PMC Pune RFD project | नदी सुधार प्रकल्प अंतर्गत पुणे महापालिकेकडून रोपांची लागवड 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune RFD project | नदी सुधार प्रकल्प अंतर्गत पुणे महापालिकेकडून रोपांची लागवड

PMC Pune RFD project | जागतिक पर्यावरण दिनाचे (World Environment Day) औचित्य साधून ठिकाणी पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) वृक्ष रोपणाच्या (Tree plantation) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शादलबाबा दर्गा ते गणेश घाट या दरम्यान रे १० ते १५ फुट उंचीची रोपे लावण्यात आली आहेत. यापूर्वी देखील पुणे महानगरपालिकेमार्फत (PMC Pune) स्वदेशी ५० रोपांची लागवड जानेवारी २०२३ दरम्यानच्या काळात करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) देण्यात आली.
या कार्यक्रमाकरिता अतिरिक्त महापालिका आयुक्त   विकास ढाकणे व अधिक्षक अभियंता युवराज देशमुख व वृक्ष प्राधिकरण अधिक्षक  अशोक घोरपडे व इतर अधिकारी कर्मचारी इ.उपस्थित होते.

नदी सुधारणा प्रकल्प (River front Devlopment project) अंतर्गत शादलबाबा दर्गा ते गणेश घाट या दरम्यान ३०० मी. नदीकाठ सुधारणेच्या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या नदीकाठ सुधारणेमध्ये वृक्षारोपणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर प्रकल्पा अंतर्गत सुमारे ६९,००० रोपांचे वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे. स्ट्रेच ९ मध्ये १५३४ झाडे सुभाबूळ, कुभाबूळ, व काटेरीबाभूळ, विलायती चिंच प्रजातीमधील आहेत. स्ट्रेच १० व ११ मध्ये सुमारे १२५३ झाडे सुभाबूळ,कुभाबूळ, व काटेरीबाभूळ, विलायती चिंच प्रजातीमधील आहेत. ही झाडे काढून सदर ठिकाणी विदेशी प्रजाती ऐवजी स्वदेशी रोपे लावण्यात येणार आहेत. (Pune Municipal Corporation RFD project)

नवीन लागवड करण्यात येणाऱ्या झाडांची नावे पुढील प्रमाणे :-

* करंज, मेढसिंगी, कांचन, कदंम्ब, साग, मुचकुंद, रक्तरोहिडा, पिंपळ, कैलासपती, बकुळ, काळाकुडा, पानजांभूळ इ. फुले येणारी झाडे.
* आंबा, जांभूळ, गुलार, पुत्रवंति, भोकर, खिरणी, अर्जुन, आसन, चिरंजी इ. फळझाडे जी पक्षांसाठी उपयोगी आहेत.
* घोळ, अर्जुन, आंबा, खिरणी इ. पक्षांना घरटी बांधण्यासाठी उपयुक्त अशी झाडे.
* लिंब, कदम्ब, जांभूळ, आंबा, वड इ. मोठी झाडे सावलीसाठी.
—-
News Title | PMC Pune RFD project | Plantation of saplings by Pune Municipal Corporation under River Improvement Project

NCP | Agitation | झाडे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे झाडावर चढून आंदोलन!

Categories
Breaking News PMC Political पुणे

झाडे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे झाडावर चढून आंदोलन!

पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (Mula mutha river revival project) हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. हे काम करताना नदी लगत असणारी काही वृक्ष ( trees) बाधित होणार आहेत. हे वृक्ष तोडू नयेत या मागणीसाठी राष्ट्रवादी कडून (ncp pune) संभाजी उद्यानासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवक्ता प्रदीप देशमुख यांनी झाडावर चढून बसत झाडे न तोडण्याचा पुनरुच्चार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी केली.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. ते म्हणाले की, पुणे शहरात विकास कामांना आमचा विरोध नाही. पण विकास काम करत असताना, पर्यावरणाचा देखील भाजप आणि महापालिका प्रशासन थोडा विचार करायला पाहिजे होता. तो त्यांनी केला नसल्याने आता नदी पात्र सुधार प्रकल्प अंतर्गत हजारो झाडांची कत्तल करण्यात येत आहे.

नियमानुसार आम्ही झाड लावणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आजवर पुणे महापालिका प्रशासनामार्फत झाडे काढल्यावर कोणत्याही ठिकाणी झाडे लावण्यात आली नाही. यामुळे या नदी पात्रात झाडांचे देखील तेच होणार आहे. यामुळे झाडांची कत्तल झाल्यास आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यावरण प्रेमींनी यावेळी दिला.

प्रवक्ते प्रदिप देशमुख म्हणाले की, केवळ आपल्या बॉसेसना खुश करण्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे.या सर्व झाडांचे पुनर्रोपण करता येणे अशक्य आहे. आम्ही देखील विकासाचे समर्थक आहोत पण पर्यावरणाचा बळी देऊन होणारा विकास आम्हाला अमान्य आहे.

यावेळी शहाराघ्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते  प्रदीप  देशमुख , दिपाली धुमाळ ,किशोर कांबळे ,  नितीन कदम , अजिंक्य पालकर , मनोज पाचपुते ,  कैलास मकवान , विक्रम जाधव , हरीश लडकत , फईम शेख,  शिल्पा भोसले इ प्रमुख  उपस्थित होते.

River revival project | टीका झाल्यानंतर महापालिकेला आली जाग

Categories
Breaking News PMC पुणे

टीका झाल्यानंतर महापालिकेला आली जाग

| बाधित वृक्षांच्या बदल्यात लावणार तब्बल ६५ हजार स्थानिक प्रजातीची वृक्ष

पुणे| पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (Mula Mutha River Revival Project) हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. हे काम करताना नदी लगत असणारी काही वृक्ष (Tree) बाधित होणार असून त्याचे पुर्नरोपण (Tree plantation) करणे व नव्याने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. बाधित वृक्षांच्या बदल्यात महानगरपालिकेने तब्बल ६५ हजार ४३४ वृक्ष लावण्याचे नियोजन केले आहे. यावरून महापालिकेची आलोचना झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून हा खुलासा करण्यात आला आहे. (pune municipal corporation)

महापालिकेकडून दिलेल्या निवेदनानुसार मुळा मुठा नदी पुनरुज्जीवनाचे संगमब्रिज ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा याठिकाणी कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना नदी लगत असणारी बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी ४ हजार ४२९ वृक्षांचे पुर्नरोपण करण्यात येईल. तर, ३ हजार ११० वृक्ष काढण्यात येणार आहेत. मात्र, याबदल्यात स्थानिक प्रजातीच्या ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्षांचे रोपण करण्याचे तसेच मोठ्या प्रमाणात नदीच्या दोन्ही काठ्यांवर झुडपांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येणार आहे. याद्वारे नदीकाठच्या परिसंस्था सुधारण्यासाठी मदत होणार आहे.

दरम्यान, नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांबाबत पुणे महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागामार्फत दैनिक वर्तमानपत्रामध्ये जाहीर प्रकटन देण्यात आले होते. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५, महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन नियम २००९, मे. उच्च न्यायालय, मुंबई यांची जनहित याचिका क्र. ९३/२००९ चे दिनांक २० सप्टेंबर २०१३ रोजीचे आदेश तसेच मे. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी पारित केलेले अध्यादेश यांस अनुसरून हे जाहीर प्रकटन देण्यात आले होते. तसेच याबाबतची तपशिलावर सविस्तर माहिती निर्देशपत्र स्वरुपात पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली होती. तसेच सदर प्रकल्पास बाधित होणाऱ्या वृक्षांची पाहणी उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार गठीत केलेल्या वृक्ष तज्ज्ञ समितीमार्फत प्रत्यक्ष जागेवर जाऊन करण्यात आलेली आहे.

वर्तमानपत्रातील जाहीर प्रकटनानुसार नागरिकांना याबाबत हरकती घेण्यास १ मार्च ते १३ मार्च २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार काही नागरिकांनी यावर हरकती घेतल्या असून त्यावर सुनावणी घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव हा वृक्ष प्राधिकरणामार्फत महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरण यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यांनी दिलेल्या मान्यतेनुसार
पुणे महानगरपालिकेकडून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

योग्य उंचीची वृक्ष लावणार

मुळा मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात पुणे महानगरपालिका एकूण ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्षांचे नव्याने रोपण करणार आहे. ही वृक्ष लावताना ती स्थानिक प्रजातीची, तज्ज्ञांनी सुचवलेली व योग्य उंचीची चांगल्या प्रतीची वृक्ष लावली जातील. या वृक्षांचे पुढील पाच ते सात वर्ष संगोपन करण्यात येणार आहे. असे कार्यकारी अभियंता (प्रकल्प) यांच्याकडून सांगण्यात आले.