Bhaubij Diwali | भाऊबीज निमित्त पोस्टमन काकांचा सन्मान | भरत आणि योगिता सुराणा यांचा उपक्रम

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Bhaubij Diwali | भाऊबीज निमित्त पोस्टमन काकांचा सन्मान | भरत आणि योगिता सुराणा यांचा उपक्रम

Bhaubij Diwali | समाजाचे काही देणे लागतो या उद्धेशाने भरत सुराणा  ( अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व्यापारी सेल ) व योगिता सुराणा  ( सरचिटणीस, पुणे शहर महिला काँग्रेस कमिटी ) यांनी दिवाळी  व भाऊबीज निमित्त मार्केटयार्ड येथील  शाही शहनाई मंगल कार्यालय येथे  सर्व पोस्टमन काकांचे सन्मान करून त्यांचे औक्षण करून त्यांना दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांना राशन धान्य  वाटप व मिठाई  अभय छाजेड, राजेंद्र भाटिया, अचल जैन, भरत सुराणा, योगिता सुराणा हस्ते  वाटप करण्यात आले.
आपले विचार व्यक्त करताना अभय छाजेड म्हणले, करोनाच्या काळात सर्व लोकं आपल्या घरी होते त्यावेळी हे सर्व पोस्टमन आपल्या जीवनाची पर्वा न करता घरपोच लोकांना टपाल देण्याचे काम प्रामाणिक पणे करत होते. अस्या सर्व पोस्टमन काकांचे आपण   दिवाळी निमित्त त्यांना मिठाई व धान्य किट देऊन सन्मानित  भरत सुराणा व त्यांच्या पत्नी योगिता सुराणा करत आहे हे कौतुकास पद आहे.
या प्रसंगी  अभय छाजेड, राजेन्द्र भाटिया, अचल जैन, भरत सुराणा व अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
आपले विचार व्यक्त करताना एक पोस्टमन काका म्हणाले, या धगधगी च्या जीवनात रोज सकाळी उठून नागरिकांना टपाल पोचवणाचे काम आम्ही करतो पण आमची दखल आज पर्यंत  कोण्ही घेतली नाही. भरत सुराणा  ही पहिली व्यक्ती आहे ज्यांनी आम्हाला आठवण करून  आमचा सर्वांचा सन्मान केला व धान्य किट देऊन आम्हाला मदत  केली याचा आम्हा सर्वांना खूप खूप आनंद वाटतो.
या प्रसंगी विलास काळे, रमेश सोनकांबळे, सुरेश चौधरी, तीलेश मोटा, अशोक जैन, विश्वास दिघे, नितीन निकम, केतन जाधव, संकेत मुनोत, शिरीराज दुग्गड, शर्मिला जैन, दूरअप्पा शेख, रजिया बेल्लारी, सीमा महाडिक, हलिमा शेख, बेबीताई राऊत, महावीर दहिभाते, विकास काळे, रमेश जाधव, सईपानपितले, संदीप सुमेरपुरिया व अनेक प्रतिष्ठित मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.  सर्वांनी दिवाळी निमित्त फराळाचा आनंद घेतला.

BJP Celebrated Diwali With Katkari | भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने पालावरची दिवाळी

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

BJP Celebrated Diwali With Katkari | भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने पालावरची दिवाळी

BJP Celebrated Diwali With Katkari | पुणे |  भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या (BJP Pune City) वतीने राजगड पायथ्यापाशी असलेल्या पाल बुद्रुक या अतिदुर्गम गावात कातकरी समाजच्या (Katkari Community) बांधवाबरोबर दिवाळी साजरी करण्यात आली.  शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्या नेतृत्वात कातकरी वस्ती वरील रहिवाशी यांच्या समवेत पदाधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी केली. (BJP Pune)
यावेळी वस्तीवरील लहान मुलांना नवीन कपडे, फटाके, मिठाई चे वाटप महिलांना साडी चोळी, भांडी कुंडी तसेच महिना भर पुरेल एवढा शिधा देण्यात आला.
यावेळी बोलताना घाटे म्हणाले की ‘ दिवाळी हा आनंदाचा उत्सव आहे आपण शहरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे करत असतो परंतु हा उत्सव समाजातील वंचित घटकाबरोबर साजरा करण्यात जो मनस्वी आनंद प्राप्त होतो तो अद्वितीय असतो’.

यावेळी कातकरी समाजच्या वतीने ही शहर भा ज पा चे आभार मानण्यात आले.
या उपक्रमात शहराध्यक्ष घाटे यांच्या सह सरचिटणीस पुनीत जोशी, बापू मानकर ,राजेंद्र शिळीमकर, रवींद्र साळेगावकर, महेश पुंडे, राहुल भंडारे,वर्षा तपकीर, सुभाष जंगले महिला आघाडी अध्यक्षा हर्षदा फरांदे,री ,युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ,ओ बी सी आघाडी नामदेव माळवदे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Eco Friendly Diwali | PMC Pune | दिवाळी सणाच्या निमित्ताने पुणे महापालिकेचे पुणेकरांना आवाहन!

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Eco Friendly Diwali | PMC Pune | दिवाळी सणाच्या निमित्ताने पुणे महापालिकेचे पुणेकरांना आवाहन!

Eco Friendly Diwali | PMC Pune | पुणे मनपा (Pune Municipal Corporation) तर्फे शहरातील नागरिकांनी दिवाळी हा सण पर्यावरणपूरक पद्धतीने (Eco Friendly Diwali) साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळी हा सण अंधार करुन दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. हा सण साजरा करताना नागरिकांनी हवा प्रदुषण तसेच ध्वनी प्रदुषण यांसारख्या उदभवणाऱ्या समस्यांना आळा घालण्याकरिता पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा यासाठी खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. असे आवाहन अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (IAS Dr Kunal Khemnar) यांनी केले आहे. (PMC Pune News)

हवा प्रदुषण:-

फटाके हे वायू प्रदुषणास कारणीभूत ठरतात तरी शहरातील हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी
प्रत्येक नागरिकांनी फटाक्यांचा वापर करणे टाळावे.

ध्वनीप्रदुषण :-

मोठ्या आवाजाचे फटाके ध्वनी प्रदुषण करतात, अशा फटाक्यांचा वापर करू नये. दिवाळीत 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके उडविण्यास मनाई केली आहे. तरी. यांसारखे फटाके उडविणे टाळावे. नागरिकांनी शांतता क्षेत्र जसे की शैक्षणिक संस्था, दवाखाने न्यायालये इ.ठिकाणी फटाके उडवू नये

पर्यावरणपूरक पर्याय:-

नागरिकांनी घर सजविण्यासाठी अधिक ऊर्जा कार्यक्षम प्रकाश देणारे LED दिवे किंवा अपारंपारिक ऊर्जा स्रोत जसे की सौर दिवे वापरावेत.
रेडिमेड (Plaster of Paris) पासून बनवलेले किल्ले पर्यावरणास घातक ठरतात त्यांचा वापर न करता दगड मातीपासून किल्ले बनवावेत.
• रासायनिक रंग/ रांगोळी न वापरता नैसर्गिक सहित्यांसह रांगोळी आकर्षक बनवावी.
तसेच प्लास्टिकचे आकाशकंदील न वापरता पर्यावरणपूरक किंवा रिमायकल करता येणाऱ्या वस्तूंपासून बनलेले आकाशकंदील वापरुन इको फ्रेंडली सजावट करावी.
हवा प्रदूषणाचे प्रमाण जास्त झाल्याने श्वसनाचे आजार होवू शकतात यासाठी जास्त धूर उत्सर्जितकरणाऱ्या फटाक्यांचा वापर करणे टाळावे.

Pune Municipal Corporation Fort Competition | पुणे महापालिकेची किल्ले स्पर्धा आजपासून | सर्वोत्कृष्ट किल्ल्यास ७००१ चे बक्षीस 

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Pune Municipal Corporation Fort Competition | पुणे महापालिकेची किल्ले स्पर्धा आजपासून | सर्वोत्कृष्ट किल्ल्यास ७००१ चे बक्षीस

 

Pune Municipal Corporation Fort Competition | पुणे महानगरपालिका, उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाच्यावतीने (PMC Garden Department)  १९९२ पासून दिपावलीच्या निमित्ताने किल्ले स्पर्धा आयोजित केल्या जातात. वाढत्या शहरीकरणामुळे, राहणीमानात झालेल्या बदलामुळे मुलांना किल्ले करण्यासाठी उपलब्ध होणारी अपुरी जागा असलेने, मुलांना जागा उपलब्ध करून आपल्याकडे असलेल्या अनमोल किल्ल्यांचा पुन्हा अभ्यास करता यावा, त्याबद्दल मुलांच्या मनात आवड निर्माण व्हावी, इतिहास भुगोलाची आवड वृध्दींगत व्हावी, शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे या उद्देशाने पुणे महानगरपालिका प्रत्येक वर्षी ही स्पर्धा आयोजित करीत आहे. यावर्षीही ९ ते १९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये २९ वे किल्ले स्पर्धा व प्रदर्शन छ.   ठिकाणी आयोजित करणेत आलेले असून स्पर्धेमध्ये एकूण तीन विभाग करणेत आलेले आहेत. अशी माहिती उद्यान विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation Garden Department)

उद्यान विभागाच्या माहितीनुसार  किल्ले स्पर्धांसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे. सदरहू स्पर्धेच्या किल्ल्यांचे परिक्षण इतिहास व भूगोल तज्ज्ञ यांचे कडून करण्यात येणार आहे. किल्ले स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रत्येक विभाग व गटामध्ये प्रथम क्रमांकास ५००१/-
व द्वितीय क्रमांकास ३००१/- व तृतीय क्रमांकास २००१/- रूपयाचे पारितोषिक देणेत येणार असून, तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ किल्ल्यांस र.रु.७००१/- चे खास पारितोषिक याप्रमाणे पारितोषिक देणेत येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन दि. ०९/११/२०२३ रोजी सायंकाळी ४.०० वा. करण्यात येणार आहे.

यशस्वी स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ ०९/११/२०२३ रोजी सायंकाळी ४.३० वा. संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन व बक्षिस समारंभ  महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांचे हस्ते होणार आहे.
तसेच मा. अति. महापालिका आयुक्त (ज), मा. अति. महापालिका आयुक्त (वि)व मा. अति. महापालिका आयुक्त (ई) पुणे महानगरपालिका उपस्थित
राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमामध्ये राजीव गांधी प्राणीसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्राच्या संकेतस्थळाचे व ऑनलाईन तिकीट बुकींग संगणक प्रणालीचे उद्घाटन होणार आहे.

या स्पर्धेमध्ये सुवर्णदुर्ग, बिजयदुर्ग, राजगड, सिंहगड, शनिवारवाडा, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, तोरणा, अंतुरगड, सज्जनगड, सिंधुदुर्ग, कोरीगड, पारांडा, मल्हारगड, जंजीरा, पुरंदर काल्पनिक किल्ले
इ. किल्ल्यांची हुबेहुब प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहेत. प्रदर्शनामध्ये वरील ठिकाणी महाराष्ट्रातील विविध किल्ले किल्ल्यांबाबतच्या अधिक माहितीसाठी किल्ल्यांचे नकाशे, किल्ल्यांवर व पर्यावरणावर
आधारित घोषवाक्य इत्यादी माहिती सदरचे किल्ले पहाताना नागरिकांना पहावयास मिळणार आहे.

प्रदर्शन हे  ०९ नोव्हेंबर सायंकाळी ४.०० वा. नंतर ते दिनांक
१९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये नागरिकांना पाहण्यासाठी विनामुल्य खुले राहणार आहे.

PMPML Employees Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रस्ताव पुणे महापालिका आयुक्तांच्या टेबलवर पडून!

Categories
Breaking News PMC पुणे

PMPML Employees Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रस्ताव पुणे महापालिका आयुक्तांच्या टेबलवर पडून!

| दिवाळी तोंडावर तरीही अजून बोनस नाही

PMPML Employees Diwali Bonus  | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून दिवाळीची भेट देत बोनस देण्यात आला आहे. दरम्यान दिवाळी तोंडावर आली तरीही पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना मात्र अजूनही बोनस देण्यात आलेला नाही. याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या टेबलवर गेल्या 15 दिवसापासून पडून आहे. दिवाळी आली तरी बोनस नाही म्हणून कर्मचारी धास्तावले आहेत. बोनसचा प्रस्ताव लवकर मान्य करण्याची मागणी केली जात आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (PMPML) सर्व कायम, बदली सेवकांना सानुग्रह अनुदान ८.३३% व बक्षिस  २१०००/- दिवाळीपूर्वी देण्याची मागणी कर्मचाऱ्यानी ने पीएमपीच्या सीएमडी (PMPML CMD) कडे केली आहे.  दरम्यान कालच पुणे महापालिका सेवकांना (PMC Employees) बोनस देण्यात (Bonus) आला आहे. त्याचप्रमाणे पीएमपी सेवकांना दिलासा दिला जाणार का, असा प्रश्न पीएमपी कर्मचारी विचारत आहेत. (PMPML Employees Diwali Bonus)
पुणे महापालिका आणि पिंपरी महापालिका संचलन तुटीच्या माध्यमातून पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनस देतात. पीएमपी कडून याचे प्रस्ताव दोन्ही महापालिकाना देण्यात आले आहेत. दरम्यान पुणे महापालिका प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी आयुक्ताकडे पाठवण्यात आला आहे. मात्र गेल्या 15 दिवसापासून आयुक्तांच्या टेबलवर हा प्रस्ताव तसाच पडून आहे. आयुक्तांनी मान्यता दिल्यांनतर हा प्रस्ताव स्थायी समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवला जाणार आहे. यात बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधी बोनस मिळणार कि नंतर असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत लवकर निर्णय करण्याची मागणी पीएमपी कर्मचारी करत आहेत.
—-

Marathwada Janvikas Sangh | Diwali | मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला, कष्टकरी, निराधार मुलांना पोशाख व मिठाई वाटप करून दिवाळी साजरी

Categories
cultural social पुणे

Marathwada Janvikas Sangh | Diwali | मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला, कष्टकरी, निराधार मुलांना पोशाख व मिठाई वाटप करून दिवाळी साजरी

Marathwada Janvikas Sangh | Diwali | मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने समाजातील श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी अशा कामगारांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची दिवाळी, नंतर पाहू आपली’ या भूमिकेतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची निराधार मुले मुली, सफाई कर्मचारी, पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना पोशाख व मिठाई, घरकाम करणाऱ्या महिलांना साडी आणि मिठाई वाटप वाटप करण्यात आली.

पिंपळे गुरव पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी, महापालिकेचे सफाई कामगार, भोसरी धावडे वस्ती येथील घरकाम करणाऱ्या महिला, विकास अनाथ आश्रम मोरे वस्ती चिखली येथील अनाथ मुले, घंटागाडीवर काम करणाऱ्या पुरुष व महिला, मे बेसिक्स मुनिसिपल वेस्ट व्हेचर्स कंपनीचे कर्मचारी आदी सर्वांना साडी, कपडे व मिठाई वाटप करण्यात आली.

यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, विकास अनाथ आश्रम संस्थेचे अध्यक्ष माऊली हरकळ, कामगार नेते बाळासाहेब साळुंके, घंटागाडी मुकादम विनोद कांबळे, बळीराम माळी, वामन भरगंडे, दत्तात्रय धोंडगे, समाजसेविका विजया नागटिळक, सूर्यकांत कुरुलकर, नितीन चिलवंत, किरण परमार, सागर मगर आदी उपस्थित होते.
याबाबत अरुण पवार यांनी सांगितले, की आपल्या माणसांसाठी वर्षातील सर्वात मोठा आनंद वाटता येणारा सण दिवाळी आहे. मराठवाडा जनविकास संघ विविध घटकांना सोबत घेऊन नेहमीच दिशादर्शक आणि सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवत आहे. प्रथम कष्टकऱ्यांची दिवाळी साजरी झाली पाहिजे, या भावनेतून या उपक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.

TMV Pune | लोकमान्य टिळक प्रतिष्ठान आणि ‘टिमवि’तर्फे ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’

Categories
Breaking News cultural social पुणे

TMV Pune | लोकमान्य टिळक प्रतिष्ठान आणि ‘टिमवि’तर्फे ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’

 

TMV Pune | पुणे : सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी लोकमान्य टिळक प्रतिष्ठान (Lokmanya Tilak pratishtan) आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (Tilak Maharashtra Vidyapeeth) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. २ नोव्हेंबर ते रविवार दि. ५ नोव्हेंबर या कालावधीत बाजीराव रस्त्यावरील नातू बाग मैदानावर हा उपक्रम होत आहे.

लोकमान्य टिळक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक (Dr Rohit Tilak) यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

जिल्हाधिकारी श्री. राजेश देशमुखपोलिस आयुक्त श्री. रितेश कुमारटिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीच्या फराळापासूनदिवाळी साजरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू, साहित्य एकाच छताखाली आणि ते देखील स्वस्त किंमतीत उपलब्ध व्हावे, हा ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ उपक्रमाचा उद्देश आहे, असे सांगून डॉ. टिळक म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला. त्यातून हळूहळू प्रत्येक जण सावरला. मात्र, वाढत्या महागाईमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. अशावेळी त्यांचा सण गोड व्हावा, दर्जेदार फराळ आणि दिवाळीसाठी गरजेच्या वस्तू कमी किमतीत त्यांना मिळाव्यात याकरता लोकमान्य टिळक प्रतिष्ठान आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांनी पुढाकार घेतला आहे.
नातू बाग मैदानावर ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ मध्ये चाळीस स्टॉल्स असतील. स्टॉलधारकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, सर्व स्टॉल्स मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून हा सर्व खर्च लोकमान्य टिळक प्रतिष्ठान आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ उचलणार आहे. दर्जा, गुणवत्ता यामध्ये कोणतीही तडजोड होऊ न देता सर्व स्टॉलधारकांनी नागरिकांना बाजारभावापेक्षा किफायतशीर दरात दिवाळीच्या साहित्याची विक्री करावी, एवढी एक अट आहे. अनेक नामांकित ब्रँडससह व्यावसायिक, व्यापारी ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ उपक्रमात सहभागी होत आहेत. बाजारभावापेक्षा अतिशय कमी किंमतीत त्यांच्याकडून दर्जेदार साहित्याची विक्री केली जाईल. लोकमान्य टिळक प्रतिष्ठानदेखील स्वतंत्र स्टॉल उभारणार असून स्टॉलवर अवघ्या १०० रुपयांमध्ये तीन किलो साखर दिली जाईल. सुमारे २५ हजार नागरिकांना सुविधेचा लाभ होईल. त्याचबरोबर या स्टॉलवर तेल, डाळी आणि मोती साबण स्वस्त दरात नागरिकांना मिळेल.

पहिल्या दिवशी, दि. २ नोव्हेंबर रोजी ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ उपक्रमाची वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा आणि दुसऱ्या दिवसापासून सकाळी आठ ते रात्री दहा, अशी राहणार आहे, अशी माहिती देऊन डॉ. टिळक यांनी सांगितले की, या कालावधीत नातू बाग मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहिल. यामध्ये पहिल्या दिवशी सायंकाळी ६ वाजता ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा लोकप्रिय कार्यक्रम सादर होईल. शनिवार दि. ४ नोव्हेंबर रोजी संदीप पाटील ‘खेळ पैठणीचा’ हा खास कार्यक्रम महिलांसाठी सादर करणार आहे. या शिवाय मनोरंजनाचे कार्यक्रम, तसेच पाककला, मेहंदी, टॅटू, ज्यूट बॅग पेंटिंग, फ्लॅश मॉब, ड्रम सर्कल असे भरगच कार्यक्रम होणार आहेत. दररोज ६ लकी ड्रॉ काढले जाणार असून विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके दिली जातील. याचबरोबर, नातू बाग मैदानावर रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असून ती बालगोपाळांसाठी आकर्षण ठरेल. ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ उपक्रमाचा सुमारे दोन लाख नागरिकांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.

नागरिकांना प्रत्येक सण आनंदात साजरा करता यावा यासाठी अनेक घटक सणांच्या दिवशीही कार्यरत असतात. त्यामध्ये अग्नीशामक दलाचे जवान, पोलिस कर्मचारी, वाहतूक पोलिस, विद्युत मंडळाचे कर्मचारी, परिचारिका, लष्करी जवान यांसह अनेकांचा समावेश असतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात काही प्रातिनिधिक सत्कार केले जाणार आहेत, असे डॉ. टिळक यांनी नमूद केले.

Anganwadi Sevika | Maharashtra News | अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार “भाऊबीज भेट”

Categories
Breaking News Education Political social महाराष्ट्र

Anganwadi Sevika | Maharashtra News | अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार “भाऊबीज भेट”

– महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Anganwadi Sevika | Maharashtra News | बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी  घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज (Bhaubij) देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Women and Child Welfare Minister Aditi Tatkare https://en.m.wikipedia.org/wiki/Aditi_Sunil_Tatkare) यांनी दिली.
            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पोषण, स्तनदा माता, गरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो. हेच लक्षात शासन त्यांच्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत  सन २०२३- २४ या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनावरील कर्मचाऱ्यांना “भाऊबीज भेट” वितरित करण्यात येणार आहे.  भाऊबीज भेट साठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या बाबतचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
*****

Divyang | CMO Maharashtra | दिव्यांगांची दिवाळी | महाराष्ट्र सरकारने दिले हे गिफ्ट

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Divyang | CMO Maharashtra | दिव्यांगांसाठी ६६७ पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकाने खरेदीस मान्यता

| दिव्यांगांच्या सेवेसाठी महामंडळाचे बळकटीकरण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Divyang | CMO Maharashtra https://mshfdc.co.in/ | राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी ६६७ हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानांची खरेदी करण्यास तसेच महामंडळाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली, दरम्यान, दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यामाध्यमातून त्यांची सेवा करण्याकरिता कार्यरत दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे बळकटीकरण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (https://www.maharashtra.gov.in/ )यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक, वार्षिक सर्वसाधारण बैठक संपन्न झाली, त्यावेळी महामंडळाच्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.  दिव्यांग कल्याण सचिव अभय महाजन, दिव्यांग वित व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्तींसाठी ६६७ हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानांची खरेदी फरिदाबाद येथील कंपनीकडून करण्यात येणार असून जानेवारी २०२४ पर्यंत दिव्यांग लाभार्थ्यांना याचे वाटप करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. संबंधित कंपनीने लाभार्थ्यांच्या दिव्यांग प्रकाराप्रमाणे ही वाहने सुधारित करुन द्यावीत, यासाठी महामंडळाने पाठपुरावा करावा शिवाय लाभार्थी निवडीची कार्यवाही लवकर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

*दिव्यांग लाभार्थी निवड प्रक्रियेसाठी नवीन पोर्टल*

दिव्यांग बांधवांच्या कल्याणाच्या विविध योजनांची माहिती, लाभार्थी निवड प्रक्रियेसाठी वेब पोर्टल तयार करुन जागतिक दिव्यांग दिनी ३ डिसेंबर रोजी ते सुरु करण्यात यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.

*रोजंदारी, बाह्ययंत्रणेद्वारे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ*

दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या विविध कार्यालयांमध्ये रोजंदारी तत्त्वावर आणि बाह्य यंत्रणेद्वार कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सहायक, लिपिक-टंकलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, वाहनचालक, लिपिक-टंकलेखक/वसुली निरीक्षक आणि शिपाई या पदावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात अडीच हजार ते ५ हजार रुपयांपर्यंतची वाढ होणार आहे.

*दिव्यांग कल्याण विभागातील पदनिर्मिती प्रस्तावाला मान्यता देण्याचे निर्देश*

दिव्यांग कल्याण विभागातील पदनिर्मितीच्या प्रस्तावाला वित्त, नियोजन विभागाने तातडीने मान्यता देण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. बैठक सुरु असतानाच वित्त विभागाच्या प्रधान सचिवांना दूरध्वनीवरुन हे निर्देश दिले. लवकरच दिव्यांग कल्याण आयुक्तांचे पद भरण्यात येणार असल्याचे सांगून दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ देण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम आयोजनासाठी प्रति जिल्हा २५ लाख रुपये निधी देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक नवीन शाह यांची महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या पदसिद्ध संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी बैठकीत महामंडळाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
०००००

DA Hike Update | केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार! | महागाई भत्ता कधी मिळणार जाणून घ्या

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश

DA Hike Update | केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार! | महागाई भत्ता कधी मिळणार जाणून घ्या

 DA Hike Update | केंद्रीय कर्मचारी (Central Government Employees) त्यांच्या वाढलेल्या महागाई भत्त्याची (Dearness Allowance) वाट पाहत आहेत. मात्र  प्रतीक्षा लांबत चालली आहे.  सप्टेंबरच्या अखेरीस महागाई भत्ता (DA) जाहीर होण्याची शक्यता होती. पण, आता एक नवीन अपडेट समोर आले आहे.  असे अपडेट जे कदाचित केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना (Pensioner) जाणून घेणे आवडणार नाही.  किंबहुना जे कर्मचारी सप्टेंबरअखेर महागाई भत्ता जाहीर होण्याची वाट पाहत होते त्यांची निराशा होऊ शकते.  कारण, या महिन्यात डीए वाढीची घोषणा होणार नाही.  ते मंजूर करण्यास सरकार थोडा विलंब करू शकते. (DA Hike Update)

 या महिन्यात कोणतीही घोषणा होणार नाही

 सप्टेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्यास मान्यता देऊ शकते, असा दावा अहवालात करण्यात आला होता.  पण, ताज्या अपडेटनुसार, सरकार या महिन्यात अशी कोणतीही घोषणा करणार नाही.  तथापि, काही अहवालांमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, सरकार दिवाळीपूर्वी (Diwali) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यास मान्यता देऊ शकते.  मात्र, यावेळी दिवाळी 12 नोव्हेंबरला येत आहे.  अशा स्थितीत एवढी प्रतीक्षा करावी लागणार नाही. (7th Pay Commission)

 त्यामुळे महागाई भत्ता कधी जाहीर होणार?

 The Karbhari ला मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार सणासुदीच्या काळात कॅबिनेटमध्ये महागाई भत्ता मंजूर करेल आणि त्यानंतर त्याचे पेमेंट सुरू होईल.  ऑक्टोबरमध्ये दसऱ्यापूर्वी सरकार त्यास मान्यता देऊ शकते.  म्हणजे ऑक्टोबरच्या अखेरीस पगारात नवीन महागाई भत्ता जोडला जाऊ शकतो.  मात्र, अद्याप या तारखेबाबत सरकारकडून कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही.  पण, सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, दसऱ्याच्या आधी त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. (Dearness allowance)

 महागाई भत्ता किती वाढणार?

 केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारावर (CPI-IW) ठरवला जातो.  महागाई भत्ता मोजण्यासाठी एक निश्चित सूत्र आहे.  7वी CPC DA% = [{AICPI-IW ची सरासरी (आधारभूत वर्ष 2001=100) गेल्या 12 महिन्यांसाठी – 261.42}/261.42×100]
 =[{382.32-261.42}/261.42×100]= 46.24.  अशा स्थितीत महागाई भत्त्यात केवळ ४ टक्के वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  म्हणजेच त्यांचा महागाई भत्ता ४६ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.

 4% DA ची पुष्टी कशी झाली?

 गेल्या 12 महिन्यांतील CPI-IW ची सरासरी 382.32 असेल.  सूत्रानुसार, एकूण DA 46.24% असेल.  सध्याचा डीए ४२% आहे.  अशा परिस्थितीत, नवीन गणनेनुसार, 1 जुलै 2023 पासून DA मधील वाढ 46.24%-42% = 4.24% होईल.  गणनेमध्ये दशांश मोजले जात नसल्यामुळे, महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढेल.  जून 2023 साठी CPI-IW डेटा 31 जुलै 2023 रोजी जारी करण्यात आला.  तेव्हापासून सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार घेणारे केंद्रीय कर्मचारी महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा करत आहेत.

 थकबाकीही दिली जाईल

 केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ ऑक्टोबरमध्ये मंजूर केली जाईल.  अशा परिस्थितीत त्यांचा नवीन महागाई भत्ता ऑक्टोबरमध्येच जोडला जाईल.  अशा प्रकारे त्यांना ऑक्टोबरच्या पगारासह ३ महिन्यांची थकबाकीही दिली जाईल.  DA 1 जुलै 2023 पासून लागू होईल.  त्यामुळे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील फरक थकबाकी म्हणून ऑक्टोबरच्या पगारात जोडावा लागेल.  पेन्शनधारकांच्या बाबतीत, महागाई भत्त्याच्या बरोबरीने महागाई सवलत देखील वाढविली जाते.  अशा परिस्थितीत पेन्शनधारकांना 4 टक्के अतिरिक्त पेमेंट देखील मिळेल आणि जुलैपासून पेन्शनची थकबाकी मिळेल.
——
News Title | DA Hike Update | Central employees will have to wait! | Know when you will get Dearness Allowance