पुणे महापालिका रणसंग्राम | PMC Election 2022 | महिला आरक्षण | काहींची गणिते जुळली तर काहींना करावे लागणार पक्षांतर! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

महिला आरक्षण | काहींची गणिते जुळली तर काहींना करावे लागणार पक्षांतर! 

पुणे – महिला आरक्षणाची सोडत निघाल्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीचे चित्र मंगळवारी जवळपास स्पष्ट झाले. या आरक्षणामुळे प्रस्थापित मधील काही नगरसेवकांचा मार्ग सुकर झाला आहे. तर काहींची मात्र गणिते पूर्णपणे बिघडून गेली आहेत. सोडतीत अनेक नेत्यांच्या प्रभागात महिला आरक्षण पडल्याने त्यांना नवीन प्रभागाचा अथवा घरातील महिलेला रिंगणात उतरावे लागणार असल्याचे समोर आले आहे. तर काही प्रभागांमध्ये पक्षातील इच्छुकांबरोबरच उमेदवारी मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. तर अनेकांना महापालिकेच्या सभागृहात जाण्याच्या इच्छेवर पाणी सोडावे लागणार आहे. अनेक इच्छुकांना पक्षांतराशिवाय पर्याय राहिलेला नाही.

स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्षपद मिळवून इतिहास घडविणाऱ्या हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे हे इच्छुक असलेले प्रभाग क्रमांक १७ मध्ये दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे या दोघांसह राजेश येनपुरे, दिलीप काळोखे, कृणाला टिळक, युवा मोर्चाचे बापू मानकर, प्रमोद कोंढरे यांच्या अनेक यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तर प्रभाग क्रमांक २० मधील दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने तेथे देखील उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. माजी महापौर रजनी त्रिभुवन, लता राजगुरू यांना उमेदवारीसाठी झगडावे लागेल. प्रभाग क्रमांक १० मध्ये देखील दोन्ही जागा महिलांसाठी राखीव झाल्याने आजी-माजीसह नगरसेवकांच्या इच्छेवर पाणी फिरले आहे.
बाळासाहेब बोडके, आदित्य माळवे, राजू पवार, चंद्रकांत अमराळे यांच्या अनेकांना आजूबाजूच्या प्रभागाचा आसरा घ्यावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक २१ मध्ये बंडू गायकवाड आणि उमेदवार गायकवाड समोरासमोर येण्याची शक्यता अधिक असल्याचे सध्या चित्र आहे. या प्रभागात भाजपकडून इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी असल्याने कोणाच्या गाळात माळ पडणार हा औसुक्याचा विषय राहणार आहे. तर प्रभाग १६ फग्युर्सन कॉलेज-एरंडवणे या प्रभागात मात्र उलटी परिस्थती आहे. महिलासाठी राखीव असलेल्या माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, निलीमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे या प्रमुख महिलांसह इच्छुकांची संख्या मोठी आहे. प्रभाग २९ घोरपेड पेठ-महात्मा फुले मंडई या प्रभागात दोन महिलांसाठी राखीव जागा आहेत. त्यामुळे अजय खेडेकर, सम्राट थोरात, अजय दरेकर, विजय ढेरे. नाराजय चव्हाण, विष्णू हरिहर, आयुब पठाण, मुनाफ शेख यांच्यासह अनेक इच्छुकांना प्रभाग २८ महात्मा फुले स्मारक-भवानी पेठ या ठिकाणी उमेदवारीसाठी प्रयत्न करावा लागणार आहे. तर प्रभाग क्रमांक ३२ भुसारी कॉलनी-बावधन खुर्द येथे दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने बंडू केमसे, दिलीप वेडेपाटील यांच्यासारख्या अनेक दिग्गज एकमेकांसमोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रभाग क्रमांक ३४ वारजे कोंढवे धावडे एक महिलेसाठी राखीव प्रभाग झाल्याने महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.मात्र, याच प्रभागात सचिन दोडके, किरण बारटक्के, भारतभूषण बराटे, सचिन दांगट, शुक्राचार्य वांजळे यांच्या दिग्गजांमध्ये लाढाई होण्याची शक्यता आहे. या प्रभागाला लागून असलेल्या ३५ रामनगर-उत्तमनगर दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने दिलीप बराटे यांच्या प्रश्‍न मार्गी लागला असल्याची चर्चा आहे. तर प्रभाग क्रमांक ३६ कर्वेनगर प्रभागात एक जागा सर्वसाधारण गटासाठी आल्याने सुशिल मेंगडे, जयंत भावे, राजाभाऊ बराटे, स्वप्नील दुधाणे यांच्यासह अनेकांना उमेदवारी मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. तर सनसिटी-नांदेड सिटी या प्रभाग क्रमांक ५२ अनुकूल असलेल्या प्रभागात दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने मंजूषा नागपुरे, राजश्री नवले, यांचे प्रश्‍न सुटला आहे. तर प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप यांच्यासह इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता अधिक आहे.
खडकवासला-नऱ्हे प्रभाग ५३ या नव्याने आलेल्या सर्वसाधारण गटाची उमेदवारी मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमालीची सुरस होण्याची शक्यता आहे.कात्रज परिसरातील प्रभाग क्रमांक ४९ बालाजीनगर-शंकर महाराज मठ या प्रभागात माजी महापौर दत्ता धनकवडे आणि राजेंद्र शिळीमकर एकमेकांसमोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर ५६ चैतन्य नगर भारती विद्यापीठ प्रभागात दोन महिलांसाठी जागा राखीव झाल्याने वर्षा तापकीर या प्रभागातून रिंगणात उतरण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. तर राष्टवीदीचे विशाल तांबे, युवराज बेलदरे यांच्या पक्षांतर्गत चुरस निर्माण झाले आहे. प्रभाग रचना आणि आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्याने अनेक प्रभागातील लढतीचे सर्वसाधारण चित्र समोर आले आहे.

Women Reservation | PMC Election 2022 | हडपसर मतदार संघातून 20 महिला नगरसेवक होणार

Categories
Breaking News PMC Political पुणे

हडपसर मतदार संघातून 20 महिला नगरसेवक होणार

: त्याखालोखाल खडकवासला आणि पर्वती

हडपसर मतदार संघातून यंदा सर्वाधिक महिला सदस्य महापालिकेच्या सभागृहात दिसणार आहे. सुमारे 20 महिला नगरसेवक या मतदारसंघातून होतील. तर त्या पाठोपाठ खडकवासला आणि पर्वती विधानसभा मतदार संघातील महिलांना महापालिकेत जाण्याची सर्वाधिक संधी मिळणार आहे.

महापालिकेच्या हद्दीत नव्याने ३४ गावे समाविष्ट झाली आहे. त्यामुळे या समाविष्ट गावांसह उपनगरामधील प्रभागांची संख्या वाढली आहे. पर्वती, हडपसर आणि खडकवासला या तीन मतदार संघातून सर्वाधिक प्रतिनिधी महापालिकेवर निवडून येणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक महिलांना संधी देखील आरक्षणाच्या निमित्ताने मिळणार आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुका तीन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने होणार आहेत. पुण्यात ५८ प्रभाग व १७३ सदस्य संख्या आहे. पन्नास टक्के महिला आरक्षणानुसार ८७ महिलांना प्रतिनिधित्व मिळणार आहे. ५८ प्रभागात प्रत्येकी एक जागा या नुसार ५८ जागा महिलांसाठी राखीव झाल्यानंतर उर्वरित २९ जागांसाठी महिला आरक्षणाची सोडत मंगळवारी काढली. लॉटरी पद्धतीने काढण्यात आलेल्या २९ पैकी सर्वाधिक हडपसर विधानसभा मतदार संघातील महिलांना संधी मिळणार आहे. या मतदार संघातील दहा प्रभागांमध्ये दोन जागांवर महिलांसाठी आरक्षण आहे.
त्यामुळे या मतदार संघातून वीस महिलांना नगरसेविका होण्याची संधी आहे.

दुसरा क्रमांक खडकवासला मतदार संघातील महिलांचा आहे. या मतदार संघातील सहा प्रभागांमध्ये दोन जागांवर महिलांचे आरक्षण आहे. त्या खालोखाल पर्वती विधानसभा मतदार संघातील पाच प्रभागांमध्ये दोन जागा महिलांसाठी आहेत. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात चार प्रभागात दोन महिलांचे आरक्षण आहे. कसबा विधानसभा मतदार संघात दोन प्रभागात, तर शिवाजीनगर, पुणे कॅन्टोमेन्ट आणि कोथरूड या मतदार संघातील प्रत्येकी एका प्रभागात दोन महिलांसाठी जागा राखीव आहेत.

दोन महिला सदस्यांचे आरक्षण पडलेले प्रभाग

टिंगरेनगर-संजय पार्क (२), लोहगाव वडगावशेरी (३), खराडी पूर्व -वाघोली (४), येरवडा (९), शिवाजीनगर-संगमवाडी (१०), शनिवार पेठ-नवीपेठ (१७), पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता (२०), कोरेगाव पार्क-मुंढवा (२१), साडेसरानळी-आकाशवाणी (२३), मगरपट्टा-साधना विद्यालय (२४), हडपसर गावठाण- सातववाडी (२५), वानवडी गावठाण- वैदुवाडी (२६), घोरपडे पेठ उद्यान-महात्मा फुले मंडई (२९), भुसारी कॉलनी-बावधन खुर्द (३२), रामनगर-उत्तमनगर- शिवणे (३५), कर्वेनगर (३६), मार्केट यार्ड- महर्षीनगर (३९), बिबवेवाडी-गंगाधाम (४०), रामटेकडी-सैय्यदनगर (४२), वानवडी-कौसरबाग (४३), मोहमदवाडी-उरुळी देवाची (४६), कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी (४७), अप्पर-सुपर इंदिरानगर (४८), बालाजीनगर-शंकर महाराज मठ (४९), नांदेड सीटी-सनसिटी (५२), खडकवासला-नऱ्हे (५३), धनकवडी-आंबेगाव पठार (५५), चैतन्यनगर-भारती विद्यापीठ (५६), सुखसागरनगर-राजीव गांधीनगर (५७)

PMC Election 2022 | Women Reservation | १७३ जागांपैकी महिलांसाठी ८७ जागा आरक्षित : निवडणूक तयारीचा मार्ग मोकळा 

Categories
Breaking News PMC पुणे

१७३ जागांपैकी महिलांसाठी ८७ जागा आरक्षित

: निवडणूक तयारीचा मार्ग मोकळा

पुणे : पुणे महापालिका (PMC) निवडणुकीसाठी तयारी करण्यासाठी इच्छुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. आरक्षण सोडतीत एकुण १७३ जागांपैकी महिलांसाठी ८७ जागा आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे येत्या पंचवार्षिक मध्ये महापालिका सभागृहात ८७ महिला असणार, हे नक्की झाले आहे.  यामध्ये १७ जागा सर्वसाधारण महिलांसाठी, १२ जागा अनुसूचित प्रवर्गातील महिलांसाठी तर एक जागा अनूसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. सर्वच प्रभागांमध्ये पुरूषांसाठी एक जागा असल्याने सर्व प्रस्थापितांना कोणताही धक्का बसलेला दिसत नाही.

पुणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. ५८ प्रभागातील १७३ जागांसाठी असणारी ही सोडत गणेश कला क्रीडा मंडळ येथे अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत पार पडली.

या सोडतीमध्ये महिलांसाठी एकूण ८७ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.  या सोडतीनुसार आरक्षित जागांची माहिती खालील प्रमाणे…..

अनुसूचित जाती महिला आरक्षित प्रभाग

प्रभाग ९ येरवडा, प्रभाग ३- लोहगाव विमाननगर, प्रभाग ४२ रामटेकडी सय्यदनगर , प्रभाग ४७-कोंढवा बुद्रुक , प्रभाग ४९- मार्केटयार्ड महर्षीनगर, प्रभाग ४६- महम्मदवाडी उरळी देवाची, प्रभाग २० पुणे स्टेशन आंबेडकर रोड , प्रभाग २६- वानवडी वैदुवाडी, प्रभाग -२१ कोरेगाव पार्क मुंढवा , प्रभाग ४८ – अप्पर इंदिरानगर, प्रभाग-१० शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी, प्रभाग-४ खराडी वाघोली.

अनुसूचित  प्रभाग

प्रभाग ८ – अ, प्रभाग – ७ अ, प्रभाग- ५० अ, प्रभाग – ३७ अ, प्रभाग २७ अ, प्रभाग – २२ अ, प्रभाग – १ अ, प्रभाग – १९ अ, प्रभाग – १२ अ, प्रभाग ११ अ

अनुसूचित जमाती

प्रभाग १ क्र. १ ब महिला

प्रभाग १४ अ – एसटी

महिला आरक्षित अ व ब जागा

प्रभाग – 2 अ, 3 ब, 4 ब, 5 अ, 6 अ, 7 ब, 8 ब, 9 ब, 10 ब, 11 ब, 12 ब, 14 ब, 15 अ , 16 अ, 17 अ, 18 अ, 19 ब, 20 ब, 21 ब, 22 ब, 23 अ, 24 अ, 25 अ, 26 ब, 27 ब, 28 अ, 29 अ, 30 अ, 31 अ, 32 अ, 33 अ, 34 अ, 35 अ, 36 अ, 37 ब, 38 ब, 39 ब, 40 अ, 41 अ, 42 ब, 43 अ, 44 अ, 45 अ, 46 ब, 47 ब, 48 ब, 49 अ, 50 ब , 51 अ, 52 अ, 53 अ, 54 अ, 55 अ, 56 अ, 57 अ, 58 अ, 29 ब, 49 ब, 36 ब, 43 ब, 25 ब, 23 ब, 57 ब, 55 ब, 17 ब, 32 ब, 2 ब, 35 ब, 56 ब, 40 ब, 53 ब, 24 ब, 52 ब

सर्वसाधारण खुला प्रभाग :

प्रभाग – 6 ब, 5 ब, 58 ब, 54 ब, 51 ब, 45 ब, 44 ब, 41 ब, 34 ब, 33 ब, 31 ब, 30 ब, 28 ब, 18 ब, 16 ब, 15 ब, 13 ब, 1 क, 2 क, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 क, 11 क , 12 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 क, 32 क, 33 क, 34 क, 35 क, 36 क, 37 क, 38 क, 39 क, 40 क, 41 क, 42 क, 43 क, 44 क, 45 क, 46 क, 47 क, 48 क, 49 क, 50 क, 51 क, 52 क, 53 क, 54 क, 55 क, 56 क, 57 क व 58 क.

PMC Election 2022 | Women Reservation | महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या | महापालिका प्रशासनाकडून रंगीत तालीम; जय्यत तयारी 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या

: महापालिका प्रशासनाकडून रंगीत तालीम; जय्यत तयारी

पुणे : आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या (ता. ३१) सकाळी ११ वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे काढली जाणार आहे. त्यांची रंगीत तालीम सोमवारी सायंकाळी महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. ही सोडत लॉटरी पद्धतीने होणार असून शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते ती काढण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अशी माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त यशवंत माने यांनी दिली.

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाली आहे. ५८ प्रभागांत १७३ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यामध्ये २३ जागा अनुसूचित जाती तर दोन जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणूका होणार असल्याने सर्वसाधारण प्रवर्गासाठी जास्त जागा उपलब्ध झालेल्या आहेत. १७३ सदस्यांपैकी ८७ जागा या महिलांसाठी आरक्षीत आहेत. यामध्ये १२ अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमातीसाठी आरक्षण असतील. तर ७४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांचे आरक्षण असणार आहे. तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने २९ प्रभागांमध्ये दोन महिला असणार आहेत.

: असे असेल नियोजन

उपायुक्त माने यांच्या माहितीनुसार सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत कार्यक्रम सुरु होईल. त्यासाठी महापालिका कर्मचारी 9:30 पासूनच उपस्थित असतील. अनुसूचित जाती, जमाती व महिला आरक्षणासाठी चिठ्ठ्या तयार करणे, सोडतीचे व्हिडिओ चित्रीकरण करणे, सोडतीचे लाइव्ह प्रसारण करणे, स्टेजवर तसेच बाहेरील बाजूस एलईडी स्क्रीन बसविणार आहेत. या ठिकाणी कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन केले आहे.

दरम्यान आज सायंकाळी आरक्षण सोडतीची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, निवडणूक उपायुक्त यशवंत माने, सहायक आयुक्त आशिष महाडदळकर, सांख्यिकी व संगणक विभागाचे राहुल जगताप, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, उपस्थित होते.