Arun Pawar : विधवा, निराधार व अपंग महिलांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अरुण पवार यांच्या हस्ते पेन्शन पत्राचे वाटप

Categories
social पुणे

विधवा, निराधार व अपंग महिलांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अरुण पवार यांच्या हस्ते पेन्शन पत्राचे वाटप

पिंपरी : समाजातील विधवा, निराधार व अपंग महिलांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पेन्शन सुरू करण्यासाठी मराठवाडा जनविकास संघ प्रयत्नशील असून, 39 लाभार्थी महिलांना अध्यक्ष अरुण पवार यांच्या हस्ते पेन्शन पत्राचे वाटप करण्यात आले. संस्थेमार्फत या योजनेंतर्गत नोंदणी केलेले 42 लाभार्थी यापूर्वी लाभ घेत आहेत.

मराठवाडा जनविकास संघामार्फत गरजू पात्र व्यक्तिंना या योजनेतून लाभ मिळवून देण्यासाठी काम सुरू असून, कुणीही या योजनेपासून वंचित राहू नये, हा या पाठीमागचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी काय कागदपत्रे लागतात, फॉर्म कसा व कुठे जमा करायचा याबाबत माहिती नसते. त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी शासनाच्या या योजनेपासून वंचित राहतात. मराठवाडा जनविकास संघाचे कार्यकर्ते विजय वडमारे हे चिंचवड, पिंपरी व भोसरी विधानसभा मतदारसंघात या योजनांबाबत गरजूंना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. गरजू विधवा, निराधार, अपंग महिलांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने त्यांचे फॉर्म भरून घेऊन ते कागदपत्रांसह आकुर्डी येथील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जमा करण्यात आले होते.

यापुढेही या योजनेतून गरजूंना मदत मिळावी, यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. ज्या गरजूंचे बँकेत खाते नाही, अशांचे बँक खाते उघडून देण्यासाठीही संस्थेमार्फत मदत करण्यात येत आहे. सर्व लाभार्थ्यांचे बँकेचे फॉर्मही भरून घेण्यात आले आहेत. ज्या गरजूंना या योजनेचा अद्याप लाभ घेता आला नाही, त्यांनी मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यालयाशी किंवा विजय वडमारे यांच्याशी 9503447000 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी केले आहे.

Neem planting : गुढीपाडव्यानिमित्त कडुनिंबाचे रोपण  : वृक्षदायी प्रतिष्ठान व देहुगाव नगरपंचायत आणि मराठवाडा जनविकास संघाचा उपक्रम 

Categories
social पुणे

 गुढीपाडव्यानिमित्त कडुनिंबाचे रोपण

: वृक्षदायी प्रतिष्ठान व देहुगाव नगरपंचायत आणि मराठवाडा जनविकास संघाचा उपक्रम

 

सण उत्सवाचा ही संकल्पना घेऊन वृक्षदायी प्रतिष्ठान, मराठवाडा जनविकास संघ व देहुगाव नगरपंचायत यांच्या वतीने गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचे औचित्य साधून ‘स्वच्छ देहू, हरित देहू उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती… या पंक्तीनुसार देहुगाव गायरान येथील जल शुद्धीकरण केंद्र या ठिकाणी कडूलिंबाच्या झाडांचे रोपण करण्यात आले. यावेळी देहू नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत जाधव, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, नगरसेविका ज्योती टिळेकर, मा . सरपंच संतोषजी हगवणे मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, वृक्षदाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकोंबाचे 10 वे वंवशज शिवाजी महाराज मोरे, सचिन पवार, जगन्नाथ जरग, यश पवार, सतीश चव्हाण, सुभाष पाटील आदी मान्यवर उपास्थित होते. दरम्यान, अरुण पवार यांनी देहू आणि पंचक्रोशीमध्ये लावण्यात येणाऱ्या झाडांना मराठवाडा जनविकास संघामार्फत मोफत पाणी पुरविण्यात येणार आहे, असे सांगितले.

शिवाजी महाराज मोरे यांनी सांगितले, की वृक्षदाई प्रतिष्ठानतर्फे सण  वृक्षांचा हे अभियान राबवण्यात येते. भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण हा निसर्गाशी जोडलेला आहे. प्रत्येक सणाला त्या संबधित वृक्षांची लावगड आणि संवर्धन करण्यात येते. गुढीपाडव्यानिमित्त कडुनिंबाच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.

Arun Pawar : Marathwada Janvikas Sangh : समाजसेवा व पर्यावरणाबाबत अरुण पवार यांचे कार्य अतुलनीय : ह.भ.प. शिवाजी मोरे

Categories
social पुणे

समाजसेवा व पर्यावरणाबाबत अरुण पवार यांचे कार्य अतुलनीय

: जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिवाजी मोरे यांचे प्रतिपादन

पिंपळे गुरव : येथील मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही झाडांना पाणी देऊन जतन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, संस्थेने रोपण केलेल्या राज्यभरातील वृक्षांना टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहे. समाजसेवा आणि पर्यावरणाबाबत त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे, असे प्रतिपादन जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिवाजी मोरे यांचे केले.

अरुण पवार यांच्या तर्फे भंडारा डोंगर परिसरात लावलेल्या झाडांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करून संपूर्ण उन्हाळ्यात झाडे जपण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही या परिसरातील झाडांना टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहे. यावेळी ह.भ.प. शिवाजी मोरे यांनी मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून अरुण पवार करीत असलेल्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले.
ह.भ.प. शिवाजी मोरे म्हणाले, की चारा पाण्यावाचून हरीण, माकडे, कोल्हे, लांडगे तसेच पक्ष्यांना पाण्यावाचून जीव गमवावा लागत आहे, हे जाणून मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून अरुण पवार यांनी चारा पाण्याची व्यवस्था केली आहे. यंदाही या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अनेकजण वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा इव्हेंट करतात. त्यांचे संगोपन करण्यासाठी कुणी पुढे येत नाही. पण अरुण पवार हे आपण लावलेल्या सर्व झाडांना पाणी देऊन ती जतन करतात. तसेच गोरगरीब गरजू लोकांना ते नेहमीच मदत करीत आले आहेत.

शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ यांनी सांगितले, की आज समाजामध्ये अनेक लोक असे आहेत जे संघर्ष करून मोठे होऊन सुखाचे आयुष्य जगतात. मात्र, त्या संघर्षाची जाणीव ठेवून समाजासाठी काम करणारे अरुण पवार यांच्यासारखे फार कमी लोक असतात. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना केलेली अन्नधान्यरुपी मदत खूप मोलाची होती. अंध अपंग, विद्यार्थी यांना नेहमीच सढळ हाताने मदत करीत आले आहेत.

अभियंते नितीन चिलवंत यांनी सांगितले, की मराठवाड्यातून पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या लोकांसाठी मराठवाडा भवन असावे, ही अरुण पवार यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी सुरु केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. त्यामुळे अरुण पवार म्हणजे मराठवाडावासियांचे चालते बोलते व्यासपीठ आहे. गरजू विद्यार्थी, गरीबांना आर्थिक मदत करणे, हे दातृत्व आम्ही अरुण पवार यांच्या कामातून शिकलो. वृक्षारोपणासोबतच वन्यप्राण्यांविषयी त्यांची असलेली तळमळ दरवर्षी उन्हाळ्यात त्यांच्या कृतीतून जाणवते.
उद्योजिका प्रिती काळे म्हणाल्या, की पुण्यासारख्या शहरात स्थायिक होऊन अरुण पवार यांनी बांधकाम क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. पर्यावरण, महिला सक्षमीकरण, धार्मिक क्षेत्रात ते अतूलनीय काम करीत आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सोहळा, देहू आळंदी स्वच्छता अभियान, मराठवाड्यातील बांधवांची नावनोंदणी, मोफत पाणी पुरवठा, मुक्या प्राण्यांना अन्न पाणी पुरवठा, गडकिल्ले संवर्धनासाठी मदत आदी कामे उल्लेखनीय आहेत.

भारुडकार कृष्णाई उळेकर यांनी सांगितले, अरुण पवार यांना समाजमानाची जाणीव आहे. त्यांनी आपलं सर्वस्व समाजकार्यात व्यापून टाकलं आहे. मी आज भारुडकार म्हणून उभी आहे, ती पवार यांनी दिलेल्या संधी आणि प्रोत्साहनामुळे. कलाकारांना कला जपण्यात अडचणी येतात. मात्र, अरुण पवार यांच्यासारखे लोक कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना भरारी घेण्याची उम्मेद देतात.

ज्ञानेश्‍वर केवळराम म्हणाले, की ज्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची उर्मी असते, त्यांना मन शांत बसू देत नाही. अगदी त्याप्रमाणे अरुण पवार यांनी हलाखीच्या परिस्थितीतून येऊन बांधकाम क्षेत्रात नावलौकिक मिळविलाच; शिवाय पर्यावरण, सामाजिक, पारमार्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात नाव कमावले आहे. गरजू लोकांना विविध प्रकारे मदत करीत त्यांच्या जीवनात आनंद आणण्याचे काम त्यांनी केले आहे.

रत्नाकर खांडेकर यांनी सांगितले, की अरुण पवार यांनी आपले शिक्षण गरीबीतून पूर्ण केले, याची जाणीव ठेवून समाजातील गरीब विद्यार्थ्यांना ते मदत करीत आले आहेत. आपण मोठे झालो, तरी गरीबीची जाणीव त्यांनी ठेवली आहे, पिंपरी-चिंचवडमध्ये मराठवाड्यातील लाखो लोक राहतात. त्यांच्यात समन्वय साधण्याचे काम करून त्यांच्या अडीअडचणी, सुखदु:खात ते सहभागी होतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते करीत असलेले वृक्षारोपणाचे कार्य खूप मोलाचे आहे. पंढरीच्या वारकर्‍यांची ते दरवर्षी सेवा करीत आहेत. त्यांना फळ वाटप, जेवण, पालखी सोहळ्यासोबत पाण्याचे टँकर देणे आदी सेवा ते मनोभावे करीत आहेत.