Threats on Twitter | शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी प्रकरणाची चौकशी करावी |खासदार सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी

Categories
Breaking News Political social देश/विदेश

Threats on Twitter | शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी प्रकरणाची चौकशी करावी

|खासदार सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी

Threats on Twitter | दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers protest) सुरु असताना भारत सरकारने (Indian Government) काही विरोधी ट्वीटस् (Tweets0 हटविण्यासाठी दबाव आणला होता. असा खुलासा ट्वीटरचे तत्कालीन सीईओ जॅक डॉर्से (Twitters former CEO Jack Dorse) यांनी केला आहे. हे अत्यंत धक्कादायक वास्तव असून या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supirya Sule) यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे (PMO) केली आहे. (Threats on Twitter)

प्रत्यक्ष पंतप्रधान कार्यालयालाच (PMO) टॅग करत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारवर टिका करणारा प्रत्येक आवाज दाबण्यासाठी दबाव होता तसेच सरकारचे ऐकले नाही तर भारतातील ट्वीटरचे कार्यालय (Twitter office in India) देखील बंद करण्याच्या धमक्या दिल्याचे जॅक यांचे म्हणणे आहे. हे आरोप अतिशय गंभीर आहेत. देशातील लोकशाही व्यवस्थेला धोका तर आहेच शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच देखील आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (Twitter)

या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती पद्धतीने चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे. ट्वीटरला खरोखरच धमक्या दिल्या गेल्या असतील तर संबंधित व्यक्तींवर कारवाई देखील व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


News Title |Threats on Twitter | The case of pressure and threats on Twitter during farmers’ agitation should be investigated |Khasdar Supriya Sule’s request to the Prime Minister’s Office

MP Supriya Sule | पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा | खासदार सुप्रिया सुळे

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा | खासदार सुप्रिया सुळे

पुणे : बावधन बुद्रुक येथील पेबल्स सोसायटीच्या समोर असलेला पीएमपी बसचा थांबा पूर्ववत सुर करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार पीएमपी प्रशासनाला टॅग करत त्यांनी ही मागणी केली आहे.

कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरून निगडी, हिंजवडी आणि वडगाव मावळ कडे धावणाऱ्या पीएमपी बसेस पूर्वी बावधन येथील पेबल्स सोसायटीच्या गेटसमोर थांबत होत्या. त्यांच्यासाठी जुनी डीएसके टोयोटा शोरूम हा अधिकृत थांबा होता. तो थांबा अचानक बंद करण्यात आल्यामुळे येथील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून तो थांबा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

निगडी, हिंजवडी आणि वडगाव मावळकडे जाणाऱ्या अनुक्रमे ४३, ४४ आणि २२८ या क्रमांकाच्या पीएमपीएमएलच्या बससाठी या थांब्यावर अनेक प्रवासी बसची वाट पहात थांबलेले असतात. अचानक तो बंद करण्यात आल्याने प्रवाशांना मागील किंवा पुढील बस थांब्यापर्यंत चालत जावे लागत आहे. ऐन कामाच्या वेळी हे चालत जाणे वेळखाऊ होते परिणामी कामावर किंवा शाळा महाविद्यालयात पोहोचण्यासाठी उशीर होणे आदी गोष्टींमुळे स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.

हा थांबा पुर्ववत करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करुनही त्याची योग्य दखल घेतली जात नाही. येथे स्टॉपचा बोर्ड लावण्यात आला नाही. नागरीकांना बससाठी किमान एक किलोमीटर अंतर चालून पुढच्या स्टॉपपर्यंत जावं लागतं. हा मार्ग आणि बस बाणेर, निगडी, चिंचवड आणि हिंजवडी येथे जाणारे प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय उपयोगी आहे.
नागरीकांची सोय लक्षात घेता वरील ठिकाणी सदर गाड्यांचा थांबा पुर्ववत करावा, असे सुळे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

Dial-112 | व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-११२ मध्ये समावेश

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र लाइफस्टाइल

व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-११२ मध्ये समावेश

| एकत्रित प्रणालीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले लोकार्पण

पुणे| प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-११२ या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअ‍ॅप (Whats app), ट्विटर (Twitter), फेसबुक (Facebook), ईमेल(Gmail) इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण त्यांनी केले. महाराष्ट्र पोलिस आणि महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेस यांनी एकत्रित येऊन ही प्रणाली विकसित केली आहे. आतापर्यंत सुमारे साडेअकरा लाख तक्रारी या प्रणालीतून हाताळण्यात आल्या असून, यातील सुमारे २.५० लाख तक्रारी या महिलांशी संबंधित होत्या. या प्रणालीतून सरासरी दररोज १९ हजारावर कॉल्स स्वीकारले जातात, तर २८०० तक्रारींचा निपटारा केला जातो. आता यात महाराष्ट्र पोलिसांचे सिटीझन पोर्टल, एसओएस, फेसबुक, ई-मेल, सिटिझन मोबाईल अ‍ॅप, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जलदगतीने तक्रारींचा निपटारा शक्य होणार आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींसाठी आणि त्यावर त्वरित प्रतिसादासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची रचना करण्यात आली आहे. यामुळे पीडितापर्यंत तातडीने मदत पोहोचू शकणार आहे. ११२ महाराष्ट्र या नावाने ट्विटर आणि फेसबुकवर हॅण्डल्स असून, अन्य तपशील महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात, तातडीची मदत पोलिसांना मागू शकतात. यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत आणखी एका जलद प्रतिसाद सेवेची भर पडलेली आहे.

PMC Commissioner : Twitter : महापालिका आयुक्त ट्विटरद्वारे नागरिकांशी साधणार लाईव्ह संवाद!

Categories
Breaking News PMC social पुणे

महापालिका आयुक्त ट्विटरद्वारे नागरिकांशी साधणार लाईव्ह संवाद!

पुणे : स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, स्वच्छतेच्या प्रक्रियेत वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढावा तसेच महानगरपालिकेशी संबंधित अन्य इतर विषयांवर थेट नागरिकांशी चर्चा करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे  आयुक्त विक्रम कुमार हे स्वत: दिनांक ४ फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी 3 ते 3.30 दरम्यान ट्विटरद्वारे लाईव्ह संवाद साधणार आहेत.

यामध्ये नागरिकांना त्यांच्या सूचना, प्रश्न, विचारण्याची संधी मिळणार आहे. तरीही जास्तीत जास्त नागरिकांनी या चर्चेमध्ये सहभागी व्हावे. असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

नागरिकांनी आपल्या सूचना किंवा मते #आयुक्तांशीचर्चा किंवा #AskPMCCommissioner हा हॅशटॅग वापरून दुपारी दोन वाजेपर्यंत ट्विट करावेत, असे पुणे महानगरपालिकेने कळविले आहे.