Training | PMC Pune | नवनियुक्त सहायक अतिक्रमण निरीक्षकांना प्रशिक्षण अनिवार्य | अन्यथा शिस्तभंगाची कारवाई

Categories
Breaking News PMC पुणे

नवनियुक्त सहायक अतिक्रमण निरीक्षकांना प्रशिक्षण अनिवार्य

| अन्यथा शिस्तभंगाची कारवाई 
पुणे | महापालिका प्रशासनाकडून नुकतीच भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये 97 सहायक अतिक्रमण निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाचे कामकाज गतिमान करण्यासाठी या निरीक्षकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जे लोक प्रशिक्षणाला येणार नाहीत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिला आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी सक्षम प्रशासन व सक्षम कार्यप्रणाली निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेतील नवनियुक्त सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक संवर्गातील कर्मचा-यांना त्यांच्या कामकाजासंबंधित विविध विषयांचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पुणे म.न.पा प्रशिक्षण प्रबोधिनी मार्फत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक संवर्गातील कर्मचा-यांना  प्रशिक्षण पुणे महापालिकेतील श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (Old G.B. hall) येथे आयोजित करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार
१. प्रशिक्षणाकरीता निवडलेले सेवक यांचेकरीता सदर ३ दिवसीय प्रशिक्षण सक्तीचे आहे.
२. संबंधित सर्व प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षणाचे ठिकाणी प्रशिक्षण वेळेच्या १५ मिनिटे आगोदर उपस्थित रहावयाचे आहे. उशीरा येणा-या प्रशिक्षणार्थींना प्रवेश दिला जाणार नाही.
3. सर्व प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षणास पूर्ण दिवस प्रशिक्षणास उपस्थित रहावे.
४.संबंधित खातेप्रमुख यांनी वरील प्रशिक्षणार्थी सेवकांना प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहण्यासाठी ०८ ते १०मार्च २०२३ या दोन दिवसांसाठी कार्यमुक्त करावे.
५. जे सेवक प्रशिक्षणास उपस्थित रहाणार नाहीत त्यांना गैरहजर समजून पुढील शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

Traffic School | PMC Pune | पुणे महापालिकेच्या वाहतूक पाठशाळेत १७०० मुलांना प्रशिक्षण |महापालिका पथ विभागाची माहिती

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे महापालिकेच्या वाहतूक पाठशाळेत १७०० मुलांना प्रशिक्षण

|महापालिका पथ विभागाची माहिती

पुणे महानरपालिकेच्या मुलांची वाहतूक पाठशाळा या ठिकाणी गेल्या तीन महिन्यात सुमारे १७०० मुलांना प्रशिक्षण देणेत आले आहे. सेफ किड्स या स्वयंसेवी संस्थेमार्फत या ठिकाणी प्रशिक्षण देणेची जबाबदारी घेतली आहे.

पुणे शिक्षण मंडळाच्या प्राथमिक वर्गातील विविध शाळेतील मुलांना वाहतुकीचे नियमांचे प्रशिक्षण मिळावे यासाठी शिक्षण मंडळ व पी.एम.पी.एम.एल अधिकारी यांची समन्वय बैठक घेतली. त्यानुसार पी.एम.पी. एम.एल यांचेमार्फत दोन मिनी बस उपलब्ध करून देणेत आली असून, शिक्षण मंडळाने प्राथमिक शाळेतील २५ मुलांचे तीन ग्रुप प्रत्येक दिवशी पार्कला भेट देतील असे नियोजन केले आहे. २२ सप्टेंबर २२ पासून तीन ग्रुप भेट देने चालू केले असून, म.न.पा मधील शाळेतील मुलांना प्रशिक्षणाचा फायदा होईल. शहरातील वाहतुकीचे नियम पाळणेसाठी उपयोग होईल.

केंद्र शासनाचे minister of housing and urban affairs यांचे मार्फत दोन दिवसांचे ( २२ व २३ सप्टेंबर २२)अर्बन ९५ या प्रकल्पअंतर्गत PEER LEARNING Workshop आयोजन केले होते. त्यासाठी देशातील १० शहरातील अधिकारी व अभियंता उपस्थित होते. पुणे महानगरपालकेच्या अर्बन ९५ अंतर्गत केलेल्या कामामुळे सर्व उपस्थित शहरांना मार्ग दर्शन मिळेल व प्रकल्पाची पाहणी करता येईल यासाठी पुणे येथे या वर्कशॉपचे नियोजन केले होते. त्यामध्ये विविध प्रकल्पांना भेट दिली, त्यामध्ये मुलांची वाहतूक पाठशाळा प्रकल्प सर्वांस आवडला. सर्व शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता, त्यांचे शहरामध्ये त्याची उभारणी करणेसाठी त्यांनी माहिती घेतली.

Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण

Categories
Breaking News social आरोग्य पुणे महाराष्ट्र

छद्मविज्ञानाच्या पराभवासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आवश्यक

– मच्छिन्द्रनाथ मुंडे यांचे प्रतिपादन

– महाराष्ट्र अंनिसचे चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण

पुणे : विज्ञानाचा आधार असल्याचे सांगून अनेक गोष्टी लोकांवर बिंबविल्या जातात. मात्र त्याला विज्ञानाचा आधार नसून ते छद्मविज्ञान असते. छद्मविज्ञानाचा पराभव करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी मच्छिन्द्रनाथ मुंडे यांनी व्यक्त केले.

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने ‘चमत्कार प्रशिक्षण’ आयोजित केले होते. प्रशिक्षणप्रसंगी मुंडे बोलत होते. कागदात असलेले तथाकथित भूत जाळून चमत्कार प्रशिक्षणाचे उदघाटन महाराष्ट्र अंनिसच्या विज्ञान बोध वाहिनीचे राज्य कार्यवाह भास्कर सदाकळे यांनी केले. राज्य पदाधिकारी विशाल विमल यांनी प्रशिक्षणाचा समारोप केला. प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सदाकळे यांनी चमत्कारांचे सादरीकरण अत्यंत रंजकपद्धतीने करून दाखविले. चमत्कारामागील वैज्ञानिक कारणे, हातचलाखी, रासायनिक घटकांचा वापर, सादरीकरणातील सफाईदारपणा मुंडे यांनी सांगितला.

डोळ्यांवर कापड बांधूनही वाचता येणे अर्थात ‘मिडब्रेन’, ‘ग्रहणात शिजवलेल्या अन्नावर अनिष्ट परिणाम होतो’, ‘चुंबकांच्या वापराने कर्करोग, मधुमेह कसा समूळ बरा होतो’ असे चमत्काराचे दावे करून छद्मविज्ञान बिबवले जात आहे. मात्र विज्ञानाच्या चष्म्यातून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केल्यास छद्मविज्ञान खोटे पडते, असे मुंडे यांनी सांगितले.

आजूबाजूला लहान घडलेली घटना ही दुसऱ्यापर्यंत पोहोचताना मोठ्या स्वरूपात सांगितली जाते. त्यामुळे चुकीची माहिती व गैरसमज पसरतात. लहान बुवाबाजी करणारा ढोंगीबाबा असेल तर त्याला मोठे करण्याचे काम काही जण करत असतात. चमत्काराला नमस्कार करून लोक फसतात आणि त्यातून आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण सुरू होते. त्यामुळे चमत्कारी गोष्टीना विरोध करून वास्तविक गोष्टीची कास धरण्याची गरज आहे, असे मत भास्कर सदाकळे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंनिसच्या थॉट विथ ऍक्शन जर्नलचे संपादक हर्षदकुमार मुंगे यांनी प्रास्ताविक केले. शाखा सचिव घनश्याम येणगे, शाखा सहसचिव अरिहंत अनामिका यांनी सुत्रसंचलन केले. माधुरी गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मयूर पटारे, वनिता फाळके, विनोद खरटमोल यांनी गाणी सादर केली. ओंकार बोनाईत आणि सागर तुपे यांनी मनोगत व्यक्त केले. सोशल मीडिया विभागाचे राज्य सहकार्यवाह रविराज थोरात यांनी आभार व्यक्त केले.