‘व्हॅक्सीनेशन ऑन व्हील’ अंतर्गत दीड लाख लोकांचे लसीकरण : वंचित घटकांसाठी महापालिकेचा उपक्रम : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती

Categories
PMC पुणे
Spread the love
‘व्हॅक्सीनेशन ऑन व्हील’ अंतर्गत दीड लाख लोकांचे लसीकरण
: वंचित घटकांसाठी महापालिकेचा उपक्रम
: महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती
पुणे.  पुणे महानगरपालिकेने सीएसआर अंतर्गत 15 युनिट्ससह व्हॅक्सीनेशन ऑन व्हील नावाचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.  झोपडपट्टी एरियात लसीकरण करण्यासाठी महापालिकेचे 10 संघ आणि सीएसआर चे 15 असे  एकूण 25 संघांनी 650 शिबिरे यशस्वीरित्या आयोजित केली आहेत. ज्यात 1.50 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले. अशी माहिती महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
वंचित घटकांना न्याय देण्याचा महापालिकेचा प्रयत्न
महापालिकेच्या वतीने शहरातील वंचित घटकांचे लसीकरण करण्यासाठी  व्हॅक्सिनेशन ऑन व्हील हा उपक्रम सुरु केला आहे. गेल्या तीन महिन्यापासून कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करत आहेत. त्यामध्ये एकटे राहणारे वृद्ध नागरिक, अंथरुणाला खिळलेले रुग्ण, विकलांग व्यक्ती/ मानसिकदृष्ट्या अपंग,  विशेष मुले, कुष्ठरोग रुग्ण, ट्रान्सजेंडर/ व्यावसायिक वेश्या,  रात्र निवारामधील लोक ज्यांची  कोणतीही ओळख नाही, अशा लोकांचा समावेश आहे. शिवाय  मोलकरीण आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी मोठ्या संख्येने शिबिरे आयोजित केली जातात. त्याचप्रमाणे  9000 परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित केली गेली. या सोबतच जिम मधील  लोक, upsc परीक्षा इच्छुक विद्यार्थी, कलाकार, यांच्या साठी देखील शिबिरे भरवली गेली.  पुणे येथील सर्व सरकारी कार्यालये, मीडिया असोसिएशन कार्यालयांना देखील कार्यस्थळी लसीकरण केले जाते. याचा चांगला फायदा लोकांना होत आहे. यातील बऱ्याच लोकांचे दुसरा डोस पूर्ण झाल्याचे देखील आयुक्त कुमार यांनी सांगितले.

Leave a Reply