Water for a day | सोमवार पासून पुढील 8 दिवसांसाठी एक दिवसाआड पाणी  | पुणे महापालिकेने जारी केले वेळापत्रक

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

सोमवार पासून पुढील 8 दिवसांसाठी एक दिवसाआड पाणी

| पुणे महापालिकेने जारी केले वेळापत्रक

पुणे |  यंदाचे वर्षी पाऊस खूप लांबल्याने, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमधील पाणी साठा अत्यंत कमी झालेला आहे. सद्य:स्थितीत असणारा पाणीपुरवठा तसाच सुरु ठेवल्यास व पाऊस लांबल्यास पुणे शहरास मिळणाऱ्या पाणीपुरवठयाची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येत्या काही दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास व पर्यायाने धरणांमधील पाणी साठा योग्य प्रमाणात न वाढल्यास, पुणे शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होऊ नये यासाठी पुणे महानरपालिकेने पुणे शहरामध्ये एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केलेले आहे.
 नियोजन हे सोमवार दिनांक ०४.०७.२०२२ पासून करण्यात येऊन, सुरुवातीला ०८ दिवसांसाठी म्हणजेच दिनांक ११.०७.२०२२ पर्यंत करण्यात येणार आहे. या दरम्यान पडणारा पाऊस व धरणांमधील पाणी साठा याचा विचार करून, पाणी वितरण व्यवस्थे संदर्भात पुढील नियोजन करण्यात येणार आहे. सोबत एक दिवसा आड करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठयाचे वेळापत्रक पुणे महानगरपालिकेच्या https://www.pmc.gov.in/sites/default/files/water_supply_timetable.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व भागांमध्ये सध्याच्या वेळेतच परंतु एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दिनांक ०४.०७.२०२२ पासून दिनांक ११.०७.२०२२ पर्यंत सदर नमूद वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येईल. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन पुणे महानगरपालिकेस सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी केले आहे.
| वेळापत्रक इथे पहा