Women Security | PMPML bus | पीएमपीच्या कंडक्टर आणि चालकाची अशी ही माणुसकी!

Categories
Political social पुणे
Spread the love

असाही सुरक्षित प्रवास पीएमपीएमएलचा

प्रवाशी सुरक्षितता विचारात घेऊन पीएमपीएमएल वाहक व चालक यांनी घडविले माणुसकीचे दर्शन

पीएमपीएमएल च्या कात्रज डेपोतील वाहक श्री. नागनाथ ननवरे (वाहक क्र. १६३९) व चालक श्री. अरुण दसवडकर (चालक क्र. २९१९) यांनी चाकोरीबद्ध कामाच्या बाहेर जाऊन पीएमपीएमएल च्या बसमधून रात्रीच्या वेळी लहानग्या बाळासह प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशास माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत करत प्रवाशी देवो भवहे पीएमपीएमएल चे ब्रीदवाक्य सार्थ ठरवले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार, दि. १४ जून २०२२ रोजी नेहमीप्रमाणे रात्री १०.४५  वा. सुटणाऱ्या सासवड ते कात्रज या पीएमपीएमएलच्या बसमधून एक महिला प्रवाशी त्यांच्या लहान बाळासह प्रवास करत होत्या. बस रात्री ११.४५ च्या सुमारास राजस सोसायटी थांब्यावर आली असता महिला प्रवाशी त्यांच्या बाळासह बसमधून खाली उतरल्या. यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या तीन बॅग खाली उतरवण्यासाठी या बसचे वाहक श्री. नागनाथ ननवरे यांनी त्यांना मदत केली. मात्र त्यांना घेण्यास त्यांच्या घरातील कुणीच आले नसल्याचे लक्षात आल्यावर रात्री उशिराची वेळ असल्याने वाहक श्री. नागनाथ ननवरे (वाहक क्र. १६३९) व चालक श्री. अरुण दसवडकर (चालक क्र. २९१९) यांनी सदर महिला प्रवाशी यांना कुणी न्यायला येणार आहे का? असे विचारले. त्यावर महिलेने दीर येणार असल्याचे सांगितले. या परिस्थितीत त्या महिला प्रवाशाच्या सुरक्षिततेचा विचार करून माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांचे दीर येईपर्यंत थांबण्याचा निर्णय वाहक श्री. ननवरे व चालक श्री. दसवडकर यांनी घेतला.

| वसंत मोरे गेले धाऊनी!

त्याच दरम्यान या परिसरातून जात असलेले पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वसंत मोरे  मोरे यांनी बस का थांबली आहे याबाबत बस वाहक व चालक यांचेकडे चौकशी केली असता सदरची संपूर्ण घटना वाहक व चालक यांनी नगरसेवक  मोरे यांना सांगितली. नगरसेवक  मोरे यांनी वाहक व चालक यांनी दाखवलेल्या माणुसकीबाबत त्यांचे कौतुक केले व त्या महिला प्रवाशाची अडचण लक्षात घेऊन त्यांना सुखरूप घरी पोहोचविले.