Corona influence on Municipal Elections | कोरोनाचा महापालिका निवडणुकीवर प्रभाव!  

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

कोरोनाचा महापालिका निवडणुकीवर प्रभाव!  

: सरकार  निवडणूक आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करू शकते 

 

महापालिका निवडणुका घेण्याबाबत पुन्हा अडचण उभी राहिली आहे. निवडणूक घेण्याबाबत सातत्याने प्रश्न निर्माण होत आहेत. इतके दिवस obc आरक्षण आणि आता राज्यात कोरोना (Corona) रुग्णांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका (local body elections) पुढे ढकलण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्येत वाढ सुरूच राहिल्यास निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला (Election Commission)  करण्याबाबत राज्य सरकार विचार करेल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)  यांनी दिली.


राज्यात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट पसरले  आहे. पुढचे आठ ते दहा दिवस रुग्णसंख्येत वाढ सुरू राहिल्यास निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जाईल. या निवडणुकांची घोषणाही ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. हा कालावधी अधिक असला तरी, काही परिस्थिती ओढवली तर निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती करावी लागेल. तसेच निवडणुका टाळता येतील का, याबाबत विचार करावा लागेल, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रभागात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. याचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारला देखील याची चिंता वाटत आहे. त्यामुळे सरकार निवडणूक आयोगाला विनंती करू शकते. मात्र यामुळे पुन्हा इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जाणार आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.