Pune Traffic | Pune Congress | पुणे शहरातील वाहतूक कोंडी त्वरित दूर करा | काँग्रेस पक्षाकडून पोलीस आयुक्तांना मागण्यांचे निवेदन

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Traffic | Pune Congress | पुणे शहरातील वाहतूक कोंडी त्वरित दूर करा  | काँग्रेस पक्षाकडून पोलीस आयुक्तांना मागण्यांचे निवेदन

मोहन जोशी यांची मागणी

Pune Traffic | Pune Congress | पुणे : शहरातील वाहतूक कोंडी (Pune Traffic Congestion) पुणेकरांसाठी प्रचंड त्रासदायक आहे. उत्सव काळात होणारी गर्दी आणि त्याकडे पोलिसांचा कानाडोळा यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह सर्वत्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पुणे शहरातील ही वाहतूक कोंडी त्वरित दूर करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी (CP Pune) लक्ष घालावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या (Pune Congress) वतीने करण्यात आली.
पुण्यातील वाहतूक कोंडीच्या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh Kumar), पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक (ACP Sandip Karnik) व वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांना देण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) , माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे (Ramesh Bagwe), नुरुद्दीन सोमजी, जया किराड, प्रशांत सुरसे, प्रथमेश आबनावे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.
मोहन जोशी यांनी दिलेल्या निवेदनात, यासंदर्भात त्वरित आढावा बैठक घेऊन पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी कोंडी होण्याच्या वेळी वाहतूक नियमनाची जबाबदारी वाहतूक शाखेतील सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी. यासाठी राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ), पोलीस आयुक्तालयातील ज्यादा कुमक, जवळील पोलीस स्टेशनचे कर्मचारी, महानगरपालिकेचे ट्राफिक वॉर्डन यांची कुमक मागवून घ्यावी. स्मार्ट सिटीतील ट्राफिक सिग्नल त्वरित कार्यान्वित करावेत. गणेशोत्सव काळात सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. कलावंताच्या सहकार्याने वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जनजागृतीपर व्हिडीओ करावेत. उत्सव काळात स्मार्ट सिटी, पुणे मेट्रो व महापालिकेतर्फे होणारी खोदकाम थांबवावीत. तसेच शहरातील जड वाहतुकीच्या संदर्भातल्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
मोहन जोशी म्हणाले, “पुणे शहरातील वाहतूक कोंडी हा कळीचा मुद्दा आहे. शहरामध्ये वाहतूक नियमन कोलमडलेले आहे. आज पुणेकर नागरिकांना वेठीला धरले जात आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यावर आणि वाहतूक नियमन सुरळीत करण्यावर पोलिसांनी भर द्यावा. शहरातील वाहतूक कोंडी दूर न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.”
——-
News Title | Pune Traffic | Pune Congress | Eliminate traffic congestion in Pune city immediately | Statement of demands from the Congress Party to the Commissioner of Police

Jansanvad Yatra | Pune Congress | पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंटमध्ये जनसंवाद यात्रा

Categories
Breaking News Political पुणे

Jansanvad Yatra | Pune Congress | पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंटमध्ये जनसंवाद यात्रा

 

Jansanvad Yatra | Pune Congress | पुणे – भारताची लोकशाही आणि डॉ.आंबेडकर यांनी दिलेले संविधान धाब्यावर बसवून मोदी सरकारचा (Modi Government) मनमानी कारभार, सरकारी यंत्रणांमधील वाढता हस्तक्षेप, महागाई आणि बेरोजगारी या विरोधात काँग्रेस पक्षाची जनसंवाद यात्रा (Congress Jansanvad Yatra) पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात (Pune Cantonment Constituency)  माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सायंकाळी काढण्यात आली.

यात्रेला सर्व थरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात्रेचा प्रारंभ कॅम्प मधील इंदिरा गांधी चौकातून करण्यात आला. ही यात्रा बाटा चौक मार्गे सेंट्रल स्ट्रीट पोलीस चौकी, कोळसा गल्ली, भोपळे चौक, कुरेशी मस्जिद, गुडलक हॉटेल, वखार चौक, चुडामण तालीम, जुना मोटर स्टॅण्ड, भवानी माता मंदिर, बनकर तालीम, दादापीर दर्गा, छाया टॉकिज, ए.डी.कॅम्प चौक, राजेवाडी, कॉर्टर गेट, संत कबीर चौक, मनुषा मस्जिद, रास्ता पेठ पॉवर हाऊस चौक अशा मार्गाने काढण्यात येऊन यात्रेचा समारोप नरपतगीर चौक येथे करण्यात आला.

या जनसंवाद यात्रेत ज्येष्ठ नेते पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या समवेत कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, अविनाश बागवे, लता राजगुरू, पूजा आनंद, शानी नौशाद, रफिक शेख, मंजूर शेख, करण मकवाणी, जया किराड, नुरूद्दीन सोमजी, संगीता पवार, प्रविण करपे, सुरेश कांबळे, विठ्ठल थोरात, अमीर शेख, सुजित यादव,असिफ शेख, विजय जाधव, चेतन अगरवाल, कान्होजी जेधे, सुरेखा खंडागळे, प्रशांत सुरसे, अरूण गायकवाड आदी पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात्रा मार्गावर जनतेने यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले, स्वागत फलकही लावण्यात आले होते. छोटे व्यापारी, पथारीवाले, युवक, महिला यांनी यात्रेतील नेत्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला, गाऱ्हाणी मांडली आणि सर्व जाती-धर्मात प्रेम निर्माण व्हावे या काँग्रेसच्या उद्देशाचे स्वागत केले.

भारत जोडो यात्रेतून कॉंग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी सामान्य जनतेशी संवाद साधला. त्यांच्याच प्रेरणेतून जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे. लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही यात्रा यशस्वी होत आहे, असे मनोगत मान्यवर वक्त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

Pune Congress Jansanvad | पुणे काँग्रेसच्या ‘जनसंवाद’ पदयात्रेचा शुभारंभ पर्वती विधानसभा मतदारसंघातून

Categories
Breaking News Political पुणे

Pune Congress Jansanvad | पुणे काँग्रेसच्या  ‘जनसंवाद’ पदयात्रेचा शुभारंभ पर्वती विधानसभा मतदारसंघातून 

  Pune Congress Jansanvad    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (Maharashtra congress) आदेशानुसार संपूर्ण राज्यभर ‘जनसंवाद’ पदयात्रा (Jansanvad Padyatra) काढण्यात येणार आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (Pune congress) वतीने या पदयात्रेचा शुभारंभ पर्वती विधानसभा मतदार संघातून करण्यात येणार असून उद्या रविवार ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वा., देशभक्त केशवराव जेध चौक, स्वारगेट ते गंगाधाम चौक पर्यंत जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती शहर काँग्रेसच्या वतीने देण्यात आली. (Pune Congress Jansanvad)

     

याबाबत शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे कि, केंद्रातील मोदी सरकार जनतेची लुट करत आहे, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी उद्धवस्थ झाला आहे. कृत्रिम टंचाईमुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे. भाजपा लोकशाही नाही तर सत्तेच्या स्वार्थासाठी काम करत आहे. आम्ही या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारचा पर्दाफाश करणार आहोत.

भाजपा सत्तेच्या जोरावर सर्व सरकारी यंत्रणामध्ये हस्तक्षेप करत आहे. संविधान संपुष्टात आणले जात आहे, विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करत आहे. जनतेच्या समस्यांकडे भाजपा सरकार लक्ष देत नाही म्हणून जनतेच्या व्यथा, समस्या, वेदना या यात्रेच्या माध्यमातून समजून घेतल्या जाणार आहेत.

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका मागील दिड-दोन वर्षांपासून घेतल्या जात नाहीत. राज्यातील वातावरण सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असून पराभवाच्या भितीने निवडणुका घेतल्या जात नाहीत. विविध कारणे देऊन सरकार निवडणुका टाळत आहे. सरकारकडे ओबीसी, मराठा आरक्षणासंदर्भात कोणतेही धोरण नाही. नोकर भरती सुरु असतानाही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. सरकार केवळ बैठकांचे गाजर दाखवत आहे. या सर्व मुद्द्यांवर लोकांसोबत आम्ही संवाद साधणार आहोत. महत्वाचे म्हणजे या जनसंवाद पदयात्रेचा उद्देश लोकभावना जाणून घेणे हा आहे. अशी माहिती या पत्रकाद्वारे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली आहे.

Ghanshyam Nimhan | Pune congress | पुणे काँग्रेसच्या चिटणीसपदी घनश्याम निम्हण

Categories
Breaking News Political पुणे

Ghanshyam Nimhan | Pune congress | पुणे काँग्रेसच्या चिटणीसपदी घनश्याम निम्हण

Ghanshyam Nimhan | Pune congress  | घनश्याम निम्हण यांची पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.

 निम्हण म्हणाले, मी नागरिकांसोबत फिरणारा काँग्रेस कार्यकर्ता आहे. पक्षाची ध्येयधोरणे समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून काँग्रेस पक्ष बळकट करण्यास प्राधान्य देणार आहे.

Mallikarjun Kharge’s birthday | कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक व सामाजिक ऐक्याचा संकल्प

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Mallikarjun Kharge’s birthday | कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक व सामाजिक ऐक्याचा संकल्प

Mallikarjun Kharge’s birthday | आज सर्व धर्माच्या धर्मगुरूंनी कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Congress President Mallikarjun Kharge’s birthday) यांना वाढदिवसानिमित्त आशीर्वाद देतानाच, शांततेचा व समानतेचा संदेश दिला हे महत्वाचे आहे. देशातील धार्मिक व जातीय एकोपा आज धोक्यात आणण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करीत आहेत, त्याला विरोध केला पाहिजे. देशाला धार्मिक व सामाजिक ऐक्याची गरज आहे आणि त्याचा संकल्प आपण सर्वांनी ऐतिहासिक जेधे मॅन्शन येथून कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त करावा असे आवाहन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार (Ulhas Pawar) यांनी केले. (Mallikarjun Kharge’s birthday)

अ. भा. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ऐतिहासिक जेधे मॅन्शन येथे आयोजित ‘सामाजिक ऐक्य’ सभेत अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. यावेळी हिंदू धर्मगुरू पंडित तेजस लक्ष्मण सप्तर्षी, शीख धर्मगुरू ग्यानी अमरजीत सिंग, मुस्लिम धर्मगुरू मौलाना अजरान गोवर साब, बौद्ध धर्मगुरू भन्ते उपाली बोधी, ख्रिश्चन धर्मगुरू रेवरंड सुधीर चव्हाण आणि या ‘सामाजिक ऐक्य’ सभेचे आयोजक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, दत्ता बहिरट, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, भिमराव पाटोळे, रमेश अय्यर, नुरुद्दीन सोमजी आदी प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

उल्हास पवार यांनी जेधे मॅन्शनचे ऐतिहासिक महत्व विषद करून म्हंटले की, आज देशाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. मणिपूर राज्यांमध्ये माता भगिनींवर गेली तीन महिने भरदिवसा अत्याचार होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. सर्व धर्माचे ऐक्य आणि सामंजस्यासाठी राहुल गांधी यांनी जो प्रेमाचा संदेश दिला, त्यांच्या या कामाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे ते म्हणाले.

विविधतेत एकता म्हणजेच भारत

या प्रसंगी प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना शुभेच्छा देऊन म्हंटले की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्व जाती धर्माचे लोक ब्रिटिशांविरूद्ध एकत्र लढले, सारा समाज जाती व धर्मभेद विसरून लढला. मात्र आता स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर याच समाजात धर्म आणि जात यांमध्ये दुही माजवून सामाजिक ऐक्याला सत्ताधारी बाधा आणत आहेत. अशा समाज द्रोही शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्याचा संकल्प कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त करूया असे सांगून ते म्हणाले की, भिन्न जाती व धर्म हे आपले देशाचे वैशिष्ट्य आहे आणि या विविधतेत ऐक्य आहे हेच अधिक महत्वाचे आहे. कॉंग्रेस पक्षाने या विविधतेत ऐक्य राखले. मात्र सत्ताधारी केवळ सत्ता राखण्यासाठी समाजात तेढ निर्माण करीत आहेत. अशी तेढ निर्माण झाली तर काय होते याचे मणिपूरमधील घटना हे उत्तम उदाहरण आहे. देशात असे घडू नये म्हणून समाजात दुही माजवणाऱ्यांचा सदैव पराभव केला पाहिजे असे ते म्हणाले.

या प्रसंगी सर्व धर्मगुरूंनी आपली मनोगते व्यक्त केली आणि सामजिक व धार्मिक सलोखा हीच भारताची खरी ओळख असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन कान्होजी जेधे यांनी केले.

याप्रसंगी कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. त्यामध्ये जया किराड, सोमेश्वर बालगुडे, प्रवीण करपे, शाबीर खान, चेतन अग्रवाल, आयुब पठाण, सुभाष थोरवे, भरत सुराणा, विनोद रणपिसे, स्वाती शिंदे, प्रियंका रणपिसे, शानी नैशाद, प्राची दुधाने, शिवानी माने, रोहिणी मल्लाव, संगिता क्षिरसागर, रवींद्र मोहिते, बाबा सय्यद, साहिल राऊत, सचिन बहिरट, गोरख पळसकर, सुभाष जाधव, अविनाश अडसूळ, जयकुमार ठोंबरे, नितीन जैन, सलीम शेख, ओंकार मोरे, नरेश धोत्रे, उमेश काची, किशोर मारणे, डॉ. अनुपम बेगी, राजू परदेशी भंडारी, महेंद्र चव्हाण, अश्फाक शेख, शकील ताजमहल, शाकिब आबाजी, इरफान खान, शाहरुख पठाण, नरेश धोत्रे, लहू जावळेकर, साहिल भिंगे, साईराज नाईक, अनिकेत वनकर, संतोष चव्हाण आदी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


News Title |Resolution of religious and social unity on the occasion of Congress party president Mallikarjun Kharge’s birthday

Pune Metro | गेल्या २४०० दिवसांमध्ये पुणे मेट्रो किती इंच पुढे सरकली? | मोहन जोशींचा संतप्त सवाल

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Metro | गेल्या २४०० दिवसांमध्ये पुणे मेट्रो किती इंच पुढे सरकली?

| मोहन जोशींचा संतप्त सवाल

Pune Metro | पुण्याची मेट्रो (Pune Metro) हे पुणेकरांचे स्वप्न असले तरी आता पूर्ण मेट्रो सुरु होण्यासाठी अजून किती वर्षे अथवा दशके थांबावे लागेल? कारण आता पिंपरी चिंचवडमधील (Pimpari Chinchwad) फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल रुग्णालय दरम्यानच्या एकूण १२ किलोमीटरच्या विस्तारित मार्गाचे उद्घाटन १५ जुलै रोजी होणार होते. त्याचे काय झाले? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) यांनी केला आहे.  (Pune Metro)
मोहन जोशी म्हणाले की, २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले भूमीपूजन आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने अवघ्या ५ किलोमीटर मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ६ मार्च २०२२ रोजी केलेले उद्घाटन म्हणजे निव्वळ धूळफेक होती. पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन होऊन आज २४०० दिवस होऊन गेले आहेत. या काळात अवघे ५ किलोमीटर मेट्रो मार्ग तयार झाले. आता पुढचे सुमारे २९-३० कि.मी. लांबीचे मेट्रो मार्ग पुरे होण्यास यापुढे किती वर्षे अथवा दशके लागतील हे भाजपाने जाहीर करावे. (Pune Metro News)
ते म्हणाले की, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे मेट्रोबाबत असंख्य वायदे केले. यावर्षी तर दर महिना ते वायदा करीत आहे. या वर्षी जानेवारी, नंतर मार्च, नंतर 1 मे, त्यानंतर जून आणि १५ जुलै असे वायदे त्यांनी केले.  तरी मेट्रो काही केल्या पुढे सरकत नाही. याचे नक्की गौडबंगाल काय आहे? पुणे मेट्रो प्रकल्प का रखडत आहे? या बाबत पालकमंत्र्यांनी पुणेकरांना उत्तर द्यायलाच हवे असे ते म्हणाले. (Congress Vs BJP)
———-
News Title |Pune Metro | How many inches has Pune Metro moved forward in last 2400 days?| Mohan Joshi’s angry question

Protest against Kirit Somaiya | पुण्यात कॉंग्रेस आणि शिवसेना महिला आघाडी कडून किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Protest against Kirit Somaiya | पुण्यात कॉंग्रेस आणि शिवसेना महिला आघाडी कडून किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन

Protest against Kirit Somaiya |पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (Pune Congress) वतीने भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्या प्रसार माध्यमात प्रसिध्द झालेल्या आक्षेपार्ह व्हिडिओ विरोधात टिळक रोड, ग्राहक पेठ समोर आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे  किरीट सोमय्या यांच्या अश्लील कृत्याचा निषेध शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या पुणे महिला आघाडीच्या (Shivsena Women wing) वतीने करण्यात आला. (Protest against Kirit Somaiya)

     यावेळी कॉंग्रेस शहाराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) म्हणाले की, ‘‘सातत्याने आपल्या विरोधकांवर बेछूट आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांचा खरा चेहरा आक्षेपार्ह व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांसमोर आला आहे. स्वत:ला चारित्र्यवान समजणारे किरीट सोमय्या यांचे चारित्र्यहीन दर्शन जनतेला झाले असून स्वच्छ प्रतिमेचे दाखले देणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी या प्रकरणी सोयीस्कर मौन बाळगले आहे. महिला वर्गावर सातत्याने अत्याचार व अपमान करणाऱ्या भाजप सरकारचा या आंदोलनाद्वारे आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व सोमय्या यांच्या या गलीच्छ कृतीबद्दल त्यांच्यावर उचित कायदेशीर कारवाई व्हावी.’’ (Pune News)

     यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, नीता रजपूत, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, अजित दरेकर, रफिक शेख, मेहबुब नदाफ, सुजित यादव, रमेश सकट, रविंद माझीरे, अक्षय माने, रजनी त्रिभुवन, सुंदरा ओव्हाळ, सीमा महाडिक, छाया जाधव, प्रकाश पवार, अश्विनी गवारे, सतिश पवार, सुनिल घाडगे, रमेश सोनकांबळे, अजित जाधव, रवि ननावरे, समीर गांधी, हेमंत राजभोज, आसिफ शेख, संतोष पाटोळे, विकी खन्ना, विशाल जाधव, बळीराम डोळे, संजय मोरे, लतेंद्र भिंगारे, संतोष डोके, शिवराज भोकरे, राहुल वंजारी, विल्सन चंदवेल, आशितोष शिंदे, नैनाताई सोनार, वंदना पोळ, मुक्ता शिंदे, संगीता कंधारे, नंदीनी कवडे, लीला भायगुडे, शोभा भगत, अनिता भायगुडे, सुविधा त्रिभुवन आदी उपस्थित होते.

शिवसेना महिला आघाडी शहर संघटीका सविताताई मते (Savita Mate)  म्हणाल्या की, त्या व्हिडिओ संदर्भात भाजपा किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करावी तसेच गृहमंत्री या प्रकरणाची चौकशी करून काय कारवाई करणार आहेत ते स्पष्ट करावे.

नगरसेविका पल्लवीताई जावळे म्हणाल्या, भाजप महिला नेत्या चित्रा वाघ आता का शांत बसल्या आहेत?, या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होते की किरीट हा विक्षिप्त माणूस आहे त्यावर कारवाई व्हावी .

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्यावतीने आंदोलनास शहर संघटीका सविता मते, माजी नगरसेविका व संघटीका पल्लवी जावळे, विद्या होडे,करूणा घाडगे, प्रज्ञा लोणकर, स्नेहल पाटोळे, गौरी चव्हाण,पद्मा सोरटे, रोहिणी कोल्हाल, भारती भोपळे, दिपाली राऊत, संगीता भिलारे, मीनाक्षी हरिशंद्रे, नमिता चव्हाण, अमृत पठारे, सुलभा तळेकर, स्वाती ठकार, शितल जाधव, अनुपमा मांगडे ,विजया मोहिते, शिल्पा पवार ,वत्सला घुले ,अनिता जांभूळकर ,स्नेहल आल्हट, वासंती शिरसाट, आशुताई शिरसाट, भारती दामजी, पल्लवी नागपुरे, वैशाली दिघे, विमल परदेसी, लता गुंजाळ, प्रियांका जव्हेरी, स्मिता पवार, दिपा भंडारी, नीलू गड्डम, बेबी म्हेत्रे इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या .


News Title |Protest against Kirit Somaiya from Congress and Shiv Sena Women’s Aghadi in Pune

Pune Congress Block President | पुणे काँग्रेस कडून 10 वर्षांपासून रखडलेल्या ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या

Categories
Breaking News Political पुणे

Pune Congress Block President | पुणे काँग्रेस कडून 10 वर्षांपासून रखडलेल्या ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या

| आगामी निवडणुकांची तयारी करण्याचे आदेश

Pune Congress Block President | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (INC Maharashtra) कमिटीच्या आदेशान्वये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (INC pune) वतीने आज काँग्रेस भवन (Congress Bhavan Pune) येथे नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांना (Block President) नियुक्तीची पत्र काँग्रेस पक्षाच्या विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. (Pune Congress Block President)

      येरवडा ब्लॉक – रमेश सकट, मार्केट यार्ड ब्लॉक – रमेश सोनकांबळे, भवानी ब्लॉक – सुजित यादव, पुणे कॅन्टोमेंन्ट – आसिफ शेख, शिवाजीनगर ब्लॉक – अजित जाधव, पर्वती ब्लॉक – संतोष पाटोळे, हडपसर ब्लॉक – बळिराम डोळे, बोपोडी ब्लॉक – विशाल जाधव, पं. नेहरू स्टेडियम ब्लॉक – हेमंत राजभोज, कोथरूड ब्लॉक – रविंद्र माझीरे, कसबा ब्लॉक – अक्षय माने आदींना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.

      यावेळी मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) म्हणाले की, ‘‘गेल्या ८ ते १० वर्षांपासून ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. जयपूर अधिवेशनामध्ये ५ वर्षांपेक्षा अधिक पदांवर असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होऊन नविन पदाधिकारी नेमणुकीचा ठराव त्यावेळी करण्यात आला होता. त्यानुसार आज काँग्रेस भवन येथे ह्या नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच सर्व नवनियुक्त अध्यक्षांकडून आगामी लोकसभा, विधानसभा व महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठी जबाबदारी असल्याचे शहराध्यक्षांनी यावेळी सांगितले तसेच आपापल्या ब्लॉकमध्ये नवीन मतदार नोंदणी, दुरूस्ती अभियान व पक्षाच्या बैठकांचे आयोजन करण्याचे आदेश दिले.’’

      सदर कार्यक्रमांप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, लता राजगुरू, दत्ता बहिरट, संगीता तिवारी, कमल व्‍यवहारे, बाळासाहेब दाभेकर, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, हनुमंत पवार आदी मान्यवरांसोबत सर्व जुने ब्लॉक अध्यक्ष व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

——

News Title | Pune Congress Block President | Appointments of block presidents stalled for 10 years by Pune Congress

 Pune Congress Agitation | वॉशिंग मशीन, वाशिंग पावडर ठेऊन काँग्रेसचे भाजपाच्या विरोधात तीव्र आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

 Pune Congress Agitation | वॉशिंग मशीन, वाशिंग पावडर ठेऊन काँग्रेसचे भाजपाच्या विरोधात तीव्र आंदोलन

 

Pune Congress Agitation |पुणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर (BJP Pune Office) काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुमारे अडीच तास तीव्र अभिनव असे आंदोलन (INC Pune Agitation) करण्यात आले. भाजपा वॉशिंग मशीन, मोदी वॉशिंग पावडर अशा विडंबन  माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचारी चेहरा उघड करण्यात आला. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi), आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), माजी राज्यमंत्री रमेश बागवे, गोपाळ दादा तिवारी, पूजा आनंद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या ठिकाणी प्रत्यक्ष वॉशिंग मशीन ठेवून त्यावर भाजपा वॉशिंग मशीन असे लिहिले होते. तसेच सोबत मोदी वॉशिंग पावडरही ठेवण्यात आली होती. (Pune Congress Agitation)

याप्रसंगी विविध घोषणांचे फलक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते – ‘इडी, सीबीआय, इनकम टॅसचे डाग धुवून मिळतील भाजपा वॉशिंग मशीन‘ ‘भारत मे पाप धोने के दो तरीके हैं… १) गंगा में स्नान २) BJP में छलांग…‘ ‘ मोदी वॉशिंग पावडर‘ अशा अनेक अभिनव घोषणांचे फलक हाती घेऊन कार्यकर्ते जोरदार घोषणा देत होते.


याप्रसंगी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) यांनी भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, देशातील महागाई, बेकारी आणि भ्रष्टाचार यामुळे पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही व मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही. हे लक्षात आल्यामुळेच इडी, सीबीआय आदिंचा वापर करुन भाजप छोटे पक्ष फोडत आहे आणि भ्रष्टाचाराचे आरोप असणार्‍यांना भाजपमध्ये घेत आहे. ही जनतेची आणि लोकशाहीची क्रुर थट्टा आहे. महाराष्ट्रात भाजपने केलेला फोडाफोडीचा तमाशा जनता बघत असून येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत जनता भाजपला पराभूत करेल असे ते म्हणाले.

या आंदोलनात कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. त्यामध्ये अविनाश बागवे, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, रफिक शेख, रमेश अय्यर, शाणी नौशाद, रजनी ताई त्रिभुवन, राजेंद्र शिरसाठ, सुनील मलके, अनिल सोंडकर, नुरुद्दीन सोमजी, मंजूर शेख, प्रशांत सुरसे, भूषण रानबरे, अजय पाटील, चैतन्य पुरंदरे, भरत सुराणा, मारुती माने, प्रवीण करपे, रमेश सकट, शोएब इनामदार, सुनील घाडगे, प्रदीप परदेशी, अजित जाधव, चेतन अग्रवाल, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, ओंकार मोरे, विशाल मलके, आशिष व्यवहारे, सुरेश कांबळे, गौरव बोराडे, नीलेश बोराटे, शाबीरखान आयुब पठाण, किशोर मारणे, संकेत गलांडे, साजिद शेख, प्रा. वाल्मिकी जगताप, सोमेश्वर बालगुडे, स्वाती शिंदे, प्रियंका रणपिसे, अंजली सोलापुरे, सुविधा त्रिभुवन, डॉ. गिरीजा शिंदे, सोनिया ओव्हाळ, आस्मा शेख, संगीता थोरात, ज्योती परदेशी, रेश्मा शिलेगावकर, कांता डोने, कविता गायकवाड, पपीता सोनवणे, मंदाकिनी नलावडे, शिवाजी सोनार, शिवाजी भोईटे, जीवन चाकणकर, विनोद रणपिसे, अनिल पवार, राजू शेख, विजय वारभुवन, ऋषिकेश बालगुडे, राजू नाणेकर, परवेज तांबोळी, गणेश भंडारी, जयकुमार ठोंबरे, निलेश मोटा, दीपक ओव्हळ, अॅनड. राजेंद्र काळबेर, फैय्याज शेख, असलम बागवान, नूर शेख, गणेश काकडे, रमेश राऊत, राजेश जाधव, डॉ. साठे, प्रसन्न मोरे, अनुप बेगी, अक्षय सोनवणे, गणेश साळुंखे, राजू देवकर, मंगेश थोरवे, गोरख पळसकर, साहिल राऊत, बंडू शेंडगे, विनायक तामकर, नरेश नलावडे, धनंजय भिलारे, अविनाश अडसूळ, सचिन बहिरट, बाबासाहेब गुंजाळ, निलेश धुमाळ, उमेश काची, सागर कांबळे, नितीन जैन, रफिक आलमेल, रनजीत गायकवाड, सुरेश नांगरे, सादिक लुकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.


News Title |Pune Congress Agitation | Intense agitation of Congress against BJP by keeping washing machine, washing powder

Rahul Gandhi | INC Pune | राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Rahul Gandhi | INC Pune | राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन

 

  Rahul Gandhi | INC Pune |  काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांच्या वक्तव्‍याबाबत गुजरातच्या एका भाजप नेत्याने  गुजरात न्यायालयात बदनामीचा खोटा आरोप करत खटला दाखला केला होता. या प्रकरणात दिवाणी व फौजदारी न्यायालयाने  राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निकालाला  राहुल गांधी यांनी गुजरात जिल्हा सत्र न्यायालयात (Gujrat Session Court) आव्‍हान दिले होते.  जिल्हा व सत्र न्यायालयाने खालच्या कोर्टाचा निकाल कायम ठेवल्याने या विरूध्द  गुजरात उच्च न्यायालयात आव्‍हान दिले होते. या प्रकरणी  गुजरात उच्च न्यायालयाने (Gujrat High Court) निकाल दिला असून गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. अशा या खोट्या मानहानी खटल्यात राहुलजी गांधी यांना अडकवल्याच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (INC Pune) वतीने आज बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आंदोलन करण्यात आले. (Rahul Gandhi | INC Pune)

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे (INC Pune President Arvind Shinde) म्हणाले की, ‘‘भाजपा विरोधात बोलणाऱ्यांवर खोट्या केसेस करून त्यांची तोंड बंद करण्याची गुजराती स्टाईल देशातील जनता गेल्या अनेक वर्षांपासून पहात आहे. मा. राहुलजी गांधी यांनी मोदी आणि अदानीच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्याने त्यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करत खटला दाखल करून त्यांची खासदारकी रद्द केली. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात खोटी तक्रार करुन राजकीय द्वेषातून ही जाणीवपूर्वक कारवाई केलेली आहे. मा. राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाचा अपमान केलेला नाही परंतु मा. राहुल गांधी यांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपा गलिच्छ राजकारणातून करत आहे. देशातील कायदे सर्वांना समान आहेत व काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देता येत नाही परंतु राजकीय द्वेषातून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोदी सरकारने विरोधी पक्ष संपविण्याचे षडयंत्र चालू केले आहे. लोकतंत्राची हत्या व पायमल्ली करण्याचे काम भाजप सरकार सध्या करीत आहे.’’

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, प्रा. विकास देशपांडे यांनी ही निषेधाचे भाषण केले.

यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, अजित दरेकर, वीरेंद्र किराड, गोपाळ तिवारी, बाळासाहेब दाभेकर, हाजी उस्मान तांबोळी, नीता रजपूत, लता राजुगरू, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, रजनी त्रिभुवन, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, ब्लॉक अध्यक्ष प्रदिप परदेशी, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, राजेंद्र भुतडा, सुनिल घाडगे, सचिन आडेकर, अशोक जैन, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, NSUI अध्यक्ष अभिजीत गोरे, महिला अध्यक्षा पुजा आनंद, सुनिल शिंदे, द. स. पोळेकर, वाल्मिक जगताप, भरत सुराणा, गुलाम खान, विनय ढेरे, अक्षय जैन, आशुतोष शिंदे, वाहिद निलगर, अविनाश अडसूळ, राज घलोत, रेखा घलोत, वैष्णवी किराड, परवेज तांबोळी, राजेंद्र पेशने, सुंदरा ओव्‍हाळ, ज्योती परदेशी, सीमा सावंत, घनश्याम निम्हण, श्रीकृष्ण बराटे, दिपक ओव्हाळ, राहुल तायडे, विनोद चौरे, सचिन भोसले, सईदभाई सय्यद, बाबा सय्यद, मुन्ना खंडेलवाल, लतेंद्र भिंगारे, पपिता ओव्‍हाळ, शारदा वीर, वैशाली रेड्डी, ॲड. राहुल ढाले, ॲड. फैय्याज शेख, ॲड. राजेंद्र काळेबेरे,  आदींसह असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलनाचे सूत्रसंचालन सुजित यादव यांनी केले तर आभार रवि आरडे यांनी मानले.

News Title |Rahul Gandhi | INC Pune | Agitation on behalf of Pune City District Congress Committee in support of Rahul Gandhi