PMC Administrative Officer | प्रशासन अधिकाऱ्याला सहायक आयुक्त पदाचा देण्यात आला पदभार! | लेखनिकी संवर्गाला न्याय मिळत असल्याची कर्मचाऱ्यांची भावना!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Administrative Officer | प्रशासन अधिकाऱ्याला सहायक आयुक्त पदाचा देण्यात आला पदभार!

| | लेखनिकी संवर्गाला न्याय मिळत असल्याची कर्मचाऱ्यांची भावना!

PMC Administrative Officer – (The Karbhari News Service) – महापालिका सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार लेखनिकी संवर्गातील प्रशासन अधिकाऱ्याला महापालिका सहायक आयुक्त (PMC Assistant Commissioner) या पदाचा पदभार देणे विधिग्राह्य असताना सरसकट उप अभियंता (Deputy Engineer) यांच्याकडे या पदाचा पदभार देण्यात येत होता.  त्यामुळे प्रशासन अधिकारी या पदावरील सेवकांवर अन्याय होत होता. मात्र प्रशासन अधिकाऱ्यांसाठी प्रशासनाने नुकताच एक सुखद धक्का दिला आहे. प्रशासन अधिकारी भास्कर महाडिक (Bhaskar Mahadik PMC) यांच्याकडे सहायक महापालिका आयुक्त पदाचा पदभार देण्यात आला आहे. महापालिका सहायक आयुक्त इंद्रायणी करचे (Indrayani Karache PMC) यांच्या रजा कालावधीतील हा पदभार महाडिक यांच्याकडे देण्यात आला आहे.  या आदेशामुळे लेखनिकी संवर्गावर (Clerical Cadre) होत असलेला अन्याय मनपा प्रशासनाने  दूर करण्याची सकारात्मक भूमिका घेतली असून प्रशासन अधिकारी या पदावरील सेवकांना न्याय दिला आहे. त्याबद्दल मनपातील सर्व सेवकांकडून प्रशासनाचे आभार मानले जात आहेत. (Pune Municipal Corporation)

: लेखनिकी संवर्गावर वारंवार केला गेला अन्याय

महापालिकेच्या सहायक महापालिका (PMC Assistant commissioner) आयुक्त पदाच्या अर्हता आणि नेमणुकीच्या पद्धतीत वारंवार बदल केला जात आहे. या पदाच्या 50% पदोन्नतीच्या (Promotion) पद्धतीत बदल केला गेला होता. प्रचलित पद्धतीनुसार सेवाज्येष्ठतेनुसार (Seniority) 50% पदोन्नती दिली जात होती. मात्र यात बदल करण्यात आला. त्यानुसार पदवी धारण करणारे अंतर्गत परीक्षेद्वारे वर्ग 1, 2 आणि 3 मधील कर्मचारी देखील सहायक आयुक्त होऊ शकतात. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच महापालिकेच्या मुख्य सभेने (pmc pune General body) मान्यता दिली होती व हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. मात्र यात अजून एक बदल केला गेला आहे. आता फक्त पदवीच (Degree) नाही तर पदविका (Diploma) धारण करणारा कर्मचारी देखील परीक्षा देऊन सहायक आयुक्त होऊ शकणार आहे. मात्र या माध्यमातून लेखनिकी संवर्गातून (clerical cadre) सहायक आयुक्त (Assistant Municipal commissioner, होण्याची मनीषा बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेदखल केले असल्याचे दिसून येत आहे. (PMC pune Assistant commissioner)
महापालिका सेवा नियमावली (PMC pune Service rules) नुसार सहायकमहापालिका आयुक्त पदासाठी अर्हता आणि नेमणुकीची पद्धत कशी करावी हे ठरवून दिले आहे. त्यानुसार त्याची साखळी देखील बनवण्यात आली होती. त्यामध्ये लेखनिकीसंवर्गासाठी अधीक्षक, प्रशासनअधिकारीसहायक आयुक्त, उपायुक्त आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त अशी आहे. तर तांत्रिक पदासाठी शाखा अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि शहर अभियंता अशी आहे. (PMC pune news)

: पदोन्नती मध्ये बदल

त्यानुसार प्रशासकीय सेवाश्रेणी – १ मधील  सहाय्यक आयुक्त (क्रिडा, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, स्थानिक संस्थाकर अधिक्षक, मालमत्ता व व्यवस्थापन, कर आकारणी व कर संकलन) या पदाची नेमणुकीची प्रचलित  पद्धत ही 25% नामनिर्देशन, पदोन्नती-५०% आणि प्रतिनियुक्ती 25% अशी होती. 50% पदोन्नती ही महापालिका कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठेतेनुसार केली जात होती. मात्र आता यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फक्त पदवीच नाही तर पदविका धारण करणारा कुठल्याही संवर्गातील कर्मचारी परीक्षा देऊन सहायक आयुक्त होऊ शकणार आहे. प्रशासनाने सेवा नियमावलीत हा बदल केला आहे. त्यामुळे लेखनिकी संवर्गात गेली 20-25 वर्ष काम करणारे, प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव असणारे कर्मचारी मात्र या नियमामुळे बेदखल होत आहेत. प्रत्येक संवर्गाची एक साखळी ठरलेली आहे. मात्र बदल करताना लेखनिकी संवर्गातील साखळीतच बदल करण्यात आला आहे. 

 
असे असले तरी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सुखद धक्का देत प्रशासन अधिकाऱ्याला थोडा काळ का होईना सहायक महापालिका आयुक्त पद दिले आहे. यामुळे सध्या तरी लेखनिकी संवर्ग समाधानी दिसत आहे.

PMC Pension Bill Clerk | बिल लेखनिक पेन्शन प्रकरणाचा स्वतःच्या स्तरावर करताहेत पाठपुरावा | अतिरिक्त आयुक्तांनी दिला प्रशासकीय कारवाईचा इशारा

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pension Bill Clerk | बिल लेखनिक पेन्शन प्रकरणाचा स्वतःच्या स्तरावर करताहेत पाठपुरावा | अतिरिक्त आयुक्तांनी दिला प्रशासकीय कारवाईचा इशारा

PMC Pension Bill Clerk  – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation (PMC) प्रशासनाकडील सेवानिवृत्त सेवकांचे पेन्शन प्रकरणे (PMC Retired Employees pension) चालवित असताना संबंधित बिल लेखनिक सदरचे पेन्शन प्रकरणे हातोहात ऑडीट अथवा इतर संबंधित विभागाकडे घेऊन जात असतात. तसेच परस्पर ऑडीट विभागाकडे मार्गदर्शन / त्रुटींची पुर्तता करण्यासाठी स्वतःच्या स्तरावर पाठपुरावा करत असतात. परिणामी यामध्ये वेळेचा अपव्यय होऊन कामकाजामध्ये कमालीची दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा बिल लेखनिकांवर कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade IAS) यांनी दिला आहे. (Pune PMC News)
 अतिरिक्त आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार एखादे पेन्शन प्रकरण किती वेळा फेर दुरुस्त / फेर सादर झाले, व कोणत्या स्तरावर त्रुटींची पुर्तता करण्यास विलंब लागला, याचा बोध होत नाही. त्यामुळे बिल लेखनिक यांना सूचीत करण्यात आले आहे की, यापुढे पेन्शन कामकाजामध्ये गतीमानता व सूसुत्रता आणण्याच्या दृष्टीने संबंधित बिल लेखनिक यांनी सदर पेन्शन प्रकरणांबाबत स्वतःच्या स्तरावर पाठपुरवा न करता, खात्यामार्फत पेन्शन प्रकरण ऑडीट विभागास जावक करावे. जेणेकरुन पेन्शन प्रकरणांची प्रत्येक टप्यावरील हालचालींच्या नोंदी राखता येईल.
तथापी बिल लेखनिकांनी ऑडीट विभागकडील (आवक व जावक स्वरुपात) लेखी नोंदी न ठेवल्यास व त्यामुळे पेन्शन प्रकणांत झालेल्या दिरंगाईस संबंधित बिल लेखनिकांस जबाबदार धरण्यात येऊन त्यांचेवर पुढील प्रशासकीय कारवाई प्रस्तवित करण्यात येईल. असा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे.

PMC Solid Waste Management Department Tender | घनकचरा विभागाच्या निविदा प्रक्रियेत ठेकेदाराने खोटी कागदपत्रे लावल्याचा पिपल्स युनियन पार्टीचा आरोप! 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Solid Waste Management Department Tender | घनकचरा विभागाच्या निविदा प्रक्रियेत ठेकेदाराने खोटी कागदपत्रे लावल्याचा पिपल्स युनियन पार्टीचा आरोप!

PMC Solid Waste Management Department Tender – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून (PMC Solid Waste Management Department)  रामटेकडी परिसरात 75 मेट्रिक टन चा सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मात्र यात भाग घेतलेल्या भूमी ग्रीन कंपनीने खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप पिपल्स युनियन पार्टीने केला आहे. शिवाय संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी पार्टीचे अध्यक्ष सुदेश दळवी यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. दरम्यान याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे कि आम्ही या प्रक्रियेची तपासणी करत आहोत. (Pune Municipal Corporation (PMC)

पार्टीच्या निवेदनानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील निविदेमध्ये भूमी ग्रीन एनर्जी या ठेकेदाराने सहभाग घेतला होता. या निविदेमध्ये बीड कॅपॅसिटी हे कागदपत्र आवश्यक होते. हे कागदपत्र भूमी ग्रीन एनर्जी यांनी जोडलेली नाही. त्यामुळे घनकचरा विभागाने संबधित ठेकेदाराकडून बीड
कॅपॅसिटी मागविली असता ठेकेदाराने खोटी बीड कॅपॅसिटी तयार करून मनपाकडे सादर केलेली आहे.  बीड कॅपॅसिटीवर 15 मार्च अशी तारीख नमूद आहे व UDIN No. चेक करता ही बीड कॅपॅसिटी 29 मार्च रोजी बनविलेली आहे असे निदर्शनास आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे कि, संबंधित ठेकेदार बाहेर चर्चा करत आहे की जर हे टेंडर त्याला मिळाले नाही तर तो संबधित अधिकाऱ्यावर दबाव टाकून हे टेंडर रद्द करणार आहे. तरी आपण भूमी ग्रीन एनर्जी यांनी खोटी कागदपत्रे लावून मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी संबधित चार्टर्ड अकौंटंट तसेच ठेकेदार यांचेवर कलम ४२० व अन्य लागू असलेल्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची फौजदारी कारवाई करावी.  अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात धाव घेवू. तसेच संबधित ठेकेदाराकडे असलेल्या अन्य विविध कामांच्या कागदपत्रांची तपासणी करावी. अशी मागणी दळवी यांनी केली आहे.
दरम्यान संबंधित ठेकेदाराला घनकचरा विभागाकडून करोडोंची कामे दिली आहेत. यात देखील खोटी कागदपत्रे सादर केली नसतील का? असा प्रश्न आता महापालिका वर्तुळात विचारला जात आहे.
संबंधित निविदा प्रक्रियेची आम्ही तपासणी करत आहोत. शिवाय आचारसंहिता काळात आम्ही कुठलीही वर्क ऑर्डर देणार नाही. तपासणीत काही वावगे आढळल्यास आम्ही त्याची गंभीर दखल घेऊ.
पृथ्वीराज बी पी, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा.  

Pune Heat Stroke | पुणे तापले; मात्र पुणेकर घेताहेत काळजी! गेल्या दोन वर्षात पुण्यात उष्माघाताचा एकही रुग्ण नाही!

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

Pune Heat Stroke  | पुणे तापले; मात्र पुणेकर घेताहेत काळजी! गेल्या दोन वर्षात पुण्यात उष्माघाताचा एकही रुग्ण नाही!

Pune Heat Stroke – (The Karbhari News Service) – राज्यात सगळीकडे उन्हाचा (Heat Wave) कडाका वाढला आहे. यात पुणे देखील मागे नाही. गेल्या काही दिवसापासून पुणे शहर (Pune Heat) चांगलेच तापू लागले आहे. पुण्याचा पारा 44 अंश पर्यंत जाऊन पोचला. मात्र पुणेकरांना या उन्हापासून आपला बचाव कसा करायचा हे चांगलेच माहित आहे. यामुळेच पुण्यात गेल्या दोन वर्षांपासून उष्माघाताचा (Heat Stroke) एकही रुग्ण पुणे शहरात आढळून आला नाही. अशी माहिती महापालिचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर (Dr Suryakant Devkar PMC)  यांनी दिली आहे. (PMC Health Department)
गेल्या आठवड्याभरापासून सगळीकडे उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. राज्यात उष्माघाताच्या रुग्णाची संख्या देखील वाढू लागली आहे. काही ठिकाणी या आजाराने रुग्ण दगावले देखील आहेत. पुण्यात मात्र गेल्या दोन वर्षांपासून उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही. नागरिकांनी स्वतः काळजी घेतली तर या आजाराचे रुग्ण दिसून येणार नाहीत. त्यामुळे स्वतःचा बचाव स्वतः करणे, हा यावरील एकमेव उपाय आहे.
पुणे शहरात ऊन जरी वाढलं असलं तरी नागरिक काळजी घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे दोन वर्षांपासून एकही रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी अशीच काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यायला हवं आहे. त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही. असे आव्हान पुणे मनपाचे आहे. उष्माघात चा पेशंट आला तर त्याची माहिती मुख्य कार्यालय येथे पोर्टल वर अपलोड करण्याचे आदेश आम्ही सर्व दवाखान्यांना दिले आहेत.
डॉ सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी. 

– पुणे महापालिकेने केले आहे आवाहन

सध्या शहराच्या तापमानात वाढ होत आहे. या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच उपचार न केल्यास उष्माघातामुळे व त्यामुळे होणाऱ्या डिहायड्रेशन ( जलशुष्कता ) मूळे मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे याबाबत काळजी घेण्याचे आवाहन पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार (Dr Bhagwan Pawar PMC) आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर (Dr Surykant Devkar PMC) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation Health Department)

उष्माघात होण्याची कारणे :-

उन्हात शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील
वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.

लक्षणे :-

मळमळ उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धवस्था इ.

अतिजोखमीच्या व्यक्ती:-

बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदयरोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिडाचे विकार इ.

प्रतिबंधात्मक उपाय :-

१. वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळणे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात असताना करावीत.
२. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सूती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे.
३. पाणी भरपूर प्यावे. डिहायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे.
४. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादी चा वापर करावा.
५. घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा.
६. पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्याना सोडू नका.
७. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या मनपाच्या आरोग्य केंद्रा/ रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधावा.

उपचार :-

१. रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
२. रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत, रुग्णाचे कपडे सैल करून त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी
होईपर्यंत पुसत राहावे.
३. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एयर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत.
४. रुग्ण शुद्धीवर आल्यास त्यास थंड पाणी, जलसंजीवनी द्यावे व डिहायड्रेशन टाळावे, चहा, कॉफी देऊ नये.
५. रुग्णाच्या काखेखाली आइसपॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवाव्यात.
६. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व 36.8 सेल्सिअस तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत.
७. नजीकच्या मनपा आरोग्य केंद्रात, रुग्णालय अथवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधावा. रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास 108 अॅम्बुलन्ससाठी कॉल करावा.

Maratha Reservation Survey | PMC Officers and Enumerators Payment | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांचे मानधन तिजोरीत तसेच पडून!   | मानधन वितरण बाबत निवडणूक विभागाची उदासीनता 

Categories
Breaking News PMC social पुणे

Maratha Reservation Survey | PMC Officers and Enumerators Payment | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांचे मानधन तिजोरीत तसेच पडून! 

 | मानधन वितरण बाबत निवडणूक विभागाची उदासीनता 

 

Maratha Reservation Survey Pune | PMC Officers and Enumerators Payment | पुण्यात पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC)) प्रगणकाद्वारे मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले.  14 लाख 30 हजार घरांचा सर्वे झाला. मात्र हे काम करणाऱ्या प्रगणक आणि अधिकाऱ्यांना अजून देखील मानधन देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाकडून हे मानधन अदा करण्यात आले आहे. ते महापालिका तिजोरीत गेली 15 दिवस झाले तसेच पडून आहे. महापालिका निवडणूक विभागाकडून निधी वितरण बाबत उदासीनता का दाखवली जात आहे, याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांकडून विचारणा केली जात आहे. (Maratha Reservation News)

महाराष्ट्र  शासनाने महाराष्ट्र  राज्य मागासवर्ग  आयोगाकडे (Maharashtra State Commission for Backward Classes) मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे  काम सोपवले होते. त्यानुसार पुणे शहरामध्ये  देखील मराठा समाज व खुल्या  प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण झाले.  सर्वेक्षण 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी  या कालावधीत पुणे मनपा (Pune Municipal Corporation) मार्फत नियुक्त केलेल्या 3 हजाराहून प्रगणकामार्फत (Enumerators) पूर्ण करण्यात  आले.   सर्वेक्षण  मनपा हद्दीतील घरोघरी जाऊन मोबाईल ॲप MSBCC वर livedata entry मार्फत  करण्यात आले. (Pune PMC News)

सर्वेक्षणाचे काम करणारे पर्यवेक्षक (Supervisor) आणि प्रगणक (Enumerator) यांना प्रत्येकी 10 हजार रुपये आणि प्रशिक्षणाकरिता प्रवास भत्ता 500 रुपये अदा करण्यात येणार आहे. हा निधी राज्य मागासवर्ग आयोगाकडून महापालिकेला देण्यात आला आहे. हा निधी वितरित करण्याचे आदेश आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. तसेच हा निधी नाही वापरला तर 90 दिवसाच्या आता जमा करावा. असे देखील आयोगाने म्हटले आहे.

सर्वेक्षणाच्या कामासाठी कर्मचारी लवकर घराच्या बाहेर पडत होते तर खूप उशिरा घरी परतत होते. असे असताना देखील कर्मचाऱ्यांना अजून पर्यंत मानधन मिळालेले नाही. विशेष हे आहे कि निधी आलेला असून देखील महापालिका निवडणूक विभागाकडून निधी वितरण बाबत उदासीनता दाखवली जात आहे.

दरम्यान याबाबत निवडणूक विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दिवसभरात त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

RTE Admission | आरटीई अंतर्गत राखीव जागांसाठी अर्ज करण्याचे पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे आवाहन!

Categories
Breaking News Education PMC social पुणे

RTE Admission | आरटीई अंतर्गत राखीव जागांसाठी अर्ज करण्याचे पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे आवाहन!

PMC Primary Education Department – (The Karbhari News Service) – शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) २५% राखीव जागांवरील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (ता. १६) सुरु झाली आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे (Sunanda Vakhare PMC) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation Primary Education Department)

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क व अधिनियम २०१२ मधील तरतुदीनुसार व सुधारित अधिसूचना 9 फेब्रुवारी नुसार सन २०२४-२५ या वर्षाची आर.टी.ई. २५% प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेंतर्गत १६ एप्रिल ते ३०/ एप्रिल या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी संकेतस्थळ.
https://student.maharashtra.gov.in/adm_portal

Pune PMC Voting Awareness |  पुणे शहरात मतदानाचा टक्का वाढविण्याबाबत पुणे महापालिकेत आढावा बैठक 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune PMC Voting Awareness |  पुणे शहरात मतदानाचा टक्का वाढविण्याबाबत पुणे महापालिकेत आढावा बैठक

Pune PMC Voting Awareness – (The Karbhari News Service) –  महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ (Loksabha Election 2024) पुणे शहरात मतदानाचा टक्का वाढविण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाय योजना करण्यासाठी आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation (PMC)

पुणे शहरात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पुणे महानगपालिके मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याची माहिती घेण्यात आली. सहायक महापालिका आयुक्त कार्यालय मार्फत मोठ्या प्रमाणावर मतदार जागृती अभियान राबविण्याच्या सूचना महापालिका आयुक्त यांनी दिल्या. (Pune PMC News)

याप्रसंगी  महापालिका आयुक्त यांनी सांगितले की, पुणे महानगरपालिका हद्दीत ३२६५ मतदान केंद्रे असून ३४ लाख मतदार आहेत. या सर्व केंद्रांवर आणि मतदारांकरीता सर्व प्रकारच्या उपाय योजना करण्यात याव्यात असे आदेश त्यांनी उपस्थित मा. खातेप्रमुख व मा. अधिकारी व कर्मचारी यांना दिले. याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त. (ज)  रवींद्र बिनवडे,  महेश पाटील, उप आयुक्त निवडणूक, राजू नंदकर , उप आयुक्त माध्यमिक व तांत्रिक विभाग,  राहुल जगताप माहिती व तंत्रज्ञान प्रमुख,  नितीन उदास उप आयुक्त समाज विकास विभाग, सुनील मते मा. महापालिका सहा. आयुक्त कर आकारणी व कर संकलन प्रमुख, इत्यादि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

PMC Water Supply Department | खैरेवाडीतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला | पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाने केली व्यवस्था 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Water Supply Department | खैरेवाडीतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला | पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाने केली व्यवस्था

No Water No Vote – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या खैरेवाडी परिसरात नागरिकांना भीषण पाणीटंचाई जाणवत होती. या त्रासाला कंटाळून नागरिकानी ‘नो वॉटर नो वोट’ अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. याबाबत जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी  गंभीरपणे लक्ष देत पुणे महापालिका आयुक्तांना (Pune Municipal Corporation Commissioner) यात लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. (PMC Water Supply Department)
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील खैरेवाडी परिसरातील नागरिकांनी पाणी टंचाईच्या त्रासाला कंटाळून मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत बॅनर लावले होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले होते. लोकांना मतदानावर बहिष्कार टाकण्यापासून परावृत्त करण्यासाठी लोकांना पाणी द्या, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ दिवसे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले होते. (Loksabha Election Voting)
याबाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी सांगितले कि, विद्यापीठ परिसरात  24*7 योजने अंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. ही टाकी कार्यान्वित करून त्याला खैरेवाडी भाग जोडून दिला आहे. त्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जगताप यांनी सांगितले कि  गणेशखिंड परिसरात रस्त्याचे काम चालू असल्याने बरीच पेंडिंग कामे होती. त्यामुळे पाणी मिळण्यास उशीर होत होता. मात्र आता जवळपास 5 हजार लोकांची पाण्याची समस्या सुटली आहे.

No Water No Vote – पाण्यामुळे नागरिकांना मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ येऊ देऊ नका | जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांचे पुणे महापालिका आयुक्तांना आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

No Water No Vote – पाण्यामुळे नागरिकांना मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ येऊ देऊ नका

| जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांचे पुणे महापालिका आयुक्तांना आदेश

No Water No Vote – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या काही भागांत नागरिकांना भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या त्रासाला कंटाळून नागरिक ‘नो वॉटर नो वोट’ अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी  गंभीरपणे लक्ष देत पुणे महापालिका आयुक्तांना (Pune Municipal Corporation Commissioner) यात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. (PMC Water Supply Department)
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील खैरेवाडी परिसरातील नागरिकांनी पाणी टंचाईच्या त्रासाला कंटाळून मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत बॅनर लावले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले आहे. (Loksabha Election Voting)
जिल्हाधिकारी कार्यालयाचा निवडणूक विभाग लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे आणि लोकांनी पुढे यावे म्हणून जनजागृती करत आहे. मात्र दुसरीकडे लोक मूलभूत समस्यांच्या अभावामुळे मतदानावर बहिष्कार घालण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय सतर्क झाले आहे. लोकांना बहिष्कार टाकण्यापासून परावृत्त करण्यासाठी लोकांना पाणी द्या, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ दिवसे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत.

 Shiv Sena opposes the privatization of PMC Laigude Hospital!

Categories
Breaking News PMC Political आरोग्य पुणे

 Shiv Sena opposes the privatization of Laigude Hospital!

 PMC Laigude Hospital Privatization – (The Karbhari news Service) – Shiv Sena Khadakwasla officials have alleged that the Pune Municipal Corporation (PMC) has laid the foundation for the privatization of Laigude Hospital on Sinhagad Road.  They protested in front and warned that if such an attempt is made in the future, they will cause severe agitation with the participation of citizens.(PMC Health Department)
 Since 2019 some people are trying for this.  This hospital is the only support for the common citizens of this area.  Common people are getting free treatment here.  People from Khadakwasla, Kirkatwadi, Nandoshi, Nanded and Dhairi areas of newly included villages come to this place for treatment.  Many patients were treated during Kovid period and Kovid center was also started.  It was useful to many citizens.
 Since two years, the machinery for the operation theater here is lying.  It has not been erected.  It was alleged that good quality materials are being scrapped.
 On this occasion, sub city chief Bharat Kumbharkar, sub district chief Ravi Mujumale, Nitin Wagh, Mahesh Pokle, Mahesh Mate, Bua Khatpe, Tanaji Pavle, Sachin Pasalkar, Manish Jagdale, Santosh Shelar, Raju Chavan, Arun Ghogre, Avinash Sarode, Mahesh Vite, Vinayak Nalavde,  Nana Margale, Raj Paigude, Shivabhau Pasalkar, Vijay Kolhe, Gokul Karanjawane, Tanaji Gadwe, Amol Dangat, Ketan Shinde, Amol Marathe, Aniket Deshmukh, Gurudutt Hagwane, Kalpesh Waje, Rajabhau Polekar, Mohan Gaikwad, Bhai Tamhankar, Gaurav Karanjawane were present.  .