Dipali Dhumal | पाणी पुरवठा विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या नोटीसा थांबवाव्या | माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

पाणी पुरवठा विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या नोटीसा थांबवाव्या

| माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या नोटीसा देणे त्वरित थांबविण्यात याव्यात, अशी मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या  दीपाली  धुमाळ यांनी आयुक्तांकडे केली. कोणतीही खबरदारी न घेता अचानक दिलेल्या नोटिसांमुळे नागरिकामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे. तरी  सर्व प्रकारात लक्ष देऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे कि अश्या प्रकारच्या नोटीसा देऊन नागरिकांची दिशाभूल करू नये व या नोटीसा देणे थांबवावे. असे धुमाळ यांनी म्हटले आहे.

धुमाळ यांनी याबाबत महापालिका आयुक्त यांनी निवेदन दिले आहे. त्यानुसार पुणे शहरामध्ये पाणीपुरवठा विभागा मार्फत नागरिकांसाठी समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत एल अॅणड टी कंपनी मार्फत अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या व पाईप लाईन चे काम सुरु आहे. मध्यंतरी प्रशासन व एल एन टी अधिकार्यांनी जबरदस्तीने नागरिकांच्या घरोघरी जाऊन नळ कनेक्शनला पाण्याचे मीटर बसवले होते व सदर मीटर बसवताना झालेले तोडफोड, लिकेज व नुकसान तसेच काम अपूर्ण सोडून मीटर बसविण्यात आले त्यावेळी नागरिकांना असे सांगण्यात आले की हे मीटर लवकर सुरु होणार नाही व याचे कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा बिल येणार नाहीत अशी नागरिकांची खोटी समजुत काढून त्यांना आता पाणीपुरवठा विभाग मार्फत नोटीसा येत आहेत.

नोटीस कोणत्याही प्रकारची मीटर रिडिंग न घेता किंवा त्या ठिकाणी व त्या जागी जाऊन सदर कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत किंवा खरच पाण्याचा वापर तेवढ्या प्रमाणत होत आहे का अशी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अंदाजे आकडे टाकून नोटीसा देत आहेत. सदर कुटुंबात व्यक्ती असेल तर त्या कुटुंबात 5 ते 6 व्यक्ती आहेत अशी बोटी आकडेवारी नमुद करून त्या कुटुंबाला नोटीस देत आहे. तसेच या नोटीस मध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि नोटीस दिलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या कालावधी नंतर पाणीपुरवठा विभाग द्वारे कारवाई करण्यात येईल. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत किती नाही याची शहानिशा न करता या नोटीसा देऊन नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे.

या प्रकाराबाबत आम्ही संबंधित अधिकार्‍यांशी  चर्चा चौकशी केली त्यावेळी अधिकार्‍यांना असे सांगण्यात आले कि या नोटीसा फक्त नागरिकांमध्ये पाण्याच्या नियमित वापराबाबत जनजागृती करण्यासाठी देत आहेत परंतु असे असेल तर या बाबत आधी जाहिरात करून प्रचार करून नोटीस दिली गेली पाहिजे होती याची कोणतीही खबरदारी न घेता अचानक दिलेल्या नोटिसांमुळे नागरिकामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे. तरी या सर्व प्रकारात लक्ष देऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे कि अश्या प्रकारच्या नोटीसा देऊन नागरिकांची दिशाभूल करू नये व या नोटीसा देणे थांबवावे. असे धुमाळ यांनी म्हटले आहे.