Dr Siddharth Dhende | प्रभाग क्रमांक दोन मधील लुंबिनी बाल स्नेही उद्यानाची निर्मिती | माजी उपहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा यशस्वी पुढाकार

Categories
Breaking News cultural Education PMC Political social पुणे

Dr Siddharth Dhende | प्रभाग क्रमांक दोन मधील लुंबिनी बाल स्नेही उद्यानाची निर्मिती

| माजी उपहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा यशस्वी पुढाकार

|मुलांच्या जडनघडणीतून सक्षम राष्ट्र घडेल : डॉ. सिद्धार्थ धेंडे

 

Dr Siddharth Dhende | विविध खेळ, चित्र आदींच्या माध्यमातून मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीला चालना मिळते. त्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. वेगवेगळे उपक्रम देखील राबविणे गरजेचे आहे. मुले घडली तेच सक्षम राष्ट्र घडेल, असे प्रतिपादन पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Former Deputy Mayor Dr Siddharth Dhende) यांनी केले.

अर्बन 95 पुणे (Urban 95 Pune) व पुणे महानगरपालिका (PMC Pune) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन (PMC Pune Ward no 2) मध्ये लुंबिनी बाल स्नेही उद्यान ” तसेच छत्रपती शिवराय दवाखाना येथील ” बाल संस्कार आरोग्य केंद्राचे उद्घाटन पार पडले. शून्य ते 10 वर्ष वयोगटातील मुलांचा बौद्धिक, शारीरिक विकास व्हावा, या उद्देशाने या उद्यानाची डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्यामुळे निर्मिती करण्यात आली. या वेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. धेंडे बोलत होते.

पुणे महापालिका विभागीय आयुक्त कु. किशोरी शिंदे, मुख्य उद्यान अधीक्षक श्री. अशोक घोरपडे, उपअभियंता श्री अमोल रुद्रके, या वेळी अर्बन 95 च्या कार्यक्रम अधिकारी कु. रुश्दा मजीद, भारत प्रतिनिधी कु. इपशिता सिन्हा, कार्यक्रम अधिकारी श्री. निमिष आगे, प्रशासक श्री. सोहेल सय्यद, इजीस इंडियाचे महाव्यवस्थापक श्री अरविंद पसुला, अर्बन ९५ पुणेचे टीम लीडर श्री मन्सूर अली आदींसह परिसरातील नागरिक, मुले या वेळी उपस्थित होते.

 हा आहे उपक्रम

बाल स्नेही उद्यानात मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाला चालना मिळेल असे खेळ ठेवण्यात आले आहेत. या मध्ये सौरमंडल, प्राण्यांची माहिती, बाराखडी, चित्रकलेच्या माध्यमातून खेळाची ओळख निर्माण करणे आदींचा या मध्ये समावेश असणार आहे.

———-

बाल स्नेही उद्यानाच्या निर्मितीसाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. आज माझ्या प्रभागातील लुंबिनी उद्यानात ते साकारत आहे. याचा प्रभागातील शून्य ते १० वर्ष वयोगटातील मुलांना फायदा होणार आहे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.

Dr Siddharth Dhende | चाइल्ड केअर सेंटर उपक्रम नागरिकांसाठी वरदान ठरेल | डॉ. सिद्धार्थ धेंडे

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

Dr Siddharth Dhende | चाइल्ड केअर सेंटर उपक्रम नागरिकांसाठी वरदान ठरेल | डॉ. सिद्धार्थ धेंडे

| प्रभाग क्रमांक 2 मधील छत्रपती शिवराय दवाखान्यात चाईल्ड केअर सेंटरचे उद्घाटन

| माजी उपमहापौर डॉ.  सिद्धार्थ धेंडे यांचा पाठपुरावा

Dr Siddharth Dhende | पुणे महानगरपालिका (Pune Municipal corporation) व अर्बन 95 (Urban 95g संस्थेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 2 मध्ये अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. नुकतेच छत्रपती शिवराय दवाखान्यात चाईल्ड केअर सेंटर (Child Care Centre) सुरू करण्यात आले आहे. पुणे शहरातील हा पहिला प्रकल्प सुरू होत आहे. त्याचा प्रभागातील नागरिकांना, लहान बालकांना मोठा फायदा होणार आहे. या अगोदरही पुणे शहरातील पहिले “हर्बल गार्डन ” तसेच लुंबिनी उद्यानातील पहिला ” बाल मेळावा ” नागरिकांच्या सहकार्याने सुरू करता आला, असे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ.  सिद्धार्थ धेंडे (Former Deputy Mayor Dr Siddharth Dhende) यांनी केले.
डॉ. धेंडे यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नांमुळे प्रभाग क्रमांक दोन मधील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथील छत्रपती शिवराय दवाखाना या ठिकाणी चाइल्ड हेल्थ केअर सेंटर आणि आयटीसी सुरू करण्यात आले. पुणे महानगरपालिका व अर्बन 95 संस्थेच्या माध्यमातून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. धेंडे बोलत होते.
या वेळी नामदेवराव घाडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिती वर्पे, अर्बन 95 संस्थेचे सर्वेसर्वा दीक्षित आणि त्यांचे सहकारी, प्रेरणा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सांडभोर आणि त्यांचे सहकारी, चैतन्य हास्य योग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश आम्रे आणि त्यांचे सहकारी या सर्वांच्या शुभहस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, त्रिदलनगर, शांतीरक्षक सोसायटी व नागपूर चाळ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कैलास रणपिसे, विजय कांबळे, गजानन जागडे, हेमंत मोरे, प्रताप धुमाळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
——-

 या सुविधा मिळणार

पुणे महापालिका आणि अर्बन 95 संस्थांमार्फत लहान मुलांच्या बौद्धिक वाढीकरिता आणि सर्वांगीण विकासाकरिता तसेच जेष्ठ नागरिक, महिलांच्या सुविधेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. पुणे शहरात प्रथम त्याच धर्तीवर प्रभाग क्रमांक 2 मध्ये डॉ. धेंडे यांच्या पाठपुराव्यामुळे हर्बल गार्डन तयार करण्यात आले. आयटीसी फ्रेन्डली प्रायमरी हेल्थ केअर सेंटर मध्ये गरोदर महिलांना गर्भ संस्कार स्वतंत्र कक्ष, हिरकणी कक्ष, बालसंगोपन कक्ष, जेष्ठ नागरिकांना अद्ययावत विरंगुळा कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी वाहन पार्किंग कक्ष निर्मिती करण्यात येणार आहे.
——————-
पुणे महापालिका आणि अर्बन 95 अंतर्गत अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 2 मध्ये चाईल्ड केअर सेंटर सुरू करता आले. त्याचा लहान मुलांना फायदा होणार आहे. तसेच आयटीसी सेंटरच्या माध्यमातून महिलांना उपचार घेता येणार आहेत.
डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका

Kid’s Festival | PMC Pune | पुणे महानगरपालिकेच्या पहिल्या बालोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Categories
Breaking News Education PMC social पुणे

पुणे महानगरपालिकेच्या पहिल्या बालोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

पुणे महानगरपालिकेने, बर्नार्ड व्हॅनलीर फाऊंडेशन आणि इजीस इंडिया यांच्या सहकार्याने  २६ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२३ या कालावधीत पुण्यातील पहिला बालोत्सव सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. मुखत्वे ०-६वयोगटातील मुले व त्यांचे सांभाळकर्ते यांच्यासाठी पहिला बालोत्सव (किड्स फेस्टिव्हल) पुण्यात सुरु होत
आहे! २६ फेब्रुवारी २०२३पासूनबालोत्सव (किड्स फेस्टिव्हल) सप्ताह सुरू होत आहे आणि मुख्य कार्यक्रम रविवार ५ मार्च २०२३ रोजी सारसबाग, सदाशिव पेठ येथे होणार आहे.
पुणे महानगरपालिकेने अलीकडील 2 ते 3 वर्षात अर्बन 95 कार्यक्रमांतर्गत विविध बाल स्नेही प्रकल्प राबवलेआहेत. त्यामुळे बालस्नेही शहर अशी पुण्याची ओळख निर्माण होते आहे. अर्बन ९५ कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या लहान मुलांच्या विकासाबाबत कार्यक्रमवत्यास अनुसरून बालस्नेही प्रकल्पाबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने या किड्स फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. बालोत्सव सप्ताहाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
 या दरम्यान चित्रकला, लहान मुलांच्या गोष्टी जबाबदार पालकत्वाचे तंत्रआणिओरिगामीचे कार्यक्रम यासारखे अनेक उपक्रम आयोजित केले जातील. मुख्य कार्यक्रमाच्या अगोदर बालोत्सव सप्ताहात ४ दिवस दररोज २ तासांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. कोंढवा येथील साळुंखे विहार सोसायटीजवळील अनसूया सदा बालोणकर गार्डन येथे दि.२६ फेब्रुवारी २०२३ रोजी रविवारपासून सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत दि.२८ फेब्रुवारी २०२३ रोजी लुंबिनी गार्डन, महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था, येरवडा येथे दुसरा कार्यक्रम दुपारी ०४ : ०० ते ०६:०० वाजता आयोजित केला जाईल. तिसरा कार्यक्रम दि. १ मार्च २०२३ रोजी राजीव गांधी प्राणी उद्यान, कात्रज येथे सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० या वेळेत आयोजित केला जाईल. चौथा कार्यक्रम चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क, ब्रेमेन चौक, औंध येथे दि. ३ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० या वेळेत होणार आहे. किड्स फेस्टिव्हलचा मुख्य कार्यक्रम सारसबाग, सदाशिव पेठ येथे ५ मार्च २०२३, रविवारी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
 किड्स फेस्टिव्हल सप्ताहामध्ये नियोजित सर्व उपक्रमांसाठी ०-६ वयोगटातील मुले व त्यांच्या सांभाळकर्त्यांसाठी विनामूल्य प्रवेश असेल. दरम्यान, बालोत्सवाची माहिती पुणे मनपाच्या वेबसाइटवर आणि लोकांसाठी सोशल मीडिया हँडलवर ऑनलाइन अपलोड केली जाईल.

 विक्रमकुमार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणाले, “मला खात्री आहे की किड्स फेस्टिव्हल हा पुणे शहरातील वार्षिक सांस्कृतिक उत्सवांपैकी एक म्हणून साजरा केला जाईल. आम्हाला अभिमान आहे की बर्नार्ड व्हॅनलीर फाऊंडेशन सोबतची आमची भागीदारी पुण्याला बालक आणि त्याच्या कुटुंबास अनुकूल असे शहर बनवण्यात यशस्वी होत आहे.”
रुश्दामजी द बर्नार्ड व्हॅनलीर फाऊंडेशनच्या मुख्य उपक्रम अधिकारी म्हणाल्या, संपूर्ण पुणे शहरात बालआणिकौटुंबिक विकासाचा हा विस्तृत झालेला उपक्रम पाहून मला आनंद झाला. शहर विकास आणि व्यवस्थापनाच्या केंद्रस्थानी बालक आणि त्याच्या कुटुंबाच्या विकासाला प्राधान्य देऊन पुणे देशातील इतर शहरांसाठी एक आदर्श शहर म्हणून ओळख निर्माण करत आहे. शहरीकरणामध्ये लहान मुले आणि त्याच्या कुटुंबाच्या गरजा पुरविण्याच्या दिशेने अर्बन 95 पुणे बालोत्सव (किड्स फेस्टिव्हल) हे एक महत्वाचे पाऊल आहे.

अर्बन 95 बद्दल: अर्बन 95 हा बर्नार्ड व्हॅनलीर फाऊंडेशनने 2016 मध्ये लहान मुलांच्या जीवनाला आकार देणारी लँडस्केप आणि संधी बदलण्यात मदत करण्यासाठी तयार केलेला एक उपक्रम आहे. या उपक्रमाच्या मध्यभागी प्रश्न आहे “जर तुम्ही 95cm पासून शहराचा अनुभव घेऊ शकता, तर तुम्ही काय बदलाल?” शहराचे नेते, नियोजक, वास्तु विशारद आणि नवोन्मेषकांसह काम करून, Urban95 जगभरातील शहरांमधील डिझाइन निर्णयांच्या केंद्रस्थानी हा दृष्टीकोन आणण्यात मदत करत आहे.

Safe transport | Dr. Siddharth Dhende | सुरक्षित वाहतूक अंतर्गत पुणे प्रभाग दोन बनला स्मार्ट |अर्बन ९५ संस्था, पुणे मनपातर्फे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

Categories
Breaking News PMC Political social पुणे

सुरक्षित वाहतूक अंतर्गत पुणे प्रभाग दोन बनला स्मार्ट

|अर्बन ९५ संस्था, पुणे मनपातर्फे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

– पदपथ, रंगीत दिशादर्शक फलकांनी समतानगर, लुम्बिनी चौकाचे सुशोभीकरण

वाहतुकी बाबत जनजागृती करण्यासाठी सुरक्षित वाहतूक झोन अंतर्गत अर्बन ९५ संस्था, पुणे महापालिकेमार्फत प्रभाग दोन स्मार्ट करण्यात आला आहे. या प्रभागातील समतानगर लुंबिनी, जेष्ठ नागरिक चौकाचे आकर्षक सुशोभीकरण करून त्याचे उद्घाटन माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पुणे वाहतुक अतिरिक्त पोलिस आयुक्त मुल्ला सय्यद, पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. (Pune Municipal corporation)

या कार्यक्रमाला अर्बन ९५ संस्थेचे प्रकाश पॉल, संदीप दीक्षित, आमिर पटेल, बाळासाहेब कांबळे आदींसह त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच प्रभाग दोन परिसरातील बालवाडी ( नर्सरी) चे विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी, सर्व शिक्षक, प्रेरणा जेष्ठ नागरिक संघ व चैतन्य हास्य योगचे नागरिक तसेच परिसरा मधील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (Urban 95 organization)

वाढते शहरीकरण व वाहतुक समस्यामुळे चौकात लहान मुले, महिला, जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व आजारी रुग्ण यांना जीव मुठीत घेउन रस्ता व चौक पार करावा लागतो. हे टाळण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेऊन लहान बालकांना ‘सुरक्षित वाहतुक झोन ही योजना राबविली आहे. पुणे मनपा, अर्बन ९५’ या संस्थेच्या वतीने प्रभाग २ स्मार्ट करण्यात आला आहे. प्रभाग दोन मधील समतानगर, लुम्बिनी या चौकात ५०० मिटर परिसरामधे चार उद्यान, तीन विद्यालय, मनपाचा शिवराय दवाखाना, आधार कार्ड सेंटर, जेष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र, बस स्टॉप, भाजी मंडई, बँक तसेच ६ बालवाडी आहेत. या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान मुले, महिला, दिव्यांग नागरिक व जेष्ठ नागरिकांची या चौकात मोठी वर्दळ असते. वाहने देखील वेगाने ये जा करतात. परिणामी अपघाताच्या शक्यता टाळण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी योग्य खबरदारी घेत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्दळीच्या या चौकात नागरिक, लहान बालके, महिला, वयोवृद्ध यांचे चालणे सुरक्षित झाले असल्याचे, डॉ. धेंडे यांनी सांगितले. (PMC Pune)

पुणे वाहतुक अतिरिक्त पोलिस आयुक्त मुल्ला सय्यद म्हणाले की, नागरिकांना वाहतूक शिस्त लागणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती करायला पाहिजे. बालवाडीपासूनच मुलांना वाहतूक शिस्त, नियम या बाबत माहिती देणे गरजेचे आहे. जेणेकरून ते या बाबत सतर्क होतील आणि वाहतूक शिस्त पाळणारे जबाबदार नागरिक देखील तयार होतील असे सय्यद म्हणाले.

चौकात या सुविधा असणार –

हा चौक बालस्नेही चौक म्हणुन विकसित करावा, यासाठी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे पाठपुरावा केला. प्रभागामधील सर्व नागरिकांच्या सहभागाने हा चौक विकसित करण्यात आला. यामध्ये पदपथ, रंगीत वाहतुक दिशादर्शक फलक, वाहतुकीचे माहिती फलक, लहान मुलांना बसण्याची व्यवस्था, नागरिकांना चालण्यासाठी पर्यायी मार्ग, रिक्षा व बस स्टैंडला राखीव जागा असे अनेक उपाय करण्यात आले आहेत.