MLA Sunil Tingre Vs Jagdish Mulik | निष्क्रिय मुळीकांना 2019 लाच वडगावशेरीकरांनी जागा दाखविली | आमदार सुनिल टिंगरेंचे प्रत्युत्तर

Categories
Breaking News PMC Political पुणे

निष्क्रिय मुळीकांना 2019 लाच वडगावशेरीकरांनी जागा दाखविली

| आमदार सुनिल टिंगरेंचे प्रत्युत्तर

पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांनी 2019 लाच जगदिश मुळीकांना घर पाठवून ते किती निष्क्रिय आहेत हे दाखवून दिले आहे. मोदी लाटेतही त्यांना निवडून येता आले नाही. आता माझ्या कामांचा धडका पाहून आता मुळीकांच्या पायाखालची वाळू सरकरली आहे असे प्रतिउत्तर आमदार सुनिल टिंगरे यांनी दिले आहे.

मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार सुनिल टिंगरे यांनी महापालिका भवनासमोर केलेल्या उपोषणावर मुळीक यांनी टिका केली होती. त्यावर उत्तर देताना आमदार टिंगरे म्हणाले, राजकिय आरोप न करता केवळ मतदारसंघातील प्रश्नांसाठी मी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. मात्र, या उपोषणाला केवळ मतदारसंघातूनच नाही तर शहरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मुळीक़ घाबरून गेले. खर तर पाच वर्ष ते आमदार होते. महापालिकेत त्यांची एकहात्ती सत्ता होती. असे असताना त्यांना हे प्रश्न सोडविता येऊ शकले नाही. मी विरोधी पक्षात असून मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी आणला आहे. प्रमुख प्रश्न मार्गी लागत आहे. त्यामुळे घाबरलेल्या मुळीकांनी निरर्थक पोपटपंची केली आहे.

Pune Fire | नगर रस्ता,वडगाव शेरी येथील भंगार मालाच्या गोडाउनला भीषण आग

Categories
Breaking News social पुणे

नगर रस्ता,वडगाव शेरी येथील भंगार मालाच्या गोडाउनला भीषण आग

पुणे – आज दुपारी  नगर रस्ता, वडगाव शेरी, सोपान नगर येथे एका भंगारच्या गोडाऊनला आग लागली असल्याची वर्दि दलाच्या नियंञण कक्षात मिळताच व नागरिकांचे सतत फोन येत असल्याने प्रथम येरवडा व धानोरी अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन व एक टँकर रवाना करण्यात आला. त्याचवेळी वर्दिवर पोहोचताना अधिकारी सुभाष जाधव यांनी दुरूनच मोठा धूर पाहत अतिरिक्त फायरगाडी व टँकरची मागणी करताच नायडू, हडपसर तसेच पीएमआरडीए आणि दलाचे व महापालिकेचे वॉटर टँकर अशी एकुण सुमारे १५ वाहने व ०८ अग्निशमन अधिकारी व जवळपास ५० ते ६० जवान दाखल होते.

घटनास्थळी पोहोचताच आग भीषण स्वरुपात असल्याचे निदर्शनास येताच दलाच्या जवानांनी होज पाईप वापरत पाण्याचा मारा सुरू केला. त्याचवेळी अग्निशमन अधिकारी यांनी आगीमधे कोणी आत अडकले आहे अथवा कसे याची चौकशी करत खाञी केली असता कोणी नसल्याचे समजले. त्या ठिकाणी सुमारे ६,००० स्केवर फुट व शेजारीच ४,००० स्केवर फुट जागेत पञ्याच्या शेडमधे उभारलेले हे भंगार मालाचे गोडाउन असल्याने जवानांनी घन, पोगर, कटर व इतर अग्निशमन उपकरणांचा वापर करीत पञा काढत आतमधे प्रवेश करुन आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. सुमारे तासाभरा नंतर दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणत शेजारी जवळच असलेली पञ्याची शेडची काही घरे व दुकाने यांना आगीच्या ज्वाळांपासून वाचविले व मोठा धोका टाळला. या गोडाऊधमनमधे छोटे व मोठे असे एकुण ०८ ते १० सिलेंडर ही फुटले. घटनास्थळी जेसीबी यांची मदत घेत जळालेला माल आजुबाजूला करीत पाणी मारत आग पुर्ण विझवली. शेजारील पाण्याच्या हौदातून पंपाच्या साह्याने पाण्याचा उपसा केला. सदर ठिकाणी कोणीही जखमी नसून जिवितहानी नाही याची खाञी केली.

या कामगिरीत दलाचे वरिष्ठ अधिकारी रमेश गांगड, गजानन पाथ्रुडकर, विजय भिलारे, सुभाष जाधव व पीएमआरडीएचे विजय महाजन व इतर जवानांनी सहभाग घेतला.

—-

“भंगार साहित्या मध्ये बरेचसे सिलेंडर होते ज्यांच्या स्फ़ोट होता त्या मुळे अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती अशा वेळेस अग्निशमन दलाने अतिशय कौशल्यपूर्ण परिस्थिती हाताळून आगीवर नियंत्रण मिळवले “

| देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी

MLA Sunil Tingre | Porwal road | अखेर पोरवाल रस्त्यांच्या पर्यायी रस्त्यांचा मार्ग मोक़ळा | आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

Categories
Breaking News PMC Political social पुणे

अखेर पोरवाल रस्त्यांच्या पर्यायी रस्त्यांचा मार्ग मोक़ळा | आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

|  मार्थोपोलिस शाळेची जागा देण्यास मंजुरी

पुणे | वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पोरवाल रस्त्याला आखण्यात आलेल्या समातंर 24 मीटर रुंदीच्या नविन पर्यायी रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या रस्त्यासाठी मार्थोपोलिस शाळेने जागा देण्यास बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता या रस्त्याचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार सुनिल टिंगरे यांनी दिली.

धानोरी-लोहगाव येथील पोरवाल रस्ता परिसरात  गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहिले आहेत. या भागाला जाणारा पोरवाल रस्ता हा एकमेव रस्ता असल्याने वाहतुक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली होती. त्यावर मार्ग काढण्यासाठी स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांनी पोरवाल रस्त्याला समांतर असा कलम 205 अंतर्गत पर्यायी सुधारित रस्त्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला होता. मात्र, त्यावर कार्यवाही होत नसल्याने आमदार टिंगरे यांनी मार्च महिन्यात उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने धानोरी स. न. 12, 14, 15 व 17 मधून 24 मीटर रुंदीचा रस्ता कलम 205 अन्वये रस्ता आखण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा व मुख्यसभेत तातडीने मंजुर करण्यात आला होता. मात्र, पर्यायी रस्त्यांवर असलेल्या मार्थोपोलिस या शाळेच्या परिसरातील जागा मिळत नसल्याने या रस्त्याचे काम रखडले होते. दरम्यान गत महिन्यात आमदार टिंगरे यांनी या शाळेचे पदाधिकारी व आयुक्त यांची एकत्रित बैठक घेऊन जागा हस्तांतरीत करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने शाळेला पत्र पाठविले होते. त्यावर शाळेने रस्त्यासाठी आवश्यक असलेली जागा देण्यास बुधवारी मंजुरी दिली असल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले. त्यामुळे आता या नविन रस्त्यांच्या कामाला तात्काळ सुरवात होऊन पोरवाल रस्त्यांच्या वाहतुक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.
—————————

या रस्त्यांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मी विधानसभा निवडणूकीत दिले होते. त्यानुसार गेल्या तीन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अखेर अनेक अडथळ्यांची शर्यंत पार केल्यानंतर रस्त्यांचा मार्ग सुकर होत असून माझीही आश्वासनपुर्ती होत आहे.
सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.

MLA Sunil Tingre | लोहगाव उपजिल्हा रुग्णालय लवकर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार | आमदार सुनिल टिंगरे यांनी रूग्णालयाच्या कामाची केली पाहणी

Categories
Breaking News PMC Political आरोग्य पुणे

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय लवकर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार

| आमदार सुनिल टिंगरे यांनी रूग्णालयाच्या कामाची केली पाहणी

वडगाव शेरी मतदार संघातील लोहगाव येथे मंजूर असलेले उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगती पथावर आहे. गुरुवारी या रूग्णालयाच्या कामाची पाहणी आमदार सुनिल टिंगरे यांनी केली. अपूर्ण असलेली कामे लवकर पूर्ण करून रूग्णालय लवकरात लवकर नागरिकांसाठी उपलब्ध करण्याची सूचना अधिकार्‍यांना आमदार टिंगरे यांनी केली.
मागील दोन वर्षांच्या काळात रूग्णालयाच्या कामामध्ये गती आली. आमदार सुनिल टिंगरे यांनी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करून जास्तीत जास्ती निधी मिळविला. डिसेंबर अखेर रूग्णालयाचे काम पूर्ण होणार आहे. नागरिकांच्या सेवेमध्ये मार्च २०२३ मध्ये रूग्णालय रूजू होगणार आहे. रूग्णालयाच्या मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाले असून, अंतर्गत सोयी सुविधा व उर्वरीत कामे गतीने पूर्ण केली जात आहेत. आमदार सुनिल टिंगरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रूग्णालयाच्या सुधारित कामांसाठी आणखी २४ कोटी रुपए निधी मंत्रालयातून मिळाला आहे. या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. रूग्णालयाच्या कामाची पाहणी करताना आमदार सुनिल टिंगरे यांच्या सोबत जिला शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, कार्यकारी अभियंता अजय भोसले, उप अभियंता जान्हवी रोडे, तसेच विद्युत विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सुसज्ज रूग्णालयाची गरज लवकरच पूर्ण
आमदार सुनिल टिंगरे यांनी सांगितले कि वडगावशेरी मतदार संघातील नागरिकांना उपचाराकरिता ससून हॉस्पिटल जावे लागत आहे. या परिसरात सरकारी व सर्व सोयींनी युक्त असे हॉस्पिटल उपलब्ध नाही. अनेकदा नागरिकांना खासगी हॉस्पिटलवर अवलंबून रहावे लागत आहे. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन लोहगाव येथे सुसज्ज रूग्णालय बनविले जात आहे. रूग्णालयाचे काम लवकरच पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत येणार आहे. या रूग्णालयामुळे गरीब व गरजवंतांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

MLA Sunil Tingre | सिद्धार्थनगर येथील नागरिकांचा वनवास कधी संपणार ? | सुनील टिंगरे यांचा सवाल | विधानसभेत आमदारांनी प्रश्‍नाला वाचा फोडली.

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

सिद्धार्थनगर येथील नागरिकांचा वनवास कधी संपणार : सुनील टिंगरे

|विधानसभेत आमदारांनी प्रश्‍नाला वाचा फोडली

 
राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान भू-संपादनासाठी आपली घरे तत्काळ खाली करणार्‍या विमाननगर येथील सिद्धार्थनगर मधील नागरिकांची पुणे महापालिका व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून टोलवाटोलवी केली जात आहे. या लोकांना घरे कधी दिली जाणार? असा प्रश्‍न वडगावशेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित केला.
या संदर्भात सुनील टिंगरे यांनी सांगितले कि वर्ष २००८-०९ च्या दरम्यान पुणे शहरात राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणावर मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. त्यामध्ये रस्ते, क्रीडांगण व क्रीडा संकुल यांचा समावेश आहे. यामध्ये लोहगाव एयरपोर्ट से नगररोड दरम्यानच्या रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले. यावेळी पुणे मनपाचे आयुक्त म्हणून प्रविणसिंह परदेशी कार्यरत होते. परदेशी यांच्याकडे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची जवाबदारी देखील होती. विमाननगर येथील सिद्धार्थनगर मधील काही घरे रस्ता रूंदीकरणात बाधा आणत होती. त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन देवून तेथील १३८ घरे व १५ दुकानांची जागा संपादित केली गेली. नागरिकांनी देखील राष्ट्रकुल स्पर्धेसाठी लगेचच आपल्या घरांचा ताबा दिला. त्यानंतर आता १४ वर्षे झाल्यावरण सुद्धा नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले नाही.
पुनर्वसनासाठी येथील नागरिक मनपा आणि झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण दोन्हीकडे हेलपाटे मारत आहेत, परंतु दोघांकडून एक-दूसर्‍याकडे बोटे दाखविली जात आहेत. बाधितांमधील काही लोक दगावली देखील आहेत. भगवान श्रीराम यांचा वनवास देखील १४ वर्षांनंतर संपला होता, या लोकांचा वनवास कधी संपणार? हा प्रश्‍न यावेळी सभागृहात उपस्थित केला. या सर्व लोकांना लवकरात लवकर घरे देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

पर्यायी रस्ता विकसित न केल्याने नागरिकांची अडचण

यावेळी आमदार सुनील टिंगरे यांनी लोहगाव परिसरातील पोरवाल रस्त्याची वाहतूक समस्येचा मुद्दा देखील उपस्थित केला. त्यांनी सांगितले कि अत्यंत रहदारी असणार्‍या पोरवाल रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी दोन-दोन तास नागरिकांना वाहतूक समस्येचा सामना करावा लागत आहे. पोरवाल रस्त्याला दो पर्यायी रस्ते आहेत, परंतु मनपा प्रशासनाकडून संबंधित रस्त्यांना डेवलप न केल्याने नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. आतापर्यंत अनेक समस्या वाहतूक कोंडीमुळे झाल्या आहेत. ट्रैफिक मुळे एक रूग्णाचा मृत्यु झाला आहे तर एक महिलेची रस्त्यावर गाडीमध्ये प्रसूती झाली आहे. चार वर्षोंपूर्वी लोहगावचा मनपा मध्ये समावेश झाला आहे, परंतु येथील समस्या जशाच्या तशा आहेत. रस्ते, पानी, डे्रनेज सगळ्या समस्या आहेत, परंतु ट्रैफिक जामची समस्या तातडीने सोडवून नागरिकांना लवकर दिलासा दिला जावा.

MLA Sunil Tingre : वडगाव शेरीत पुराचे पाणी शिरल्यास थेट अधिकाऱ्यांवर कारवाई : आमदार सुनिल टिंगरे यांचा इशारा

Categories
Breaking News PMC Political पुणे

वडगाव शेरीत पुराचे पाणी शिरल्यास थेट अधिकाऱ्यांवर कारवाई

: आमदार सुनिल टिंगरे यांचा इशारा

: पूरग्रस्त ठिकाणची केली पाहणी.

पुणे :  वडगाव शेरीतील विविध भागात पावसाचे पाणी शिरू नये यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र तरीही यावर्षी  पुन्हा नागरीकांच्या घरात पुराचे पाणी शिरण्याचे प्रकार घडल्यास संबधित महापालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाईची मागणी विधी मंडळात केली जाईल असा इशारा आमदार सुनिल टिंगरे यांनी दिला आहे.
          वडगाव शेरीतील विविध भागात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात सातत्याने पाणी घुसून नागरिकांचे नुकसान होत आहे. महापालिकेकडून तरीही ठोस उपाय योजना होत नाही.  येत्या पावसाळ्यात पुन्हा पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी ज्या जागी पूराचे पाणी जमा होते अशा पूरग्रस्त ठिकाणे आणि नालेसफाईची कामे यांची पाहणि आमदार टिंगरे यांनी महापालिका अधिकारांसमवेत वडगाव शेरीतील विविध भागात प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली. त्यात प्रामुख्याने विमाननगर, शास्त्रीनगर, कल्याणीनगर, सोमनाथनगर, आदर्शनगर, हरीनगर, गार्डेनिया सोसायटी, करण घरोंदा, डाॅन बाॅस्को शाळा, पार्क आयलंड सोसायटी, कल्याणीनगर जाॅगर्सपार्क शेजारील नाळा, आनंदा हायईट्स, थिटेवस्ती, चंदननगर पोलिस स्टेशन, पिट्टी मैदान याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
         यावेळी आमदार टिंगरे यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची कारणे काय आहेत, त्यावर तत्कालीन आणि दीर्घकालीन काय काय उपाययोजना करतील यातील माहिती अधिकार्यनाकडून घेतली. तसेच याबाबत अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी नारायण गलांडे, उषा कळमकर, नाना नलवडे, प्रमोद देवकर, माऊली कळमकर, आशिष माने, निता गलांडे, आनंद सरवदे, अभिजित रोकडे, प्रभा बागळकोटकर, बाबासाहेब गलांडे, मनोज पाचपुते, कुलदीप वर्मा, समीर शेख, मोरेश्वर चांधरे,  पुणे महानगरपालिका मलःनिसरण विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र मुळे, उप अभियंता विनायक शिंदे, कनिष्ठ अभियंता सिध्दाराम पाटील, नगररोड क्षेत्रिय कार्यालयाचे पुणे मनपा सहायक आयुक्त सुहास जगताप,  उप अभियंता व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

Education Committee : PMC : शहर सुधारणा समितीत जाणारा प्रस्ताव शिक्षण समितीत कसा?  : नगरसचिव विभागाचा सल्ला देखील सत्ताधाऱ्यांनी धुडकावला 

Categories
Breaking News PMC Political पुणे

शहर सुधारणा समितीत जाणारा प्रस्ताव शिक्षण समितीत कसा?

: नगरसचिव विभागाचा सल्ला देखील सत्ताधाऱ्यांनी धुडकावला

: स्थायी समिती अध्यक्ष देखील जाऊन बसले शिक्षण समिती बैठकीला

पुणे : वडगाव शेरी (WadgaonSheri) येथील अ‍ॅमिनीटी स्पेसच्या जागेवर एका बांधकाम व्यावसायीकाला शाळा बांधण्याची परवानगी देण्याचा ठराव भाजपने शिक्षण समितीमध्ये बहुमताच्या आधारे मंजुर करून घेतल्याने जोरदार वाद निर्माण झाला आहे. अ‍ॅमिनीटी स्पेस महापालिकेच्या (Pune Corporation) मालकिची असताना व नवीन विकास नियंत्रण नियमावली तिला लागू होत नसताना सर्वसामान्य पुणेकरांच्या हक्काची जागा बिल्डरच्या (Builders in Pune) घशात घातल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप (Corporator Subhash Jagtap) यांनी केला आहे. दरम्यान अशा प्रकारचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीतून मुख्य सभेकडे जाणे अपेक्षित आहे. तसा सल्ला देखील नगरसचिव विभागाने दिला होता. मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावापुढे विभागाचे देखील काही चालू शकले नाही.

: प्रशासनाचा अभिप्राय घेतला नाही

वडगाव शेरी येथील स. नं. १५ येथील अ‍ॅमेनिटी प्लॉट क्र. ३ वर शाळेचे आरक्षण आहे. ही जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे. या जागेवर संबधित विकसक व जागा मालक युका प्रमोटर्स एल. एल. पी. (Yuka Promoters L.L.P.) यांना शाळा बांधण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव ११ फेब्रुवारी रोजी शिक्षण समिती अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर (Corporator Manjushree Khardekar ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत आला होता. त्यावेळी या प्रस्तावावर प्रशासनाचा अभिप्राय घ्यावा असा निर्णय घेण्यात आला.

मात्र, स्वत: शिक्षण समिती अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, उपाध्यक्षा कालिंदा पुंडे आणि नगरसेविका वर्षा साठे (Corporator Sathe Varsha) यांनी त्याच दिवशी या निर्णयाचा फेरविचार करण्याचे पत्र देत १६ फेब्रुवारी रोजी विशेष सभेची मागणी केली. त्यानुसार खर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये बहुमताने संबधित विकसकाला शाळा उभारण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. या प्रस्तावाला राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध केला आहे.

राष्ट्रवादीचा जोरदार विरोध

समितीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य सुभाष जगताप यांनी सांगितले की, या शिक्षण समितीच्या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने हे स्वत: उपस्थित राहीले. तसेच यावेळी बांधकाम विभागाचा एक निरीक्षकही कुठलेही निमंत्रण नसताना उपस्थित राहीला होता. त्याने युनिफाईड डीसी रुल्सनुसार जागा मालक आरक्षण विकसित करू शकतो असे सांगितले.
परंतू ही ऍमेनिटी स्पेस युनिफाईड डीसी रुल्स लागू होण्यापुर्वी महापालिकेच्या ताब्यात आली असल्याने तिला हा नियम लागू होत नाही, असे बैठकीत निदर्शनास आणून दिल्यानंतर सगळेच गप्प झाले. शाळा उभारणे व चालविणे ही महापालिकेची जबाबदारी असताना विकसकालाच कशी चालवायला देणार. अशा पद्धतीने महापालिकेच्या सगळ्या इस्टेट बिल्डर्सच्या घशात जातील, पुणेकरांना सुविधा मिळणार नाहीत हे बैठकीत निदर्शनास आणून दिले. परंतू यानंतरही रासने यांनी मतदान घ्या व बहुमताने प्रस्ताव मंजुर करा असे खर्डेकर यांना सांगितले. खर्डेकर यांनी मतदान घेण्याचे आदेश दिल्यानंतर समितीमध्ये भाजपचे बहुमत असल्याने प्रस्ताव मंजुर करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी विरोधात मतदान केले, असे जगताप यांनी नमूद केले. तर प्रशांत जगताप म्हणाले, ऍमेनिटी स्पेसच्या जागा खाजगी विकसकांच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव आहे. यापुर्वीही त्यांनी ऍमेनिटी स्पेस बड्या लोकांच्या घशात घालण्याची योजना आणली होती. आम्ही तेंव्हा विरोध केला होता.आता तर केवळ बहुमताचा वापर करून त्याला कुठल्याही उपसूचना देऊन शाळा, मैदानांच्या जागा बिल्डरांच्या घशात घातल्या जात आहेत. भाजपच्या या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात येणार आहे.