Tag: Ulka Kalaskar
DA Hike Circular : पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! | कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता लागू | DA बाबतचे सर्क्युलर जारी
Dearness Allowance to PMC Pune Employees : पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. महागाई भत्त्यातील ४ टक्के वाढ १ जुलैपासून लागू करण्यात आली आहे. याबाबतचे सर्क्युलर महापालिकेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांनी जारी केले आहे. चार महिन्याचा फरक नोव्हेंबर पेड इन डिसेंबर च्या वेतनातून दिला जाणार आहे. तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 5 महिन्याचा फरक डिसेंबर पेड इन जानेवारी च्या निवृत्ती वेतनातून दिला जाणार आहे. (DA Hike Circular)
केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता दिल्यांनतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली आहे. १ जुलै २०२३ पासूनही वाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची वातावरण आहे. (7th pay Commission)
दरम्यान पुणे महापालिकेने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार १ जुलै २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ वरुन ४६ टक्के करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या चार महिन्याच्या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबर पेड इन डिसेंबर च्या वेतनातून द्यावा असा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित दराचा जुलै ते नोव्हेंबर असा 5 महिन्याचा फरक डिसेम्बर पेड इन जानेवारी च्या पेन्शन मधून दिला जाणार आहे. (Dearness allowance News)
महागाई भत्त्याची रक्कम फरकासह अदा करताना नोव्हेंबर पेड इन डिसेम्बर च्या पगारबीलातून 24 महागाई भत्ता, या अंदाजपत्रकीय तरतुदींवर खर्च टाकण्यात यावा. तसेच दर महाच्या महागाई भत्त्याचा खर्च खात्याच्या वेतन विषयक तरतुदींमधून करण्यात यावा. यासाठी सर्व खातेप्रमुख आणि सहायक आयुक्त यांनी आपल्या नियंत्रणाखालील सेवकांना सूचित करण्या बाबत सांगण्यात आले आहे.
PMC Income Tax | महापालिकेच्या विविध विभागातील क्लार्कना दिले जाणार आयकर कायद्याचे (Income Tax Law) प्रशिक्षण | कर्मचाऱ्यांच्या आयकर कपात बाबत देखील होणार चर्चा
महापालिका कर्मचाऱ्यांना देखील सहन करावा लागतो त्रास
PMC Chief Finance and Account Officer | उल्का कळसकर यांच्याकडील अतिरिक्त पदभार कमी केला!
| महापालिका आयुक्तांकडून आदेश जारी
PMC Pune Additional Commissioner | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदासाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी सरकारकडे!
| महापालिका अधिकाऱ्यांना यावेळेस तरी मिळणार का पद?
7th Pay Commission | PMC Retired Employees | 2800 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित लाभ मिळणार
| प्रस्ताव सादर करण्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे आदेश
7th Pay Commission | PMC Retired Employees | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) 1 जानेवारी 2016 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या 2800 सेवकांना ७ व्या वेतन आयोगातील (7th Pay Commission) तरतूदीप्रमाणे निवृत्तिविषयक लाभ सुधारित करण्यात आला आहे. त्यानुसार या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर (PMC Chief Account and Finance Officer Ulka Kalaskar) यांनी सर्व विभागांना दिले आहेत. (PMC Pune)
PMC Employees Income Tax | वेतनातून Income tax कपात होऊनही पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना आयकर विभागाची नोटीस!
| बिल क्लार्क च्या चुकांमुळे महापालिका कर्मचारी हैराण
महापालिका कर्मचाऱ्यांचे आयकर भरल्याची सिस्टम मध्ये नोंद करण्याचे काम बिल क्लार्क चे आहे. मात्र त्यांच्या हातून होत असलेल्या छोट्याश्या तांत्रिक चुकांमुळे नोंद होत नाही. परिणामी आयकर भरल्याचे दिसत नाही. बिल क्लार्कनी आपल्या कामात सुधारणा करण्यासाठी आम्ही त्यांना लवकरच प्रशिक्षण देऊ.
महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून दिवाळीची बंपर ‘भेट’
| 7 व्या वेतन आयोगातील पहिल्या हफ्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा
| ‘कारभारी’ च्या पाठपुराव्याला यश
पुणे | पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाने दिवाळीची बंपर भेट दिली आहे. शुक्रवारी संध्याकाळी प्रशासनाने अचानक कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सातव्या वेतन आयोगाच्या हफ्त्याची रक्कम जमा केली आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. ‘कारभारी’ वृत्तसंस्थेने याबाबत पाठपुरावा केला होता. प्रशासनाने दिवाळी बोनस चे नुकतेच परिपत्रक काढले आहे. त्यानुसार त्याचे काम सुरु आहे. तसेच दिवाळी उचल रक्कम देखील कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शनिवार, रविवारी खरेदी करता येणार असून आनंदाने दिवाळी साजरी करता येणार आहे.
महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक, तंत्र शाळांकडील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगापोटी पाच समान हत्यांपैकी पहिल्या हत्याची रक्कम मिळालेली नव्हती. यामुळे प्रशासनाची आलोचना केली जात होती. खरे पाहता नियमानुसार ही रक्कम जून महिन्यात मिळणे अपेक्षित होते. जून महिन्यापासून महापालिका प्रशासन याची तयारी करत होते. तरीही चार महिन्यात 100 बिले देखील तयार झाली नव्हती.
लेखा व वित्त विभागाने ऑगस्ट महिन्यात याबाबत पत्रक जारी केले. 5 ऑगस्ट पर्यंत ही बिले तपासून घेण्याचे आदेश लेखा विभागाने सर्व विभागांना दिले होते. यामध्ये शिक्षण विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना देखील न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ही रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाची आलोचना केली जात होती. शिवाय महापालिका कर्मचारी देखील त्रस्त झाले आहेत. याबाबत संगणक विभागाकडे बोट दाखवले जात होते. दरम्यान महापालिका आयुक्तांनी नुकतीच माहिती आणि तंत्रज्ञान विभागाची पूर्ण जबाबदारी राहुल जगताप यांच्यावर सोपवली. त्यामुळे आता कामात गती येईल, असे बोलले जात होते. त्यानुसार बिले तयार करण्याचे काम सुरु होते.
| 50 कोटींची रक्कम जमा करण्यात आली
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण 122 बिले तयार झाली होती. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी एवढ्या बिलाची रक्कम जमा करण्यात आली. 50 कोटीची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित 70 बिले तयार करण्याची बाकी आहेत. यावर देखील महापालिका प्रशासनाने तोडगा काढला आहे. ज्यांना रक्कम मिळाली नाही, त्यांना पुढील दोन तीन दिवसात त्यांच्या मागील वेतनाएवढी रक्कम जमा केली जाणार आहे. बिले तयार झाल्यानंतर त्यामध्ये नंतर फेरफार केला जाणार आहे. प्रशासनाच्या या गोड धक्क्यामुळे महापालिका कर्मचारी मात्र चांगलेच आनंदी झाले आहेत.
—
वेतन आयोगाच्या हफ्त्याची रक्कम कमर्चाऱ्यांना देण्याबाबत महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेतला. कारण तयार झालेली बिले कमी होती. त्यावरही आयुक्तांनी तोडगा सुचवत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर हफ्त्याची रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही शुक्रवारी तयार झालेल्या बिलांची रक्कम जमा केली. उर्वरित कर्मचाऱ्यांना येत्या आठवड्यात त्यांच्या मागील पगाराएवढी रक्कम दिली जाणार आहे. आयुक्तांच्या पुढाकारामुळे आणि त्यांच्या निर्देशामुळे आम्ही हे काम करू शकलो.
| उल्का कळसकर, वित्त व लेखा अधिकारी, पुणे महापालिका.
बोनस वेळेत अदा करण्यासाठी ऑडिटर सेवकांना शनिवार, रविवारी कामावर येण्याचे आदेश
| 18 ऑक्टोबर पर्यंत बिले तपासणीच्या वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांच्या सूचना
| असे आहेत आदेश
उल्का कळसकर, शिवाजी दौंडकर यांचे नामाभिधान आता ‘सह महापालिका आयुक्त’ असणार
पुणे | मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर आणि मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांना आता सह महापालिका आयुक्त असा दर्जा देण्यात आला आहे. महापालिकेचे खातेप्रमुख म्हणून दहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या परंतू बढतीची संधी नसलेल्या अधिकार्यांच्या पदाचे नामाभिधान ‘सह महापालिका आयुक्त’ असा करण्यात आला आहे. हे दोन्ही अधिकारी सह महापालिका आयुक्त समकक्ष समजण्यात येणार असून त्यांना सह महापालिका आयुक्तांना देण्यात येणारे सर्व फायदे व मान्य दराने विशेष वेतन देण्यात येणार आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील खातेप्रमुख संवर्गातील (वे. श्रे. रु. १५,६०० ते ३९,१००+ ८,९०० ग्रेड पे+मान्य भत्ते) पदावर सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना बढतीची संधी नाही म्हणून त्यांचे पदाचे नामाभिधान बदलून ते ‘सह महापालिका आयुक्त (जॉइंट म्युनिसिपल कमिशनर)’ असे करणेस, मात्र ज्या अधिकाऱ्यांचा हुद्दा अधिनियमात हुद्दा नमूद केल्यामुळे तो बदलता येणार नाही त्यांना सह महापालिका आयुक्त समकक्ष समजण्यात यावे व त्यांना सह महापालिका आयुक्त यांना देण्यात येणारे सर्व फायदे व मान्य दराने विशेष वेतन देण्यात यावे असे धोरण मनपा सभा ठरावान्वये मान्य करण्यात आले आहे. तसेच शासनाची मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यानुसार उल्का कळसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि शिवाजी भिकाजी दौंडकर यांना मान्य ठरावानुसार त्यांचे संबोधनात बदल करण्यात येत आहे. या दोन्ही अधिकार्यांना सह महापालिका आयुक्तांना देण्यात येणारे सर्व फायदे व मान्य दराने विशेष वेतन देण्यात येणार आहे. या अधिकार्यांचे पदनाम बदलले तरी त्यांना पुर्वीच्याच हुद्यावरच व त्याच अधिकारानुसार काम करावे लागणार आहे.