VIkas Dhakane PMC | पुण्याच्या विकासासाठी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासारखे अधिकारी पुणे महापालिकेत राहणे गरजेचे! 

Categories
Breaking News PMC social पुणे

VIkas Dhakane PMC | पुण्याच्या विकासासाठी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासारखे अधिकारी पुणे महापालिकेत राहणे गरजेचे!

VIkas Dhakane PMC – (The Karbhari News Service) – पुणे शहर जसं वाढत चाललंय, तसं इथल्या समस्या देखील वाढत चालल्या आहेत. खासकरून पायाभूत सुविधा मिळण्यासाठी नागरिकांना झगडावे लागते. यात महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) महत्वाची भूमिका बजावते. महापालिकेत त्यासाठी सकारात्मक आणि शहर हित जोपासणारे अधिकारी हवे आहेत. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांच्या रूपाने तसा अधिकारी पुणे महापालिकेला मिळाला. मात्र राज्य सरकारला कदाचित  पुण्याचा विकास नको झाला असेल तर त्यामुळे ढाकणे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची कालावधी पूर्ण होण्याआधीच बदली होतीय. दुसरीकडे 4 वर्ष म्हणजे कालावधी उलटून देखील लवकर बदली केली जात नाही. मात्र शहराच्या विकासाला हितकारक असणारे बदलले जाताहेत. राज्य सरकारच्या या धोरणाचा पुण्यातील नागरिकांकडून विरोध केला जातोय. विकास ढाकणे यांची बदली करू नये. याबाबत शहरातून मागणी होतेय. सरकार यात काही सकारात्मक विचार करणार आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. (Pune PMC News)

पुण्यातील वाहतुकीची समस्या मार्गी लागतेय!

पुणे शहर वाहतुकीच्या समस्येने ग्रस्त आहे. महापालिका दरवर्षी करोडो रुपये खर्च करते, असे असताना देखील म्हणावी तेवढी ही समस्या सुटत नव्हती. विकास ढाकणे यांनी पदभार हाती घेतल्यांनंतर त्यांच्याकडे महापालिकेच्या एकूण 28 खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यात पथ विभाग हा प्रमुख विभाग होता. ढाकणे यांनी यात लक्ष घातल्यापासून शहरात खूप सकारात्मक बदल घडू लागले. कात्रज कोंढवा रस्त्याची समस्या, मुंढवा चौकातील समस्या, हडपसर, बाणेर, पाषाण, सातारा, नगर रोड सारखे वाहतुकीच्या समस्येने ग्रस्त झालेले रस्ते ढाकणे यांनी केलेल्या कामाने मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. शहरात प्रमुख 15 रस्त्यांची कामे हातात घेण्यात आली आहेत. यामुळे शहरातील रहदारीची समस्या चांगल्या पद्धतीने सुटणार आहे. मात्र ढाकणे यांच्या बदलीने हे काम अर्धवटच राहील की काय, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
ढाकणे यांच्या कालावधीतच पुणे महापालिकेच्या शाळांना पुरस्कार मिळाले. महापालिकेच्या शाळा आदर्श करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्याचप्रमाणे शहरातील नाट्यगृहे आणि सांस्कृतिक ठिकाणे अद्ययावत कशी होतील, यावर त्यांनी भर दिला. शहराचा विकास म्हणजे दुसरे काय असते? यात सुधारणा घडणे गरजेचे असते. तेच काम ढाकणे चांगल्या पद्धतीने करत होते. मात्र राज्य सरकारला पुण्याचे हे सुख पाहवत नाही की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.
The Karbhari - Vikas Dhakane

– कोण आहेत विकास ढाकणे?

भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील अधिकारी विकास ढाकणे यांची मागील 2 वर्षापुर्वी महापालिकेत नियुक्ती करण्यात आली.   ते सिव्हिल सर्व्हिसेसचे 2008 बॅचचे अधिकारी आहेत.  पीएचडी व्यतिरिक्त त्यांनी एम.ए. (अर्थशास्त्र), बी.एसी.  (कृषी), आणि एल. एल. बी. पदवी प्राप्त केली आहे.
या अगोदर ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्री यांचे विशेष कर्तव्य अधिकारी म्हणूनही काम केले आहे.
     ढाकणे यांना विविध प्रशासकीय पदांवर काम करण्याचा मोठा अनुभव आहे.  त्यांच्या सेवेत त्यांनी भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्र्याचे खाजगी सचिव म्हणून काम केले आहे आणि रेल्वेच्या मुंबई, अहमदाबाद, पुणे, सोलापूर विभागांवर सहायक आणि विभागीय सुरक्षा आयुक्त या पदांवर उत्कृष्ट काम केले आहे.
 त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल, त्यांना 2014, 2018 आणि 2019 मध्ये महासंचालक पदक (DG )  पुरस्कार आणि 2021 मध्ये ‘राजीव गांधी प्रशासकीय उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. राजपथ, दिल्ली  येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये त्यांनी परेड कमांडरचा सन्मान पटकावला आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट प्रोबॅशनरी अधिकारी पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
 वाचन, ट्रेकिंग आणि दिग्दर्शन ही त्यांची विशेष आवड आहे. त्यांनी आत्तापर्यंत पाच नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.याशिवाय विद्यापीठ स्तरावर ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

– पुणे आणि आपल्या कारकिर्दी बाबत ढाकणे यांच्या या आहेत भावना

बदली रद्द होईल नाही होईल पण सगळ्यांचे प्रेम बघून मन खूप भरून आले. रस्ते, शाळा, हॅास्पिटल, क्रीडांगणे, उद्याने,ॲाडिटोरियम यांचा खूप विचारपूर्वक योजनाबध्द कार्यक्रम हाती घेतला होता. काल ॲाफीस झाल्यावर संध्याकाळी सावरकर भवनला भेट दिली. २ नवीन कोर्ट PMC ला मिळतील असा मा न्यायाधीश, उच्च न्यायालय यांचा शब्द रविवारी घेतला होता. तिथे नियोजन केले. नंतर बालगंधर्वला गेलो. इतका सुंदर कायापालट होतोय पाहून खूप आनंदी होतो. VIP room,make up room, नवीन पडदा, लाईट्स, साऊंड खूप बरं वाटलं. VIP room मध्ये बालगंधर्वला आतापर्यंत झालेल्या महत्वाच्या अविस्मरणीय प्रसंगांचं कोलाज करायचं ठरलं.टीव्हीची साईज,मेक अप रूम मध्ये स्टेजवरचं लाईव्ह प्रक्षेपण,प्रत्येक रूममध्ये 5 star हॅाटेलसारखं पासवर्ड/कार्ड लॅाक,गोदरेज तिजोरी,AC चे मॅाडेल अगदी कोहलर/टोटो चे टॅायलेट फिटींग्स लागतायेत.
घरी आलो तर बदलीची ॲार्डर.
असो सरकारी नोकरी म्हणजे हे सगळं आलंच.
ईश्वराने  MPSC नंतर UPSC त उत्तीर्ण केलं हाच खूप मोठा आशीर्वाद. जिकडे बदली मिळेल तिकडे जाऊ. पोलीस, रेल्वे, केंद्रीय मंत्रालय, राज्य मंत्रालय, PCMC, PMC सगळीकडे खूप काही करायलामिळालं. सर्वोत्कृष्ट परिक्षाधीन अधिकारी पासून, तीन वेळेस केंद्रीय मंत्रालयाच्या पुरस्कारापासून तर महाराष्ट्र शासनाचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रथम पुरस्कार सगळे काही मिळाले. चांगले वरिष्ठ भेटले.
पुण्यात घर आहे. कुठेही गेलो तरी पुण्यासाठी काम चालूच ठेवू. जिकडे जाऊ तिकडे सिस्टीम आणि आपला देश चांगला करण्याचा प्रयत्न करू.

Pune Pustak Mahotsav Record | भारताने चीनचा रेकॉर्ड मोडला

Categories
Breaking News cultural Education PMC social देश/विदेश पुणे

Pune Pustak Mahotsav Record | भारताने चीनचा रेकॉर्ड मोडला

| पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावाने

 

Pune Pustak Mahotsav Record | पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (National Book Trust) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या शनिवारी १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव (Pune Book Festival) होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने पुणे महापालिकेने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर (S P College Ground) गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या ‘ पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या ‘ या उपक्रमात तीन हजार ६६ पालकांनी सहभागी होत, त्यांनी आपल्या पाल्यांना सलग चार मिनिटे गोष्ट सांगितली. ही गोष्ट पूर्ण होताच पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगण्याचा चीनचा रेकॉर्ड (China Record) मोडत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर गीतांवर आनंदोत्सव साजरा झाला. (Pune Book Festival Record)

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उद्योजक जय काकडे, ॲड. एस. के. जैन, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, न्यासाचे संचालक युवराज मलिक, अभिनेत्री प्राजक्ता माळी, संयोजक राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसेनजित फडणवीस, राहुल पाखरे, भाग्यश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.

वाचन संस्कृतीचा चालना देण्यासाठी गुरुवारी सकाळपासून स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आले. साधारण दहाच्या सुमारास तीन हजार २०० पेक्षा अधिक पालक आणि त्यांच्या पाल्यानी सहभाग नोंदवला. या सहभागी झालेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना क्षिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या निसर्गाचा नाश करू नका या पुस्तकातील धड्याचे सलग तीन मिनिटे वाचन केले. यावेळी गिनेस बुक रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी ‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या’ हा नवा विश्वविक्रम भारताच्या नावाने प्रस्थापित केल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला. या विश्व विक्रमानंतर पालक आणि मुलांनी वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोख पद्धतीने केले. या संपूर्ण उपक्रमाला उद्योजक सूर्यकांत काकडे यांचे सहकार्य लाभले. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन करीत, त्यांना वाचन करण्याची प्रेरणा दिली. यावेळी चैतन्य कुलकर्णी यांनी मराठी गीतांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

अन चीनचा रेकॉर्ड मोडला

पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या हा विश्वविक्रम यापूर्वी चीनच्या नावावर होता. चीनमध्ये साधारण आठ वर्षांपूर्वी दोन हजार ४७९ पालकांनी एकाचवेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या. त्यानंतर आज स. प. मैदानावर तीन हजार ६६ पालकांनी एकत्रित येत, आपल्या आपल्या पाल्यांना निसर्गाचा नाश करू नका हा धडा वाचला आणि विश्वविक्रमाला गवसणी घातली.

Urban 95 | PMC Kids Festival | उद्यापासून पुणे महापालिकेचा बालोत्सव! | सारस बागेत 4 दिवस मुलांसाठी गमती जमती

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Urban 95 | PMC Kids Festival | उद्यापासून पुणे महापालिकेचा बालोत्सव! | सारस बागेत 4 दिवस मुलांसाठी गमती जमती

Urban 95 | PMC Kids Festival |  | पुणे महापालिकेच्यावतीने (Pune Municipal Corporation) येत्या १४ ते १७ डिसेंबर दरम्यान सारसबागेमध्ये शिशुगटातील अर्थात सहा वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी बालोत्सवाचे (Kids Festival) आयोजन करण्यात आले आहे. वॅन लिअर फाउंडेशन या स्वंयसेवी संस्थेच्या सहकार्याने आयोजित या बालोत्सवामध्ये विविध खेळ, कला, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून मुलांचे आरोग्य,आहार आणि कौशल्य विकासासाठी पालकांसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शन वर्गाचे देखिल आयोजन करण्यात आले आहे. या बालोत्सवामध्ये पालकांनी आपल्या सहा वर्षांपर्यंतच्या पाल्यांसह मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांनी केले आहे. (Urban 95 | PMC Kids Festival )

महापालिकेच्यावतीने बालोत्सव आयोजित करण्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी पाच विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. यंदा सारसबागेमध्ये सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हा उपक्रम होईल. या उपक्रमाअंतर्गत मुलांसाठी जादुचे खेळ, ओरिगामी, बाहुल्यांचा खेळ, मातीची भांडी बनविणे, वाळूतील खेळ, चित्रकला यासोबतच मुलांमध्ये कलात्मकता आणि कल्पनाशक्ती वाढविण्यासाठी खेळांतून विकासाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहेत. तसेच पालकांसाठी बालविकासाबदद्दल व प्रतिसादात्मक पालकत्वाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. (Pune Balotsav PMC)

या उपक्रमासाठी शहरातील अंगणवाड्या आणि बालवाड्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.  तसेच यंदा प्रथमच गतीमंद मुले आणि त्यांच्या पालकांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. लहान मुलांचे कान, डोळे आणि ह्दयविकाराच्या आराजांबद्दल सल्ला आणि पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन आणि प्रत्यक्षात मदत करण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित रुग्णालयांतील तज्ज्ञही याठिकाणी उपस्थित राहाणार आहेत. या उपक्रमात नागरिकांनी आपल्या सहा वर्षापर्यंतच्या पाल्यासह आवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन ढाकणे यांनी केले आहे. (PMC Pune News)

——

PMC Pedestrian Day | पुणे महापालिकेकडून सलग तिसऱ्या वर्षी पादचारी दिन साजरा

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pedestrian Day | पुणे महापालिकेकडून सलग तिसऱ्या वर्षी पादचारी दिन साजरा

 

PMC Pedestrian Day | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) पादचारी दिवस (Pedestrian Day) हा अभिनव उपक्रम देशात राबवणारी पहिली महापालिका आहे.  यंदा देखील पादचारी दिनाचे तिसरे वर्ष साजरा करण्यात आले. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC Pune News)

पुण्यातील प्रतिष्ठित लक्ष्मी रस्ता या दिवशी वाहन विरहित करण्यात आला. नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती चौक हा रस्ता वाहनांना बंद करून फक्तं पादचारी करण्यात आला. या शिवाय पुणे शहरातील १०० चौक देखील पादचारी सुरक्षा निश्चित करण्यात आले. आज पुणे महापालिकेच्या पथ विभागाने दर वर्षी प्रमाणे हा उपक्रम यशस्वी करून दाखवला. पथ विभागाने केलेल्या योजना व मागील पाच वर्षात केलेली कामे यंदा प्रदर्शित करण्यात आली. पदपथ नियोजन करताना महत्त्वाचे मापदंड यावेळी प्रदर्शित करण्यात आले , परिसर संस्थेच्या मार्फत सार्वजनिक व शाश्वत वाहतुक याचे महत्व,  सेव किड्स फाऊंडेशन तर्फे लहान मुलांसाठी रस्ते सुरक्षा कार्यशाळा , एकांश ट्रस्ट तर्फे विकलांग अपंग लोकांसाठी जनजागृती कार्यशाळा , साथी हाथ बढाना संस्थेचे मानसिक आरोग्य या विषयी पथनाट्य,  sptm मार्फत झेब्रा वेषभूषा करून  रस्ते सुरक्षा बाबत प्रबोधन असे उपक्रम होते.

त्र्यंबकेश्वर संस्थेतर्फे मर्दानी खेळ , रस्ता Jammers तर्फे संगीत इत्यादी मनोरंजन उपक्रम होते. आज महामेट्रोने ई-स्कुटी  ही विद्युत वाहन मेट्रोपासून घरापर्यंत प्रवासासाठी उपलब्ध केले तसेच पीएमपीएमएल ने जादा बसचे नियोजन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे मा. श्री विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) यांच्या हस्ते झाले व पथ विभागाचे मा. मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर अणि मा. अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, माजी मुख्य अभियंता (पथ विभाग) व्ही. जी. कुलकर्णी तसेच पर्यावरण विभागाचे प्रमुख मा.माधव जगताप उपस्थित होते.  लक्ष्मी रस्ता व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष श्री फत्तेचंद रांका , पथारी संघटनेचे श्री. रवींद्र माळवदकर व श्री. शंके हे  उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचा  सामान्य लोकांनी आनंद घेतला.

Katraj Zoo Online Ticket | आता कात्रज झू मध्ये तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाही | घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट

Categories
Breaking News Education PMC social पुणे

Katraj Zoo Online Ticket | आता कात्रज झू मध्ये तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाही | घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट

| प्राणी संग्रहालयाचे स्वतंत्र पोर्टल सुरु

Katraj Zoo Online Ticket | पुणे | महापालिकेचे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र (Rajiv Gandhi Zoological Park and Wildlife Research Center) अर्थात कात्रज झू पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे कधी कधी नागरिकांना तिकिटासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. हे टाळण्यासाठी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) प्राणी संग्रहालयासाठी स्वतंत्र पोर्टल (Katraj Zoo Portal) सुरु केले आहे. या माध्यमातून नागरिक आता घरबसल्या ऑनलाईन तिकीट काढू शकतात. या प्रणालीचे आजच अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. अशी माहिती उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे (Garden Superintendent Ashok Ghorpade) यांनी दिली.
कात्रज परिसरात पुणे महापालिकेच्या (PMC Pune) वतीने राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र निर्माण केले आहे. वाघ, सिंह, चित्ता, कोल्हा पासून ते सर्व प्रकारचे पक्षी, प्राणी, साप या संग्रहालयात आपल्याला पाहायला मिळतात. हे पाहण्यासाठी महाराष्ट्र भरातून लोक येत असतात. यात शाळांच्या सहलीचे प्रमाण देखील असते. शनिवार, रविवार किंवा इतर सुट्टीच्या दिवशी झू मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. जवळपास 10 हजार नागरिक एका दिवशी भेट देतात. महापालिकेने तिकिटाचे काउंटर देखील वाढवले होते. तरीही नागरिकांना तिकिटासाठी बराच काळ रांगेत उभे राहावे लागते. याबाबत तक्रारी देखील येत होत्या. त्यामुळे याबाबत प्रशासनाने पुढाकार घेत तिकीटाची प्रणाली ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्वतंत्र पोर्टल चे काम पूर्ण करण्यात आले असून त्याचे आज उदघाटन झाले.
घोरपडे यांनी सांगितले कि, दरम्यान ही प्रणाली ऑनलाईन झाली असली तरी तिकिटाचे दर मात्र पाहिल्यासारखेच असणार आहेत. त्यात कुठलाही बदल नाही. प्रौढ व्यक्तींना 40 रुपये, मुलांना 10 रुपये, परदेशी नागरिकांना 100 रुपये असे तिकिटाचे दर आहेत. तर video कॅमेरा साठी 200 आणि स्टील कॅमेरा साठी 50 रुपये असा दर आहे.
दरम्यान या ऑनलाईन प्रणालीचे काम Stark Digital Media Services Pvt. Ltd या कंपनीकडून करण्यात आले आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
—-
ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. पूर्वी नागरिकांचा रांगेत वेळ जात होता, तो वेळ आता वाचणार आहे. त्यामुळे  नागरिकांनी आता या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
अशोक घोरपडे, उद्यान अधिक्षक, पुणे महापालिका. 

Additional commissioner Vikas Dhakne | भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या मदतीने विकास ढाकणे यांना पुणे मनपात येण्याची मिळाली संधी!

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या मदतीने विकास ढाकणे यांना पुणे मनपात येण्याची मिळाली संधी!

पुणे : महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) अतिरिक्त आयुक्तपदी रुजू झालेले विकास ढाकणे (Additional commissioner Vikas Dhakne) यांची आता पुणे महापालिकेत (PMC Pune)  अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील एका बड्या नेत्याने मदत केल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. पुणे महापालिकेत येण्यासाठी बरेच अधिकारी इच्छुक असतात. (pune municipal corporation)

विकास ढाकणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या मदतीने एकहाती कारभार चालवला होता. महाविकास आघाडीतील नेत्यांना पुरक भूमिका घेतल्यामुळे ढाकणे भाजपाकडून ‘लक्ष्य’ झाले होते. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर ढाकणे यांची बदली झाली. त्यांना काही काळासाठी रेल्वे सेवेत (IRPFS) काम करण्याचे आदेश देण्यात आले होते.

दरम्यान, पुणे महापालिकामधील तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खेचाखेची सुरू असतानाच राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्त म्हणून भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे यांची नियुक्ती केली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त विलास कानडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर वर्णी लागण्यासाठी महापालिकेतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली होती. यामध्ये प्रतिस्पर्धी अधिकाऱ्याचा स्पर्धेतून पत्ता कट करण्यासाठी विविध पर्यायांचा वापर केला. या पदावर नेमकी कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता असताना, राज्य शासनाने महापालिकेचे तिसरे अतिरिक्त आयुक्त म्हणून भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश राज्य नगरसचिव विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी काढले आहेत. या प्रक्रियेत पुणे जिल्ह्यातील भाजपाच्या एका बड्या नेत्याने ढाकणे यांना मदत केल्याचे सांगण्यात येत आहे.