Wrestler Agitation News| पुण्यातील खेळाडूंनी प्रतीकात्मक कुस्ती करून दिला महिला कुस्तीगारांना पाठिंबा

Categories
Breaking News Political social Sport देश/विदेश पुणे

Wrestler Agitation News| पुण्यातील खेळाडूंनी प्रतीकात्मक कुस्ती करून दिला महिला कुस्तीगारांना पाठिंबा

Wrestler Agitation News | पुण्यातील खेळाडूंनी प्रतीकात्मक कुस्ती करून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीगारांना पाठिंबा दिला. या आंदोलनाचे संयोजन प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केले होते. (Wrestler Agitation News)

दिल्लीत ऑलम्पिक विजेत्या महिला कुस्तीगीर साक्षी मलिक(Wrestler Sakshi Malik), विनेश फोगात (Wrestler Vinesh Fogat) व त्यांचे सह खेळाडू त्यांचं लौंगिक शोषण करणाऱ्या ब्रिज भूषण सिंग यांच्या विरोधात धरणे आंदोलन करत आहेत. ब्रिजभूषण सिंग (MP Brijbhushan Sing) याने अनेक महिला कुस्तीगीरांचे लौंगिक शोषण केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याबाबत गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले ब्रिजभूषण यांनी त्वरित राजीनामा द्यावा व केंद्र सरकारने त्याच्यावर कारवाई करण्याची कुस्तीगिरांनी मागणी केली आहे. देशाची मान जगात उंचवणाऱ्या महिला कुस्तीगिरांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आज पुण्यातील खेळाडूंनी अभिनव आंदोलन केले. खेळाडूंनी टिळक रोड येथे प्रतिकात्मक कुस्त्या करून हे आंदोलन करण्यात आले.  यावेळी कुस्ती संघटनेचे माजी पदाधिकारी श्रीरंग चव्हाण राहुल वांजळे राहुल वांजळे भिकुले श्रीकृष्ण बराटे,सुरेश कांबळे, ऋषिकेश बालगुडे आदि पैलवान,खेळाडू उपस्थित होते.  आंदोलन संयोजक प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केले होते

Hind Kesari | ‘हिंद केसरी’ची गदा यंदा महाराष्ट्राकडे! पुण्याच्या अभिजीत कटकेने मारलं मैदान

Categories
Breaking News cultural Sport देश/विदेश

‘हिंद केसरी’ची गदा यंदा महाराष्ट्राकडे! पुण्याच्या अभिजीत कटकेने मारलं मैदान

हैद्राबाद येथे पार पडलेल्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये (Hind kesari competetion) पुण्याच्या पैलवान अभिजीत कटकेने (Wrestler Abhijit katke) बाजी मारली. अभिजीतच्या विजयामुळे यंदाची मानाची हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे (Maharashtra) आली आहे. अभिजीतने हरियाणाच्या पैलवानाला चितपट केलं.

भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची समजल्या जाणार्या हिंद केसरी स्पर्धेत पुण्याच्या पैलवानने बाजी मारल्याने पुण्यात जल्लोष करण्यात आला. या हिंद केसरी स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खेळवण्यात आला. या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेने हरियाणाच्या सोमवीरला मात दिली. अभिजीतने सोमवीर याला 4-0 अशा फरकाने पराभूत केलं.

अभिजीत कटकेने 2017 सालचा महाराष्ट्र केसरीची (maharashtra Kesari)  गदा पटकावली होती. तसेच अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहे.

या विजयानंतर अभिजीतवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी ट्विट करत त्याला शुभच्छा दिल्या आहेत. त्यांनी “वा रे… पठ्ठ्या ! आपल्या वाघोलीचे सुपुत्र पैलवान अभिजित कटके हिंद केसरी किताबाचे मानकरी ठरले. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! “अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

Wrestling in Karvenagar : कर्वेनगरमध्ये रंगणार कुस्तीचा आखाडा! :  मातीवरील भव्य हवेली अजिंक्यपद जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२२

Categories
Breaking News Political Sport पुणे

कर्वेनगरमध्ये रंगणार कुस्तीचा आखाडा!

:  मातीवरील भव्य हवेली अजिंक्यपद जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२२

पुणे : यंदा कर्वेनगर मध्ये कुस्तीचा आखाडा रंगणार आहे. मातीवरील भव्य हवेली अजिंक्यपद जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२२ आयोजित करण्यात आली आहे. 14 आणि 15 एप्रिलला होणाऱ्या या कुस्ती स्पर्धेचे आयोजन मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक आणि कोथरूड ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विजय खळदकर यांनी केले आहे.
पुणे महापालिकेच्या सम्राट अशोक शाळेच्या ज्या आखाड्यात या कुस्ती स्पर्धा होणार आहेत त्या स्व. पै. नानासाहेब बराटे क्रीडानगरी आखाड्याचे आणि मांडवाचे भूमिपूजन नुकतेच झाले. या कार्यक्रमास  हवेली अजिंक्य कुस्ती परिषदेचे सदस्य पै भारत चौधरी, पै भीमराव वांजळे, पै बाबुराव थोपटे पै संदीप वांजळे व कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे सर्व सदस्य तसेच कर्वेनगर हिंगणे बु.मधील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विजय खळदकर व  मित्र परिवार यांनी केले होते. कर्वेनगर मध्ये होणाऱ्या या स्पर्धेची कर्वेनगर वासियांसोबत आसपासच्या परिसरातील नागरिकांना देखील उत्सुकता लागून राहिली आहे.