Mahavikas Aghadi : PMC Election : प्रभाग  रचना  जाहीर  झाल्याबरोबर  महाविकास  आघाडीत  ‘बिघाडी’! 

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

प्रभाग  रचना  जाहीर  झाल्याबरोबर  महाविकास  आघाडीत  ‘बिघाडी’! 

: राष्ट्रवादीची  स्वबळाची  भाषा  तर  घटक  पक्ष  म्हणतात  आम्हाला  काही  फरक  पडत  नाही 

 

पुणे – महापालिका निवडणुकीसाठी (Pune Municipal Election) प्रारूप प्रभाग रचना (Ward Structure) राष्ट्रवादी काँग्रेससाठी (NCP) अनुकूल असल्याचे दिसत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून आघाडीची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीने आता थेट स्वबळावर (Independent) लढणार असल्याचे स्पष्ट केल्याने महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रभाग रचनेचे स्वागत करताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यंदाच्या निवडणुकीत १२२ नगरसेवक निवडून येतील असा दावा यांनी पत्रकार परिषदेत केला. तर इकडे महाविकास आघाडीतील  घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेनेने मात्र आम्हाला काही फरक पडत नाही. असे म्हटले आहे. त्यामुळे निवडणुकीत प्रत्यक्षात हे पक्ष सोबत लढणार कि बिघाडी होणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

जगताप म्हणाले, निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे व नियमानुसार प्रभाग रचना तयार केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला १२२ जागा मिळतील. ही प्रभाग रचना राष्ट्रवादीसाठी पूरक असल्याने ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी माझी इच्छा आहे. यासाठी पुढील तीन दिवसात शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. मात्र, महापालिका निवडणुकीत आघाडी करायची की नाही याचा अंतिम निर्णय पक्षाचे नेते घेतली. आघाडीसाठी शिवसेनेसोबत चर्चा झाली असली तरी ती प्राथमिक आहे, त्यात कोणताही निर्णय झालेला नाही. भविष्यात आघाडी झालीच तर राष्ट्रवादी काँग्रेस १७३ पैकी ११० जागांच्या खाली येणार नाही. भाजपसह इतर पक्षातील १६ नगरसेवक राष्ट्रवादीत येणार आहेत, असेही जगताप यांनी सांगितले.

शिवसेना म्हणते आम्हाला काही फरक पडत नाही

 निवडणुकीत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीनेच आम्हाला दोन वेळा बैठकीला बोलविले होते. पण त्यांना आता आघाडी करायची नसले तर आम्हाला काही फरक पडत नाही. सर्व जागा ताकदीने लढण्याची आमची तयारी आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळाल्याने प्रशांत जगताप यांची भूमिका बदलली असेल, पण आम्ही आघाडी करताना आम्ही कायम सतर्कच आहोत, असे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितले.

आमची तर पहिलीच स्वबळाची तयारी – काँग्रेस

 शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे आज स्वबळाची भाषा करत आहेत. पण आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच काँग्रेस स्वबळावर लढणार असे सांगितल्याने तीन महिन्यांपासून आमची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीने आघाडीसाठी आमच्याकडे संपर्क साधला होता, पण त्याचवेळी आम्ही तुमच्यासोबत येऊ शकणार नाही, असे त्यांना स्पष्ट केले होते. असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले

Leave a Reply