Water Closure | शहराच्या काही भागात येत्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

शहराच्या काही भागात येत्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये फ्लो मीटर बसविणेचे, पर्वती ते एस.एन.डी.टी. दरम्यान अस्तित्वात असलेल्या १२०० मि.मी. व्यासाचे पाण्याच्या लाईन मधील गळती बंद करणेचे काम तसेच चतुश्रुंगी येथील आशा नगर भागातील पाण्याच्या टाकीला पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या लाईनचे, मुख्य जलवाहिनीला जोडणेचे काम हाती घेण्यात येत आहे. यास्तव गुरुवार. २३/०३/२०२३ रोजी खालील भागास पाणीपुरवठा बंद होणार आहे व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी. असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
चतुश्रुंगी टाकीवरून पाणीपुरवठा बंद होणारा भाग-
चतुश्रुंगी टाकी परिसर :- औंध, बोपोडी, औंध रोड, खडकीचा काही भाग (पुणे मुंबई महामार्ग), अभिमानश्री सोसायटी, विधाते वस्ती, आय.टी.आय. रोड, पंचवटी, कस्तुरबा वसाहत, सिध्दार्थ नगर, औंध गाव, पुणे विद्यापीठ परिसर, भाऊ पाटील रोड, बाणेर रोड परिसर, भोईटे वस्ती, सिंध सोसायटी, सानेवाडी, आनंद पार्क, नागरस रोड, आय.सी.एस.कॉलनी भोसले नगर, इंदिरा वसाहत, सकाळ नगर, अनगळ पार्क, राजभवन.
चिखली जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा बंद होणारा भाग
चिखली जलशुद्धीकरण केंद्र :- गणेश नगर बोपखेल, म्हस्के वस्ती आळंदी रोड, टिंगरेनगर, आदर्श कॉलनी, बर्माशेल झोपडपट्टी, पुणे एअर पोर्ट लोहगाव, राजीव गांधी नगर (नॉर्थ आणि साऊथ), विमाननगर, यमुनानगर, श्रीपार्क सोसायटी, पाराशर सोसायटी, दिनकर पठारे वस्ती, ठुबे पठारे नगर, खराडी बायपास रोड.