Water issue of Warje area | वारजे परिसरातील नागरिकांच्या पाणी प्रश्नाबाबत सकारात्मक बैठक   | क्लोजर कमी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आश्वासन

Categories
Breaking News PMC social पुणे

वारजे परिसरातील नागरिकांच्या पाणी प्रश्नाबाबत सकारात्मक बैठक

 | क्लोजर कमी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आश्वासन

पुणे | वारजे परिसरात (Warje Aea) मागील आठवड्यात नागरिकांना पाणी प्रश्नाचा (water problem) चांगलाच सामना करावा लागला. वारंवार घेतल्या जाणाऱ्या क्लोजर मुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागला. याबाबत माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी पुढाकार घेत आणि प्रशासनाला धारेवर धरत प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (PMC additional commissioner) यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. यामध्ये क्लोजर (water closure) कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले. शिवाय ज्यावेळी क्लोजर असेल त्याच्या आधीच नागरिकांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल, असे ही आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले. (Pune Municipal corporation)
मागील काही दिवसापासून वारजे परिसरातील नागरिक पाण्याचा समस्येबाबत त्रस्त आहेत. महापालिकेने गेल्या पंधरा दिवसात दोन गुरुवारी पाणी बंद (closure) ठेवले होते. महापालिकेची system अशी आहे कि संबंधित परिसरात एकदा पाणी बंद ठेवल्यानंतर पुढील तीन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होतो. असे असतानाही इथेच वारंवार closure घेतले जाते. त्यामुळे पाण्याच्या टाक्या बंद राहतात. त्यामुळे पाणी येत नाही. जिथे पाणी येते, तिथे खूप कमी दाबाने पाणी येते. दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांच्या तक्रारी देखील ऐकून घेतल्या जात नव्हत्या. याबाबत माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ चांगल्याच आक्रमक दिसून आल्या. याची दखल महापालिका प्रशासनाला घ्यावी लागली. (warje water problem)
वारजेच्या पाणी प्रश्नाबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे आणि परिसरातील नागरिक यांच्यासोबत बैठक झाली. याबाबत माहिती देताना धुमाळ यांनी सांगितले कि, वारजे परिसरात क्लोजर कमी करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले. तसेच क्लोजर ची सूचना लवकरच देण्याबाबत सूचना करण्यात आली. क्लोजर च्या आधीच काही दिवस टँकरने पाणी पुरवठा करण्याची खात्री देखील अतिरिक्त आयुक्तांनी दिली. परिसरातील नागरिकांना पाणी बिलाबाबत नोटीस देण्यात आल्या होत्या. याबाबत देखील अतिरिक्त आयुक्तांनी आश्वस्त केले कि नागरिकांना नाहक त्रास दिला जाणार नाही. तसेच समान पाणी पुरवठा अंतर्गत जे काम केले जात आहे, ते आगामी 15 दिवसात पूर्ण करून तिथून पाण्याच्या लाईन घेतल्या जातील. जेणेकरून पाणी समस्या कमी होईल. एकूणच बैठक सकारात्मक झाल्याचे धुमाळ यांनी सांगितले. (PMC Pune)

Warje Water Problem | वारजे परिसरातील नागरिकांच्या पाण्याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचा हलगर्जीपणा | माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा आरोप | महापालिकेवर मोर्चा आणण्याचा दिला इशारा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

वारजे परिसरातील नागरिकांच्या पाण्याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचा हलगर्जीपणा

| माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा आरोप 

| महापालिकेवर मोर्चा आणण्याचा दिला इशारा

पुणे | वारजे परिसरात गेल्या तीन दिवसापासून नागरिकांच्या पाण्याबाबत तक्रारी सुरु आहेत. नागरिकांची याबाबत ओरड सुरु आहे. नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. महापालिका पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांवर ही वेळ  आली आहे. असा आरोप माजी विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी केला आहे. आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला तर नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा आणू, असा इशारा धुमाळ यांनी दिला आहे.
याबाबत धुमाळ यांनी सांगितले कि, गेल्या तीन दिवसापासून वारजे परिसरातील नागरिक पाण्याचा समस्येबाबत त्रस्त आहेत. महापालिकेने गेल्या पंधरा दिवसात दोन गुरुवारी पाणी बंद (closure) ठेवले होते. महापालिकेची system अशी आहे कि आमच्या परिसरात एकदा पाणी बंद ठेवल्यानंतर पुढील तीन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होतो. असे असतानाही इथेच closure घेतले जाते. गांधीभवन, एसएनडीटी या पाण्याच्या टाक्या बंद आहेत. त्यामुळे पाणी येत नाही. जिथे पाणी येते, तिथे खूप कमी दाबाने पाणी येते. धुमाळ यांनी सांगितले कि, नागरिकांच्या तक्रारी आम्ही पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना सांगण्यासाठी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते आमचा फोन देखील उचलत नाही. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त देखील आमच्याशी संवाद साधून दखल घेतात. शिवाय स्थानिक अधिकारी देखील सहकार्य करतात, मात्र पावसकर आमच्याकडे फिरकण्यास देखील तयार नाहीत. धुमाळ म्हणाल्या, काही परिसरात टँकरने पाणी पुरवठा होतो, मात्र तो पुरेसा नाही. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर परिसरातील नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा आणू. असा इशारा धुमाळ यांनी दिला आहे.
गुरुवारी एक दिवस पाणी नसेल तर पुढील चार-पाच दिवस आम्हाला अजिबात पाणी येत नाही ….कारण पाण्याला प्रेशर कमी असते व ते उताराने खाली जाते ….काल आज मी पाण्याचे बिसलेरी जार आणून घरात वापरत आहे पिण्यासाठी देखील दोन-तीन हंडे पाणी येत नाही…
– नागरिक
…बरेच दिवस सांगत आहे की वरती जो वाल बसवलेला आहे सरोदे एडगे घराजवळ तो काढून टाकावा किंवा  तो काढून खाली बसवावा ..आम्हाला वरील 10 घराणं 1 वर्ष होऊन गेले पाणी खूप कमी येते…आत्ता पाणी उताराने सर्व खाली जात आहे… कृपया लक्ष लक्ष घालून लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवावा.
– नागरिक
वारजे भागात सलग 3 दिवस पाण्यावाचून नागरिकांचे हाल. सुस्त पाणी पुरवठा यंत्रणा आणि यांना जागे करण्यासाठी कोणीच वाली नसल्यामुळे मागील काही काळा पासून वारजे भगातील नागरिकांचे पाण्यावाचून मोठ्या प्रमाणात हाल चालू आहेत.
– नागरिक

आपण फारच सहनशील आहोत. ठीक आहे एक दिवस पाणी येणार नाही समजू शकतो पण पुढील दोन दिवस पाणी येत नाही हे मात्र योग्य नाही. दर 15 दिवसांनी गुरुवारी पाणी नसते आणि पुढील दोन दिवस पाण्या साठी वणवण करायची. हे नेहमीचेच झाले आहे. आपल्या भागातील नगरसेवक काय करतात?

– नागरिक
—-
तांत्रिक अडचण समजू शकतो पण मग महापालिकेने स्वतःचे टँकर्स पाठवून स्वखर्चाने टाक्या भरून द्याव्यात.
– नागरिक

water closure | गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

Categories
Breaking News PMC social पुणे

water closure |  गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

| शुक्रवारी कमी दाबाने पाणी

पुणे | गुरूवारी  वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, वारजे GSR टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एच.एल.आर टाकी परीसर तसेच नवीन, जुने वारजे जलकेंद्र, गणपती माथा पंपींग,कोंढवे -धावडे जलकेंद्र व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत/ पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्ती व अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी क्लोजरची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने या कालावधीमध्ये मनपाची विविध देखभाल दुरूस्तीची कामे करण्याचे नियोजन असल्याने उपरोक्त
ठिकाणची पंपींग यंत्रणा बंद ठेवावी लागणार असल्याने उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा
पाणीपुरवठा या दिवशी बंद ठेवावा लागणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक ०२/१२/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन मनपा पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर :-
पाषाण साठवण टाकी, भूगावरोडपरिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीन गर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकी परिसर :-
 कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे
सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी
परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य
कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व
वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा
झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियमस्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर :-  बाणेर, बालेवाडी, बार
गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड,
विजयनगर, आंबेडकरन गर, दत्त नगर, इ.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील GSR टाकी परिसर :-
कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम
सोसायटी,शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र.
१ ते १०
एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) :-
गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी.
कोंढवे -धावडे जलकेंद्रः-
वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यु कोपरे.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग :-
मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर,MES,
HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.

Water Closure | Pune | महत्वाची बातमी | गुरुवारी पुणे शहरात पाणी बंद | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

Categories
Breaking News PMC social पुणे

महत्वाची बातमी | गुरुवारी पुणे शहरात पाणी बंद | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

पुणे | येत्या गुरूवारी  महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या. (MSEDCL) यांचे २२०/२२ KV पर्वती सबस्टेशन येथे तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामामुळे पर्वती जलकेंद्र (जुने व नवीन) व अखत्यारीतील पंपींग, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी MLR पंपींग व वडगाव जलकेंद्र येथे देखभाल दुरुस्ती विषयक काम असल्या कारणाने उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच कोथरूड व शिवाजीनगर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून (PMC Water dept) करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती MLR टाकी परिसर :-
गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.
पर्वती HLR टाकी परिसर :-
सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर,पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र,, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी.
पर्वती LLR परिसर –
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर. एस.एन.डी.टी. एम.एल.आर. टाकी परिसर :- एरंडवणा, कर्वेरोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, हैपी कॉलनी, गोसावी वस्ती, मयूर कॉलनी, सहवास सोसा परिसर गिरीजा शंकर विहार, दशभुजा गणपती परिसर,वकील नगर, पटवर्धन बाग, डीपी रोड,गुळवणी महाराज रोड, गणेशनगर, राहुल नगर, करिष्मा सोसा, संगमप्रेस रोड, सिटी प्राईड परिसर, आयडीयल कॉलनी इ.
चतुःश्रृंगी टाकी परीसर :-
औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानाश्री सोसयटी, नॅशनल, सिंध सोसायटी, औंध गाव परिसर.
लष्कर जलकेंद्र भाग :-
लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परीसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.
वडगाव जलकेंद्र परीसर :-
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग वरील भाग, आंबेडकरनगर, टिळेकरनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

Water Closure | सिंहगड रोड, हडपसर परिसरात गुरुवारी पाणी बंद! 

Categories
Breaking News PMC social पुणे

सिंहगड रोड, हडपसर परिसरात गुरुवारी पाणी बंद!

पुणे | गुरूवारी  लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, वडगाव रॉ वॉटर व राजीवगांधी पंपिंग येथील विद्युत/पंपींग विषयक व वितरण विभागाकडील स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

लष्कर जलकेंद्र भाग :-
संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कँन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे संपूर्ण परिसर
वडगाव जलकेंद्र परीसर :-
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर,
धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

Water Closure | pune | गुरुवारी ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार 

Categories
Breaking News PMC social पुणे

गुरुवारी ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे | गुरूवारी वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, वारजे GSR टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एच.एल. आर व एम.एल.आर टाकी परिसर, स्वारगेट पाणीपुरवठा विभाग अखत्यारीतील पर्वती एच.एल. आर टाकी परिसर तसेच नैवीन व जुने होळकर जलकेंद्र, चतुश्रुंगी टाकी परिसर येथील विद्युत/ पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्ती व अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. वारजे जलकेंद्रासाठी म.रा.वि.वि.कं.ली कडून आलेल्या वीजपुरवठया संदर्भात ब्रेकरची कामे म.रा.वि.वि.कं.ली करावायाची असल्याने संपुर्ण जलकेंद्र बंद राहणार आहे. त्यासाठी क्लोजरची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने या कालावधीमध्ये  पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा सदर दिवशी बंद ठेवावा लागणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक ०७/१०/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर :-
 पाषाण साठवण टाकी, भूगावरोडपरिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीन गर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीवन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकी परिसर :- कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर :- 
बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरन गर, दत्त नगर, इ.

Water Closure | Pune | शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

गुरूवार दिनांक २२/०९/२०२२ रोजी पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर, पर्वती LLR षरिसर व चिखली पंपिंग येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे
अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक २३/०९/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

पर्वती MLR टाकी परिसर :-
 गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.
पर्वती HLR टाकी परिसर :-
 सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग – १ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट,
ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स.नं.४२ कोंढवा खुर्द, साईबाबानगर, इत्यादी.
पर्वती LLR परिसर – 
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर.
चिखली पंपिंगवर अवलंबून असणारा भाग-
संजय पार्क, बर्माशेल सोसायटी, पुणे एअरपोर्ट, राजीव गांधी नगर नॉर्थ व साऊथ, यमुनानगर, गणेशनगर (बोपखेल), कळस काही भाग, म्हस्के वस्ती, टिंगरेनगर गल्ली नं.१ ते ६, एकतानगर झोपडपट्टी, सिध्देश्वर, कुमार समृध्दी, प्री पार्क सोसायटी, पराशर सोसायटी, ठुबे पठारे वस्ती, दिनकर पठारे वस्ती इत्यादी.

Water supply shut off | शहरात बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार | शुक्रवारी कमी दाबाने पाणी 

Categories
Breaking News PMC social पुणे

शहरात बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

गुरुवार दिनांक १५/०९/२०२२ रोजी लष्कर जलकेंद्राचे अखत्यारीतील वानवडी ESR व हायसर्व्हिस टाकी तसेच पर्वती जलकेंद्राचे अखत्यारीतील पर्वती HLR येथे व SNDT HLR येथे फ्लो मीटर बसविण्याचे  नियोजन आहे.  त्यामुळे शहरातील पुढीलप्रमाणे परिसर बुधवार दि. १४/९/२०२२ रोजी रात्री १० ते गुरुवार दि. १५/०९/२०२२ रोजी रात्री १० पर्यंत पाणीपुरवठा बंद व शुक्रवार दि. १६/०९/२०२२ रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-

१) वानवडी इ एस आर व हाय सर्विस टाक्याखालील भाग:- 
वानवडी गाव, फातिमानगर, पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचा संपूर्ण भाग, संपूर्ण डिफेन्स एरिया विभागाचा भाग, सोलापूर रोडच्या दोन्ही बाजू रामटेकडी चौकापर्यंत, सोपान बाग, उदय बाग, डोबरवाडी कवडे मळा संपूर्ण परिसर, बी.टी. कवडे रोड व संपूर्ण परिसर, प्रभाग क्र. २५ संपूर्ण परिसर.
२) पर्वती HLR :-
पर्वती HLR, पर्वती गाव, सहकारनगर संपूर्ण, तावरे कॉलनी, आदर्श नगर, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट, वाळवेकर नगर, संतनगर, नव महाराज सोसायटी, सारंग सोसायटी, मित्रमंडळ कॉलनी, पर्वती दर्शन, शिवदर्शन, SBI कॉलनी, अरण्येश्वर, कोंढवा, बिबवेवाडी, अप्पर बिबवेवाडी, मार्केट यार्ड, बिबवेवाडी ओटा, महेश सोसायटी, कात्रज कोंढवा, गंगाधाम परिसर, डायस प्लॉट, महर्षीनगर, सॅलिसबरी पार्क, संदेशनगर, मीरा सोसायटी, ST कॉलनी, स्वारगेट, संभाजीनगर धनकवडी (चव्हाणनगर)
३) सेमिनरी GSR :-
अप्पर, इंदिरानगर, कोंढवा खुर्द, शिवनेरी नगर, कोंढवा गावठाण, स.नं. ३५४, मोरे चाळ, गव्हाणे चाळ, भाग्योदयनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, साईबाबानगर, स.नं. ४२,४३, युनिटी पार्क, ज्ञानेश्वर नगर, सवेरा पार्क परिसर.
४) SNDT (HLR):-
शिवाजीनगर परिसर, भांडारकर रोड,बी.एम.सी.सी. रोड, रेव्हेन्यू कॉलनी,
गोखलेनगर, मॉर्डन कॉलनी, वैदुवाडी, पत्रकारनगर, पांडवनगर, भोसलेनगर, खैरेवाडी, जनवाडी, सेनापतीबापट रोड, कोथरूड (डहाणूकर कॉलनी, तेजसनगर, कोथरूड गावठाण, जोग शाळेजवळील भाग, भेलकेनगर, गुजरात कॉलनी, सुतार दवाखान्या मागील परिसर, गाडवे कॉलनी, परमहंस नगर, सुतारदरा, रामबाग, आनंदनगर, आयडीयल कॉलनी, गुरुराज सोसायटी, इन्कमटॅक्स कॉलनी, वनाज परिसर, रामबाग कॉलनी, केळेवाडी, जय भवानी नगर, किस्किंदा नगर, एम.आय.टी. कॉलेज परिसर, प्रभाग ३१ चा वडार वस्ती, स्टेट बँक नगर, हैप्पी कॉलनी, पृथ्वी हॉटेल परिसर, मेघदूत सोसायटी).

Water Closure | महत्वाची बातमी | पुणे शहरात गुरुवारी पाणी बंद!

Categories
Breaking News PMC social पुणे

महत्वाची बातमी | पुणे शहरात गुरुवारी पाणी बंद!

महापालिकेकडून गुरूवारी शहराच्या महत्वाच्या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.  वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर,गांधी भवन टाकी परिसर, वारजे जीएसआर टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एच.एल. आर व एम.एल.आर टाकी परिसर, पर्वती एमएलआर टाकी परिसर तसेच नवीन व जुने होळकरजलकेंद्र, चतुश्रुंगी टाकी परिसर येथील विद्युत व पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात येणार असल्याने पाणी बंद असणार आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशिरा पाणी कमी दबाने सोडण्यात येणार असल्याने पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग- 
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर :- पाषाण साठवण टाकी, भूगावरोडपरिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीन गर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीवन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड,

गांधी भवन टाकी परिसर – कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर,कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनिय स्कूल, कर्वेनगर गावठाण, कॅनॉल रस्ता परिसर

पॅनकार्ड क्‍लब जीएसआर टाकी परिसर – बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्‍लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईट रोड, विजयनगर, आंबेडकरन नगर, दत्त नगर

वारजे जीएसआर टाकी परिसर –  कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधामसोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. 1 ते 11 , इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. 1ते 10

एस.एन.डी.टी. टाकी परिसर – गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, गोखले नगर मॉडेल कॉलनी संपूर्ण भाग, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, आपटेरोड, घोले रोड, सेनापती बापट रोड, पंचवटी, गणेशनगर, एरंडवणा, कर्वेरोड, युनिव्हरसिटी, खडकी परिसर, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी,

पर्वती टाकी परिसर – गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ

नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग:- मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर

चतुश्रुंगी टाकी परिसर : औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत,संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सिंध सोसायटी, औंध गाव परिसर.