भावांनी बांधली बहिणींना राखी

Categories
cultural
Spread the love

एकता योग ट्रस्टचा अनोखा उपक्रम

– भावांनी बहिणीला बांधली राखी

कारभारी वृत्तसेवा

पुणे. रक्षाबंधन बहिण भावांच्या नात्याचा सण. या दिवशी भावाने बहिणीचे रक्षण करण्यासाठी बहिण भावाला राखी बांधते. मात्र कात्रज येथील एकता योग ट्रस्टच्या वतीने अनोखा उपक्रम सुरू केला “भावांनी बांधली बहिणींना राखी “हाच तो उपक्रम. या उपक्रमाचे शहरातून कौतुक केले जात आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे पुणे शहर अध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन आडेकर म्हणाले ” आजची बहिण, स्त्री हि कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. आजच्या बहिणीला वारसा आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा , महाराणी येसूबाई , ताराराणी , उमाबाई दाभाडे या पराक्रमी महिलांचा.ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी राज्यांच्या संरक्षणासाठी त्यांची थोरली बहीण शिवपुत्री राणूअक्का साहेब मोघलांच्या छावणीत छत्रपती संभाजी राजें बरोबर गेल्या होत्या हा इतिहास आपण विसरता कामा नये म्हणूनच आज भावाने बहिणीला राखी बांधण्याची प्रवाहा विरुद्धची संकल्पना या कार्यक्रमात साकारली जाते आहे. हा क्रांतिकारी बदल समाजाने स्वीकारावा असे मी आव्हान मी या प्रसंगी करतो व एकता योग ट्रस्ट चे अभिनंदन करतो.
कार्यक्रमाचे आयोजन एकता योग ट्रस्टचे मा.नाना निवंगुणे यांनी केले. पतंजली योग समिती संचलित एकता योगा ट्रस्ट,पुणे केंब्रीज विद्यालय, ब्रम्ह कुमारीज धनकवडी शाखा यांनी संयोजन केले.

प्रथम महिलांनी योगाची प्रात्यक्षिके सादर करून कार्यक्रमास सुरुवात केली. कार्यक्रमाच्या मध्यावर पुरुष बंधूंनी प्रथम महिला भगिनींना राख्या बांधून आनंद साजरा केला. कोरोना परिस्थितीमध्ये आपण स्वतःचा प्रपंच सांभाळत बहिणींनी भावांना मदतीचा हात दिला आणि म्हणून त्याच हातात भावा बहिणींनी एकमेकांना राख्या बांधून कर्तव्यपूर्तीचा आनंद घेतला. कोरोनाच्या संकटकाळात आपले वैयक्तिक आयुष्य विसरून जनतेच्या आरोग्यासाठी ऑनलाइन ऑफलाइन योगा वर्ग घेऊन जनतेच्या आरोग्यासाठी कार्य करनाऱ्या योगशिक्षक,  योगा प्रशिक्षक,  योगा सुवर्णपदक विजेता, यांचा एकता ट्रस्टच्या सहयोगि संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी एकता योगा ट्रस्टचे अध्यक्ष नाना निवंगुणे डॉ.चंद्रकांत कुंजीर, अनिल रेळेकर, बीके सुलभा, सुमन कुसळे, संगीता गोंगाने ,आरती घुले, मच्छिंद्र आवटे, जयंत पाटणकर, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ . चंद्रकांत कुंजीर यांनी केले व अनिल रेळेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply