NCP Strike | हक्काच्या पाण्याकरिता स्वारगेट पाणी पुरवठा विभाग येथे राष्ट्रवादीचे उपोषण

Categories
Breaking News PMC Political social पुणे

हक्काच्या पाण्याकरिता स्वारगेट पाणी पुरवठा विभाग येथे राष्ट्रवादीचे उपोषण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्वारगेट पाणी पुरवठा विभाग येथे आज विधान सभा अध्यक्ष संतोष नांगरे यांच्या नेतृत्वाखाली योगेश पवार सुशांत ढमढरे, गणेश दामोदरे, गौरव घुले, आदीसह बेमुदत आमरण उपोषण आज सुरू करण्यात आले.

वारंवार पर्वती जलकेंद्रातून पाणी मुबलक मिळत नसल्यामुळे, पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीची उंची भरत नसल्यामुळे, वीज विद्युत वितरण कडून खंडित वीज पुरवठा होत असल्यामुळे, मुख्य पाईपलाईनचे गेट पडल्यामुळे, तसेच पद्मावती पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा होत नसल्याच्या विविध कारणे रोज अधिकारी देत असल्यामुळे त्याला वैतागून स्थानिक नागरिक, महिला, यांच्यासह पर्वती विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसह उपोषणास सुरुवात झाली.

गेल्या अनेक दिवसांपासून पर्वती मतदार संघातील बिबेवाडी या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा होणाऱ्या सर्वच भागाला पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे विशेष करून प्रभाग क्रमांक जुना 28, 36, 35, 37, 39 या प्रभागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे तर काही ठिकाणी पाणी येत नाही त्याच्या मुळे नागरिक त्रस्त झालेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या संदर्भामध्ये 9 मे 2022 रोजी देखील दोन दिवसांचे उपोषण केलं होतं काही दिवस समस्या सुटल्या परंतु त्या पुन्हा उदभवू लागल्या आहेत. त्याकरिता हे उपोषण सुरु करण्यात आले.

आंदोलनाला दुपारी मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग पुणे शहर अनिरुद्ध पावसकर व त्यांचे खात्याचे संबंधित अधिकारी यांनी आंदोलन स्थळला भेट दिली. तसेच यावेळी नागरिकांनी महिलांनी तसेच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात होणाऱ्या अडचणीचा पाढा त्यांच्यासमोर मांडला व त्यांनी देखील पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या अडचणी, समस्या, त्रुटी येत्या येत्या शनिवार पर्यंत सोडवण्याचे आश्वासन यावेळी दिले. तसे लेखी पत्र उप अभियंता अजित नाईकनवरे व सौ अंजुषा रेड्डी यांनी दिले.

आपण जर दिलेल्या मुदतीत समस्या सोडविल्या नाहीतर अत्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विधासभा अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दिला.

या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, रविंन्द्र माळवदकर , महेश शिंदे, मृणालिनी वाणी, शशिकला कुंभार, विपुल म्हैसूरकर, बाळासाहेब अटल, दिलीप अरुंदेकर, समीर पवार, संजय दामोदरे, विजय बगाडे, राहुल गुंड, सतीश धर्मावत, विनय पाटील, विद्या ताकवले, रुपाली बिबवे, राणी दामोदरे, अमोल ननावरे, लखन वाघमारे, तुषार शेषनाईक, राजेंद्र चोरघे, शंकर सहाणे,प्रतिक कोंडे,अमोल शिंदे, कृणाल गायकवाड, सौरभ माने, संतोष पोले, अविनाश शिखापुरे , अमोल परदेशी, संदेश नाक्ते आदी पदाधिकारी व महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते

Water issue of Warje area | वारजे परिसरातील नागरिकांच्या पाणी प्रश्नाबाबत सकारात्मक बैठक   | क्लोजर कमी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आश्वासन

Categories
Breaking News PMC social पुणे

वारजे परिसरातील नागरिकांच्या पाणी प्रश्नाबाबत सकारात्मक बैठक

 | क्लोजर कमी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आश्वासन

पुणे | वारजे परिसरात (Warje Aea) मागील आठवड्यात नागरिकांना पाणी प्रश्नाचा (water problem) चांगलाच सामना करावा लागला. वारंवार घेतल्या जाणाऱ्या क्लोजर मुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागला. याबाबत माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी पुढाकार घेत आणि प्रशासनाला धारेवर धरत प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (PMC additional commissioner) यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. यामध्ये क्लोजर (water closure) कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले. शिवाय ज्यावेळी क्लोजर असेल त्याच्या आधीच नागरिकांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल, असे ही आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले. (Pune Municipal corporation)
मागील काही दिवसापासून वारजे परिसरातील नागरिक पाण्याचा समस्येबाबत त्रस्त आहेत. महापालिकेने गेल्या पंधरा दिवसात दोन गुरुवारी पाणी बंद (closure) ठेवले होते. महापालिकेची system अशी आहे कि संबंधित परिसरात एकदा पाणी बंद ठेवल्यानंतर पुढील तीन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होतो. असे असतानाही इथेच वारंवार closure घेतले जाते. त्यामुळे पाण्याच्या टाक्या बंद राहतात. त्यामुळे पाणी येत नाही. जिथे पाणी येते, तिथे खूप कमी दाबाने पाणी येते. दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांच्या तक्रारी देखील ऐकून घेतल्या जात नव्हत्या. याबाबत माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ चांगल्याच आक्रमक दिसून आल्या. याची दखल महापालिका प्रशासनाला घ्यावी लागली. (warje water problem)
वारजेच्या पाणी प्रश्नाबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे आणि परिसरातील नागरिक यांच्यासोबत बैठक झाली. याबाबत माहिती देताना धुमाळ यांनी सांगितले कि, वारजे परिसरात क्लोजर कमी करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले. तसेच क्लोजर ची सूचना लवकरच देण्याबाबत सूचना करण्यात आली. क्लोजर च्या आधीच काही दिवस टँकरने पाणी पुरवठा करण्याची खात्री देखील अतिरिक्त आयुक्तांनी दिली. परिसरातील नागरिकांना पाणी बिलाबाबत नोटीस देण्यात आल्या होत्या. याबाबत देखील अतिरिक्त आयुक्तांनी आश्वस्त केले कि नागरिकांना नाहक त्रास दिला जाणार नाही. तसेच समान पाणी पुरवठा अंतर्गत जे काम केले जात आहे, ते आगामी 15 दिवसात पूर्ण करून तिथून पाण्याच्या लाईन घेतल्या जातील. जेणेकरून पाणी समस्या कमी होईल. एकूणच बैठक सकारात्मक झाल्याचे धुमाळ यांनी सांगितले. (PMC Pune)

Warje Water Problem | वारजे परिसरातील नागरिकांच्या पाण्याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचा हलगर्जीपणा | माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा आरोप | महापालिकेवर मोर्चा आणण्याचा दिला इशारा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

वारजे परिसरातील नागरिकांच्या पाण्याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचा हलगर्जीपणा

| माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा आरोप 

| महापालिकेवर मोर्चा आणण्याचा दिला इशारा

पुणे | वारजे परिसरात गेल्या तीन दिवसापासून नागरिकांच्या पाण्याबाबत तक्रारी सुरु आहेत. नागरिकांची याबाबत ओरड सुरु आहे. नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. महापालिका पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांवर ही वेळ  आली आहे. असा आरोप माजी विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी केला आहे. आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला तर नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा आणू, असा इशारा धुमाळ यांनी दिला आहे.
याबाबत धुमाळ यांनी सांगितले कि, गेल्या तीन दिवसापासून वारजे परिसरातील नागरिक पाण्याचा समस्येबाबत त्रस्त आहेत. महापालिकेने गेल्या पंधरा दिवसात दोन गुरुवारी पाणी बंद (closure) ठेवले होते. महापालिकेची system अशी आहे कि आमच्या परिसरात एकदा पाणी बंद ठेवल्यानंतर पुढील तीन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होतो. असे असतानाही इथेच closure घेतले जाते. गांधीभवन, एसएनडीटी या पाण्याच्या टाक्या बंद आहेत. त्यामुळे पाणी येत नाही. जिथे पाणी येते, तिथे खूप कमी दाबाने पाणी येते. धुमाळ यांनी सांगितले कि, नागरिकांच्या तक्रारी आम्ही पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना सांगण्यासाठी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते आमचा फोन देखील उचलत नाही. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त देखील आमच्याशी संवाद साधून दखल घेतात. शिवाय स्थानिक अधिकारी देखील सहकार्य करतात, मात्र पावसकर आमच्याकडे फिरकण्यास देखील तयार नाहीत. धुमाळ म्हणाल्या, काही परिसरात टँकरने पाणी पुरवठा होतो, मात्र तो पुरेसा नाही. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर परिसरातील नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा आणू. असा इशारा धुमाळ यांनी दिला आहे.
गुरुवारी एक दिवस पाणी नसेल तर पुढील चार-पाच दिवस आम्हाला अजिबात पाणी येत नाही ….कारण पाण्याला प्रेशर कमी असते व ते उताराने खाली जाते ….काल आज मी पाण्याचे बिसलेरी जार आणून घरात वापरत आहे पिण्यासाठी देखील दोन-तीन हंडे पाणी येत नाही…
– नागरिक
…बरेच दिवस सांगत आहे की वरती जो वाल बसवलेला आहे सरोदे एडगे घराजवळ तो काढून टाकावा किंवा  तो काढून खाली बसवावा ..आम्हाला वरील 10 घराणं 1 वर्ष होऊन गेले पाणी खूप कमी येते…आत्ता पाणी उताराने सर्व खाली जात आहे… कृपया लक्ष लक्ष घालून लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवावा.
– नागरिक
वारजे भागात सलग 3 दिवस पाण्यावाचून नागरिकांचे हाल. सुस्त पाणी पुरवठा यंत्रणा आणि यांना जागे करण्यासाठी कोणीच वाली नसल्यामुळे मागील काही काळा पासून वारजे भगातील नागरिकांचे पाण्यावाचून मोठ्या प्रमाणात हाल चालू आहेत.
– नागरिक

आपण फारच सहनशील आहोत. ठीक आहे एक दिवस पाणी येणार नाही समजू शकतो पण पुढील दोन दिवस पाणी येत नाही हे मात्र योग्य नाही. दर 15 दिवसांनी गुरुवारी पाणी नसते आणि पुढील दोन दिवस पाण्या साठी वणवण करायची. हे नेहमीचेच झाले आहे. आपल्या भागातील नगरसेवक काय करतात?

– नागरिक
—-
तांत्रिक अडचण समजू शकतो पण मग महापालिकेने स्वतःचे टँकर्स पाठवून स्वखर्चाने टाक्या भरून द्याव्यात.
– नागरिक

Water problem | Baner, Balewadi, Pashan, Soos, Mhalunge | बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा

| भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील नागरी सुविधा सक्षम करणं काळाची गरज आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगे आदी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. महापालिकेने हा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशा सूचना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला केल्या.

बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नाबाबत कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार  चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त  विक्रम कुमार व पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत आयोजित करण्यात आलेली पाणीपुरवठा समस्या निवारण बैठक बाणेर येथील अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर संपन्न झाली.
या बैठकिचे आयोजन मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योतीताई गणेश कळमकर, स्वप्नालीताई प्रल्हाद सायकर यांनी केले होते.

यावेळी पुरेसा पाऊस पडुन धरणांमध्ये पाणी साठा असुनही फक्त प्रशासनाच्या पाणी वितरणाच्या अनियोजित धोरणांमुळे बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे गावांना अपुरा पाणी पुरवठा होत आहे. तसेच वारंवार पाठपुरावा करुन देखिल अधिकारी या गंभिर पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आयुक्तांना निदर्शनास आणुन दिले.

“जागो-जागी पाईप लाईन मधुन होत असलेली गळती थांबवुन, पंप दुरुस्त करुन तसेच वितरण व्यवस्थेत सातत्य ठेवुन लवकरात लवकर या भागाला पुन्हा एकदा सुरळित पाणी पुरवठा करावा” अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.

यावेळी आयुक्तांनी बाणेर बालेवाडी परिसराला पाणीपुरवठा करणारे जे पंप आहेत ते पंप लवकरात लवकर दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच वाढीव पंप लावण्यासंदर्भात सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. तसेच नव्याने समाविष्ठ सुस-म्हाळुंगे-बावधन बु. या गावांसाठी पुणे मनपा मार्फत पाणी पुरवठा करण्यासाठीचा आराखडा तयार झाला असुन लवकरच याकरीता निधी उपलब्ध करुन दिला जाईल व या गावांमध्ये देखिल पुणे मनपा मार्फत पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासित केले.

यासोबतच जोपर्यंत या गावांमधील पाणी प्रश्न मार्गी लागत नाही व पाईप लाईन विकसित होत नाहित तोपर्यंत बाणेर-बालेवाडी-पाषाण सहित नविन समाविष्ठ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. तसेच प्रशासनाच्या मदतीकरीता या भागातील सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन व लोकसहभागातुन विविध भागात टाक्यांची उभारणी करण्यात येईल व सर्वत्र पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासित केले. तसेच २४x७ अंतर्गत बांधण्यात आलेल्या ८ टाक्या तातडीने सुरू करण्याचेही आदेश मा.चंद्रकांतदादांनी पुणे मनपा आयुक्त व अधिकारी यांना दिले.

याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, बाणेर बालेवाडी येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव, विविध सोसायटीचे चेअरमन-सेक्रेटरी व पदाधिकारी तसेच समस्त नागरिक उपस्थित होते.

Amol Balwadkar Vs Baburao Chandre : राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडीचा पाणी प्रश्न निर्माण केलाय  : अमोल बालवडकर यांचा गंभीर आरोप 

Categories
Breaking News Political social पुणे

राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडीचा पाणी प्रश्न निर्माण केलाय

: अमोल बालवडकर यांचा गंभीर आरोप

पुणे : बाणेर बालेवाडी परिसरात गेली चार पाच वर्ष पाणीटंचाई नव्हती. मग आताच का? असा प्रश्न भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला आहे. शिवाय बालवडकर यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे कि हा प्रश्न राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, परिसरातील व शहरातील त्यांचे पदाधिकारी पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी मिळून केला आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता फोन करो आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारावा, असे आवाहन बालवडकर यांनी परिसरातील नागरिकांना केले आहे.
बालवडकर म्हणाले महापालिकेत आता प्रशासक आहे. त्यामुळे साहजिकच शहराच्या प्रश्नांची जबाबदारी राज्य सरकारची आहे.  बाणेर बालवाडीत 2017 साली पाण्याची वितरण व्यवस्था नव्हती. प्रश्न गंभीर होता. मी नगरसेवक झाल्यानंतर नियोजन केले. समान पाणीपुरवठा योजने चे काम सुरु केले.  मात्र आता प्रशासनाने तोच पाणीपुरवठा विस्कळीत केला आहे. बालवडकर म्हणाले, पाणी प्रश्न मिटवणार भाजप कुठे आणि पाणी प्रश्न निर्माण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस कुठे? एवढा फरक आहे. पाण्यासाठी झगडणारा भाजप कुठे आणि नागरिकांची मजा पाहणारा राष्ट्रवादी कुठे?
बालवडकर पुढे म्हणाले, चांदणी चौक पाणी टाकी मधून 47mld बाणेर बालवाडीत पाषाण ला पाणीपुरवठा होत होता. गेल्या तीन महिन्यापासून या पाण्यात कपात करण्यात आली. 10 mld पेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे टँकर पाठवण्याची सोसायट्यांची मागणी आहे. असे नीच पातळीवरील राजकारण राष्ट्रवादी  करते.
बालवडकर म्हणाले पाणी प्रश्न निर्माण करण्यात  आला आहे. राजकीय सूडासाठी हा प्रश्न उभा केलाय. राष्ट्रवादीने हा प्रश्न निर्माण केलाय. बाबुराव चांदेरे, पदाधिकारी,मनपा अधिकारी असे सर्वानी मिळून हा प्रश्न निर्माण केलाय. महापालिका अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. याला सरकार जबाबदार आहे. बाबुराव चांदेरे यांनी याबाबत कधी निवेदन दिले नाही. चांदेरे चार वर्ष झोपले होते. आता निवडणुकीसाठी प्रयत्न करताहेत.

: फोन करो आंदोलन सुरु करा

बालवडकर पुढे म्हणाले, चांदेरे उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ही जबाबदारी अजित दादांची देखील आहे. पवार देखील याचे समर्थन करताहेत का? चुकीच्या पद्धतीने काम सुरु आहे. राजकारण करणाऱ्या पक्षाला यश मिळणार नाही. तुम्ही कितीही काही जरा. पाणी हेच जीवन आहे. मात्र भाजपचे लोक नाराज होणार नाहीत. नागरिकांची तुम्ही मजा पाहत आहात. आम्ही तो प्रश्न सोडवू. अधिकाऱ्यावर कुणाचा दबाव आहे? पाणी कपात नसताना पाणी का कमी केले?
नागरिकांना आवाहन आता तुम्ही फोन करो आंदोलन सुरु करा. आयुक्त आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्याचे नंबर आम्ही देतोय. त्यावरून प्रशासनाला जाब विचारा. असे बालवडकर म्हणाले.