Tag: Water
If you’re a man, these tips will help you
How to Stay Healthy? Here are 9 points everyone should apply
निवासी करण्यात आलेल्या सिंचन क्षेत्राचे पाणी पुणे महानगरपालिकेस उपलब्ध करून द्या
| महापालिका जलसंपदा विभागाला करणार मागणी
वाढीव पाण्याच्या तक्रारीबाबत MWRRA चा पुणे महापालिकेला दिलासा
| आता सुनावणी देखील घेण्याची गरज नाही
महत्वाची बातमी | पुणे शहरात गुरुवारी पाणी बंद!
महापालिकेकडून गुरूवारी शहराच्या महत्वाच्या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर,गांधी भवन टाकी परिसर, वारजे जीएसआर टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एच.एल. आर व एम.एल.आर टाकी परिसर, पर्वती एमएलआर टाकी परिसर तसेच नवीन व जुने होळकरजलकेंद्र, चतुश्रुंगी टाकी परिसर येथील विद्युत व पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात येणार असल्याने पाणी बंद असणार आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशिरा पाणी कमी दबाने सोडण्यात येणार असल्याने पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर :- पाषाण साठवण टाकी, भूगावरोडपरिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीन गर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीवन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड,
गांधी भवन टाकी परिसर – कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर,कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनिय स्कूल, कर्वेनगर गावठाण, कॅनॉल रस्ता परिसर
पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर – बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईट रोड, विजयनगर, आंबेडकरन नगर, दत्त नगर
वारजे जीएसआर टाकी परिसर – कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधामसोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. 1 ते 11 , इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. 1ते 10
एस.एन.डी.टी. टाकी परिसर – गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, गोखले नगर मॉडेल कॉलनी संपूर्ण भाग, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, आपटेरोड, घोले रोड, सेनापती बापट रोड, पंचवटी, गणेशनगर, एरंडवणा, कर्वेरोड, युनिव्हरसिटी, खडकी परिसर, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी,
पर्वती टाकी परिसर – गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ
नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग:- मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर
चतुश्रुंगी टाकी परिसर : औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत,संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सिंध सोसायटी, औंध गाव परिसर.
नागरिकांसाठी सूचना | शहराच्या महत्वाच्या भागात गुरुवारी पाणीपुरवठा नाही
गुरूवार दिनांक ०४/०८/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण व पारेषन कंपनीचे कामासाठी तसेच पर्वती जलकेंद्र व लष्कर जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसेंच शुक्रवार दिनांक ०५/०८/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२, ४६ ( कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती
टँकर भरणा केंद्र.
खडकवासलातून पाण्याचा विसर्ग केला बंद | पावसाचा जोर ओसरला
| चार धरणात 18.89 TMC पाणी जमा
खडकवासला धरण साखळीतील पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग आज सकाळी सहा वाजता पूर्ण बंद केला आहे. खडकवासला धरण सध्या १०० टक्के भरले आहे. परंतु या धरणात मागील चार- पाच दिवसात मोठा पाऊस झालेला नाही. पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. परिणामी ओढ्याचे पाणी कमी झाल्याने धरणातील येवा बंद झाल्याने धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद केला आहे.
धरणातील विसर्ग एक हजार ७१२ क्यूसेक होता. तो आज पहाटे पाच वाजता ८५६ क्यूसेक केला. सहा वाजता पूर्ण बंद केला. खडकवासला धरण मागील मंगळवारी सकाळी(१२ जुलै रोजी) शंभर टक्के भरले होते. त्यानंतर त्यातून धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. आज सकाळी सहा वाजता बंद केला या दरम्यान धरणातून ३.३४टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले. पुढे हे पाणी उजनी धरणात जमा होते.
खडकवासला धरण साखळीत मिळून एकूण पाणीसाठा १८.८९ टीएमसी झाला आहे. पानशेत आणि वरसगाव धरणांनंतर टेमघर धरणही निम्मे भरले आहे. खडकवासला धरणाच्या परिसरात सहा मिलिमीटर, पानशेत धरण क्षेत्रात ३२ मिलिमीटर, वरसगाव ३७ आणि टेमघर धरण क्षेत्रात २०मिलिमीटर पाऊस पडला आहे.
पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन
पाणी आरक्षणाच्या अनुषंगाने एकत्रित करारनामा करा
| पाटबंधारे विभागाचे महापालिकेला आदेश
विविध प्रकल्पांमधून मंजूर असल्याने म.ज.नि.प्रा.चे मापदंडाप्रमाणे पाणीवापर आहे किंवा नाही व त्यानुसार आकारणी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने सर्व मंजूर पाणीआरक्षणाच्या अनुषंगाने एकत्रित करारनामा करावा. तसेच दरानुसार विविध प्रकल्पातून केलेला पाणीवापर एकत्रित करून जास्तीच्या पाणीवापरावर अनुज्ञेय दराने पाणीपट्टी पुणे महानगरपालिकेस भरणा करणे अनिवार्य राहील. असे आदेश पाटबंधारे विभागाने महापालिकेस दिले आहेत.
पाटबंधारे पुणे मंडळांतर्गत बिगरसिंचन पाणीवापर ग्राहकांच्याबाबत काही ग्राहकांनी जसे कि पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कोका कोला कंपनी, पिरंगुट इ. ग्राहकांनी त्यांच्या पाणीमागणीच्या अनुषंगाने विविध प्रकल्पांतून पाणी आरक्षित केले आहे. पुणे म.न.पा.स देखील जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पातून पाणी आरक्षणास मंजूरी आहे. यामध्ये खडकवासला, पवना, भामा आसखेड चा समावेश आहे.
अनामत रक्कम भरून संबंधित विभागाकडे करारनामे संबंधित संस्थेस करावे लागतात. म.ज.नि.प्रा. आदेश दि. २९.०३.२०२२ मधील निर्देशानुसार बिगरसिंचन ग्राहकांच्या पाणीवापरानुसार आकारणी दर केले आहेत.