Transfer | PMC | आणखी 646 सेवकांच्या होणार बदल्या! | प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, लिपिकांचा समावेश

Categories
Uncategorized

आणखी 646 सेवकांच्या होणार बदल्या!

| प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, लिपिकांचा समावेश

पुणे | महापालिका प्रशासनाने बदल्या करण्याची बाब गंभीरपूर्वक घेतली आहे. नुकतेच 132 कनिष्ठ अभियंता यांच्या बदल्या केल्यानंतर अजून 646 सेवकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, लिपिकांचा समावेश आहे.  यानियतकालिक बदल्यांची तसेच पदस्थापनेची कार्यवाही 17 एप्रिल ला केली जाणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील ज्या सेवकांची एकाच खात्यात तीन वर्षे अगर त्यापेक्षा जास्त सेवा झाली आहे, अशा सेवकांच्या अन्य खात्यात बदल्या कराव्या लागतात. खात्याच्या एकूण पदांपैकी
दरवर्षी जास्तीत जास्त २०% अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या कराव्यात, अशा बदल्या करणेविषयीच्या धोरणानुसार  ३१/०३/२०२३ अखेर एकाच खात्यात तीन वर्षे अगर त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या लेखनिक संवर्गातील प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक या पदावरील सेवकांची नियतकालिक बदल्या तसेच लेखनिक संवर्गातील उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक व अभियांत्रिकी संवर्गातील शाखा अभियंता या पदाच्या पदस्थापना करण्याची कार्यवाही अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांचे अध्यक्षतेखाली प्रस्तावित केलेली आहे.

या  नियतकालिक बदल्या व पदस्थापना करण्याची कार्यवाही सोमवार, १७/०४/२०२३ रोजी जुना जी.बी. हॉल, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, तिसरा मजला, येथे होणार आहे.
– हे आहेत सेवक
शाखा अभियंता – 18 – पदस्थापना कार्यवाही
प्रशासन अधिकारी – 4  – बदली कार्यवाही
उप अधिक्षक – 43 – बदली कार्यवाही
उप अधिक्षक – 56 – पदस्थापना कार्यवाही
लिपिक टंकलेखक – 274 – बदली कार्यवाही
वरिष्ठ लिपिक – 112 – बदली कार्यवाही
वरिष्ठ लिपिक – 139 – पदस्थापना कार्यवाही

PMC pune | Transfers | महापालिकेत तब्बल 6 वर्षांनी होणार बदल्या! |  मात्र राजकीय नेते पूर्ण समाधानी नाहीत 

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिकेत तब्बल 6 वर्षांनी होणार बदल्या!

|  मात्र राजकीय नेते पूर्ण समाधानी नाहीत

पुणे | पुणे महापालिकेतील सेवकांच्या बदल्या हा महत्वाचा विषय झाला आहे. याबाबत आरोप होऊ लागल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने तडकाफडकी बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तब्बल 6 वर्षानंतर या नियतकालिक बदल्या होणार आहेत. सुमारे 132 कनिष्ठ अभियंता (JE) च्या पारदर्शक पद्धतीने बदल्या करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अभियंता प्रमाणेच लेखनिकी संवर्गातील बदल्या करताना हाच निकष वापरला जावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.  दरम्यान असे असले तरी राजकीय नेते मात्र अजून पूर्ण समाधानी नाहीत. सर्वच विभागातील बदल्या तात्काळ कराव्यात अशी मागणी नेत्यांनी केली आहे. (PMC Pune)

गेल्या काही दिवसापासून मनपा वर्तुळात तसेच शहरभरात चर्चेचा असलेला मुद्दा म्हणजे पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा आहे.  पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बादल्या दर तीन वर्षांनी करणे, असे धोरण असून या धोरणास हरताळ फासला जात आहे. तसेच  बदल्यांमध्ये लाखोंची उलाढाल होत आहे. असा आरोप राजकीय नेत्यांकडून केला जात होता.  लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, उप अधीक्षक, अधिक्षक, प्रशासन अधिकारी या पदांवर काम करणारे अधिकारी यांच्या खूप वर्षांपासून पासून दर तीन वर्षांनी होणाऱ्या बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे बदल्या करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास 132 कनिष्ठ अभियंत्यांचा यात समावेश आहे. त्यामध्ये स्थापत्य पदावरील 109, विद्युत पदावरील 17 आणि यांत्रिकी पदावरील 6 कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. (Pune Municipal Corporation)

| मनपा प्रशासनाचे परिपत्रक जारी

 

महापालिका प्रशासनाच्या परिपत्रकानुसार  पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील ज्या सेवकांची एकाच खात्यात तीन वर्षे अगर त्यापेक्षा जास्त सेवा झाली आहे, अशा सेवकांच्या अन्य खात्यात बदल्या कराव्या लागतात. खात्याच्या एकूण पदांपैकी दरवर्षी जास्तीत जास्त २०% अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या कराव्यात, अशा बदल्या करणेविषयीचे  धोरण आहे. या मंजूर बदली धोरणातील तरतुदी विचारात घेऊन ३१/०३/२०२३ अखेर एकाच खात्यात तीन वर्षे अगर त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) या पदावरील सेवकांची नियतकालिक बदल्या करण्याची कार्यवाही अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांचे अध्यक्षतेखाली प्रस्तावित केलेली आहे.
या नियतकालिक बदल्यांची कार्यवाही बुधवार, दिनांक १२/०४/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता, जुना जी.बी. हॉल, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, तिसरा मजला, येथे होईल.
महापालिका सभेने मंजूरी दिलेल्या बदली धोरणाप्रमाणे नियतकालिक बदलीस पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी संबंधित सेवकांचे माहितीसाठी पुणे महानगरपालिका संकेत स्थळावरील कार्यालय
परिपत्रक प्रणालीवर (https://pmc.gov.in/en/circulars) उपलब्ध केलेली आहे. नियतकालिक बदलीस पात्र ठरणाऱ्या सेवकांनी वरील नियोजित ठिकाणी व वेळेत समक्ष उपस्थित रहावयाचे आहे.

तरी खातेप्रमुख, प्रशासन अधिकारी यांनी प्रस्तुतचे कार्यालय परिपत्रक आपले अखत्यारीत कार्यरत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) या संवर्गातील संबधित सेवकांच्या त्वरीत निदर्शनास आणावे व नोंद घेतल्याबाबत स्वाक्षरी घ्यावी. असे आदेशात म्हटले आहे.
| लेखनिकी संवर्गासाठी हाच न्याय अपेक्षित
कनिष्ठ अभियंता याच्या या नियतकालिक बदल्या पारदर्शक पद्धतीने केल्या जाणार आहेत. ज्यांची सेवा अधिक आहे, अशा सेवकांना बदलीचे खाते विचारले जाणार आहे. त्यानुसार यादी प्रसिद्ध केली असून त्यानुसारच बदली केली जाणार आहे. अभियंता प्रमाणेच लेखनिकी संवर्गातील सेवकांच्या देखील बदल्या प्रलंबित आहेत. त्याही बदल्या लवकरच होणे अपेक्षित आहे. त्यांच्या बदल्या करताना देखील अशाच पारदर्शक पद्धतीने केल्या जाव्यात. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
—-
महापालिका प्रशासनाने 132 JE च्या बदल्या करण्याबाबत निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र बदली केल्यानंतर संबंधित सेवक कामाला एका ठिकाणी आणि पगाराला दुसऱ्या ठिकाणी, असे प्रशासनाने होऊ देऊ नये. तसेच आम्ही एकच खाते किंवा ठराविक सेवकांच्या बदल्या करण्याची मागणी केली नव्हती. नियमानुसार ज्यांनी 3 वर्ष एका खात्यात काम केले आहे आणि बदलीस पात्र असणाऱ्या अशा सर्वांच्या बदल्या आम्हाला अपेक्षित आहेत. टप्प्या टप्प्याने बदल्या आम्हाला मंजूर नाहीत.
अरविंद शिंदे, शहर अध्यक्ष, काँग्रेस.
आमच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने बदल्या करण्याचा निर्णय घेतला, याबद्दल आम्हाला आनंद आहे. मात्र मलईदार खात्यात गेल्या कित्येक वर्षांपासून जे सेवक काम करताहेत, त्यांच्या तात्काळ बदल्या होणे अपेक्षित आहे. जेणेकरून सर्वांना सर्व खात्यात काम करण्यास प्राधान्य मिळेल. 
नाना भानगिरे, शहर अध्यक्ष, शिवसेना 
हे आहेत सेवक 

Transfers | Nana Bhangire | महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा | शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा

| शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची मागणी

| बदल्या न झाल्यास आंदोलनाचा इशारा

पुणे | महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. तसेच इंजिनियर, कर विभाग, क्लार्क यांच्या नियमानुसार तातडीने बदल्या कराव्यात अन्यथा शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा भानगिरे यांनी दिला आहे. (Pmc Pune)
भानगिरे यांच्या निवेदनानुसार नुकतेच मनपा वर्तुळात तसेच शहरभरात चर्चेचा असलेला मुद्दा म्हणजे पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा आहे.  पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बादल्या दर तीन वर्षांनी करणे, असे धोरण असून या धोरणास हरताळ फासला जात आहेअभियंत्यांच्या बदल्यांमध्ये लाखोंची उलाढाल होत आहे. अशी चर्चा असली तरी लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, उप अधीक्षक, अधिक्षक, प्रशासन अधिकारी या पदांवर काम करणारे अधिकारी यांच्या सन 2012 पासून दर तीन वर्षांनी होणाऱ्या बदल्या झालेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. (Pune municipal corporation)

भानगिरे यांनी पुढे म्हटले आहे कि, 2012 नंतर बदल्या झाल्या. परंतु ज्या कर्मचाऱ्यांचा वशिला नाही अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. कर आकारणी कर संकलन विभागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचा आढावा घेतल्यास सन 2010 पासून तेच तेच अधिकारी त्याच त्याच परिसरात काम करीत आहेत. परिणामी अशा अधिकाऱ्यांची त्या त्या परिसरात मक्तेदारी झालेली आहे.  तसेच हाच प्रकार बदल्या करणारे खाते म्हणजेच सामान्य प्रशासन विभाग, मालमत्ता व्यवस्थापन, मुख्य लेखापाल, दक्षता विभाग अशी अत्यंत महत्वाचे विभाग याठिकाणी काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या 10 वर्षांहून अधिक काळ झाला तरी झालेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

या बाबी निदर्शनास आणून देण्याचे महत्वाचे कारण म्हणजे या पदांवर काम करणारे अधिकारी देखील आमच्या शिवाय मनपाला पर्याय नाही. अशा वल्गना खाते प्रमुखांसमोर करतात व खाते प्रमुख देखील वेळ मारून नेण्यासाठी गप्प बसतात. मनपाच्या कडे प्रतिनियुक्ती वर आलेल्या अधिकारी यांनी स्वतःचे महत्त्व वाढवण्याच्या उद्देशाने व काही गूढ हेतूने अकारण नैसर्गिकरित्या पात्र बदल्याही अडवून ठेवल्या आहेत सेवकवर्ग विभाग संपुर्ण आयुक्त यांच्या अख्यतारीत घेण्यात यावा जेणेकरून कोणताही भ्रष्टाचार न होता पारदर्शक विना वशिलेबाजी ने बदल्या होतील.  इंजिनियर, कर विभाग, क्लार्क यांच्या नियमानुसार तातडीने बदल्या कराव्यात अन्यथा शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल. असे भानगिरे यांनी म्हटले आहे.

Zilla Parishad teacher : transfer process : जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया आता अधिक पारदर्शक!

Categories
Breaking News Education पुणे महाराष्ट्र

जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया आता अधिक पारदर्शक 

: सॉफ्टवेअरची निर्मिती सुरू

 

पुणे- जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया पारदर्शक, वेगाने करण्यासाठी आता राज्य सरकारने एका सॉफ्टवेअरची निर्मिती सुरू केली आहे. या सॉफ्टवेअरच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून येत्या एप्रिलपर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित असून मे महिन्यांपासून बदल्यांची प्रक्रिया या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होईल.

सॉफ्टवेअरच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने पुणे, सातारा आणि वर्धा येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली. सॉफ्टवेअर निर्मिती करणाऱ्या कंपनीला मार्गदर्शन करण्याचे काम ही समिती करणार आहे. त्या समितीची पुण्यात मंगळवारी बैठक झाली. त्यानंतर सॉफ्टवेअर निर्मितीमध्ये काही सूचना केल्या आहेत. राज्यातील जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनेकदा घोळ होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्या तक्रारींची दखल राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतली.

 

बदल्यांची प्रक्रिया कशा पद्धतीने राबविण्यात यावी. त्यावर नेमक्‍या कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत राज्य सरकारने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्यात सातारा, वर्धा, रायगडसह काही जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्या समितीने राज्य सरकारला बदली प्रक्रिया कशापद्धतीने राबविता येईल या शिफारशींचा अहवाल दिला होता. शिफारशीनुसार सरकारमार्फत तयार करण्यात येणारे हे सॉफ्टवेअर मराठी, इंग्रजी भाषेत आहे. हे सॉफ्टवेअर संगणकासह मोबाईलद्वारे वापरता येणार असून त्याद्वारे संपूर्ण प्रक्रिया करणे शक्‍य होणार आहे. सॉफ्टवेअरचा वापर कसा करायचा याची माहितीदेखील दिली जाणार आहे. सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यासाठी अवघ्या तीन सेकंदाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.