PMPML | पीएमपीएमएल बसेस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 300 ऐवजी 500 रुपयाचा दंड | १० मार्च पासून होणार कार्यवाही.

Categories
Uncategorized

पीएमपीएमएल बसेस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 300 ऐवजी 500 रुपयाचा दंड 

१० मार्च  पासून होणार कार्यवाही.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये दंडात्मक कारवाई करण्याच्या तरतुदीस अनुसरून रक्कम रु. ३००/- दंड वसूल करण्यात येतो. तसेच प्रवाशांनी कोणत्याह
ी प्रकारच्या सवलतीच्या प्रवासी पासमध्ये खाडाखोड, दुरुपयोग अशा प्रकारे गैरप्रकारे जे प्रवासी पासचा गैरवापर करून प्रवास करताना आढळल्यास त्या प्रवाशांकडून रक्कम रु. ५००/- दंड वसूल करण्यात येतो.

 

दिनांक १०/०३/२०२३ पासून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आळा व महामंडळाचे आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रक्कम रु. ३००/- ऐवजी रक्कम रु.५००/- इतका दंड आकारणी करण्यास संचालक मंडळाने दिनांक १६/०२/२०२३ रोजी मान्यता दिली असून विनातिकीट प्रवासी रक्कम रु.५००/-  दंड आकारणी दिनांक १०/०३/२०२३ पासून करण्यात येणार आहे.

| प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेस पीएमपीएमएलच्या ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत बस प्रवास.

 

 

​जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांना मोफत प्रवास देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने दि. ०६/०३/२०१९ रोजी मा. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दर महिन्याच्या ८ तारखेस महिलांना तेजस्विनी बसमध्ये मोफत बस प्रवास करू देण्यास मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने परिवहन महामंडळामार्फत खास महिलांसाठी २३ मार्गावर २८ तेजस्विनी बसेस सुरू करण्यात आल्या होत्या तथापि, कोविड – १९ मुळे महिला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याने सदरच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या.

​सध्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्याने व सर्व मार्गावर पूर्ण क्षमतेने बस संचलन सुरू करण्यात आल्याने महिला तेजस्विनी बसेस पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेल्या आहेत. सध्या प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेस ‘तेजस्विनी’ बस मधून मोफत प्रवास सेवा हि दि. ८ मार्च २०२३ पासून पूर्ववत करण्यात येत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त तेजस्विनी बसेस मधून महिलांनी मोफत प्रवास करण्याचे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.