Tag: women
PORN makes it Harder to Approach women. Here’s why:
पीएमपीच्या बसमध्ये देखील महिलांना 50% सवलत द्या
| माजी महिला बाल कल्याण अध्यक्ष राणी भोसले यांची मागणी
पुणे | राज्य सरकारने महिला सम्मान योजना अंतर्गत राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या तिकिटमध्ये 50% सवलत दिली आहे. त्याच धर्तीवर PMPML मधून प्रवास करणाऱ्या महिलांना देखील 50% सवलत द्यावी. अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका तथा माजी महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष राणी भोसले यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
राज्य सरकारच्या वतीने महिला सम्मान योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या अंतर्गत महिलांना वेगवेगळ्या सुविधा देण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून एसटीच्या प्रवासात तिकिटात 50% सवलत देण्यात आली आहे. पुणे शहरात पीएमपी ला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची जीवनदायिनी म्हटले जाते. यामधून खूप महिला प्रवास करत असतात. महिलांसाठी विशेष बस देखील ठेवण्यात आल्या आहेत. तसेच महिन्यातून एकदा मोफत प्रवासाची सुविधा महिलांना दिली जाते. शहरातील महिला प्रवाशाची संख्या पाहता आणि त्यांना सुविधा देण्याच्या दृष्टीने एसटी प्रमाणेच पीएमपी मध्ये देखील सर्व महिला 50% सवलत देण्याची मागणी राणी भोसले यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त आणि पीएमपी प्रशासन मिळून काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
असाही सुरक्षित प्रवास ‘पीएमपीएमएल‘चा
प्रवाशी सुरक्षितता विचारात घेऊन पीएमपीएमएल वाहक व चालक यांनी घडविले माणुसकीचे दर्शन
पीएमपीएमएल च्या कात्रज डेपोतील वाहक श्री. नागनाथ ननवरे (वाहक क्र. १६३९) व चालक श्री. अरुण दसवडकर (चालक क्र. २९१९) यांनी चाकोरीबद्ध कामाच्या बाहेर जाऊन पीएमपीएमएल च्या बसमधून रात्रीच्या वेळी लहानग्या बाळासह प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशास माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत करत ‘प्रवाशी देवो भव‘ हे पीएमपीएमएल चे ब्रीदवाक्य सार्थ ठरवले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार, दि. १४ जून २०२२ रोजी नेहमीप्रमाणे रात्री १०.४५ वा. सुटणाऱ्या सासवड ते कात्रज या ‘पीएमपीएमएल‘ च्या बसमधून एक महिला प्रवाशी त्यांच्या लहान बाळासह प्रवास करत होत्या. बस रात्री ११.४५ च्या सुमारास राजस सोसायटी थांब्यावर आली असता महिला प्रवाशी त्यांच्या बाळासह बसमधून खाली उतरल्या. यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या तीन बॅग खाली उतरवण्यासाठी या बसचे वाहक श्री. नागनाथ ननवरे यांनी त्यांना मदत केली. मात्र त्यांना घेण्यास त्यांच्या घरातील कुणीच आले नसल्याचे लक्षात आल्यावर रात्री उशिराची वेळ असल्याने वाहक श्री. नागनाथ ननवरे (वाहक क्र. १६३९) व चालक श्री. अरुण दसवडकर (चालक क्र. २९१९) यांनी सदर महिला प्रवाशी यांना कुणी न्यायला येणार आहे का? असे विचारले. त्यावर महिलेने दीर येणार असल्याचे सांगितले. या परिस्थितीत त्या महिला प्रवाशाच्या सुरक्षिततेचा विचार करून माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांचे दीर येईपर्यंत थांबण्याचा निर्णय वाहक श्री. ननवरे व चालक श्री. दसवडकर यांनी घेतला.
| वसंत मोरे गेले धाऊनी!
त्याच दरम्यान या परिसरातून जात असलेले पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वसंत मोरे मोरे यांनी बस का थांबली आहे याबाबत बस वाहक व चालक यांचेकडे चौकशी केली असता सदरची संपूर्ण घटना वाहक व चालक यांनी नगरसेवक मोरे यांना सांगितली. नगरसेवक मोरे यांनी वाहक व चालक यांनी दाखवलेल्या माणुसकीबाबत त्यांचे कौतुक केले व त्या महिला प्रवाशाची अडचण लक्षात घेऊन त्यांना सुखरूप घरी पोहोचविले.