1971 War : Aba Bagul : पाण्याच्या पडद्यावर थ्रीडी चित्रफितीचे लोकार्पण गुरुवारी  : कॉंग्रेस गटनेते आबा बागुल यांची संकल्पना 

Categories
Breaking News cultural PMC पुणे
Spread the love

1971 युद्धाची 50 वर्षे

 पाण्याच्या पडद्यावर थ्रीडी चित्रफितीचे लोकार्पण गुरुवारी

: कॉंग्रेस गटनेते आबा बागुल यांची संकल्पना

पुणे : 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाला 16 डिसेंबर रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या युद्धावर आधारित 120 फूट लांब आणि 40 फूट रुंद अशा पाण्याच्या पडद्यावर थ्रीडी मल्टिमीडिया चित्रफितीचे लोकार्पण दि. 16 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी पाच वाजता कै. वसंतराव बागुल उद्यान, शिवदर्शन पुणे येथे
संपन्न होत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न होईल. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार
मोहन जोशी, मनपा आयुक्त विक्रमकुमार यांच्यासह पुणे मनपा पदाधिकारी, नगरसेवक व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच निवृत्त लष्करी अधिकार्‍यांचा गौरवही यावेळेस केला जाणार आहे. पुणे मनपा काँग्रेस गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम पुणे महानगरपालिका सादर करणार आहे.

याप्रसंगी लष्करी बँड व पोलिस बँडही असेल.

या कार्यक्रमात एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त), ब्रिगेडियर प्रकाश घोगले (निवृत्त) आणि कमांडर इंद्रजित रॉय (निवृत्त) हे उपस्थित राहणार असून, त्यांचा विशेष सत्कार याप्रसंगी केला जाणार आहे. 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर 1971 या काळात झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने विजय मिळवला त्यास 50 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2021 असा ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताह आयोजित केला. त्यातील उद्घाटन व समारोपास पुणे महानगरपालिकेचा सहयोग लाभला. सैन्यदलाने पुणे महानगरपालिकेस भेट दिलेल्या प्रदर्शनीय रणगाड्याचे लोकार्पण, 1971 भारत-पाक युद्धातील छायाचित्रांचे प्रदर्शन, ‘1971’ या विषयावर खुली निबंध स्पर्धा, पुण्यातील 25 नामवंत चित्रकारांनी ‘इंदिरा गांधी आणि 1971 चे युद्ध’ या विषयावर साकारलेली पेंटिंग्ज, घोरपडी येथील युद्ध स्मारकास आदरांजली, ‘एक स्वाक्षरी शहीद जवानांच्या अभिवादनासाठी’ उपक्रम असे विविध कार्यक्रम या द्विसप्ताहात साजरे केले गेले. या
द्विसप्ताहाचा समारोप 16 डिसेंबर रोजी भव्यतेने साजरा होत आहे. 120 फूट लांब आणि 40 फूट रुंद पाण्याच्या पडद्यावर 1971 च्या युद्धावर आधारित 20 मिनिटांची थ्रीडी मल्टिमीडिया चित्रफीत हे प्रमुख आकर्षण असेल. ही चित्रफीत त्यानंतर रोज सायंकाळी कै. वसंतराव बागुल उद्यान येथे नागरिकांना दाखवली जाईल, अशी माहिती पुणे
मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी दिली.

Leave a Reply