Assistant Commissioners : Deputation : महापालिकेत प्रतिनियुक्तीने आलेल्या तीन सहायक आयुक्तांना केले कार्यमुक्त 

Categories
PMC पुणे
Spread the love

महापालिकेत प्रतिनियुक्तीने आलेल्या तीन सहायक आयुक्तांना केले कार्यमुक्त

पुणे : महापालिकेत राज्य सरकार कडून तीन अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या अधिकाऱ्यांना सरकारने पदोन्नती दिली आहे. त्यामुळे महापालिकेतून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. यामध्ये सहायक आयुक्त प्रज्ञा पवार, सुहास जगताप आणि संजीव ओहोळ यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश नुकतेच अतिरिक्त आयुक्त यांनी जारी केले आहेत.
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे प्रतिनियुक्तीने कार्यरत  प्रज्ञा पोतदार, सहायक आयुक्त, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय यांची संदर्भाकीत आदेशान्वये मुख्याधिकारी गट-ब संवर्गातून मुख्याधिकारी गट-अ संवर्गात निव्वळ तदर्थ स्वरूपात पदोन्नती झाली असून, त्यांची पदोन्नती नंतरची
पदस्थापना “सहायक आयुक्त, गट-अ, नागपूर, महानगरपालिका” येथे करण्यात आलेली आहे.    प्रज्ञा पोतदार यांचेकडील सहाय्यक आयुक्त, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय या पदाचा पदभार विजयकुमार वाघमोडे, उप अभियंता (स्थापत्य) यांचेकडे सोपविण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे प्रतिनियुक्तीने कार्यरत  सुहास जगताप, सहाय्यक आयुक्त, नगररोड-वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालय यांची संदर्भाकीत आदेशान्वये मुख्याधिकारी गट-ब संवर्गातून मुख्याधिकारी गट-अ संवर्गात निव्वळ तदर्थ स्वरूपात पदोन्नती झाली असून, त्यांची पदोन्नती नंतरची पदस्थापना “उपायुक्त, मालेगांव महानगरपालिका” येथे करण्यात आलेली आहे. सुहास जगताप यांचेकडील सहायक आयुक्त, नगररोड- वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालय व किशोरी शिंदे, सहायक आयुक्त यांचे रजा कालावधीत त्यांचेकडील सहायक आयुक्त, क्रीडा या पदांचा पदभार बजबळकर नामदेव पांडुरंग, उप अभियंता (स्थापत्य) यांचेकडे सोपविण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे प्रतिनियुक्तीने कार्यरत  संजीव ओहोळ, सहाय्यक आयुक्त, सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालय यांची संदर्भाकीत आदेशान्वये मुख्याधिकारी गट-ब संवर्गातून मुख्याधिकारी गट-अ संवर्गात निव्वळ तदर्थ स्वरूपात पदोन्नती झाली असून, त्यांची पदोन्नती नंतरची पदस्थापना “उपायुक्त, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका” येथे करण्यात आलेली आहे.  संजीव ओहोळ यांचेकडील सहाय्यक आयुक्त, सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालय या पदाचा पदभार आव्हाड प्रदिप रखमाजी, उप अभियंता (स्थापत्य) यांचेकडे सोपविण्यात येत आहे.

Leave a Reply