Dr. Bharti pawar : PMC : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री महापालिकेच्या कोरोना कामाचा घेणार आढावा 

Categories
PMC आरोग्य देश/विदेश पुणे
Spread the love

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री महापालिकेच्या कोरोना कामाचा घेणार आढावा

: उद्या महापालिकेत बैठक

पुणे : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार उद्या पुणे महापालिकेचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्या महापालिकेने कोरोन काळात काय काम केले, याचा  आढावा घेणार आहेत. ही बैठक उद्या म्हणजे सोमवारी १२ वाजता होईल. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

: पुणे महापालिकेवर केंद्राचे आहे लक्ष

पुणे महापालिकेवर केंद्र सरकारचे चांगलेच लक्ष असते. या आधी देखील कोरोना  काळात वेगवेगळ्या टीम महापालिकेत येऊन गेल्या. त्या सर्वानी महापालिकेचे अनुकरण इतर महापालिकांना करण्याचे आदेश दिले होते. शिवाय  काही न काही मदत करण्याचे काम केंद्र सरकारकडून करण्यात आले. मात्र अजूनपर्यंत कुठल्या केंद्रीय मंत्र्याने महापालिकेत येऊन कधी आढावा घेतला नव्हता. मात्र आता नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार पुणे महापालिकेचा दौरा करणार आहेत . यावेळी त्या पुणे महापालिकेने कोरोना काळात काय काम केले याचा आढावा घेतील. यामध्ये महापालिकेने कुठल्या उपाय योजना राबवल्या याचका देखील आढावा घेण्यात येईल. ही बैठक उद्या म्हणजे सोमवारी १२ वाजता होईल. त्अयानंतर त्शीया पत्रकार परिषद घेतील. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

याआधी देखील राज्य सरकार मधील बऱ्याच मंत्र्यांनी कोरोना कामाचा आढावा घेतला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार तर आघाडीवर आहेत. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे, विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी देखील महापालिकेच्या कोरोना कामाचा आढावा घेतला आहे.

Leave a Reply