Arun Pawar | वृक्ष संवर्धन कार्याबद्दल वृक्षमित्र अरुण पवार यांचा ग्रीन महाराष्ट्र परिषदेत गौरव

Categories
Breaking News social महाराष्ट्र

Green Maharashtra Conference | वृक्ष संवर्धन कार्याबद्दल वृक्षमित्र अरुण पवार यांचा ग्रीन महाराष्ट्र परिषदेत गौरव

The Karbhari News Service – ‘झाडे लावा, झाडे जगवा,’ या संदेशाची प्रभावी अंमलबजावणी करून पर्यावरणा संदर्भात भरीव कार्य केल्याबद्दल मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांचा गौरव करण्यात आला.

माईर्स एमआयटी येथे आयोजित ग्रीन महाराष्ट्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत वृक्षमित्र अरुण पवार यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी निवृत्त विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, निवृत्त सचिव किरण कुरुंदकर, एमआयटी’चे कार्यकारी संचालक राहुल कराड, उद्योजक शिवशंकर लातुरे, मिलिंद पाटील, उद्योजक प्रशांत इथापे, योगेश भोसले, नितीन असालकर, रोहित सरोज, संतोष शिंग,नितीन चिलवंत आदी उपस्थित होते.

The Karbhari - Tree friend arun pawar
परिषदेमध्ये अरुण पवार करत असलेल्या वृक्षारोपण, वृक्ष संगोपन या कार्याची दखल घेत कौतुक करण्यात आले. तसेच या कार्यामध्ये सहभाग नोंदवून वृक्ष संवर्धन करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, वृक्षमित्र अरुण पवार यांनी घोषणा केली, की दरवर्षीप्रमाणे यंदाही पाऊस पडेपर्यंत झाडांना टँकरच्या माध्यमातून पाणी देऊन झाडांचे संगोपन करण्यात येणार आहे. सध्या भंडारा डोंगर परिसर, इंदोरी परिसर सुदवडी रोड, केशेगाव, बावी,वाडी, बामणी, मोरडा, धारूर अशा सर्व ठिकाणी सात टँकरच्या माध्यमातून झाडांना नियमित पाणी देण्यात येत आहे. जानेवारीपासूनच या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्ही वृक्षारोपण केल्यानंतर पैकी जवळपास सर्वच झाडे आज डौलाने उभी आहेत.

Bandara Dongar | काल्याच्या महाप्रसादाने भंडारा डोंगरावरील अखंड गाथा पारायण सोहळ्याची सांगता

Categories
cultural social पुणे

Bandara Dongar | काल्याच्या महाप्रसादाने भंडारा डोंगरावरील अखंड गाथा पारायण सोहळ्याची सांगता

Bhandara Dongar |  पहाटेचा काकडा, अभिषेक, महापूजा, हरिपाठ, नांदेड जिल्ह्यातील वाकुळणी येथील संतपीठाचे प्रमुख, सामुहिक पारायण, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा व जागर अशी दैनंदिनी असलेल्या सप्ताहाची सांगता हभप, गुरुवर्य उमेश महाराज दशरथे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

संपूर्ण सप्ताहभर रोज उसळणारी भाविकांची अलोट गर्दी, भक्तीमय, उसाही वातावरणात माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने वसंतपंचमीपासून श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर सुरु झालेल्या ‘अखंड गाथा पारायण व कीर्तन महोत्सवाची’ सांगता बुधवारी ह.भ.प. गुरुवर्य उमेश महाराज दशरथे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, उद्योजक विजय जगताप, ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद व सर्व विश्वस्त मंडळ, तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपजोनिया पुढती येऊ | काला खाऊ दहीभात || वैकुंठी तो ऐसे नाही | कवळ काही काल्याचे || या तुकोबारायांच्या अभंगावर निरुपण करीत ह.भ.प. गुरुवर्य उमेश महाराज दशरथे यांनी गोकुळातील भगवंताच्या विविध लीला अनेक रुपकांमधून व दृष्टांतामधून सांगितल्या.

तत्पूर्वी गाथा पारायणाची समाप्ती होताच उपस्थित हजारो भाविकांनी तुकोबारायांची गाथा व तुळशी वृंदावन डोक्यावर घेत मुख्य मंडपातून हरिनामाचा गजर करीत दिंडीने डोंगराला प्रदक्षिणा घातली. ज्ञानोबा- तुकाराम असा एकच नामघोष करीत महिला व पुरुष भाविकांनी फेर धरीत फुगड्या खेळल्या.

श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व दशमी सोहळा समितीच्यावतीने या सोहळ्यासाठी सहकार्य करणारे कीर्तनकार, गायक, वादक, वाचक, भाविक श्रोते, आचारी, मंडपवाले, तसेच आर्थिक व वस्तुरुपू देणगी देणारे सर्व दानशूर दाते, अहोरात्र झटणारे सर्व तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थ, महाप्रसादाचे वाटप करणारे खांडी, बोरवलीचे ग्रामस्थ, पायथ्यापासून मंदिरापर्यंत मोफत बस सेवा पुरविणारे युवा उद्योजक गणेश बोत्रे, देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, दररोज पाण्याचा टँकर पुरविणारे मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांच्या सहकार्याबद्दल ट्रस्टच्यावतीने ह.भ.प. बाळासाहेब काशीद यांनी आभार मानले.

दरम्यान, काल्याच्या कार्यक्रमासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. डोंगरावर एक किलोमीटरपेक्षा जास्त लांब रस्त्याच्या दुतर्फी दुचाकी व चारचाकी वाहनांची रांग लागली होती. काल्याचे कीर्तन संपल्यानंतर भोजन मंडपात व मुख्य मंडपात महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. लवकरात लवकर मंदिर निर्माणाचे कार्य पूर्णत्वास जावो व या भव्य-दिव्य मंदिराचा कळस लवकरात लवकर पाहण्याचे भाग्य आम्हांला लाभो असे तुकोबारायांना साकडे घालीत हजारो भाविकांनी साश्रू नयनांनी भंडारा डोंगराचा निरोप घेतला.

श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे विश्वस्त, कीर्तनकार ह.भ.प. रवींद्र महाराज ढोरे यांची नात व इंदुरी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार ढोरे यांची कन्या अपूर्वा ढोरे यांनी सार्थ ज्ञानेश्वरीचे मुक्त चिंतनातून इंग्रजीत भाषातंर केले असून, या हस्तलिखित सार्थ ज्ञानेश्वरीचे प्रकाशन ह.भ.प. रविदास महाराज शिरसाठ यांच्या हस्ते, ट्रस्टच्या सर्व पदाधिका-यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

bhandara Dongar Trust | भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

bhandara Dongar Trust | भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन

श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, हा हरिनाम सप्ताह येत्या 14 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान भंडारा डोंगर येथे संपन्न होणार आहे. या महायज्ञाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

या हरिनाम सप्ताहात 14 फेब्रुवारी रोजी ह.भ. प. ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे कीर्तन, 15 फेब्रुवारी रोजी ह. भ. प. भागवताचार्य विकासानंद महाराज मिसाळ यांचे कीर्तन, 16 फेब्रुवारी रोजी ह. भ. प. गुरुवर्य पांडुरंग महाराज गिरी यांचे कीर्तन, 17 फेब्रुवारी रोजी ह. भ. प. गुरुवर्य जयेश महाराज भाग्यवंत यांचे कीर्तन, 18 फेब्रुवारी रोजी ह.भ. प. बंडा महाराज कराडकरयांचे कीर्तन, 19 फेब्रुवारी रोजी ह. भ. प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे कीर्तन, 20 फेब्रुवारी ह.भ. प. ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे कीर्तन संपन्न होणार आहे. ही कीर्तनसेवा रात्री 8 ते 10 यावेळेत पार पडणार आहे.
21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत काल्याचे कीर्तन संपन्न होणार असून, ह. भ. प. उमेश महाराज दशरथे मानवतकर आपली सेवा देतील. याबरोबरच 19 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते दीड या वेळेत प्रबोधनकार गणेश शिंदे व गायिका सन्मिता गणेश शिंदे यांचा ‘मोगरा फुलला’ हा सुश्राव्य अभंगवाणीचा कार्यक्रम सादर होईल. तसेच दुपारी दोन ते सायंकाळी साडेचार या वेळेत मेघना झुझम (भिवर पाटील) या संत साहित्य व लोककला यावर आधारित ‘तुझ्या नामाचा गजर’ हा भक्तिमय कार्यक्रम सादर करणार आहेत.

याबरोबरच 14 ते 20 फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी 4 ते 6 या वेळेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तत्त्वचिंतन होणार असून, ह.भ. प. रवीदास महाराज शिरसाट आपली सेवा देणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी दिली.
——————————–
वृक्षमित्र अरुण पवार यांनी केले भंडारा डोंगरावर वृक्षारोपनाचे संवर्धन आणि संगोपन

अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित अरुण पवार यांनी भंडारा डोंगर परिसरात वृक्षारोपनाचे संगोपन आणि संवर्धन केले. तसेच यापूर्वी भंडारा डोंगरावर लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देत आपण लावलेल्या झाडांची आपणच काळजी घेऊन पर्यावरणाला पोषक वातावरण निर्माण करूयात, असा संदेश दिला. वृक्षमित्र अरुण पवार यांनी डोंगर परिसरात लावलेली झाडे आज सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

Health Camp | पिंपळे गुरव कला क्रीडा संस्कार समिती व शिव सह्याद्री ढोल पथकाच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Categories
Breaking News social आरोग्य पुणे

Health Camp | पिंपळे गुरव कला क्रीडा संस्कार समिती व शिव सह्याद्री ढोल पथकाच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Health Camp | मनःशांती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने पिंपळे गुरव कला क्रीडा संस्कार समिती व शिव सह्याद्री ढोल पथकाच्या वतीने पिंपळे गुरव येथे मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात सातशेहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.

या शिबिरामध्ये सर्जरी, मेडीसिन, बालरोग, अस्थिरोग, स्री रोग, आयुर्वेद व पंचकर्म या संदर्भातील विविध आजार, व्याधी याबाबत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. एक्स रे, रक्त लघवी, सोनोग्राफी, कलोनोग्राफी, गॅस्ट्रॉसकॉपी, इसीजी, सिटी स्कॅन आदी तपासण्या करण्यात आल्या.
यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरूण पवार, आयोजक प्रा. विष्णू शेळके, सह्याद्री ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी. बी. घोडे, उपनिबंधक सुदाम चपटे, नुमवी पर्यवेक्षक देवराम चपटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धावजी साबळे आदी उपस्थित होते.

The karbhari - Arun Pawar
शिबिरात डॉ. धीरज जंगले, डॉ. विराग  कुलकर्णी, डॉ. शुभांगी करंजे, डॉ. मंजिरी जोशी, डॉ. केतन जंगले या तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासण्या व मार्गदर्शन केले.
शिबिराच्या आयोजनात राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित जमाती सेल पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विष्णू शेळके व महिला सरचिटणीस सुनिता कोळप यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुशिला डिसुझा, रुपाली लांडे, सिद्धी शेळके, प्रज्ज्वल कांबळे, श्रेया वरे, अंकिता दाते, वैष्णवी कराळे यांनी सहकार्य केले.

Arun Pawar | वृक्षमित्र, समाजसेवक अरुण पवार यांना कार्य-कर्तृत्व पुरस्कार प्रदान

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Arun Pawar | वृक्षमित्र, समाजसेवक  अरुण पवार यांना कार्य-कर्तृत्व पुरस्कार प्रदान

 

Arun Pawar | वृक्षमीत्र, समाजसेवक श्री अरूण पवार यानां दि.२९ शनीवार रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथील संवाद व्यासपीठ हरिशजी मोरे आणि मित्र परिवाराच्या वतीने संसंद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारने (Shrirang Zappa Barne) याच्यां शुभहस्ते हस्ते कार्य-कर्तृत्व पुरस्कारा देऊन सन्मानित करण्यात आले.

 

वृक्षमीत्र श्री अरुण पवार यांनी मराठवाडा जनविकास संघाची (Marathwada Janvikas Sangh) स्थापन करून. संन.२०१२पासून लाखो वृक्षाची लागवड केली आहे. भंडारा डोंगर, देहूगाव मरकळ , शिंदेवाडी , पिंपळे गुरव , नवी सांगवी अशा अनेक भागांमध्ये वृक्षारोपण करून संगोपन करतात आजही ते त्या वृक्षाचे संगोपन करतात. तसेच विविध उपक्रमात लाखो वृक्षाचें दान केली आहेत. धारूर ते तुळजापूर बायपास पर्यंत. धारूर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्या पर्यंत हजारो वृक्षांची लागवड केली आहे. तसेच देहु-आळंदी येथील भंडारा डोगरावरही हजारो वृक्षारोपण करून संगोपन करणे चालू आहे.

 

मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून गोरगरीब, मजदूर, अपंग, विद्यार्थी, शेतकरी,गो-शाळा, रानावनातील मुके प्राणी,देहु-आळंदीहून पंढरपूर कडे निघालेल्या पालख्यानां,संतानां, समाजसेवक, राजकारणी, तसेच समाजातील वंचित व ऐकदम खालच्या पातळीवरील काम करणाऱ्यांना आर्थिक मदत,बहुमोल साथ,मार्गदर्शन ते सदैव करत असतात. याच कार्याची दखल घेऊन धारूर येथील ग्रामस्थांनी बंधु बालाजी काका पवार यानां बहुमतानी सरपंच पद देऊन विकासासाठी संपूर्ण ग्रामपंचायत ताब्यात दिली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, धारूर रत्न पुरस्कार,समाजभूषण पुरस्कार असे शेकडो पुरस्कार त्यांना मीळाले आहेत. .आश्या थोर समाज सेवकाला पुणे-पिंपरी चिंचवड येथील संवाद व्यासपीठाचा कार्य-कर्तृत्व पुरस्कार खासदार संसद रत्न श्रीरंग बारने याच्यां हस्ते मीळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Tribal Brides Grooms | पिंपळे गुरवमध्ये आदिवासी वधू वरांचा १३ वा मेळावा उत्साहात संपन्न

Categories
Breaking News cultural social पुणे

Tribal Brides Grooms | पिंपळे गुरवमध्ये आदिवासी वधू वरांचा १३ वा मेळावा उत्साहात संपन्न

Tribal Brides Grooms | पिंपळे गुरव येथे कोळी महादेव, ठाकर, गोंड, भिल्ल, कातकरी, कोकणा आदी जमातींच्या विवाहेच्छुक वधू वरांचा परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
        यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेविका उषा मुंढे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरूण पवार, सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष कृष्णा भालचिम, डी. बी. घोडे, उद्योजक किसनराव गभाले, गुलाब हिले, गोविंद पोटे, करवंदे गुरूजी आदी उपस्थित होते.
        दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, आदिम विरांगणा राणी दुर्गावती, आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे,  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी  दीपस्तंभ डॉ. गोविंद गारे यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
         महाराष्ट्रभर विखुरलेल्या आदिवासी बांधवांना वधू-वर परिचयाच्या निमित्ताने सर्व जमातींना एकत्र करून समाजोपयोगी उपक्रम राबविणे, ही चांगली गोष्ट आहे. म्हणुन समाजाच्या विविध जमातींना विविध अनुरूप स्थळांची माहिती वर्षभर करून देण्याचे परिश्रम घेतात, हे कौतुकास्पद आहे, अशा शब्दात अजित गव्हाणे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
         मेळाव्याचे आयोजक आणि वधू वर केंद्राचे संस्थापक अध्यक्ष विष्णू शेळके यांच्या तर्फे आयोजित या मेळाव्याचे हे ९ वे वर्ष आणि हा १३ वा मेळावा होता. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने शहरात स्थिरावलेल्या आदिवासी बांधवांची नाळ पुन्हा गावाशी जोडणे व जमातीत ऐक्य साधून आंतर जमातीय विवाहांना प्रोत्साहन देणे, हा यामागचा मूळ उद्देश होता.
       मेळाव्यात विविध आदिवासी जमातींच्या ४००  हून अधिक वधू-वरानी नोंदणी केली
        कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रियंका घोटकर, विजय आढारी, रोहिणी शेळके, वैष्णवी कराळे, गौरी कराड, साईराज मुरगुंडी यांनी परिश्रम घेतले.
      सूत्रसंचालन देवराम चपटे यांनी, तर राणी आढारी यांनी आभार मानले.

Ayushman Bharat Card | वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वतीने पावणेपाच हजार नागरीकांना आयुष्मान भारत कार्ड वाटपास सुरुवात

Categories
Breaking News cultural social आरोग्य पुणे महाराष्ट्र

Ayushman Bharat Card | वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वतीने पावणेपाच हजार नागरीकांना आयुष्मान भारत कार्ड वाटपास सुरुवात

Ayushman Bharat Card | आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे (Marathwada  Janvikas Sangh) संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार (Arun Pawar) यांच्या वतीने चार हजार सातशे नागरिकांना आयुष्मान भारत आरोग्य कार्ड (Ayushmann Bharat Card) वाटपास नुकतीच सुरुवात सुरुवात करण्यात आली. दरम्यान, या सेवेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

पिंपळे गुरव येथील भालचिम सभागृहात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, शेंद्रियशेती तज्ञ मा , दिलीपराव देशमुख बारडकर माजी नगरसेविका उषाताई मुंढे, कामगार नेते विश्वनाथ शिंदे, सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष कृष्णा भालचिम, डी. बी. घोडे, किसनराव गभाले, गुलाब हिले, गोविंद पोटे, करवंदे गुरुजी, विष्णू शेळके, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, सखाराम वाळकोळी, नागेश जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना अजित गव्हाणे म्हणाले, की अशा योजनेंतर्गत कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच मिळत आहे. याचा लाभ कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात. या योजनेत एक हजार २०९ शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचार उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात ५७ खासगी आणि १२ सरकारी अशा एकूण ६९ रुग्णालयांचा समावेश आहे. असे उपक्रम राबविणे ही काळाची गरज असून, मराठवाडा जनविकास संघाने घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे.

अरुण पवार म्हणाले, की आज सर्वसामान्य कुटुंबाना रुग्णालयाचा खर्च परवडेनासा झालेला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने सुरू केलेला हा उपक्रम नागरिकांना फायदेशीर ठरत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम माळी सर यांनी, तर आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.

Marathwada Janvikas Sangh | Diwali | मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला, कष्टकरी, निराधार मुलांना पोशाख व मिठाई वाटप करून दिवाळी साजरी

Categories
cultural social पुणे

Marathwada Janvikas Sangh | Diwali | मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला, कष्टकरी, निराधार मुलांना पोशाख व मिठाई वाटप करून दिवाळी साजरी

Marathwada Janvikas Sangh | Diwali | मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने समाजातील श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी अशा कामगारांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची दिवाळी, नंतर पाहू आपली’ या भूमिकेतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची निराधार मुले मुली, सफाई कर्मचारी, पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना पोशाख व मिठाई, घरकाम करणाऱ्या महिलांना साडी आणि मिठाई वाटप वाटप करण्यात आली.

पिंपळे गुरव पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी, महापालिकेचे सफाई कामगार, भोसरी धावडे वस्ती येथील घरकाम करणाऱ्या महिला, विकास अनाथ आश्रम मोरे वस्ती चिखली येथील अनाथ मुले, घंटागाडीवर काम करणाऱ्या पुरुष व महिला, मे बेसिक्स मुनिसिपल वेस्ट व्हेचर्स कंपनीचे कर्मचारी आदी सर्वांना साडी, कपडे व मिठाई वाटप करण्यात आली.

यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, विकास अनाथ आश्रम संस्थेचे अध्यक्ष माऊली हरकळ, कामगार नेते बाळासाहेब साळुंके, घंटागाडी मुकादम विनोद कांबळे, बळीराम माळी, वामन भरगंडे, दत्तात्रय धोंडगे, समाजसेविका विजया नागटिळक, सूर्यकांत कुरुलकर, नितीन चिलवंत, किरण परमार, सागर मगर आदी उपस्थित होते.
याबाबत अरुण पवार यांनी सांगितले, की आपल्या माणसांसाठी वर्षातील सर्वात मोठा आनंद वाटता येणारा सण दिवाळी आहे. मराठवाडा जनविकास संघ विविध घटकांना सोबत घेऊन नेहमीच दिशादर्शक आणि सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवत आहे. प्रथम कष्टकऱ्यांची दिवाळी साजरी झाली पाहिजे, या भावनेतून या उपक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.

Marathwada Janvikas Sangh | मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला मंडळांना ज्ञानेश्वरी, हस्तलिखित एकनाथी भागवत व रोप वाटप

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Marathwada Janvikas Sangh | मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला मंडळांना ज्ञानेश्वरी, हस्तलिखित एकनाथी भागवत व रोप वाटप

मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने शिव मल्हारी युवा प्रतिष्ठान नवी सांगवी,  विद्यानगर नवरात्र महोत्सव महिला मंडळ, दुर्गामाता महिला मंडळ नवरात्र  उत्सवामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ, हस्तलिखित एकनाथी भागवत आणि पाचशे रोपांचे वाटप करण्यात आले.

वृक्षदान चळवळीचा एक भाग म्हणून मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वतीने पिंपळ, वड, कडुलिंब, चिंच, नारळ, पेरू, चिकू,  रामफळ, कनेरी, मोगरा, जास्वंदी, गुलाब अशी अनेक प्रकारची रोपे वाटप करण्यात आली. यावेळी भीमाना हिरेमठ, सोनू शिंदे, रेणुका तलवार, संगीता शिंदे, गंगामा हिरेमठ, लक्ष्मी वनेटी आदी उपस्थित होते.
याबाबत बोलताना अरुण पवार यांनी सांगितले, की वृक्षवाटप करण्यामागे मानव आणि निसर्ग यांचा संबंध हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. निसर्गातूनच माणसाचा जन्म झाला आणि याच निसर्गातून माणसाच्या सर्व गरजा पूर्ण होतात. निसर्गात माणसाला आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होऊ लागली. त्यामुळे मनुष्याचे जीवन जगणे सोपे झाले.

Marathwada Janvikas Sangh | मराठवाडा जनविकास संघाच्या सहकार्याने नागरिकांनी केली इर्शाळवाडीतील आदिवासी बांधवांना मदत

Categories
Breaking News cultural social महाराष्ट्र

Marathwada Janvikas Sangh | मराठवाडा जनविकास संघाच्या सहकार्याने नागरिकांनी केली इर्शाळवाडीतील आदिवासी बांधवांना मदत

Marathwada Janvikas Sangh |  सातारा जिल्हा मित्र मंडळ नवी सांगवी व संस्कार प्रतिष्ठान पिंपरी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एक हात मदतीचा या भावनेतून मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार (Arun Pawar) आणि लोकनियुक्त आदर्श सरपंच बालाजी पवार मित्रपरिवार यांच्या सहकार्याने दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीतील आदिवासी बांधवांसाठी वस्तूरुपात मदत करण्यात आली. (Marathwada Janvikas Sangh)
            यामध्ये २५ सतरंजी, ४० ब्लॅंकेट, लहान मुलांसाठी ५० स्वेटर, २० मोठे स्वेटर, लहान मुला- मुलींसाठी ७० ड्रेस, २०० साड्या, ३० बेडसीट, ५० टॉवेल, ५० नॅपकिन, २० छत्र्या या साहित्याचा समावेश आहे. ही मदत विठ्ठल चव्हाण, अजीज सिद्धकी, अण्णा जोगदंड, रणजित कानकाटे, मराठवाडा जनविकास संघ मित्र परिवार, ख्रिस्ती ऐक्य संघटना औंध रोड, श्री स्वामी समर्थ सोसायटी काळेवाडी, सूर्यकांत कुरुलकर, दिगंबर बोरावके, शेषेराव डोके, महादेव पाटेकर यांनी मराठवाडा जनविकास संघाच्या साहाय्याने सातारा जिल्हा मित्र मंडळ व स्वरूप प्रतिष्ठानकडे सुपूर्द करण्यात आली.
      सातारा जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव माने, सचिव सोमनाथ कोरे, कार्याध्यक्ष संजय चव्हाण, उपाध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, अरविंद जाधव, लक्ष्मण माळी, संस्कार प्रतिष्ठान अध्यक्ष मोहनराव गायकवाड यांनी संत, महंत, वारकरी सांप्रदायिक मंडळी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ही मदत स्वीकारली. यावेळी ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर, ह.भ.प. धारूमामा बालवडकर, शिव कीर्तनकार डॉ. गजानन महाराज वाव्हळ, ह.भ.प. आदिनाथ उर्फ नाना शितोळे, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, अतुल लंगर, वामन भरगंडे, दत्तात्रेय धोंडगे, बळीराम माळी, संतोष पाटील, अनुराज दूधभाते, प्रकाश इंगोले, विष्णू फुटाणे, जगन्नाथ फुलमाळी, प्रमोद आंग्रे, सेंद्रिय शेतीतज्ज्ञ दिलीप देशमुख बारडकर, उद्योजिका प्रितीताई काळे, किरण परमार आदी मान्यवर उपस्थित होते.
          डॉ. गजानन महाराज वाव्हळ म्हणाले, की कुणी अडचणीत असेल तर समाजातील अनेक घटकांनी एकत्र येत मदतीचा हात पुढे करायला हवा. अनेक संस्थांच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे.
          ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर म्हणाले, की समाज एकमेकांविषयी कृतज्ञता विसरत चालला आहे. प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी दुःख येते. तेव्हा कुणीतरी साद घालावी व त्याला समाजाने प्रतिसाद द्यावा. संतांनी सांगितले आहे की एकमेकांवर दया करा.
           सोमनाथ कोरे म्हणाले, की सर्व वस्तू एकत्र करून ज्यांना ज्याची गरज आहे, त्यांच्यापर्यंत पोहोच केली जाणार आहे. एकमेकांच्या हातात हात घालून समाजातील गरजूंना मदत केली तर त्यांना मोठा हातभार लागेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी मोठ्या मनाने मदत करावी.
         प्रितीताई काळे म्हणाल्या, की अरुण पवार हे प्रत्येकात ज्योत तेवत ठेवण्याचे काम करीत आहेत. अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. मात्र, घडल्या तर समाजाने एकत्र येऊन मदत करणे गरजेचे असते.
          सूत्रसंचालन बळीराम माळी यांनी, तर आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.