Vadgaon Sheri Citizen Forum | विमाननगर एअरपोर्ट रोडवर अशास्त्रीय पद्धतीनं चौकात सर्कल उभे केल्याने अपघाताला निमंत्रण  | वडगाव शेरी नागरिक मंचाकडून तक्रार 

Categories
Breaking News PMC social पुणे

विमाननगर एअरपोर्ट रोडवर अशास्त्रीय पद्धतीनं चौकात सर्कल उभे केल्याने अपघाताला निमंत्रण

| वडगाव शेरी नागरिक मंचाकडून तक्रार

पुणे | पुणे महापालिकेकडून शहरात G 20 परिषदे निमित्त काही कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत.  अशास्त्रीय पद्धतीने विमाननगर एअरपोर्ट समोरील सिम्बायोसिस चौकात सर्कल व कारंजे उभे केलेले आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते आहे. अशी तक्रार वडगाव शेरी नागरिक मंचाच्या आशिष माने महापालिकेकडे केली आहे.

माने यांच्या तक्रारी नुसार रस्त्याच्या मधोमध हे सर्कल मांडलेले असून त्याचा व्यास अंदाजे १० ते१२ फूट आहे. अपघाताला निमंत्रण देणारं हे सर्कल आहे. मोठ्या गाड्या जसे कि ट्रक वगैरे वळताना त्यांना अडचण होत आहे. सरळ चाललेल्या गाड्या या सर्कलच्या किनाराला धडकण्याची शक्यता वाहनचालकांना वाटत असल्याने वेग शिथिल होऊन येथे वाहतूक कोंडी होत आहे.

माने पुढे म्हणाले, वाहतूक पोलिसांना याबाबत विचारात घेतलेले नाही. पथ विभागाच्या अधिका-यांना चौकशी केली असता त्यांनीही हात वर केले. पथ विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता संजय धारव यांना विचारले असता हे सर्कल उभे करताना आम्हाला कसलीही विचारणा केली नाही व आमचा अभिप्राय घेतला नाही असे उत्तर त्यांनी दिले आहे. हे सगळे अनाकलनीय व नियमबाह्य आहे. असे माने यांनी म्हटले आहे.  या सर्कलमुळे अपघात झाला तर पुणे मनपा आयुक्तांच्या विरोधात FIR करायची का? आम्हाला याचे उत्तर हवंय. या सर्कलमुळे वाहतूक कोंडी तर होतोयच परंतू वाहनचालक गोंधळूनही जात आहेत.
हे सर्कल जर पुढच्या दोन दिवसांत काढले नाही तर आम्ही येथे आंदोलन करू यासाठी हे पत्र देत आहे. आपण गंभीरपणे दखल घ्यावी. असा इशारा माने यांनी दिला आहे.