Water cut : PMC : शहराच्या मध्यवर्ती भागात 6 दिवस कमी दाबाने येणार पाणी!

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

शहराच्या मध्यवर्ती भागात 6 दिवस कमी दाबाने येणार पाणी

: महापालिकेची सूचना

पुणे : रविवार 16 जानेवारी पासून शुक्रवार २१पर्यंत रात्री १०.०० पासून ते पहाटे ३.३० पर्यंत पर्वती जलकेंद्राचे अखत्यारीतील पर्वती एल.एल.आर टाकीचे मुख्य पाण्याची लाईन व नव्याने टाकण्यात आलेल्या लाईनला जोडण्यासाठीचे कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या दिवसांत सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

पाणीपुरवठा बाधित होणारा भाग :-

पर्वती एल.एल.आर.जलकेंद्र परिसर – शहरातील सर्व पेठा( रविवार दि.१६/०१/२०२२ रोजी पासून शुक्रवार दि. २१/०१/२०२२ पर्यंत रात्री १०.०० पासून ते पहाटे ३.३० पर्यंत)
डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, भवानी पेठ, नाना पेठ येथील भागांना या संपूर्ण कालावधी मध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply