्याला नक्कीच येईल. स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते, महान क्रांतिकारक, सक्रिय समाजसुधारक असे विविधांगाने त्यांची ओळख होती. ते प्रतिभावंत साहित्यिक, कवी होते तसेच अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते आणि भाषिक गुलामगिरी दूर करण्यासाठी इंग्रजीला त्यांनी अनेक पर्यायी शब्द उपलब्ध करून दिले, असे म्हणून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वा. सावरकरांना अभिवादन केले.
पालकमंत्री श्री केसरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करीत त्यांनी स्वातंत्र्याची जाज्वल्य ज्योत पेटविल्याचे सांगितले. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी अमूल्य योगदान दिल्याचे सांगून विविध इंग्रजी शब्दांना त्यांनी मराठी पर्यायी शब्द उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले. मातृभाषेतून शिक्षण या त्यांच्या विचारांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राधान्याने समावेश केल्याचे त्यांनी सांगितले. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सेल्युलर जेलमध्ये मुंबईकरांच्या वतीने आज ‘सागरा प्राण तळमळला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून सावरकरांच्या स्मृती राज्यभर जपल्या जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रधान सचिव श्री खारगे यांनी प्रास्ताविकाद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. पारतंत्र्यात देशाचा निरुत्साही इतिहास लिहिला गेला, तो प्रेरणादायी कसा होता ते सावरकरांनी लिहिले असल्याचा त्यांनी उल्लेख केला. सावरकरांना अनेक उपाध्या मिळाल्या असून लोकांनी त्या उत्स्फूर्तपणे दिल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून दरवर्षी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगून यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध आठ ठिकाणी महानाट्य सादर होत असून इतरही विभागांमार्फत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रारंभी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरूवात राज्यगीताने करण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
00000
News Title | Bandra-Versova sea route to be named after Swatantra Veer Savarkar  Chief Minister Eknath Shinde’s announcement

Pune Hindi News | Savarkar Jayanti | पुणे के फर्ग्यूसन कॉलेज में स्वातंत्र्यवीर सावरकर का कमरा कैसा है?  जान लो 

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र हिंदी खबरे

Pune Hindi News | Savarkar Jayanti | पुणे के फर्ग्यूसन कॉलेज में स्वातंत्र्यवीर सावरकर का कमरा कैसा है?  जान लो

 |  सावरकर के दर्शन के लिए उमड़ी भीड़

Pune Hindi News | Savarkar Jayanti |  स्वातंत्रवीर वि दा  सावरकर (Swatantra veer Savarkar) के निवास स्थान फर्ग्यूसन कॉलेज (Fergusson College) का छात्रावास कक्ष आज सावरकर जयंती के अवसर पर दर्शन के लिए खुला रखा गया।  बड़ी संख्या में सावरकर प्रेमियों ने दर्शन किए और श्रद्धासुमन अर्पित किए।  (Pune Hindi News: Savarkar Jayanti)
 डेक्कन एजुकेशन सोसाइटी ( Deccan Education Society) के गवर्निंग बोर्ड के अध्यक्ष डॉ.  डॉ शरद कुंटे ने सुबह 9 बजे सावरकर की प्रतिमा पर माल्यार्पण किया।  पूर्व सांसद प्रदीप रावत, महेश अठावले, प्रो.  धनंजय कुलकर्णी, डॉ.  सविता केलकर, मिलिंद कांबले, शाहिर हेमंत मालवे प्रमुख रूप से मौजूद थे।  ( vinayak Damodar Savarkar)
 1902 से 1906 की अवधि के दौरान, सावंतरी वीर सावरकर लड़कों के छात्रावास नंबर 1 के कमरा नंबर 17 में रहते थे, जब वे फर्ग्यूसन कॉलेज में छात्र थे।  उनके उपयोग की विभिन्न वस्तुओं को इस स्थान पर संरक्षित किया गया है।  ( Swatantra veer Savarkar News)
—-
News Title | Pune Hindi News | Savarkar Jayanti What is the room of Swatantra Veer Savarkar in Fergusson College, Pune? get to know

Swatantra Veer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य, भारतीय इतिहासातील योगदान, त्यांची पुस्तके, साहित्य याविषयी सविस्तर माहिती करून घ्या 

Categories
Uncategorized

Swatantra Veer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य, भारतीय इतिहासातील योगदान, त्यांची पुस्तके, साहित्य याविषयी सविस्तर माहिती करून घ्या

| स्वातंत्र्यवीर सावरकर: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक दूरदर्शी नेता

Swatantra Veer Savarkar | भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचा उदय झाला ज्यांनी ब्रिटीश  राजवटीपासून देशाला मुक्त करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले.  असेच एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व म्हणजे वीर सावरकर. एक क्रांतिकारी विचारवंत, कवी, लेखक आणि राजकीय नेते.  भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सावरकरांचे योगदान मोठे आहे आणि त्यांच्या कल्पना आधुनिक भारताच्या सामाजिक-राजकीय परिदृश्याला आकार देत आहेत.  या लेखामध्ये, आम्ही स्वतंत्र वीर सावरकरांचे जीवन, कल्पना आणि प्रभाव यांचा सखोल अभ्यास उपलब्ध करून देत आहोत. (Swatantra Veer Savarkar)
 प्रारंभिक जीवन आणि शिक्षण:
 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिकजवळील भगूर गावात जन्मलेले विनायक दामोदर सावरकर, ज्यांना वीर सावरकर म्हणून ओळखले जाते, त्यांनी लहानपणापासूनच अलौकिक बुद्धी आणि देशभक्ती दाखवली.  त्यांचे शिक्षण त्यांना पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात घेऊन गेले, जिथे त्यांनी विद्यार्थी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आणि सामाजिक आणि राजकीय समस्यांकडे त्यांचा कल दर्शविला.
 क्रांतिकारी विचारधारा आणि राष्ट्रवाद: (Revolutionary Ideology and Nationalism) 
 सावरकरांची क्रांतिकारी विचारधारा हिंदुत्वाच्या संकल्पनेत खोलवर रुजलेली होती, जी त्यांनी हिंदू अस्मिता आणि संस्कृतीचे सार म्हणून परिभाषित केली होती.  त्यांनी हिंदूंचे एकीकरण आणि हिंदु राष्ट्र (राष्ट्र) स्थापन करण्यासाठी वकिली केली, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या वारशाचा अभिमान वाटेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये सक्रियपणे योगदान दिले जाईल.
 “भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध” या त्यांच्या 1909 च्या पुस्तकात ब्रिटिश राजवटीविरुद्ध 1857 च्या उठावाचे सर्वसमावेशक वर्णन सादर केले आहे, ज्यात वसाहतवादी दडपशाहीविरुद्ध सशस्त्र प्रतिकार करण्याची गरज आहे.  सावरकरांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्यक्ष कृती आणि लढाईचा वापर करण्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या मार्गावर चालणाऱ्या क्रांतिकारकांच्या पिढीला प्रेरणा दिली.
 तुरुंगवास आणि कसोटी: 
 स्वातंत्र्यासाठी सावरकरांच्या अतूट समर्पणामुळे 1909 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. ब्रिटीश राजवटीविरुद्ध क्रांतिकारक कार्यात सहभागी झाल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला.  प्रथम भारतात आणि नंतर अंदमान आणि निकोबार बेटांमधील सेल्युलर जेलमध्ये त्यांनी अनेक वर्षे तुरुंगवास सहन केला.  त्यांना झालेल्या क्रूर वागणुकीनंतरही, सावरकरांचा आत्मा अखंड राहिला आणि त्यांनी प्रतिकार आणि राष्ट्रवादाच्या भावनांचा प्रतिध्वनी करणार्‍या कविता लिहिल्या आणि लिहिल्या.
 सामाजिक सुधारणांचे वकील: (Advocate for social reform ) 
 स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच वीर सावरकरांनी भारतीय समाजात सामाजिक सुधारणांच्या गरजेवर भर दिला.  त्यांनी जाती-आधारित भेदभावाचा निषेध केला, महिला सक्षमीकरणाला चालना दिली आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी आवाहन केले.  सावरकरांनी सामाजिक समतेचे महत्त्व ओळखले आणि त्यांचा असा विश्वास होता की या अंतर्गत आव्हानांना तोंड देऊनच एक मजबूत आणि अखंड भारत मिळू शकतो.
 वारसा आणि प्रभाव: (Legacy and impact) 
 वीर सावरकरांचा वारसा भारतीयांच्या पिढ्यांना प्रेरणा देत आहे.  स्वराज्य, सशस्त्र प्रतिकार आणि हिंदू अस्मितेच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी केलेल्या वकिलीचा स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय प्रवचनावर खोलवर परिणाम झाला.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सारख्या संघटनांच्या नेतृत्वाखालील हिंदू राष्ट्रवादी चळवळीने सावरकरांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेतली आणि देशातील उजव्या विचारसरणीच्या वाढीस हातभार लावला.
 शिवाय, एक विपुल लेखक आणि कवी म्हणून सावरकरांच्या योगदानाने भारतीय साहित्यावर अमिट छाप सोडली.  त्यांच्या रचनांमधून राष्ट्राप्रती असलेले त्यांचे नितांत प्रेम आणि प्रतिकूल परिस्थितीतही त्यांची अखंड भावना दिसून येते.
  सावरकरांच्या विचारांनी आणि कृतींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला आणि त्यानंतरच्या राष्ट्राच्या रूपात उत्क्रांती घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.  हिंदुत्वाच्या तत्त्वांवर आधारित सशक्त, अखंड भारताची त्यांची दृष्टी आजही अनेकांच्या मनात गुंजत आहे.  सावरकरांचा वारसा हा वादाचा आणि विवेचनाचा विषय राहिला असला तरी, स्वातंत्र्यसैनिक, लेखक आणि समाजसुधारक म्हणून त्यांची भूमिका भारताच्या ऐतिहासिक जडणघडणीचा अविभाज्य भाग आहे.  जसे वीर आठवतात
वीर सावरकर हे केवळ स्वातंत्र्यसैनिक आणि राजकीय नेते नव्हते तर ते एक विपुल लेखक देखील होते.  त्यांनी आयुष्यभर अनेक पुस्तके आणि पत्रके लिहिली, ज्यांनी त्यांच्या विचारधारेला आकार देण्यात आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रभावित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.  त्याच्या काही उल्लेखनीय कामांचा समावेश आहे:
 “भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध” (1909):
 या पुस्तकात, सावरकरांनी ब्रिटीश वसाहतवादी राजवटीविरुद्ध 1857 च्या उठावाचे सर्वसमावेशक वर्णन दिले आहे, ज्याला भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध किंवा सिपाही विद्रोह म्हणून संबोधले जाते.  सावरकर भारतीय स्वातंत्र्यसैनिकांच्या वीर प्रयत्नांवर प्रकाश टाकतात आणि ब्रिटीश दडपशाहीविरुद्ध सशस्त्र प्रतिकार करण्याच्या गरजेवर भर देतात.  हे पुस्तक एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून काम करते जे स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानांवर प्रकाश टाकते.
 “हिंदुत्व: हिंदू कोण आहे?”  (१९२३):
 कदाचित सावरकरांच्या सर्वात प्रभावशाली कार्यांपैकी एक, “हिंदुत्व: हिंदू कोण आहे?”  हिंदुत्वाची संकल्पना आणि भारतीय समाजातील त्याचे महत्त्व स्पष्ट करते.  या पुस्तकात, त्यांनी हिंदू अस्मितेची कल्पना शोधून काढली आहे आणि त्यात भारताला आपली पवित्र भूमी आणि मातृभूमी मानणाऱ्या सर्व व्यक्तींचा समावेश आहे.  सावरकरांचे म्हणणे आहे की हिंदुत्व हे केवळ धार्मिक श्रद्धांपुरते मर्यादित नाही तर त्यात सांस्कृतिक, भाषिक आणि ऐतिहासिक पैलूंचा समावेश आहे जे राष्ट्राला एकत्र बांधतात.
 “भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने” (1907):
 या पुस्तकात सावरकरांनी भारतीय इतिहासातील वैदिक कालखंड, मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य, राजपूत कालखंड, मुस्लिम राजवट आणि मराठा साम्राज्य या सहा महत्त्वाच्या कालखंडांचा सर्वसमावेशक लेखाजोखा मांडला आहे.  त्यांनी या कालखंडातील भारतीय सभ्यतेचे योगदान आणि उपलब्धी अधोरेखित केली आणि जनतेमध्ये भारताच्या समृद्ध वारशाचा अभिमान आणि जागरूकता वाढवली.
 “माझी जन्मठेप” (1909):
 अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील सेल्युलर जेलमध्ये तुरुंगात असताना लिहिलेले “माझी जन्मठेप” हे सावरकरांचे क्रांतिकारक आणि राजकीय कैदी म्हणून आलेल्या अनुभवांचे आत्मचरित्र आहे.  हे पुस्तक सावरकर आणि त्यांच्या सहकारी कैद्यांनी सहन केलेल्या कष्टांबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करते, ज्याने वसाहतवादी जुलूमविरुद्ध त्यांच्या संघर्षाला चिन्हांकित केले त्या लवचिकता आणि अदम्य आत्म्यावर प्रकाश टाकला.
 या महत्त्वपूर्ण कार्यांव्यतिरिक्त, सावरकरांनी सामाजिक सुधारणा, महिला सक्षमीकरण आणि भाषिक राष्ट्रवाद यासह विविध विषयांवर विपुल लेखन केले.  भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या राष्ट्रवाद्यांच्या पिढीला जनमत एकत्रित करण्यात आणि प्रेरणा देण्यात त्यांच्या लेखनाने महत्त्वाची भूमिका बजावली.
 सावरकरांची पुस्तके समकालीन काळात मोठ्या प्रमाणावर वाचली जातात आणि त्यावर चर्चा होत आहे.  स्वातंत्र्यलढ्यादरम्यान त्यांची विचारधारा आणि भारतातील व्यापक सामाजिक-राजकीय परिदृश्य समजून घेण्यासाठी ते महत्त्वाचे स्त्रोत आहेत.  आधुनिक भारतातील बौद्धिक प्रवचन आणि राजकीय विचारधारा यांना आकार देत त्यांच्या लेखनाचा प्रभाव त्यांच्या काळाच्या पलीकडे पसरलेला आहे.
 —
News Title |Swatantra Veer Savarkar | Get detailed information about the work of Swatantra Veer Savarkar, his contribution to Indian history, his books, literature