Capital value based tax system | महापालिका भांडवली मूल्याधारित कर प्रणालीचा करणार अभ्यास 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

महापालिका भांडवली मूल्याधारित कर प्रणालीचा करणार अभ्यास

: 4 महिन्यासाठी 22 लाखाचा येणार खर्च

पुणे : पुणे महापालिका आता भांडवली मूल्याधारित कर प्रणालीचा अभ्यास करणार आहे. हे काम गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्स संस्थेला दिले जाणार आहे. 4 महिन्यात हे काम केले जाणार आहे. त्यासाठी संस्थेला 22 लाख दिले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीने नुकताच मंजूर केला आहे.
महापालिकेकडून सद्यस्थितीत रेडीरेकनरवर आधारित मूल्य काढले जाते. महापालिका आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला बृहन्मुंबई महापालिकेच्या धर्तीवर भांडवली मूल्याधारित कर प्रणालीचा अभ्यास करण्याचे आदेश दिले होते. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स संस्थेस काम देण्यास सांगितले होते. मात्र या संस्थेने नकार कळवला आहे. त्यामुळे हे काम गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्स संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संस्था कर प्रणालीचा अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे. त्यासाठी शहर आणि समाविष्ट गावाचा सर्वे केला जाईल. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव स्थायी समिती समोर दाखल केला होता. नुकतीच या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

या विषयांना दिली मंजुरी

१. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्स ही संस्था शासकीय तसेच निमशासकीय संस्थांसाठी महाराष्ट्र शासनमान्य पॅनेलवरील शासन सहाय्यित पुण्यातील एकमेव संस्था आहे. सदरचे काम हे विशिष्ट प्रकारचे काम असल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण ५ नियम २(२)

नुसार गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्स या संस्थेस भांडवली मूल्याधारित कर प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी ४ महिने कालावधीकरिता करार करणेस व रक्कम रुपये २२.५७,१०४/- (बावीस लक्ष सत्तावन्न हजार एकशे चार फक्त) चार टप्प्यांमध्ये म्हणजेच कामाच्या
सुरुवातीस अग्रीम रक्कम २५%, कामाच्या प्रगतीनुसार ४५ दिवसानंतर २५%, कामाच्या पुढील प्रगतीनुसार ९० दिवसानंतर – २५% व कामाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर २५% प्रमाणे अदा करणेस
२. सन २०२२-२३ च्या आर्थिक वर्षासाठी पुणे महानगरपालिकेकरिता भांडवली मूल्याधारित कर प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी खात्याकडे उपलब्ध असलेली “संकीर्ण”, RE11G103 या अर्थशिर्षकावरील रक्कम रुपये २०,००,०००/- (अक्षरी वीस लक्ष फक्त) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १०३ व प्रकरण ७ नियम २ अन्वये वर्गीकरणाने भांडवली मूल्यावर कर आकारणी करणेसाठी कायदेतज्ज्ञ, व्हॅल्युअर, प्रशासकीय अधिकारी इत्यादी तदनुषंगिक खर्च” RE11G109 या अर्थशिर्षकावर उपलब्ध करणेस.
३. सदरचे काम विहित मुदतीत न केल्यास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्स या संस्थेस कामाच्या एकूण रकमेवर दरमहा १०% दंड आकारणी करणेस.